Saturday, 13 January 2018

आमदार शंभूराज देसाई यांची अशीही बांधिलकी. लोकनेत्यांपासून तीन पिढयांशी ऋृणानुबंध असणारे शामराव मोहिते गुरुजींचा वाढदिवस घरी जावून केला साजरा.


  महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि पाटण तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पासून स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) ते आमदार शंभूराज देसाई या तीन पिढयांशी ऋृणानुबंध असणारी अनेक कुटुंबे मोठया संख्येने आजही पाटण तालुक्यात पहावयास मिळतात.त्यातीलच एक कुंटुब म्हणजे वांग मराठवाडी धरणप्रकल्पात बाधित झालेल्या उमरकांचन येथील शामराव मोहिते गुरुजी यांचे मोहिते कुटुंब.लोकनेत्यांपासून देसाई कुटुबिंयाच्या तीन पिढयांशी जिव्हाळयाचे ऋृणानुबंध असणारे शामराव मोहिते गुरुजी यांचा दि.१० जानेवारी रोजी ९८ वा वाढदिवस देसाई कुटुबांचे तिस-या पिढीचे नेतृत्व करणारे तालुक्याचे लोकप्रिय उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी आवर्जुन वेळ काढून मोहिते गुरुजींच्या घरी जावून त्यांचा मानाची शाल,श्रीफळ देवून व पेढे भरवून साजरा करीत समाजाशी आणि देसाई कुटुंबावर प्रेम करणा-या कुटुंबाबरोबरची सामाजिक बांधिलकी जपली.आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यावर गाढा विश्वास असणारे मोहिते गुरुजीं आबा या बांधिलकीमुळे भारावून गेले.
  लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचीत असणारे शामराव मोहिते गुरुजी आबा यांच्याविषयी आमदार शंभूराज देसाई यांना नेहमीच जिव्हाळा आणि आपुलकी राहिली आहे.ढेबेवाडी विभागातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा शामराव मोहिते गुरुजी कार्यक्रमास येतात तेव्हा तेव्हा आमदार शंभूराज देसाई हे आवर्जुन आबांच्या तब्बतेची विचारपुस करुन त्यांच्याविषयीचा जिव्हाळा व्यक्त करतात.स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) आणि मोहिते गुरुजी यांचे घनिष्ट ऋृणानुबंध होते.लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) आणि आता आमदार शंभूराज देसाई यांचे कार्य जवळून पाहिलेला मी एक कार्यकर्ता आहे लोकनेत्यांचे सर्व गुण आमदार शंभूराज देसाईंनी आत्मसात केले आहेत. जनतेच्या प्रश्नाविषयी आपल्या आजोबांप्रमाणे नातवाचाही जीव तीळ तीळ तुटतो हे पाहण्याचे भाग्य मला मिळाले आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव मी जवळून घेतला आहे. आमच्या धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सुटले पाहिजेत याकरीता शासनदरबारी भांडणारा नेता आम्हाला मिळाला. आज आमदार शंभूराज देसाई यांच्यामुळेच आमच्या उमरकांचन येथील धरणग्रस्तांना न्याय मिळाला आहे. त्यांचा शासनाकडे सातत्याचा पाठपुरावा हेच धरणग्रस्तांचे प्रश्न सुटण्यामागचे गमक आहे. आणि ही धमक केवळ आमदार शंभूराज देसाईंच्यात आहे माझया त्यांच्या कार्याला शुभेच्छा तर आहेतच परंतू वयाने मोठा म्हणून आर्शिवादही आहेत.असे मोहिते गुरुजी अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगतात. त्याचबरोबर अशा या कर्तृत्ववान व्यक्तीस महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी सदिच्छाही गुरुजी अनेकदा आमदार शंभूराज देसाई यांच्याविषयी बोलून दाखवितात.
    प्राथमिक शिक्षक ते मुख्याध्यापक ते तालुका मास्तर म्हणून शैक्षणिक कार्यात उमरकांचन, सोनवडे, सणबूर, गारवडे आणि कुंभारगांव या गावातील प्राथमिक शाळांमधून काम करीत त्यांनी या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.४० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात काम केलेले मोहिते गुरुजी मौजे कुंभारगांव शाळेत सन १९७८ ला सेवानिवृत्त झाले. मोहिते आबांचा जन्म दि.१० जानेवारी १९२० रोजी झाला. सामाजिक बांधिलकीतून काम करताना त्यांनी सन १९८० ते ८५ मध्ये उमरकांचन गावचे सरपंच म्हणूनही काम पाहिले. आज त्यांनी ९९ व्या वर्षात पदार्पण केले असले तरी वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील एक धरणग्रस्त म्हणून १९९७ पासून धरणग्रस्तांच्या न्यायहक्काकरीता लढा देत असताना तरुणांनाही लाजवेल असा जोश त्यांच्यामध्ये पहावयास मिळतो. उमरकांचन येथील सर्वात मोठे कुटुंब म्हणून या मोहिते कुटुंबाकडे पाहिले जाते. एकूण आठ भावाचे हे कुटुंब पाटण तालुक्यात गटातटाच्या राजकारणात कधीच डगमगले नाही. आमचा एकच गट आणि एकच नेता देसाई कुटुंब असे ठणकावून सांगणारे मोहिते गुरुजी व त्यांच्या कुटुंबाने लोकनेतेसाहेब यांच्या पासून आमदार शंभूराज देसाई यांच्या पर्यंतच्या राजकारणातील अनेक चढउतार पाहिले परंतू देसाई कुटुंबांशी असणारी नाळ त्यांनी कधी तोडू दिली नाही. सत्ता असो वा नसो या कुटुंबाने देसाई कुटुबांच्या तीन पिढयाशी असणारे जिव्हाळयाचे ऋृणानुबंध नेहमीच कायम ठेवले आहेत म्हणूनच एक सामाजिक बांधीलकीची जपणूक करण्याकरीता आपण आबांच्या घरी जावून त्यांचा ९९ वा वाढदिवस साजरा करायचा असे आमदार शंभूराज देसाईंनी ठरविले आणि आबांच्या घरी जावून आंबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून आंबाना दिर्घायुष्य लाभावे अश्या सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
साहेब, सुदाम्याघरचे पोहे खायला कधी येणार?

वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार शंभूराज देसाईंनी मोहिते गुरुजींना शुभेच्छा देत असताना या शुभेच्छांचा स्विकार करतो पण साहेब, सुदाम्याघरचे पोहे खायला घरी परत कधी येणार? असा प्रश्न आबांनी साहेबांना विचारला तेव्हा आबा लवकरच येतो असे आमदार शंभूराज देसाईंनी आबांना सांगितले तेव्हा आबांच्या चेह-यावर आलेली उजाळी लपून राहीली नाही.

दादाचा पुळका आणणा-योंनो, २०१७ पर्यंत बंधा-याचे काम तुमच्या दादांना का करता आले नाही ? आमदार शंभूराज देसाईंचे कार्यकर्ते राष्ट्रवादी विरोधात आक्रमक.


दादाचा पुळका आणणा-योंनो यालाच म्हणायचे खोट बोल पण रेटून बोल. तत्कालीन जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन तुमच्या दादांनी २००८-२००९ ला आमदार नसतानाही खळयाच्या बंधा-याकरीता निधी मंजुर करुन आणला होता तर तुमचेच दादा २००९ ते २०१४ पर्यंत या तालुक्याचे आमदार होते. मग या पाच वर्षाच्या काळात तुमच्या दादांना या बंधा-याचे काम का पुर्ण करुन घेता आले नाही. आज २०१८ उजाडले आहे याचे तरी भान ठेवा. आमचे नेते आमदार शंभूराज देसाईसाहेब यांच्यामध्ये धमक असल्यानेच त्यांच्याच काळात बंधा-याचे काम सुरु झाले असून न केलेल्या कामांचे श्रेय घेणे राष्ट्रवादीकरोंनो तुम्हीच बंद करा. असा प्रतिटोला खळे गावातील आमदार शंभूराज देसाईंचे समर्थकांनी या विभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रसिध्दीपत्रकाव्दारे लगावला आहे.
ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादीच्या विशेषत: माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचा पुळका आणणा-यांनी खळे बंधा-यांच्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा जो देखावा लावला आहे. त्याला आमदार शंभूराज देसाई यांच्या खळे गावातील समर्थकांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

आमदार शंभूराज देसाई यांच्या समर्थकांनी पत्रकात म्हंटले आहे की,  माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हे आमदार नसताना त्यांनी पाठपुरावा करून २००८-२००९ ला खळे गावातील नदीवरील केटीवेअर बंधारा बांधकामासाठी निधी मंजूर करून आणला असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्यांच्या समर्थकांना एवढेही भान राहिले नाही आज २०१८ साल उजाडले आहे. तुमच्या दादांनी सन २००८-२००९ ला या कामांसाठी तत्कालीन जलसंपदामंत्री यांचेकडे पाठपुरावा करुन या कामासाठी निधी आणला असेल तर लगेचच झालेल्या २००९ च्या विधानसभा निवडणूकीत काठावर ५८० मतांनी तुमचेच दादा आमदार झाले होते त्यांना २००९ नंतर २०१४ पर्यंत या बंधा-याचे काम पुर्ण करुन घेण्यास पाच वर्षाचा कालावधी त्यांच्याजवळ होता. मग या पाच वर्षात या बंधा-याचे काम तुमचे दादा का पुर्ण करु शकले नाहीत याचे उत्तर पहिल्यांदा दादांचा पुळका आणणा-यांनी या विभागातील जनतेला दयावे. अहो खोट बोलायचे पण किती ? याचे तरी भान ठेवा. माजी आमदारांप्रमाणे तुम्हीही खोट बोल पण रेटून बोल.ही घेत असलेली भूमिका आपल्या विभागाच्या दृष्टीने हानीकारक आहे.२००९ ला आमदार झालेल्या पाटणकरदादांना महाराष्ट्रात व दिल्लीत आघाडी शासनाची सत्ता असतानाही खळे बंधाऱ्याची एक वीटही का हलविता आली नाही ? पाच वर्षे नुसते जनतेला झुलवत ठेवले आणि आता आमचे नेते आमदार शंभूराज देसाईसाहेब यांच्या प्रयत्नातून बंधा-याचे काम पुर्ण होत आहे हे दिसायला लागले की पाटणकर दादांप्रमाणे आले फुकटचे श्रेय घ्यायला. ज्यांना दहा वर्षांपासून खळे गावातील ग्रामपंचायत व सेवासोसायटीची सत्ता राखता आली नाही जनतेने गावातील विकासकामाचा लेखाजोखा ओळखून आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले त्यांमुळे विरोधकांनी आम्हाला श्रेयवादाचे राजकारण शिकवु नये जर त्यांना एवढाच उन्माद असेल तर येणार्‍या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांची धमक आणि ताकद किती आहे हे आम्ही दाखवून देवू असा निर्वाणीचा इशारा देत कुंभारगाव जि प मतदारसंघ हा आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्लाच राहणार आहे. खळे गावातील ग्रामपंचायत व सेवा सोसायटी व ग्रामस्थ गेल्या दहा वर्षापासून आमदार शंभूराज देसाईसाहेब यांना मानणारे आहेत खळ्याच्या जनतेने त्यांच्यावर अलोट प्रेम केले आहे त्याचेच प्रतीक म्हणून तिसऱ्यांदा या बंधा-याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते आम्ही करुन घेतले आहे कारण आम्हाला आणि तुम्हालाही माहिती आहे की, खळे बंधा-यांचे काम पुर्ण करुन घेण्याचे धमक आणि ताकद फक्त आणि फक्त आमदार शंभूराज देसाई यांच्यामध्येच आहे. आमदार शंभूराज देसाईसाहेब खळे गावात आले आणि भूमिपुजन करुन गेल्यानंतर प्रत्यक्षात बंधा-याच्या कामालाही सुरुवात झाली. तुमच्या दादासारखे आमच्या साहेबांना या बंधा-याचे काम पुर्ण करुन घ्यायला १० वर्षे लागणार नाहीत असा टोलाही त्यांनी पत्रकात लगाविला आहे. पत्रकावर खळे गावचे सरपंच संदीप टोळे,सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गजानन कचरे व शंभुराज युवा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल कचरे, महादेव कचरे,नामदेव कचरे यांच्या सह गावातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या सहया आहेत.  

एकीमुळे गावाचा विकास होतो हे केळोली गावाने दाखवून दिले. आमदार शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन.


गावची सत्ता एकी करुन विरोधकांच्या ताब्यातून काढून घेत चांगल्या विचारांच्या ताब्यात घेतल्यामुळे आणि गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकी दाखविल्यामुळे गावचा विकास कसा साध्य करुन घेता येतो हे चाफळ भागातील केळोली गावाने दाखवून दिले आहे. केळोली गावाचा आदर्श मतदारसंघातील इतर गावांनीही घ्यावा असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
केळोली ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांच्या निधीतुन उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे उदघाटन व गावाला जोडणारा रस्ता याचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते घेण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड मिलींद पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटील,जिल्हा परिषद माजी सदस्य दत्तात्रय वेल्हाळ, डी.वाय पाटील, माजी संचालक बी.आर.पाटील,प्रकाश नेवगे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष व शंभूराज युवा संघटना अध्यक्ष भरत साळुंखे, उपाध्यक्ष अभिजीत पाटील, शिवदौलत बँक संचालक चंद्रकांत पाटील,संरपच सौ.युमुना मोरे,उपसरपंच संतोष साळुंखे,सदस्य वंदना सुतार,उषा काकडे,दिनकर साळुंखे,श्रीरंग साळुंखे,परशुराम मोरे, राजाराम सुतार,दिलीप सपकाळ,शंकर मोरे,बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.माने,शाखा अभियंता घुटे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, दोन वर्षापुर्वी केळोली गावची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि अनेक वर्षे विरोधकांच्या ताब्यात असणारी केळोली ग्रामपंचायतीत कोणत्याही परिस्थितीत सत्तातंर करायचे ही भूमिका संपुर्ण गावाने एकी करुन घेतली आणि विरोधकांच्या ताब्यात असणारी ग्रामपंचायत चांगल्या विचारांच्या ताब्यात देण्याचे काम गावातील ग्रामस्थांनी केले. ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्काराला ग्रामस्थांनी मला बोलविले.आणि आता या सदस्यांना बसण्याकरीता चांगली ग्रामपंचायत बांधून दया अशी आग्रही मागणी माझेकडे केली.ग्रामस्थांच्या मागणीच्या दुस-याच वर्षी या ग्रामपंचायतीच्या चांगल्या उभारलेल्या वास्तूचे माझेहस्ते उदघाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे. गावाच्या दर्शनी उभारलेली ही वास्तू ही इतर गांवाना आदर्श देणारी वास्तू आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आपण गावाला जोडणारा संपुर्ण रस्ता, गावाच्या वरील बाजूस लघु पाटबंधारे विभागाकडून बंधारा बांधण्याचे काम केले. एका वर्षात गावामध्ये सुमारे ५५ लक्ष रुपयांचा निधी आपण ग्रामस्थांना मिळवून दिला त्या निधीचे कामे गांवामध्ये आज पुर्ण झालेली पहावयास मिळत आहेत. असे सांगून ते म्हणाले, अशाप्रकारची कामे या विभागातील प्रत्येक गांवामध्ये पुर्ण झाली आहेत तर काही सुरु आहेत. तरीही आपल्या विरोधकांना विकासाची कुठे कामे सुरु आहेत असा प्रश्न पडला आहे. आपण केलेली विकासकामे ही विरोधकांचे डोळे दिपवणारी असल्यामुळेच कांमे दिसत असूनही ती दिसत नसल्याचा डांगोरा विरोधकांकडून पिटला जात आहे. विरोधकाकडे आज देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे जनतेमध्ये बुध्दीभेद कसा निर्माण करायचा हाच त्यांचा प्रयत्न राहिला आहे आणि भविष्यातही राहणार आहे त्यामुळे गावांनी आणि गावांतील ग्रामस्थांनी जागरुक रहाणे गरजेचे आहे. विकास नेमका कोण करतय हे तालुक्यातील जनता उघडया डोळयांनी पहात आहे. आता केळोली गावाचेचे उदाहरण घ्या विरोधकांच्या ताब्यात ग्रामपंचायतीची सत्ता होती तेव्हा ग्रामपंचायतीच्या इमारतीची काय अवस्था होती आणि आता ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीची काय अवस्था आहे. हा फरक आहे विकासाचा दृष्टीकोन असल्याचा.मी गेल्या ३० वर्षात विकासाच्या मुद्दायावरच जनतेच्या दारात निवडणूकांच्या काळात मते मागायला गेलो आणि विकासाचाच मुद्दा घेवून भविष्यातही मी मतदारांपुढे जाणार आहे. माझेप्रमाणे विरोधक कोणता मुद्दा घेवून मतदारांच्या दारात येणार आहेत याचा विचार मतदारसंघातील जनतेने करावा आणि गावाच्या विकासाची जबाबदारी घेणा-या नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत शंकर मोरे यांनी करुन आभार मानले.
चौकट:-राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त अभिवादन.

