Wednesday, 14 November 2018

उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता शालेय साहित्य,वहया आणण्याचे आवाहन.

        लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदार संघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा वाढदिवस प्रतिवर्षी पाटण तालुक्यात  मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा त्यांचा 52 वा वाढदिवस शनिवार दि.17 नोव्हेंबर 2018 रोजी कारखाना या कार्यस्थळ,दौलतनगर येथे मोठया दिमाखात साजरा होत आहे.वाढदिवस असो वा सत्कार समारंभ या कार्यक्रमामध्ये शाल,श्रीफळ  देवून सत्कार किंवा स्वागत करण्यापेक्षा सत्कार म्हणून शालेय साहित्य अथवा वहया दयाव्यात हा पायंडा स्वत: आमदार शंभूराज देसाईंनीच मतदारसंघात पाडला असून माझे वाढदिवसानिमित्त भेट देताना मला गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता भेट म्हणून वहया व शालेय सहित्यच दयावे असे आवाहन स्वत:  आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
              आमदार शंभूराज देसाई यांनी केलेल्या आवाहनामध्ये म्हंटले आहे की, प्रतिवर्षी साज-या होणा-या माझे  वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे आणून मला सदिच्छा देण्यात येत होत्या.त्या दिवसापुरते  त्या हारतु-यांचे महत्व होते परत हे सर्व हारतूरे एकञित करून ते नदीमध्ये विसर्जन करावे लागत असल्याने गत सात ते आठ वर्षापासून माझे वाढदिवसाला भेट देवून सदिच्छा देणा-या व्यक्तींनी हारतूरे न आणता गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता वहया तसेच शालेय साहित्यच भेट दयावे अशी मी हाक दिली या माझे हाकेलाही मतदारसंघातील जनतेने  चांगला प्रतिसाद दिला हाच पायंडा मी लग्नसमारंभ तसेच सत्कार समारंभाच्या निमित्ताने राबविला त्यासही जनतेने मोठया संख्येने प्रतिसाद दिला.प्रतिवर्षी मला भेट मिळणा-या वहया तसेच शालेय साहित्य हे मी मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार म्हणून देत असतो. गत सात ते आठ वर्षापासून प्रतिवर्षी माझा वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने मला भेट मिळणा-या सुमारे दीड लाखाहून अधिक वहयाचा सदुपयोग पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विदयार्थींनीना देवून मदतीचा हातभार लावला आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षीही माझे वाढदिवसानिमित्त भेट देताना मला वहया तसेच शालेय साहित्य दयावे असे आवाहन स्वत:  आमदार शंभूराज देसाईंनीच केले आहे.

उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त दि.17 नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन . पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता वहया आणण्याचे आवाहन.

              लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा 52 वाढदिवस शनिवार दि.17 नोव्हेंबर 2018 रोजी कारखाना  कार्यस्थळ,दौलतनगर येथे मोठया दिमाखात साजरा होत असल्याची  माहिती आमदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचेकडून प्रसिध्दीपञकाव्दारे देण्यात आली असून वाढदिवसानिमित्त आमदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणा-या हितचिंतक कार्यकर्त्यांनी  पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना वाढदिवसाची भेट देण्याकरीता वहया तसेच शालेय वस्तू आणाव्यात असे आवाहनही  नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
       पञकांत म्हंटले आहे की,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा 52 वा वाढदिवस शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे मोठया दिमाखात साजरा होत असून या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर येथे करण्यात आला आहे .सकाळी 09.00 वा.त्यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 11.00 पर्यंत ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी  येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत. त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई ( ताईसाहेब ) यांच्या पुतळा, स्व.शिवाजीराव देसाई  ( आबासाहेब  ) यांची समाधी व पुर्णाकृती  पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन असे धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.त्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या  52  साखर पोत्यांचे पूजन त्यांचे हस्ते करण्यात येणार आहे.तसेच हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन व या विभागातील गरीब कुटुंबातील महिलांना व पुरुषांना ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे.शिवदैालत बँकेच्या विस्तारीत कक्षाचे 15 व्या वर्धापन दिन समारंभास उपस्थित राहिल्यानंतर वाढदिवसानिमित्त स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्ट व पाटण तालुका कराड रहिवाशी मिञमंडळाच्या वतीने आयोजित शिबीर व रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे त्यानंतर त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर या परिसरातील प्राथमिक शाळेतील तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊवाटप व शालेय साहित्यांचे वाटप करून लहान मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्याचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. त्यानंतर स.1१.०0 पासून दुपारी 04.00 वाजेपर्यंत आमदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते,हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत. दुपारी 04.00 वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त  दौलत औदयोगिक  प्रशिक्षण  संस्थेच्या प्रांगणामध्ये सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर रणसंग्राम २०१९ चा अभीष्टचिंतन जाहीर सभा आयोजीत केली असून  अभीष्टचिंतन जाहीर सभेला संबोधित करण्याकरीता ते उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी 07.30 वा.आतिष बाजी व राञौ 09.00 वा. श्री.गणेश सांस्कृतिक मंडळ ,दौलतनगर यांचेवतीने आयोजित करते तुम्हा मुजरा हा मराठी लावण्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.आमदार शंभूराज देसाई हे या दिवशी दिवसभर शुभेच्छा स्विकारण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित राहणार आहेत,याची हितचिंतकांनी नोंद घ्यावी तसेच शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे,पुष्पगुच्छ व पुष्पहार न आणता शालेय विदयार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पेन वहया इ.