Thursday 11 January 2018

पाटणकरसाहेब, खरोखरच कामे केली असतील तर, मग आव्हानाला घाबरता कशाला ? वाडयात बसून पत्रके काढण्यापेक्षा जनतेपुढे येण्याचे आव्हान स्विकारा ना ? .:- आमदार शंभूराज देसाई आव्हानांवर ठाम.


पाटणकरसाहेब आपण तालुक्याचे सहावेळा कसे आमदार झालात हे मी सांगायला नको.तुमचे तुम्हाला ते चांगलेच माहिती आहे.इलेक्ट्रानिक मशिनीव्दारे मतदानाची प्रक्रिया सुरु होण्याअगोदर तुमच्या बगलबच्च्यांकडून डोंगरपठारावरील मयत व्यक्तींच्याही मारलेल्या बोगस मतांमुळेच तुम्हाला आमदार होण्याची संधी मिळाली हे जगजाहीर आहे.वाडयात बसून पत्रके काढण्यापेक्षा तुम्ही खरोखरच कामे केली असतील तर मग मी दिलेल्या आव्हानांना घाबरता कशाला? माझयासारखे जनतेत उभे राहून जनतेपुढे येण्याचे आव्हान स्विकारा ना? असे प्रतिउत्तर आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांच्या पत्रकावर देवून पाटणकरांकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही असे सांगत पाटणकरांकडे खरोखरच काही असेल तर दुध का दुध,पाणी का पाणी होण्याकरीता त्यांनी माझे आव्हान स्विकारावेच. मतदारसंघातील जनता ठरवेल कोण कामांचा अन्कोण निष्क्रीय आहे ते. असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले व पाटणकरांना दिलेल्या आव्हानांवर आजही मी ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
   डाकेवाडी ता.पाटण याठिकाणी जिल्हा वार्षिक आराखडयातून मंजुर झालेल्या डाकेवाडी ते सलतेवाडी या दोन गांवाना जोडणा-या रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. या रस्त्याच्या कामांसाठी त्यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे,पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,पंचायत समिती माजी सदस्य रघूनाथ माटेकर, माजी संचालक बबनराव पाटील,किसनशेठ मोरे,सरपंच राजेश चव्हाण, माजी सरपंच नारायण चव्हाण,अशोक मोरे,संपत शिंदे,भरत चव्हाण,शिवाजी सावंत,संजय टेळे महाराज, रामचंद्र चव्हाण, रामचंद्र सलते, सदाशिव शेलार,बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.माने,शाखा अभियंता कांबळे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

      याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटणकरसाहेब,मी तुमच्या पोराच्याच वयाचा आहे.पोराच्या नादाला लागा असे मी म्हणत नाही.माझे म्हणणे एकच आहे, तुम्ही खरोखरच भरीव कामे केली असतील तर मग जनतेसमोर येवून सांगा ते सांगायला तुम्ही घाबरताय कशाला? जनतेला सांगण्यासारखे तुमच्याकडे काहीच नाही हे याच पोराला माहिती आहे.याच पोराने तुम्हाला राज्याचे मंत्री असताना घरी बसविले होते याचा विसर पडला की काय? शंभूराज देसाई लोकनेत्यांचा नातू आहे धडकी मला नाही तुम्हाला माझया कामाची भरली आहे. म्हणूनच तुमची आगपाखड सुरु आहे. मी भित्रा असतो तर वयाच्या २१ व्या वर्षापासून तुमच्याबरोबर लढा दिला नसता तुमच्याबरोबर मी दिलेल्या लढयाची आकडेवारी जरा काढून पहा. ७३६ आणि ५८० मतांनी दोन वेळा निवडून आलात त्यावेळसच तुमचे अस्तित्व काय आहे हे तालुक्यातील जनतेने ओळखले होते.पहिल्यावेळेसच फेरमतमोजणी घेतली असती तर सहावेळा आमदार झाल्याच्या बढाया मारण्याची संधी तुम्हाला मिळाली नसती.तुमच्या वाढदिवसाच्या चाफळच्या कार्यक्रमात तुम्ही व तुमच्या सुपुत्राने मला पाण्यात पाहण्याचा उद्योग केल्यामुळेच मलाही तुमची निष्क्रीयता जनतेसमोर आणावी लागली. तुमचे नाव घेण्याची इथे कुणाला हौस आहे. विक्रम नोंदविणारे आणि सत्य सांगण्यासारखे तुमच्या नावात काय आहे हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे. तुमच्या मुलाचे कतृत्व काय आहे मी दोनवेळा कारखान्याच्या निवडणूकीत आणि २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत तुम्हाला दाखवून दिले आहे.२००९ ला मला शेवठचे मतदान करा असे भावनिक आव्हान तुम्ही करीत बसलात म्हणून ५८० मतांनी माझा पराभव झाला.माझी पात्रता काय आहे हे तालुक्यातील जनतेने सिध्द करुन दाखविल्यानेच मला आमदार आणि तुम्हाला माजी आमदार पदवी जनतेने दिली आहे.असे सांगून ते म्हणाले, मी २०० व ५०० मीटर रस्त्यांची भूमिपुजने करतोय होय करतोयच परंतू तीही तुम्ही आमदार असताना करु शकला नाहीत. तुमच्या आमदारकीच्या काळात एका वर्षात जेवढा निधी तुम्ही आणला असेल तेवढया रक्कमेच्या निधीच्या कामांची भूमिपुजने मी एका दिवसात करतो म्हणूनच २०० व ५०० मीटरच्या रस्त्याबरोबर ४ ते ५ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे तालुक्यात सुरु आहेत. सार्वजनीक बांधकाम विभागाकडून विशेष दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत दरवर्षी कामे येतात सांगणारे पाटणकरसाहेब तुमच्या आमदारकीच्या काळात का ही कामे आली नाहीत. पवनचक्की प्रकल्प उभारले म्हणून सांगता पण तिथला शेतकरी आणि त्यांची कुटुंबे रस्त्यावर आणलीत त्यांना देशाधडीला लावलेत यालाच तुमची सभ्यता आणि सुसंस्कृतपणा म्हणायचा का? खळे बंधा-याचा पाया यापुर्वीच भरला होता सांगणा-या पाटणकरांनी तो कुणी भरला हे नाही सांगितले तो पाया सन २००९ मध्ये शंभूराज देसाईंनीच भरला होता. परंतू तुमच्या काळात २००९ ते २०१४ त्याला एक रुपाया देखील तुम्हाला आणता आला नाही. २० टक्के समाजकारण आणि ८० टक्के अर्थकारण करणा-या पाटणकरांना तालुक्यातील जनतेची काळजी किती आहे हे त्यांच्या निष्क्रीय कारभारातूनच तालुक्यातील जनतेने दाखवून दिले आहे.असे ते शेवठी म्हणाले. उपस्थितांचे स्वागत आनंदा मोरे यांनी करुन आभार मानले.

No comments:

Post a Comment