उदघाटन व भूमिपुजन कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्वराज्य संकल्प निर्मितीच्या संस्थापिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणा-या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन आमदार शंभूराज देसाई यांनी राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन केले. अभिवादन करताना आम्ही जिजाऊच्या लेकी म्हणत केळोली गावातील सर्व महिला या आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबर राजमाता जिजाऊना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यास आवर्जुन उपस्थित होत्या.

Thursday, 11 January 2018

पाटणकरसाहेब, खरोखरच कामे केली असतील तर, मग आव्हानाला घाबरता कशाला ? वाडयात बसून पत्रके काढण्यापेक्षा जनतेपुढे येण्याचे आव्हान स्विकारा ना ? .:- आमदार शंभूराज देसाई आव्हानांवर ठाम.


पाटणकरसाहेब आपण तालुक्याचे सहावेळा कसे आमदार झालात हे मी सांगायला नको.तुमचे तुम्हाला ते चांगलेच माहिती आहे.इलेक्ट्रानिक मशिनीव्दारे मतदानाची प्रक्रिया सुरु होण्याअगोदर तुमच्या बगलबच्च्यांकडून डोंगरपठारावरील मयत व्यक्तींच्याही मारलेल्या बोगस मतांमुळेच तुम्हाला आमदार होण्याची संधी मिळाली हे जगजाहीर आहे.वाडयात बसून पत्रके काढण्यापेक्षा तुम्ही खरोखरच कामे केली असतील तर मग मी दिलेल्या आव्हानांना घाबरता कशाला? माझयासारखे जनतेत उभे राहून जनतेपुढे येण्याचे आव्हान स्विकारा ना? असे प्रतिउत्तर आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांच्या पत्रकावर देवून पाटणकरांकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही असे सांगत पाटणकरांकडे खरोखरच काही असेल तर दुध का दुध,पाणी का पाणी होण्याकरीता त्यांनी माझे आव्हान स्विकारावेच. मतदारसंघातील जनता ठरवेल कोण कामांचा अन्‍ कोण निष्क्रीय आहे ते. असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले व पाटणकरांना दिलेल्या आव्हानांवर आजही मी ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
   डाकेवाडी ता.पाटण याठिकाणी जिल्हा वार्षिक आराखडयातून मंजुर झालेल्या डाकेवाडी ते सलतेवाडी या दोन गांवाना जोडणा-या रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. या रस्त्याच्या कामांसाठी त्यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे,पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,पंचायत समिती माजी सदस्य रघूनाथ माटेकर, माजी संचालक बबनराव पाटील,किसनशेठ मोरे,सरपंच राजेश चव्हाण, माजी सरपंच नारायण चव्हाण,अशोक मोरे,संपत शिंदे,भरत चव्हाण,शिवाजी सावंत,संजय टेळे महाराज, रामचंद्र चव्हाण, रामचंद्र सलते, सदाशिव शेलार,बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.माने,शाखा अभियंता कांबळे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

      याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटणकरसाहेब,मी तुमच्या पोराच्याच वयाचा आहे.पोराच्या नादाला लागा असे मी म्हणत नाही.माझे म्हणणे एकच आहे, तुम्ही खरोखरच भरीव कामे केली असतील तर मग जनतेसमोर येवून सांगा ते सांगायला तुम्ही घाबरताय कशाला? जनतेला सांगण्यासारखे तुमच्याकडे काहीच नाही हे याच पोराला माहिती आहे.याच पोराने तुम्हाला राज्याचे मंत्री असताना घरी बसविले होते याचा विसर पडला की काय? शंभूराज देसाई लोकनेत्यांचा नातू आहे धडकी मला नाही तुम्हाला माझया कामाची भरली आहे. म्हणूनच तुमची आगपाखड सुरु आहे. मी भित्रा असतो तर वयाच्या २१ व्या वर्षापासून तुमच्याबरोबर लढा दिला नसता तुमच्याबरोबर मी दिलेल्या लढयाची आकडेवारी जरा काढून पहा. ७३६ आणि ५८० मतांनी दोन वेळा निवडून आलात त्यावेळसच तुमचे अस्तित्व काय आहे हे तालुक्यातील जनतेने ओळखले होते.पहिल्यावेळेसच फेरमतमोजणी घेतली असती तर सहावेळा आमदार झाल्याच्या बढाया मारण्याची संधी तुम्हाला मिळाली नसती.तुमच्या वाढदिवसाच्या चाफळच्या कार्यक्रमात तुम्ही व तुमच्या सुपुत्राने मला पाण्यात पाहण्याचा उद्योग केल्यामुळेच मलाही तुमची निष्क्रीयता जनतेसमोर आणावी लागली. तुमचे नाव घेण्याची इथे कुणाला हौस आहे. विक्रम नोंदविणारे आणि सत्य सांगण्यासारखे तुमच्या नावात काय आहे हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे. तुमच्या मुलाचे कतृत्व काय आहे मी दोनवेळा कारखान्याच्या निवडणूकीत आणि २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत तुम्हाला दाखवून दिले आहे.२००९ ला मला शेवठचे मतदान करा असे भावनिक आव्हान तुम्ही करीत बसलात म्हणून ५८० मतांनी माझा पराभव झाला.माझी पात्रता काय आहे हे तालुक्यातील जनतेने सिध्द करुन दाखविल्यानेच मला आमदार आणि तुम्हाला माजी आमदार पदवी जनतेने दिली आहे.असे सांगून ते म्हणाले, मी २०० व ५०० मीटर रस्त्यांची भूमिपुजने करतोय होय करतोयच परंतू तीही तुम्ही आमदार असताना करु शकला नाहीत. तुमच्या आमदारकीच्या काळात एका वर्षात जेवढा निधी तुम्ही आणला असेल तेवढया रक्कमेच्या निधीच्या कामांची भूमिपुजने मी एका दिवसात करतो म्हणूनच २०० व ५०० मीटरच्या रस्त्याबरोबर ४ ते ५ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे तालुक्यात सुरु आहेत. सार्वजनीक बांधकाम विभागाकडून विशेष दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत दरवर्षी कामे येतात सांगणारे पाटणकरसाहेब तुमच्या आमदारकीच्या काळात का ही कामे आली नाहीत. पवनचक्की प्रकल्प उभारले म्हणून सांगता पण तिथला शेतकरी आणि त्यांची कुटुंबे रस्त्यावर आणलीत त्यांना देशाधडीला लावलेत यालाच तुमची सभ्यता आणि सुसंस्कृतपणा म्हणायचा का? खळे बंधा-याचा पाया यापुर्वीच भरला होता सांगणा-या पाटणकरांनी तो कुणी भरला हे नाही सांगितले तो पाया सन २००९ मध्ये शंभूराज देसाईंनीच भरला होता. परंतू तुमच्या काळात २००९ ते २०१४ त्याला एक रुपाया देखील तुम्हाला आणता आला नाही. २० टक्के समाजकारण आणि ८० टक्के अर्थकारण करणा-या पाटणकरांना तालुक्यातील जनतेची काळजी किती आहे हे त्यांच्या निष्क्रीय कारभारातूनच तालुक्यातील जनतेने दाखवून दिले आहे.असे ते शेवठी म्हणाले. उपस्थितांचे स्वागत आनंदा मोरे यांनी करुन आभार मानले.

Monday, 8 January 2018

विकासकामांना निधी आणायला आमदार म्हणून कुठे कमी पडलो नाही आणि पडणार नाही .:- आमदार शंभूराज देसाई.