शालेय साहित्य आणावे असे आवाहान मान्यवर मंडळीसह तालुक्यातील पदाधिकारी, हितचिंतक,कार्यकर्ते यांना करण्यात येत असून पाटण मतदार संघातील आम जनतेने कारखान्याचे सभासद, हितचिंतक,कार्येकर्ते  यांनी आपल्या मतदार संघाचे लाडके आमदार शंभूराज देसाई यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त व आयोजित रणसंग्राम २०१९ चा अभीष्टचिंतन जाहीर सभेला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही पञकाव्दारे करण्यात आले आहे.

उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त दि.17 नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन . पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता वहया आणण्याचे आवाहन.

प्रसिध्दीसाठी  दि.14 / 11/2018
उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त
दि.17 नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन .
पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता  वहया आणण्याचे आवाहन.

प्रसिध्दीसाठी दि.1५/11/201८
उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त
पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता शालेय साहित्य,वहया आणण्याचे आवाहन.
                
        लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदार संघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा वाढदिवस प्रतिवर्षी पाटण तालुक्यात  मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा त्यांचा 52 वा वाढदिवस शनिवार दि.17 नोव्हेंबर 2018 रोजी कारखाना या कार्यस्थळ,दौलतनगर येथे मोठया दिमाखात साजरा होत आहे.वाढदिवस असो वा सत्कार समारंभ या कार्यक्रमामध्ये शाल,श्रीफळ  देवून सत्कार किंवा स्वागत करण्यापेक्षा सत्कार म्हणून शालेय साहित्य अथवा वहया दयाव्यात हा पायंडा स्वत: आमदार शंभूराज देसाईंनीच मतदारसंघात पाडला असून माझे वाढदिवसानिमित्त भेट देताना मला गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता भेट म्हणून वहया व शालेय सहित्यच दयावे असे आवाहन स्वत:  आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
              आमदार शंभूराज देसाई यांनी केलेल्या आवाहनामध्ये म्हंटले आहे की, प्रतिवर्षी साज-या होणा-या माझे  वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे आणून मला सदिच्छा देण्यात येत होत्या.त्या दिवसापुरते  त्या हारतु-यांचे महत्व होते परत हे सर्व हारतूरे एकञित करून ते नदीमध्ये विसर्जन करावे लागत असल्याने गत सात ते आठ वर्षापासून माझे वाढदिवसाला भेट देवून सदिच्छा देणा-या व्यक्तींनी हारतूरे न आणता गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता वहया तसेच शालेय साहित्यच भेट दयावे अशी मी हाक दिली या माझे हाकेलाही मतदारसंघातील जनतेने  चांगला प्रतिसाद दिला हाच पायंडा मी लग्नसमारंभ तसेच सत्कार समारंभाच्या निमित्ताने राबविला त्यासही जनतेने मोठया संख्येने प्रतिसाद दिला.प्रतिवर्षी मला भेट मिळणा-या वहया तसेच शालेय साहित्य हे मी मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार म्हणून देत असतो. गत सात ते आठ वर्षापासून प्रतिवर्षी माझा वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने मला भेट मिळणा-या सुमारे दीड लाखाहून अधिक वहयाचा सदुपयोग पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विदयार्थींनीना देवून मदतीचा हातभार लावला आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षीही माझे वाढदिवसानिमित्त भेट देताना मला वहया तसेच शालेय साहित्य दयावे असे आवाहन स्वत:  आमदार शंभूराज देसाईंनीच केले आहे.

