Sunday 7 January 2018

जनतेला डोळयाला दिसतील अशी विकासकामे मतदारसंघात सुरु.:- आमदार शंभूराज देसाई.

    
      मतदारसंघातील जनतेने आमदार म्हणून निवडून देवून माहे ऑक्टोंबर २०१७ मध्ये माझे आमदारकीला तीन वर्षे पुर्ण झाली.मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील विविध भागात आज मतदारसंघातील जनतेच्या डोळयाला दिसतील अशी विकासकामे सुरु आहेत.गत तीन वर्षात मतदारसंघात जिल्हयातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत जादाचा विकासनिधी शासनाकडून मिळवून आणण्यास मला यश मिळाले आहे.माझे प्रयत्नातून सुरु असलेली कामे विरोधकांना दिसत असूनही विरोधकांकडून डोळेझाक होत आहे त्याला कोण काय करणार? असा सवाल करुन ही कामे जनतेच्या डोळयांना दिसत आहेत यातच मला समाधान मिळत आहे असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
      ढेबेवाडी ता.पाटण येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या भूमिपुजन कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते. या इमारतीसाठी आमदार शंभूराज देसाईंनी सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई, कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.वनिता कारंडे, माजी सभापती डी.आर.पाटील,गटनेते पंजाबराव देसाई, सदस्या सौ.सिमा मोरे,दिलीपराव जानुगडे,नारायण कारंडे,नाना साबळे,ढेबेवाडी उपसरंपच सौ.शैलजा कचरे,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंतराव खाडे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.डोंगरे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
    याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे काम अनेक वर्षापासून प्रलंबीत होते सन २०१४ ला मी आमदार झालेनंतर या रुग्णालयाच्या कामांस भेट दिल्यानंतर कामाची माहिती घेवून तात्काळ सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना बोलावून या कामांस तातडीने सुरुवात करण्याच्या सुचना केल्या आज ग्रामीण रुग्णालयाची इमारत दिमाखात उभी आहे.या रुग्णालयाकरीता ३० बेडची साधनसामुग्री व यंत्रसामुग्री देणेकरीताचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर झाला आहे त्याकरीता आवश्यक असणा-या निधीची तरतूदही जिल्हा वार्षिक आराखडयात करुन ठेवली आहे. आता सुमारे ३ कोटी रुपयाचे या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता निवासस्थानाकरीता शासनाकडून निधी मंजुर करुन आणला आहे आज याचे भूमिपुजन झाले येत्या काही दिवसात हीही इमारत उभी राहिलेली दिसून येईल. ग्रामीण रुग्णालयाकरीता ४ कोटी निवासस्थानाकरीता ३ कोटी अशी एकूण ७ कोटीची कामे ग्रामीण रुग्णालयाकरीता डोळयाला दिसत असून विरोधकांना ती कशी दिसत नाहीत याचेच आश्चर्य वाटते. त्यांच्याकडून ही कामे दिसण्याची अपेक्षाही करणे चुकीचे आहे परंतू स्वत:च्या हातात आमदारकी असताना विरोधकांना काहीही करता आले नाही आणि आज एवढी कामे सुरु असताना कामे दिसत नाहीत आमदार खोटे बोलत आहेत असे विरोधकांकडून सांगितले जात असले तरी मतदारसंघातील जनता आता सुज्ञ झाली आहे कोण विकासकामे मंजुर करुन आणतो आणि कोण केवळ दिशाभूल व थापा मारण्याचे काम करतोय हे मतदारसंघातील जनतेने आता चांगलेच ओळखले आहे. जनतेच्या डोळयाला दिसेल अशी कामे मतदारसंघात सुरु आहेत याचे मोठे समाधान मला आमदार म्हणून मिळत आहे असे सांगून ते म्हणाले,या विभागातील वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील रिंगरोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे समजल्यानंतर तात्काळ संबधित  अधिका-यांना बोलावून हे काम परत करण्याच्या सुचना दिल्या आज हे काम सुरु आहे तर ढेबेवाडी ते उमरकांचन हे सुमारे ३ कोटी २० लाख रुपयाचे काम शासनाच्या अर्थस्ंकल्पातून सुरु झाले आहे.रिंगरोडसाठी आपण कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून ५ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.कोटीतील कामे मंजुर करुन आणण्याचा माजी आमदारांकडून कधी प्रयत्नच झाला नसल्याने त्यांना व त्यांच्या सहकार्यांना आपण मंजुर करुन आणलेली कोटयावधीची विकासकामे दिसत नाहीत ही दुर्दैवाची बाब असल्याचा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी विरोधकांना लगाविला.उपस्थितांचे स्वागत मनोज मोहिते यांनी केले तर आभार दिलीपराव जानुगडे यांनी मानले.
चौकट:- कारणे नको रिर्झल्ट दाखवा सांगितल्यानेच ग्रामीण रुग्णालयाचे काम पुर्ण.
       ग्रामीण रुग्णालयाचे काम तातडीने होणेकरीता या कामासंदर्भात ढेबेवाडीला भेट देवून बांधकाम विभागाच्या अधिका-यांना कारणे नको रिर्झल्ट दाखवा असे ठणकावून सांगितल्यानेच ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम आज पुर्णत्वाकडे गेल्याचे दिसून येत असून याचे साक्षीदार आज याठिकाणी उपस्थित आहेत. असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.


No comments:

Post a Comment