     माझे तीन वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकालात मतदारसंघात सुरु असलेला सर्वांगीण विकास विरोधकांना दिसत नाही असे नाही तो दिसतोय पंरतू तो दिसला तर विरोधकांचे काम काय? तीन वर्षात मतदारसंघात प्रलंबीत असणारी अनेक कामे मार्गी लावण्याकरीता या तालुक्याचा आमदार म्हणून माझे प्रयत्न मी प्रमाणिकपणे करीत आहे. या विकासकामांना आवश्यक असणारा निधी आणायला मतदारसंघाचा आमदार म्हणून गत तीन वर्षात मी कुठे कमी पडलो नाही आणि भविष्यातही कमी पडणार नाही अशी ग्वाही आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.
     मोरगिरी ता.पाटण याठिकाणी पेठशिवापुर मोरगिरी गांवास जोडणा-या रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती सदस्या सौ.निर्मला देसाई, सदस्य संतोष गिरी, माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील, बशीर खोंदू, पंचायत समिती माजी सदस्य नथूराम कुंभार,ॲड.मारुती देसाई,गणेश भिसे,संपत कोळेकर,बांधकाम विभागाचे शाखाअभियंता वायदंडे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

    याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, विरोधासाठी विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे.त्यांनी विरोधक म्हणून विरोध नाही केला तर त्यांना विरोधक कोण म्हणणार.परंतू विरोधकांच्या कार्यकालात पाटण मतदारसंघाची अवस्था काय होती आणि आता तीन वर्षात पाटण मतदारसंघात कशाप्रकारे बदल झाला आहे याची तुलना मतदारसंघातील जनता करु लागली आहे.गत पाच वर्षात विरोधकांच्या काळात पाटण मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी जेवढा निधी आला नाही त्याहून अधिक निधी या तीन वर्षात तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील रस्त्याच्या कामांसाठी आणण्यास मला यश मिळाले आहे. आता बांधकाम मंत्री असताना जेवढा निधी बांधकाम मंत्री यांनी मतदारसंघात आणला नाही त्यापेक्षा जास्त निधी जर आमदार म्हणून मी मतदारसंघात आणत असेल तर विरोधकांना त्याचे वाईट वाटणे सहाजिक आहे. या रस्त्याच्या कामांना माजी आमदारपुत्र खड्डे भरणे म्हणत असतील तर माजी आमदारपुत्रांनी एकदा तालुक्याच्या डोंगरद-यात फिरावे म्हणजे त्यांच्या लक्षात येईल कुठे आणि कशाप्रकारचे रस्ते झाले आहेत. माजी बांधकाम मंत्री यांचे ते सुपुत्र आहेत म्हंटलयावर बांधकामचे काम त्यांच्या पुर्णत: लक्षात येईल. परंतू माजी आमदारपुत्र जी टिका करीत आहेत त्यांच्या टिकेकडे मी लक्ष देत नाही. आपण काम करीत राहणे विरोधकांचे कामच आहे टिकाटिपणी करणे कारण त्यांच्याकडे जनतेला देण्यासारखे काही नाहीच तर ते दुसरे काय करणार? असा सवाल करुन ते म्हणाले, राज्यात आपली सत्ता आहे या सत्तेचा वापर आपल्या मतदारसंघातील प्रमुख्‍ प्रलंबीत कांमे करण्याकरीता झाला पाहिजे याच भूमिकेतून आपण तालुक्यात काम करीत असून जिल्हयात सर्वात जास्त निधी मतदारसंघातील रस्ते करण्याकरीता मी आणू शकलो याचा मला आनंद आहे. राज्याच्या विविध योजनांमधून मतदारसंघात काम सुरु आहे. विकासकामांच्या संदर्भातील बदल मतदारसंघातील जनतेच्या लक्षात येवू लागला आहे. आपण केलेले काम घेवूनच येणा-या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये आपण मतदारांच्या दारात मते मागायला जाणार आहे. त्यामुळे आपण जे काम करीत आहोत ते मतदारसंघातील मतदारांपर्यंत जासतीत जास्त प्रमाणात कसे पोहचेल याकरीता विभागा विभागातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जागृत रहाणे गरजेचे आहे. काहीही न करता आणि हातात काहीही देण्यासारखे नसताना हे आम्ही केले असे सांगण्यात विरोधक भलतेच तरबेज आहेत. दिशाभूल करुन जनतेची मने वळविण्याचा त्यांचा नेहमीचा उद्योग असतो. सन २००४ ते २००९ पर्यंत एवढे काम करुनही आपल्याला २००९ च्या निवडणूकीत पराभव पत्करावा लागला होता.याचा विसर मतदारसंघातील जनतेने आणि कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पडू न देता सर्वसामान्य जनतेचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष देवून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आपण सर्वांनी ठेवावी. विरोधकांनी कितीही मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी मतदारसंघातील सुज्ञ जनता त्यांच्या भूलथांपाना बळी पडणार नाही.असा विश्वासही त्यांनी शेवठी बोलताना व्यक्त केला. प्रास्ताविक बशीर खोंदू यांनी केले उपस्थितांचे स्वागत किशोर गुरव यांनी केले तर आभार इरफान चाफेरकर यांनी मानले.

Sunday, 7 January 2018

जनतेला डोळयाला दिसतील अशी विकासकामे मतदारसंघात सुरु.:- आमदार शंभूराज देसाई.