Tuesday, 6 November 2018

मतदारसंघाच्या विकासासाठी कोटींचा निधी आणायला विधानसभेत पोटतिडकीने बोलावे लागते. आमदार शंभूराज देसाई.

 मी केवळ सत्तेत असणा-या सत्ताधारी पक्षाचा एक आमदार आहे.आपले विरोधकही सत्ताधारी पक्षाचे अनेक वर्षे आमदार होते.आमदारांना मिळणारा निधी यावरच समाधान मानले असते तर मतदारसंघात प्रलंबीत राहिलेली विविध विकासकामे मार्गी न लागता ती प्रलंबीतच राहिली असती. जशी माजी आमदारांच्या आमदारकीच्या काळात प्रलंबीत राहिली. मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावायची असतील तर शासनाशी भांडून आपले प्रश्न विधानसभेत मांडून शासनाच्या तिजोरीतून जादाचा निधी आणणारा आमदार आपल्या सारख्या डोंगरी तालुक्याला पाहिजे.गत चार वर्षात मतदारसंघाचा आमदार म्हणून विधानसभेत पोटतिडकीने बोललो आणि कोटयावधींचा निधी शासनाच्या तिजोरीतून पाटण मतदारसंघातील विविध विकासकामांकरीता मंजुर करुन आणला असल्याचे प्रतिपादन करीत मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारसंघाचे माजी आमदार कधी विधानसभेत पोटतिडकीने बोललेले कुणी एैकले आहे काय? असा उपरोधिक टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी माजीमंत्री पाटणकर यांचे नाव न घेता लगाविला.
आंब्रग ता.पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत २ कोटी १० लक्ष रुपयांच्या निधीच्या वाडीकोतवडे ते आंब्रग गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जिल्हा परिषद सदस्य सौ.सुग्रा खोंदू,माजी सदस्य जालंदर पाटील,बशीर खोंदू,माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार,विष्णूपंत देसाई,शिवशंभो दुध संघाचे माजी चेअरमन गणेश भिसे,ॲड.मारुती देसाई,आंब्रग सरपंच संतोष गुरव,सदस्य तानाजी जगताप,मारुती पवार,सौ.सुरेखा पवार,सौ.विणा पवार, शंकर पवार,राजू पवार,दिनकर कोळेकर,रमेश गालवे,उदय देसाई,प्रदीप जाधव,इरफान चाफेरकर,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता पी.डी.कदम,उपअभियंता विलास पानस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण तालुक्यात यापुर्वी सलग पाच वेळा आमदारपद आणि एकदा राज्याचे कॅबिनेट मंत्री होण्याची संधी तालुक्यातील जनतेने विरोधकांना दिली.या २६ वर्षात विरोधकांकडून विकासाचे राजकारण तालुक्यात झाले नाही म्हणूनच तालुक्यातील अनेक विकासकामे प्रलंबीत राहिली.या गांवामध्ये गत चार वर्षात २ कोटी ४६ लाख रुपयांची जी प्रलंबीत कांमे राहिली होती ती पुर्ण केली.आंब्रग गाव देसाई गटाच्या पाठीशी ठाम उभे आहे म्हणूनच या गांवाला विकासाच्या बाबतीत झुकते माफ देण्याचा माझा कायम प्रयत्न राहिला आहे.विधानसभेच्या निवडणूकीनंतर झालेल्या पंचायत समिती,जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत या गांवाने मताधिक्कयामध्ये वाढ केली आहे ही आंनदाची बाब आहे.