Thursday 17 October 2024

एका विचाराने हातात हात घालून तालुक्याचा विकास करण्याचे काम करुया.ना.शंभूराज देसाई.


दौलतनगर दि.17-  गत दोन वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे सहकार्याने राज्यातील शिवसेना भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकारासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात यश आले. गावा-गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या अडचणी  लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार विविध विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परिणामी गावच्या गावे विकास प्रवाहात सामिल झाल्याचे चित्र सध्या दिसत असून शिवसेना पक्षामध्ये नव्याने पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना जुना-नवा असा भेदभान न करता यापुढे  सन्मानाची वागणूक देत एका विचाराने हातात हात घालून तालुक्याचा विकास करण्याचे काम करुया,असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांनी केले.

                 ते दौलतनगर,ता.पाटण येथे गत दोन वर्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संवाद मेळाव्याप्रसंगी  बोलत होते.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),चि.जयराज देसाई(दादा),शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲङमिलिंद पाटील,ॲङडी.पी.जाधव,संजय देशमुख,बबनराव शिंदे,प्रदिप पाटील,जालंदर पाटील,संतोष गिरी,भरत साळूंखे,प्रशांत पाटील,नामदेव साळूंखे,बाळासो खबाले पाटील,निलेश मोरे,विजय शिंदे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

                 यावेळी बोलताना ते पुढे  म्हणाले की, पाटण तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने गटा तटाच्या राजकारणाला सन 1980 साली सुरुवात झाली.पाटण तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये डोंगरा एवढ काम करणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांना या कालावधीत तालुक्यातील काही मंडळींनी जाणिव पूर्वक त्रास देण्याचे काम केले.त्रास देणाऱ्या या मंडळींनी त्यावेळी मनाचा मोठेपणा दाखवायच काम करायला हव   होतं पण प्रत्यक्षात तस झालं नाही. त्यामुळे विरोधकांकडे असलेली आमदारकीची सत्ता सर्व सामान्य जनतेच्या हातात यायला 21 वर्ष लागली. या काळात आपण अनेक प्रसंगांना सामोरे गेलो. सत्ता नसताना अनेक सुख दुखाचे प्रसंग अनुभवले,चढ उतार पाहायला मिळाले,पराभवांना सामोरे जावे लागले पण मैदान सोडले नाही. पराभवामुळे अनेकवेळा कार्यकर्ते दुखी व्हायचे  परंतु त्यांना धीर देत विजय मिळवायच्या हेतूने नेहमी प्रयत्नशील राहिलो.पराभवाच्या दुसऱ्या दिवशी  कामाला लागत स्वत:च्या नशिबात विजय नव्हता,स्वता:ला जबाबदार धरत पुन्हा जोमाने कामाला लागलो.आपला पक्ष संघटना वाढविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख यांनी ज्या भाजपा पक्षाच्या युतीच्या माध्यमातून मते मागून निवडणूक लढवली त्या भाजपा पक्षाशी फारकत घेत महाविकास आघाडीची स्थापना करत सत्ता स्थापन केली. आपण तालुक्यामध्ये ज्यांच्या विरोधात कायम पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून पिढयान पिढया लढलो त्यांच्या सोबतच आघाडी करण्याची वेळ आली.परंतु मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला आणि राज्यात पुन्हा भाजपा शिवसेना महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी  सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री  त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या.त्यामुळे मतदारसंघामध्ये संपर्क कमी झाला.परंतु असे असले तरी प्रत्येक आठवडयाच्या शनिवार व रविवारी मतदारसंघामध्ये येऊन जनता दरबार घेऊन लोकांच्या अडी अडचणी जागेवर सोडविण्याचा प्रयत्न केला.गत दोन वर्षामध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लावण्याचे काम केले. गावा गावांत वाडी वस्तीवर विकासाची कामे होऊ लागल्याने अनेक गावातील कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने  शिवसेना पक्षामध्ये मोठया प्रमाणांत जाहिर प्रवेश केले.अनेक गावे विकासाच्या प्रवाहात सामिल झाली.केवळ पक्षप्रवेश करुन आपण थांबलो नाही तर ज्या ज्या गावांना विकास कामांची आश्वासन दिली ती विकासाची कामे मंजूर करत मार्गी लावली.त्यामुळे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना विकासाच्या प्रवाहात आल्याचे निश्चत समाधान असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षामध्ये जूना नवा असा कदापि भेदभाव होणार नाही.आपण संघटना म्हणून एकत्र आलो आहे.गावाचा विकास साधण्याबरोबर आपली संघटना कशी वाढेल यासाठी सांघिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. आता निवडणुका जवळ आल्या की काही मंडळी फोन करत भावनिक आव्हाहन करत आहेत. ती विरोधकांची जूनी सवय आहे.त्यांच्या भावनिकतेला बळी  पडू नका. जेामाने विकासाचे काम करायच असल्याने महिनाभर एक एक मत मिळवण्यासाठी प्रयत्न करुया. कसल्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेना भाजपा महायुतीची ताकद अधिक बळकट करुया.

चौकट : तीच खरी श्रध्दांजली....

विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. दि. 20 नोव्हेंबर ही स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचा जयंती  दिन आहे. स्व.आबासाहेब यांचे अपूर्ण स्वप्न हे सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादने आपण पूर्ण करु शकलो.त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी 20 नोव्हेंबरला जास्तीत जास्त मतदान शिवसेना पक्षाला करुन जास्तीत जास्त मताधिक्याने निवडूण येण्यासाठी प्रयत्न करुयात तीच खरी स्व.शिवाजीराव देसाई (स्व.आबासाहेब) यांना श्रध्दांजली ठरेल असे ना.शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगीतले.


No comments:

Post a Comment