    
      मतदारसंघातील जनतेने आमदार म्हणून निवडून देवून माहे ऑक्टोंबर २०१७ मध्ये माझे आमदारकीला तीन वर्षे पुर्ण झाली.मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील विविध भागात आज मतदारसंघातील जनतेच्या डोळयाला दिसतील अशी विकासकामे सुरु आहेत.गत तीन वर्षात मतदारसंघात जिल्हयातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत जादाचा विकासनिधी शासनाकडून मिळवून आणण्यास मला यश मिळाले आहे.माझे प्रयत्नातून सुरु असलेली कामे विरोधकांना दिसत असूनही विरोधकांकडून डोळेझाक होत आहे त्याला कोण काय करणार? असा सवाल करुन ही कामे जनतेच्या डोळयांना दिसत आहेत यातच मला समाधान मिळत आहे असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
      ढेबेवाडी ता.पाटण येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या भूमिपुजन कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते. या इमारतीसाठी आमदार शंभूराज देसाईंनी सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई, कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.वनिता कारंडे, माजी सभापती डी.आर.पाटील,गटनेते पंजाबराव देसाई, सदस्या सौ.सिमा मोरे,दिलीपराव जानुगडे,नारायण कारंडे,नाना साबळे,ढेबेवाडी उपसरंपच सौ.शैलजा कचरे,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंतराव खाडे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.डोंगरे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
    याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे काम अनेक वर्षापासून प्रलंबीत होते सन २०१४ ला मी आमदार झालेनंतर या रुग्णालयाच्या कामांस भेट दिल्यानंतर कामाची माहिती घेवून तात्काळ सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना बोलावून या कामांस तातडीने सुरुवात करण्याच्या सुचना केल्या आज ग्रामीण रुग्णालयाची इमारत दिमाखात उभी आहे.या रुग्णालयाकरीता ३० बेडची साधनसामुग्री व यंत्रसामुग्री देणेकरीताचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर झाला आहे त्याकरीता आवश्यक असणा-या निधीची तरतूदही जिल्हा वार्षिक आराखडयात करुन ठेवली आहे. आता सुमारे ३ कोटी रुपयाचे या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता निवासस्थानाकरीता शासनाकडून निधी मंजुर करुन आणला आहे आज याचे भूमिपुजन झाले येत्या काही दिवसात हीही इमारत उभी राहिलेली दिसून येईल. ग्रामीण रुग्णालयाकरीता ४ कोटी निवासस्थानाकरीता ३ कोटी अशी एकूण ७ कोटीची कामे ग्रामीण रुग्णालयाकरीता डोळयाला दिसत असून विरोधकांना ती कशी दिसत नाहीत याचेच आश्चर्य वाटते. त्यांच्याकडून ही कामे दिसण्याची अपेक्षाही करणे चुकीचे आहे परंतू स्वत:च्या हातात आमदारकी असताना विरोधकांना काहीही करता आले नाही आणि आज एवढी कामे सुरु असताना कामे दिसत नाहीत आमदार खोटे बोलत आहेत असे विरोधकांकडून सांगितले जात असले तरी मतदारसंघातील जनता आता सुज्ञ झाली आहे कोण विकासकामे मंजुर करुन आणतो आणि कोण केवळ दिशाभूल व थापा मारण्याचे काम करतोय हे मतदारसंघातील जनतेने आता चांगलेच ओळखले आहे. जनतेच्या डोळयाला दिसेल अशी कामे मतदारसंघात सुरु आहेत याचे मोठे समाधान मला आमदार म्हणून मिळत आहे असे सांगून ते म्हणाले,या विभागातील वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील रिंगरोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे समजल्यानंतर तात्काळ संबधित  अधिका-यांना बोलावून हे काम परत करण्याच्या सुचना दिल्या आज हे काम सुरु आहे तर ढेबेवाडी ते उमरकांचन हे सुमारे ३ कोटी २० लाख रुपयाचे काम शासनाच्या अर्थस्ंकल्पातून सुरु झाले आहे.रिंगरोडसाठी आपण कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून ५ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.कोटीतील कामे मंजुर करुन आणण्याचा माजी आमदारांकडून कधी प्रयत्नच झाला नसल्याने त्यांना व त्यांच्या सहकार्यांना आपण मंजुर करुन आणलेली कोटयावधीची विकासकामे दिसत नाहीत ही दुर्दैवाची बाब असल्याचा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी विरोधकांना लगाविला.उपस्थितांचे स्वागत मनोज मोहिते यांनी केले तर आभार दिलीपराव जानुगडे यांनी मानले.
चौकट:- कारणे नको रिर्झल्ट दाखवा सांगितल्यानेच ग्रामीण रुग्णालयाचे काम पुर्ण.
       ग्रामीण रुग्णालयाचे काम तातडीने होणेकरीता या कामासंदर्भात ढेबेवाडीला भेट देवून बांधकाम विभागाच्या अधिका-यांना कारणे नको रिर्झल्ट दाखवा असे ठणकावून सांगितल्यानेच ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम आज पुर्णत्वाकडे गेल्याचे दिसून येत असून याचे साक्षीदार आज याठिकाणी उपस्थित आहेत. असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.


Saturday, 6 January 2018

मी परत आमदार झाल्यावरच खळे बंधा-याचे काम सुरु.:- आमदार शंभूराज देसाई.