असाच पाठींबा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीतही या गांवाने कायम ठेवावा.या विभागात मागील वर्षी एकाच दिवशी धावडेच्या माळरानावर सुमारे १२ कोटी रुपयांच्या अनेक रस्त्यांच्या कामांची भूमिपुजने केली यातील अनेक कामे पुर्ण झाली तर काही कांमे प्रगतीपथावर आहेत.हातात सत्ता असताना विरोधकांना जे जमले नाही ते हातात सत्ता नसताना त्यांना शक्यच नाही हे तालुक्यातील प्रत्येक गांवाने आणि वाडीवस्तीने आता ओळखले आहे.तालुक्याच्या अनेक गांवामध्ये गावाला डोळयाला दिसतील अशी विविध विकासकांमे आपण गत चार वर्षात मार्गी लावली आहेत.ते माजी आमदारांना जमले नाही त्यांनी केलेली डोळयाला दिसतील अशी कामे प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये दाखवून दयावीत असे आवाहन करीत आमदार देसाई म्हणाले,माजी आमदार हे राज्याचे बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.बांधकाम मंत्री असताना देखील स्वत:च्या मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांवर त्यांनी दोन ठिकाणी टोल बसविला यावरुनच त्यांची कार्यक्षमता लक्षात येते.बांधकाम खात्याच्या किल्ल्या त्यांच्या हातात असताना देखील ते बिनटोलचा रस्ता मतदारसंघातील जनतेला देवू शकले नाहीत मी आमदार म्हणून राज्याच्या नाहीतर केंद्राच्या तिजोरीतून ३२० कोटी रुपयांचा प्रमुख रस्ता मंजुर करुन आणला त्याचे काम सध्या सुरु आहे या रस्त्यावर एकाही ठिकाणी टोल नाही.हा फरक त्यांच्या आणि माझे कामांमधील आहे.त्यांच्या २६ वर्षाच्या आमदारकीची कारकीर्द आणि माझे केवळ १० वर्षाची आमदारकीची कारकीर्द पाहिली तर माजी मंत्रयांना लाजवेल एवढया कोटयावधी रुपयांची विविध विकासकांमे मी शासनाकडून मंजुर करुन आणली आहेत येणा-या निवडणूकीत त्यांच्या कामांचा आणि माझे कामांची तुलना करुनच मतदारसंघातील जनतेने तालुक्याचा आमदार निवडावा.जो विकासाच्या कामांमध्ये उजवा असेल तोच या तालुक्याचे नेतृत्व करेल ही खुणगाठ मतदारसंघातील मतदारांनी मनाशी घट्ट बांधावी असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.
चौकट:- समाजाच्या मनामध्ये विष पेरणा-यांचा प्रचार हाणून पाडा. शंभूराज देसाई.
निवडणूका आल्या की,फोडाफोडी,जनतेचा बुध्दीभेद व मतांचा सौदा कशाप्रकारे करायचा यामध्ये आपले विरोधक तरबेज आहेत.पाच वर्षातून एकदा मतदान मागायला यायचे.स्वत: काही करायचे नाही आणि दुसरा करतोय त्यांच्या कामांसंदर्भात बुध्दीभेद करायचा.स्वत: काहीही न करता जनतेच्या मनामध्ये विष पेरणा-यांचा प्रचार पारावर बसून, चौकाचौकात बसून सुज्ञ जनतेने हाणून पाडणे गरजेचे असल्याचे मत आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केले.

आमदार शंभूराज देसाईंची शासकीय अधिकारी,पदाधिकारी यांचेसमवेत रंगली सुरेल दिवाळी सायंकाळ. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंसह तालुकास्तरापासून जिल्हास्तरीय सर्व अधिकारी दिवाळी फराळाला उपस्थित.

दौलतनगर दि.०६:- मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून सामाजीक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करताना एका जबाबदारीने आणि कर्तव्य भावनेने नित्यनेमाने आपल्या समवेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर दिवाळीचा गोड फराळ करुन हा सण आंनदाने आणि उत्साहाने गोड साजरा व्हावा या उद्देशाने दिवाळीच्या पुर्वसंध्येला पाटणचे महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंनी आयोजीत केलेली सलग तिस-या वर्षातील दिवाळीची सुरेल सायंकाळ ही मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ते,विविध संस्थांचे पदाधिकारी,तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंतच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगर ता.पाटण येथील निवासस्थानच्या परिसरात चांगलीच रंगली व साजरी झाली.आमदार शंभूराज देसाईंच्या दिवाळी फराळ सायंकाळमुळे कार्यकर्ते,पदाधिकारी,अधिकारी यांचा आनंद मोठया उत्साहाने व्दिगुणीत झाला.सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेमहाराज हेही या कार्यक्रमास उपस्थित होते.
               प्रतिवर्षी मोठया उत्साहाने साजरा होणाऱ्या दिवाळी या सणांचा आनंद खुप मोठा असून आपल्या समवेत काम करणाऱ्या प्रत्येकाबरोबर हा सण गोड व्हावा आणि त्यांच्या समवेत खाऊ दिवाळी,लेवू दिवाळी आणि सजवू दिवाळी या उद्देशाने पाटणचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई हे कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या निवासस्थान परिसरात गत तीन वर्षापासून दिवाळीचा फराळ खाणे आणि सोबत गाणे एैकणे अशापध्दतीने दिवाळी फराळ सुरेल सायंकाळ आयोजित करीत आहेत.दिवाळी फराळाची ही सुरेल सायंकाळ मोठया उत्साहाने पाटण मतदारसंघात गत तीन वर्षापासून साजरी होत आहे.यंदाच्या दिवाळी फराळ सायंकाळ कार्यक्रमास खास सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेमहाराज,जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंगल,निवासी जिल्हाधिकारी सचिन बारावकर,सातारा प्रातांधिकारी स्वाती देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज,कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे,परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक एस.एस.पळसुले,श्रीमती पी.टी.काशीद,कराडचे प्रांताधिकारी हिम्म्त खराडे,पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर,एमएसईबीचे कार्यकारी अभियंता अभिमन्यु राख,कराडचे तहसिलदार राजेश चव्हाण हे मान्यवर अधिकारी व त्यांचे सहकाऱी हे प्रमुख उपस्थित होते.   
                आपण सर्वजण आपआपल्या घरी दिवाळी सण साजरा करतो.परंतु रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपल्याला प्रत्येकालाच वेळ देता येत नाही.प्रत्येकाला आर्वजून भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम एक संधी असल्याचे ओळखून पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघातील विविध क्षेत्रातील मान्यवर,शासकीय अधिकारी,कार्यकर्ते,विविध संस्थाचे पदाधिकारी,डॉक्टर,वकील मंडळी यांच्यासाठी दिवाळी फराळ या उपक्रमाचे प्रतिवर्षी आयोजन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही त्यांनी दिवाळी फराळ या उपक्रमाचे आयोजन केले होते.सातारा जिल्ह्यात एकमेव पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे अशा अनोख्या पद्धतीने दिवाळी उत्सव साजरा करीत असल्याने त्‍यांच्या या उपक्रमाकडे नेहमीच सर्वाचेच लक्ष लागलेले असते.त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे दिवाळी फराळास आलेल्या सर्वाचा आनंद व्दिगुणीत तर होतोच परंतु कार्यक्रमांस येणारे उपस्थित हे मोठया उत्साहाने या उपक्रमास चांगलीच दाद देतात.आमदार शंभूराज देसाई हे स्वतः दिवाळीचे खाद्य पदार्थ घेवून या कार्यक्रमाची सुरूवात करतात त्यानंतर स्वतः प्रत्येक टेबलजवळ जावून कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी यांनी फराळ घेतला आहे का?यांची आपुलकीने चौकशी करीत असतात.येथे येणारा प्रत्येकजण धकाधकीचे जीवन विसरुन एकमेकांशी असलेले नाते जपण्यासाठी येत असून सामान्यातील सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी,मान्यवर यांना तालुक्‍याचे आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबर दिवाळी साजरी करता आली. याचे आत्मीक समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येते.या वर्षीही कार्यक्रमस्थळी कोल्हापुरचे प्रा. सुरेश शुक्‍ल निर्मीत मधूर स्वरांगण या मराठी गाण्याचा कार्यक्रम आयोजन करुन फराळ्याच्या गोडीबरोबर गाण्याच्या आस्वादाने दिवाळी फराळाची सुरेल सायंकाळ उत्साहात साजरी झाली.सुरेल संगीतावरील गाणी ऐकत प्रत्येकजण या दिवाळी फराळ्याच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक करीत होता.आमदार शंभूराज देसाईंनी या कार्यक्रमांस आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे अगत्याने स्वागत करुन दिवाळी फराळाचा आस्वाद घेण्याची विनंती केली.त्यांच्या विनंतीवरुन प्रत्येकाने या सुरेल दिवाळी फराळ सायंकाळचा मनमुराद आस्वाद घेतला.सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समूहातील पदाधिकारी विविध गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामस्थ यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Monday, 5 November 2018

शेतकऱ्यांच्या ऊसबिलाचा शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी देसाई कारखाना करेल. आमदार शंभूराज देसाईंचे ४५ व्या गळीत हंगाम शुभारंभात आश्वासन.

             देसाई कारखान्याच्या संदर्भात सुरवातीपासूनच विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो कारखाना बंद पडण्याची स्वप्ने पहाणाऱ्यां विरोधकांचे हे प्रयत्न आजही संपले नाहीत.परंतू कारखान्याच्या सभासदांना व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना मला जागृत आणि सावध करावयाचे आहे.क्षणिक फायदयासाठी दुसरी वाट धरण्याचा निर्णय विरोधकांच्या सांगण्यावरुन अनेक शेतकऱ्यांनी यापुर्वी घेतला तो शेतकऱ्यांच्या अडचणीचा आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे धोरण आपले कारखान्याने कधीच राबविले नाही. गतवर्षी सुमारे तीन लाख टन ऊसाचे गाळप होईल असा अंदाज बांधण्यात आला होता परंतू तालुक्यातील १ लाख्‍ टन ऊस बाहेर गेल्याने गाळप कमी झाले. अंदाजाप्रमाणे ऊसाचे गाळप झाले असते तर आम्हालाही शेतकऱ्यांना ऊसाचा चांगला दर देता आला असता तरीही कोणतेही कर्ज न काढता आपण जिल्हयातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने गतवर्षी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे ऊसाचा दर दिला यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाचा दर देणेसंदर्भात शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी आपला देसाई कारखाना करणार असल्याचे आश्वासन देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाईंनी दिले.
                दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांच्या हस्ते व आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, आदित्यराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर. पाटील, सातारा बँकेचे माजी व्हा.चेअरमन ॲड.बी.आर.पाटील,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, सुरेश पानस्कर, संतोष गिरी, माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कारखान्याचे सभासद व शेतकरी बांधवाची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
              याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात १२५० मे टनाचे किती साखर कारखाने सुरु आहेत आणि त्यांनी किती दर शेतक-यांना दिला आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. १०० किलोच्या पैलवानाबरोबर ५० किलोच्या पैलवानाची बरोबरी होऊ शकत नाही तसेच मोठया क्षमतेच्या कारखान्याच्या बरोबरीने आपल्या कारखान्याची बरेाबरी कधीच होवू शकत नाही.त्यामुळे मोठया क्षमतेच्या कारखान्याबरोबर तुलना करणे चुकीचे आहे.आपला आवाका पाहून हातपाय पसरणे योग्य.सवंग लोकप्रियतेकरीता ऊस दर देण्यासाठी मोठया कारखान्यांच्या बरोबर दराची स्पर्धा करायची याकरीता कारखान्यावर कर्ज काढायचे आणि त्याचा बोजा कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर ठेवायचा  असे कारखान्याने कधीच केले नाही.शेतकऱ्यांच्या पदरात न्यायच देण्याचा प्रयत्न कारखान्याने केला आहे. शेतकऱ्यांनीही साखर कारखानदारी समजुन घेणे गरजेचे आहे.मला कुठल्या कारखान्याचे नाव घ्यायचे नाही परंतू जो ऊस  शेतकरी बाहेरच्या कारखान्यांना घालतात त्या शेतकऱ्यांनी गेल्या ३ वर्षात एकाच कारखान्याला ऊस घातलेला दिसून येत नाही. दुर्देव एवढेच आहे की,कारखान्याच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून आपला ऊस भिजवायचा आणि तो बाहेरच्या कारखान्यांना घालायचा. ज्या कारखान्यांनी यापुर्वी एफआरपी एवढीही रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही.त्या कारखान्याला ऊस घालून शेतकऱ्यांचा काय फायदा झाला.अडचणीतील ऊस बाहेरचे कारखाने नेत नाहीत.लोकरी माव्याचे मागील वेळेस मोठे संकट शेतकऱ्यांवर आले तेव्हा आपल्याच कारखान्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देवून या संकटातून बाहेर काढले.कारखान्यावरही अडचणीचा आणि परीक्षेचा काळ आल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे आहे.अत्यंत कमी खर्चात आपण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकरीता उभारलेला हा कारखाना चालवित आहोत.खोटया आमिषांना बळी पडून शेतकऱ्यांनी आपले नुकसान करुन घेवू नये.कर्मचाऱ्यांचे वाढीव पगाराचे प्रश्न शिल्लक आहेत परंतू त्या प्रश्नांचा शेतकऱ्यांच्या ऊसदरावर कधीही परिणाम होवू दिला नाही.कर्मचाऱ्यांच्या वाढीव पगारवाढीचा निर्णयही कारखाना लवकर घेणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी क्षणिक फायदयासाठी खेाटया आमिषांना बळी पडून बाहेरच्या कारखान्यांना ऊस देवून त्यांनी त्यांचे नुकसान करुन घेवू नये. यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाचा दर देणेसंदर्भात शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण करणार असून आपले कारखान्याकडे नोदंविलेला संपुर्ण ऊस शेतकऱ्यांनी देसाई कारखान्यासच घालावा असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत चेअरमन अशोकराव पाटील यांनी केले आभार संचालक गजानन जाधव यांनी मानले.
चौकट:- ५०० रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, शासनाकडे आग्रही राहणार.- आमदार देसाई.
             साखरेचे दर मोठया प्रमाणात कोसळल्यामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. सध्या बाजारपेठेत साखरेचे भाव प्रति क्विटंल २९०० रुपये इतका आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम अदा करताना साखर कारखान्यांना सुमारे ५०० रुपये प्रति मे टन इतकी तुट येत आहे ही तुट भरुन काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संयुक्तीकपणे ५०० रुपयांचे अनुदान कारखान्यांना नाहीतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे याकरीता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शासनाकडे आग्रही राहणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.