Saturday 13 January 2018

आमदार शंभूराज देसाई यांची अशीही बांधिलकी. लोकनेत्यांपासून तीन पिढयांशी ऋृणानुबंध असणारे शामराव मोहिते गुरुजींचा वाढदिवस घरी जावून केला साजरा.


  महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि पाटण तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पासून स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) ते आमदार शंभूराज देसाई या तीन पिढयांशी ऋृणानुबंध असणारी अनेक कुटुंबे मोठया संख्येने आजही पाटण तालुक्यात पहावयास मिळतात.त्यातीलच एक कुंटुब म्हणजे वांग मराठवाडी धरणप्रकल्पात बाधित झालेल्या उमरकांचन येथील शामराव मोहिते गुरुजी यांचे मोहिते कुटुंब.लोकनेत्यांपासून देसाई कुटुबिंयाच्या तीन पिढयांशी जिव्हाळयाचे ऋृणानुबंध असणारे शामराव मोहिते गुरुजी यांचा दि.१० जानेवारी रोजी ९८ वा वाढदिवस देसाई कुटुबांचे तिस-या पिढीचे नेतृत्व करणारे तालुक्याचे लोकप्रिय उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी आवर्जुन वेळ काढून मोहिते गुरुजींच्या घरी जावून त्यांचा मानाची शाल,श्रीफळ देवून व पेढे भरवून साजरा करीत समाजाशी आणि देसाई कुटुंबावर प्रेम करणा-या कुटुंबाबरोबरची सामाजिक बांधिलकी जपली.आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यावर गाढा विश्वास असणारे मोहिते गुरुजीं आबा या बांधिलकीमुळे भारावून गेले.
  लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचीत असणारे शामराव मोहिते गुरुजी आबा यांच्याविषयी आमदार शंभूराज देसाई यांना नेहमीच जिव्हाळा आणि आपुलकी राहिली आहे.ढेबेवाडी विभागातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा शामराव मोहिते गुरुजी कार्यक्रमास येतात तेव्हा तेव्हा आमदार शंभूराज देसाई हे आवर्जुन आबांच्या तब्बतेची विचारपुस करुन त्यांच्याविषयीचा जिव्हाळा व्यक्त करतात.स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) आणि मोहिते गुरुजी यांचे घनिष्ट ऋृणानुबंध होते.लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) आणि आता आमदार शंभूराज देसाई यांचे कार्य जवळून पाहिलेला मी एक कार्यकर्ता आहे लोकनेत्यांचे सर्व गुण आमदार शंभूराज देसाईंनी आत्मसात केले आहेत. जनतेच्या प्रश्नाविषयी आपल्या आजोबांप्रमाणे नातवाचाही जीव तीळ तीळ तुटतो हे पाहण्याचे भाग्य मला मिळाले आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव मी जवळून घेतला आहे. आमच्या धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सुटले पाहिजेत याकरीता शासनदरबारी भांडणारा नेता आम्हाला मिळाला. आज आमदार शंभूराज देसाई यांच्यामुळेच आमच्या उमरकांचन येथील धरणग्रस्तांना न्याय मिळाला आहे. त्यांचा शासनाकडे सातत्याचा पाठपुरावा हेच धरणग्रस्तांचे प्रश्न सुटण्यामागचे गमक आहे. आणि ही धमक केवळ आमदार शंभूराज देसाईंच्यात आहे माझया त्यांच्या कार्याला शुभेच्छा तर आहेतच परंतू वयाने मोठा म्हणून आर्शिवादही आहेत.असे मोहिते गुरुजी अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगतात. त्याचबरोबर अशा या कर्तृत्ववान व्यक्तीस महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी सदिच्छाही गुरुजी अनेकदा आमदार शंभूराज देसाई यांच्याविषयी बोलून दाखवितात.
    प्राथमिक शिक्षक ते मुख्याध्यापक ते तालुका मास्तर म्हणून शैक्षणिक कार्यात उमरकांचन, सोनवडे, सणबूर, गारवडे आणि कुंभारगांव या गावातील प्राथमिक शाळांमधून काम करीत त्यांनी या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.४० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात काम केलेले मोहिते गुरुजी मौजे कुंभारगांव शाळेत सन १९७८ ला सेवानिवृत्त झाले. मोहिते आबांचा जन्म दि.१० जानेवारी १९२० रोजी झाला. सामाजिक बांधिलकीतून काम करताना त्यांनी सन १९८० ते ८५ मध्ये उमरकांचन गावचे सरपंच म्हणूनही काम पाहिले. आज त्यांनी ९९ व्या वर्षात पदार्पण केले असले तरी वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील एक धरणग्रस्त म्हणून १९९७ पासून धरणग्रस्तांच्या न्यायहक्काकरीता लढा देत असताना तरुणांनाही लाजवेल असा जोश त्यांच्यामध्ये पहावयास मिळतो. उमरकांचन येथील सर्वात मोठे कुटुंब म्हणून या मोहिते कुटुंबाकडे पाहिले जाते. एकूण आठ भावाचे हे कुटुंब पाटण तालुक्यात गटातटाच्या राजकारणात कधीच डगमगले नाही. आमचा एकच गट आणि एकच नेता देसाई कुटुंब असे ठणकावून सांगणारे मोहिते गुरुजी व त्यांच्या कुटुंबाने लोकनेतेसाहेब यांच्या पासून आमदार शंभूराज देसाई यांच्या पर्यंतच्या राजकारणातील अनेक चढउतार पाहिले परंतू देसाई कुटुंबांशी असणारी नाळ त्यांनी कधी तोडू दिली नाही. सत्ता असो वा नसो या कुटुंबाने देसाई कुटुबांच्या तीन पिढयाशी असणारे जिव्हाळयाचे ऋृणानुबंध नेहमीच कायम ठेवले आहेत म्हणूनच एक सामाजिक बांधीलकीची जपणूक करण्याकरीता आपण आबांच्या घरी जावून त्यांचा ९९ वा वाढदिवस साजरा करायचा असे आमदार शंभूराज देसाईंनी ठरविले आणि आबांच्या घरी जावून आंबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून आंबाना दिर्घायुष्य लाभावे अश्या सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
साहेब, सुदाम्याघरचे पोहे खायला कधी येणार?

वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार शंभूराज देसाईंनी मोहिते गुरुजींना शुभेच्छा देत असताना या शुभेच्छांचा स्विकार करतो पण साहेब, सुदाम्याघरचे पोहे खायला घरी परत कधी येणार? असा प्रश्न आबांनी साहेबांना विचारला तेव्हा आबा लवकरच येतो असे आमदार शंभूराज देसाईंनी आबांना सांगितले तेव्हा आबांच्या चेह-यावर आलेली उजाळी लपून राहीली नाही.

No comments:

Post a Comment