सन २००४ ते २००९ या काळात मी आमदार असताना २००९ ला मी खळे येथील वांग नदीवरील कामांस मंजुरी आणली होती. २००९ ला दुर्दैवाने माझा पराभव झाल्यानंतर या बंधा-याचा एक दगडही तालुक्याच्या माजी आमदारांना हालविता आला नाही. हे या विभागाचे दुर्दैव म्हणावे लागेल पण मी परत आमदार झाल्यानंतरच खळे येथील कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-याच्या कामांस सुरुवात होत आहे. माझेत ती धमक असल्यानेच मी या कामासाठी शासनाकडून निधी मंजुर करुन आणू शकलो असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
     खळे ता.पाटण येथे कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत वांग नदीवर कोल्हापुर पध्दतीचा बंधारा बांधणे या कामाचा शुभारंभ व आमदार शंभूराज देसाई यांच्या फंडातून उभारण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उदघाटन आणि ग्रामपंचायत खळे यांच्या वतीने ग्रामस्थांना तालुक्यात प्रथमच उभारण्यात आलेल्या ५ लिटर स्वच्छ पाणी देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ अशा संयुक्तीत कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.वनिता कारंडे, माजी सभापती डी.आर.पाटील,गटनेते पंजाबराव देसाई, सदस्या सौ.सिमा मोरे,नारायण कारंडे,ढेबेवाडी सरंपच संदीप टोळे, उपसरपंच सौ.सुमन सकपाळ, सोसायटी चेअरमन बाळासाहेब पानवळ, माजी सरपंच नामदेव पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बोडके, उपअभियंता दाभाडे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
    याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, खळे येथे वांग नदीवर कोल्हापुर पध्दतीचा बंधारा व्हावा अशी या गावातील व विभागातील नागरिकांची व शेतक-यांची अनेक वर्षांची मागणी होती सन २००४ ते २००९ या कालावधीत मी पहिल्यांदा मी आमदार झालेनंतर सन २००९ मध्ये दि.२३/०३/२००९ रोजी मी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून या कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-याच्या कामांस प्रशासकीय मान्यता घेतली होती या कामांस २ कोटी ३५ लाख ९० हजार रुपये रक्कमेस मान्यता मिळाली होती. दुर्दैवाने २००९ ला माझा विधानसभेला पराभव झाला आणि मी मंजुर करुन आणलेले या बंधा-याचे काम कामास काम मंजुर असूनही माजी आमदारांना प्रत्यक्षात सुरुवात करता आली नाही. जे काम मी मंजुर करुन आणले तेच काम मी परत आमदार झालेनतंरच होत आहे यावरुनच माझेअगोदरचे आमदार किती निष्क्रीय होते हे स्पष्ट होत आहे. २००९ ते २०१४ या पाच वर्षाच्या कालावधीत २००९ ला मंजुर झालेल्या या बंधा-याचा एक दगडही माजी आमदारांना हालविता आला नाही.यावरुनच त्यांच्या कामाची माहिती जनतेसमोर येत आहे. जनतेला दिलेला शब्द पाळण्याची आणि तो शब्द पुर्ण करुन दाखविण्याची धमक फक्त माझयात आहे म्हणूनच मी परत आमदार झालेनंतर या कामांस प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. असे सांगून ते म्हणाले, खळे असो, काढणे असो हा भाग २००९ ते २०१४ या कालावधीत कुठे होता आणि आता या तीन वर्षात कुठे आहे काढणेपासून खळयापर्यंत सुमारे ४ कोटी रुपयांचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सध्या सुरु आहे. काढणे गावाजवळ ५ कोटी रुपयांचा मोठया पुलाचे काम मंजुर झाले असून हे काम निविदास्तरावर आहे त्या कामांस लवकरच सुरुवात होत आहे. हा विकास नाहीतर आणखी दुसरे काय आहे. परंतू माजी आमदार आणि त्यांचे सुपुत्र हे मी नुसत्याच विकासाच्या थापा मारत असल्याचे तालुकाभर सांगत सुटले आहेत हे पितापुत्र तालुक्याचे ठिकाण असणारे त्यांचे गांव सोडत नाहीत त्यांना तालुक्यात सुरु असणारी कामे कशी दिसणार असा सवाल करुन ते म्हणाले आज आपण भूमिपुजन केलेला बंधारा ३ कोटी रुपयांचा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सुरु असणारा काढणे ते खळे रस्ता ४ कोटी रुपयांचा आणि काढण्याचा पुल ५ कोटी रुपयांचा म्हणजे या १० किलोमीटरच्या अंतरातच सुमारे ११ ते १२ कोटी रुपयांची कामे सुरु आहेत तर काही सुरु होत आहेत. मग तालुक्याच्या इतर भागात विकासाची कामे कशाप्रकारे सुरु असतील याचा अंदाज या विभागाने घ्यावा. विकासाच्या बाबतीत मी जनतेला दिलेल्या शब्दात कुठेही मागे पडणार नाही परंतू आपण केलेली विकासकामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आहे विरोधकांच्या हातात आता जनतेला देण्यासारखे काही नाही त्यामुळे विरोधक आंधळेपणाचे सोंग घेवून जनतेत बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करणारच त्यांच्या या कुटील राजकारणाला कुणी बळी पडू नये याकरीता आपणच सावध पवित्रा घेतला पाहिजे असे आवाहनही आमदार शंभूराज देसाई यांनी शेवठी बोलताना केले.   उपस्थितांचे स्वागत विजय पाटील यांनी केले तर आभार महादेव कचरे यांनी मानले.