Friday, 26 June 2026

नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत 335 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश.

 

दौलतनगर दि.26: पाटण विधानसभा मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. ना.शंभूराज देसाई यांचे सातत्याचे पाठपुराव्यानुसार सन 2026-27चे आर्थिक वर्षात राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत 335 कोटी 50 लक्ष  रुपायांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

            प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदार संघातील कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग असलेला राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन हा दळण वळणसाठी  महत्त्वाचा असलेला राज्य मार्ग असून या मार्गावर मोठया प्रमाणांत वाहनांची वर्दळ असते.दरम्यान नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे या रस्त्याचे कामासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक तो प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यामध्ये पाटण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. पुरवणी मागण्यांद्वारे तालुक्यातील विकासकामांसाठी मोठा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला असून पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांनुसार राज्य मार्ग क्र. १४८ अंतर्गत नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेनोली स्टेशन रस्ता या महत्त्वाच्या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत तब्बल ३३५.५0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामामध्ये हेळवाक ते लेंडोरी आणि मोरगिरी ते मारुलहवेली फाटा या टप्प्यांतील कामांचा समावेश आहे.यामुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध होण्याबरोबरच शेती, व्यापार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांचा निधी.

              पावसाळी अधिवेशामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आला आहे. या निधीमुळे पाटण तालुक्यासह इतर तालुक्यांतील विकासकामांना गती मिळणार आहे.  मंत्री शंभुराज देसाई यांचा पाटण तालुक्याच्या विविध विकासकामांसाठी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा सुरु असतो. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने तालुक्याच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटण तालुक्यासाठी मंजूर झालेल्या या पुरवणी मागण्या केवळ आर्थिक तरतुदी नसून विकास आणि सामाजिक बांधिलकीचा समतोल साधणाऱ्या आहेत. एका बाजूला रस्ते विकासासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला मंत्री शंभूराज देसाई हे कोषाध्यक्ष असलेल्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने  तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment