Monday 8 January 2018

विकासकामांना निधी आणायला आमदार म्हणून कुठे कमी पडलो नाही आणि पडणार नाही .:- आमदार शंभूराज देसाई.


     माझे तीन वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकालात मतदारसंघात सुरु असलेला सर्वांगीण विकास विरोधकांना दिसत नाही असे नाही तो दिसतोय पंरतू तो दिसला तर विरोधकांचे काम काय? तीन वर्षात मतदारसंघात प्रलंबीत असणारी अनेक कामे मार्गी लावण्याकरीता या तालुक्याचा आमदार म्हणून माझे प्रयत्न मी प्रमाणिकपणे करीत आहे. या विकासकामांना आवश्यक असणारा निधी आणायला मतदारसंघाचा आमदार म्हणून गत तीन वर्षात मी कुठे कमी पडलो नाही आणि भविष्यातही कमी पडणार नाही अशी ग्वाही आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.
     मोरगिरी ता.पाटण याठिकाणी पेठशिवापुर मोरगिरी गांवास जोडणा-या रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती सदस्या सौ.निर्मला देसाई, सदस्य संतोष गिरी, माजी जि..सदस्य जालंदर पाटील, बशीर खोंदू, पंचायत समिती माजी सदस्य नथूराम कुंभार,ॲड.मारुती देसाई,गणेश भिसे,संपत कोळेकर,बांधकाम विभागाचे शाखाअभियंता वायदंडे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

    याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, विरोधासाठी विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे.त्यांनी विरोधक म्हणून विरोध नाही केला तर त्यांना विरोधक कोण म्हणणार.परंतू विरोधकांच्या कार्यकालात पाटण मतदारसंघाची अवस्था काय होती आणि आता तीन वर्षात पाटण मतदारसंघात कशाप्रकारे बदल झाला आहे याची तुलना मतदारसंघातील जनता करु लागली आहे.गत पाच वर्षात विरोधकांच्या काळात पाटण मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी जेवढा निधी आला नाही त्याहून अधिक निधी या तीन वर्षात तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील रस्त्याच्या कामांसाठी आणण्यास मला यश मिळाले आहे. आता बांधकाम मंत्री असताना जेवढा निधी बांधकाम मंत्री यांनी मतदारसंघात आणला नाही त्यापेक्षा जास्त निधी जर आमदार म्हणून मी मतदारसंघात आणत असेल तर विरोधकांना त्याचे वाईट वाटणे सहाजिक आहे. या रस्त्याच्या कामांना माजी आमदारपुत्र खड्डे भरणे म्हणत असतील तर माजी आमदारपुत्रांनी एकदा तालुक्याच्या डोंगरद-यात फिरावे म्हणजे त्यांच्या लक्षात येईल कुठे आणि कशाप्रकारचे रस्ते झाले आहेत. माजी बांधकाम मंत्री यांचे ते सुपुत्र आहेत म्हंटलयावर बांधकामचे काम त्यांच्या पुर्णत: लक्षात येईल. परंतू माजी आमदारपुत्र जी टिका करीत आहेत त्यांच्या टिकेकडे मी लक्ष देत नाही. आपण काम करीत राहणे विरोधकांचे कामच आहे टिकाटिपणी करणे कारण त्यांच्याकडे जनतेला देण्यासारखे काही नाहीच तर ते दुसरे काय करणार? असा सवाल करुन ते म्हणाले, राज्यात आपली सत्ता आहे या सत्तेचा वापर आपल्या मतदारसंघातील प्रमुख्प्रलंबीत कांमे करण्याकरीता झाला पाहिजे याच भूमिकेतून आपण तालुक्यात काम करीत असून जिल्हयात सर्वात जास्त निधी मतदारसंघातील रस्ते करण्याकरीता मी आणू शकलो याचा मला आनंद आहे. राज्याच्या विविध योजनांमधून मतदारसंघात काम सुरु आहे. विकासकामांच्या संदर्भातील बदल मतदारसंघातील जनतेच्या लक्षात येवू लागला आहे. आपण केलेले काम घेवूनच येणा-या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये आपण मतदारांच्या दारात मते मागायला जाणार आहे. त्यामुळे आपण जे काम करीत आहोत ते मतदारसंघातील मतदारांपर्यंत जासतीत जास्त प्रमाणात कसे पोहचेल याकरीता विभागा विभागातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जागृत रहाणे गरजेचे आहे. काहीही न करता आणि हातात काहीही देण्यासारखे नसताना हे आम्ही केले असे सांगण्यात विरोधक भलतेच तरबेज आहेत. दिशाभूल करुन जनतेची मने वळविण्याचा त्यांचा नेहमीचा उद्योग असतो. सन २००४ ते २००९ पर्यंत एवढे काम करुनही आपल्याला २००९ च्या निवडणूकीत पराभव पत्करावा लागला होता.याचा विसर मतदारसंघातील जनतेने आणि कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पडू न देता सर्वसामान्य जनतेचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष देवून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आपण सर्वांनी ठेवावी. विरोधकांनी कितीही मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी मतदारसंघातील सुज्ञ जनता त्यांच्या भूलथांपाना बळी पडणार नाही.असा विश्वासही त्यांनी शेवठी बोलताना व्यक्त केला. प्रास्ताविक बशीर खोंदू यांनी केले उपस्थितांचे स्वागत किशोर गुरव यांनी केले तर आभार इरफान चाफेरकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment