दौलतनगर दि.०६:- मतदारसंघाचा प्रथम
नागरिक म्हणून सामाजीक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करताना एका जबाबदारीने आणि
कर्तव्य भावनेने नित्यनेमाने आपल्या समवेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर
दिवाळीचा गोड फराळ करुन हा सण आंनदाने आणि उत्साहाने गोड साजरा व्हावा या
उद्देशाने दिवाळीच्या पुर्वसंध्येला पाटणचे महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट
संसदपटु आमदार शंभूराज देसाईंनी आयोजीत केलेली सलग तिस-या वर्षातील दिवाळीची सुरेल
सायंकाळ ही मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ते,विविध संस्थांचे
पदाधिकारी,तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंतच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या
प्रमुख उपस्थितीत आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगर ता.पाटण येथील निवासस्थानच्या
परिसरात चांगलीच रंगली व साजरी झाली.आमदार शंभूराज देसाईंच्या दिवाळी फराळ
सायंकाळमुळे कार्यकर्ते,पदाधिकारी,अधिकारी यांचा आनंद मोठया उत्साहाने व्दिगुणीत
झाला.सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत
छत्रपती उदयनराजे भोसलेमहाराज हेही या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रतिवर्षी मोठया
उत्साहाने साजरा होणाऱ्या दिवाळी या सणांचा आनंद खुप मोठा असून आपल्या समवेत काम
करणाऱ्या प्रत्येकाबरोबर हा सण गोड व्हावा आणि त्यांच्या समवेत खाऊ दिवाळी,लेवू
दिवाळी आणि सजवू दिवाळी या उद्देशाने पाटणचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई हे
कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या निवासस्थान परिसरात गत तीन वर्षापासून दिवाळीचा
फराळ खाणे आणि सोबत गाणे एैकणे अशापध्दतीने दिवाळी फराळ सुरेल सायंकाळ आयोजित करीत
आहेत.दिवाळी फराळाची ही सुरेल सायंकाळ मोठया उत्साहाने पाटण मतदारसंघात गत तीन
वर्षापासून साजरी होत आहे.यंदाच्या दिवाळी फराळ सायंकाळ
कार्यक्रमास खास सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेमहाराज,जिल्हयाच्या
जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंगल,निवासी जिल्हाधिकारी सचिन बारावकर,सातारा
प्रातांधिकारी स्वाती देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,सार्वजनीक बांधकाम
विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज,कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे,परिवहन
महामंडळाचे विभाग नियंत्रक एस.एस.पळसुले,श्रीमती पी.टी.काशीद,कराडचे प्रांताधिकारी
हिम्म्त खराडे,पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ
ढवळे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर,एमएसईबीचे कार्यकारी अभियंता
अभिमन्यु राख,कराडचे तहसिलदार राजेश चव्हाण हे मान्यवर अधिकारी व त्यांचे सहकाऱी हे
प्रमुख उपस्थित होते.
आपण सर्वजण आपआपल्या घरी दिवाळी
सण साजरा करतो.परंतु रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपल्याला प्रत्येकालाच वेळ
देता येत नाही.प्रत्येकाला आर्वजून भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा
कार्यक्रम एक संधी असल्याचे ओळखून पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे
मतदारसंघातील विविध क्षेत्रातील मान्यवर,शासकीय अधिकारी,कार्यकर्ते,विविध संस्थाचे
पदाधिकारी,डॉक्टर,वकील मंडळी यांच्यासाठी दिवाळी फराळ या उपक्रमाचे प्रतिवर्षी
आयोजन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही त्यांनी दिवाळी फराळ या
उपक्रमाचे आयोजन केले होते.सातारा जिल्ह्यात एकमेव पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे
अशा अनोख्या पद्धतीने दिवाळी उत्सव साजरा करीत असल्याने त्यांच्या या उपक्रमाकडे
नेहमीच सर्वाचेच लक्ष लागलेले असते.त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे दिवाळी फराळास
आलेल्या सर्वाचा आनंद व्दिगुणीत तर होतोच परंतु कार्यक्रमांस येणारे उपस्थित हे
मोठया उत्साहाने या उपक्रमास चांगलीच दाद देतात.आमदार शंभूराज देसाई हे स्वतः
दिवाळीचे खाद्य पदार्थ घेवून या कार्यक्रमाची सुरूवात करतात त्यानंतर स्वतः
प्रत्येक टेबलजवळ जावून कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी यांनी फराळ घेतला आहे
का?यांची आपुलकीने चौकशी करीत असतात.येथे येणारा प्रत्येकजण धकाधकीचे जीवन विसरुन
एकमेकांशी असलेले नाते जपण्यासाठी येत असून सामान्यातील सामान्य कार्यकर्ता,
पदाधिकारी,मान्यवर यांना तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबर दिवाळी
साजरी करता आली. याचे आत्मीक समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येते.या
वर्षीही कार्यक्रमस्थळी कोल्हापुरचे प्रा. सुरेश शुक्ल निर्मीत मधूर स्वरांगण या
मराठी गाण्याचा कार्यक्रम आयोजन करुन फराळ्याच्या गोडीबरोबर गाण्याच्या आस्वादाने
दिवाळी फराळाची सुरेल सायंकाळ उत्साहात साजरी झाली.सुरेल संगीतावरील गाणी ऐकत
प्रत्येकजण या दिवाळी फराळ्याच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक करीत
होता.आमदार शंभूराज देसाईंनी या कार्यक्रमांस आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे अगत्याने
स्वागत करुन दिवाळी फराळाचा आस्वाद घेण्याची विनंती केली.त्यांच्या विनंतीवरुन
प्रत्येकाने या सुरेल दिवाळी फराळ सायंकाळचा मनमुराद आस्वाद
घेतला.सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समूहातील पदाधिकारी विविध गावचे
सरपंच,उपसरपंच, ग्रामस्थ यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment