लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग
समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदार संघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई
यांचा वाढदिवस प्रतिवर्षी पाटण तालुक्यात
मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा त्यांचा 52 वा वाढदिवस शनिवार
दि.17 नोव्हेंबर 2018 रोजी कारखाना या कार्यस्थळ,दौलतनगर येथे मोठया दिमाखात साजरा
होत आहे.वाढदिवस असो वा सत्कार समारंभ या कार्यक्रमामध्ये शाल,श्रीफळ देवून सत्कार किंवा स्वागत करण्यापेक्षा सत्कार
म्हणून शालेय साहित्य अथवा वहया दयाव्यात हा पायंडा स्वत: आमदार शंभूराज देसाईंनीच
मतदारसंघात पाडला असून माझे वाढदिवसानिमित्त भेट देताना मला गरीब कुटुंबातील
मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता भेट म्हणून वहया व शालेय सहित्यच दयावे
असे आवाहन स्वत: आमदार शंभूराज देसाई
यांनी केले आहे.
आमदार शंभूराज देसाई यांनी
केलेल्या आवाहनामध्ये म्हंटले आहे की, प्रतिवर्षी साज-या होणा-या माझे वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे आणून मला
सदिच्छा देण्यात येत होत्या.त्या दिवसापुरते
त्या हारतु-यांचे महत्व होते परत हे सर्व हारतूरे एकञित करून ते नदीमध्ये
विसर्जन करावे लागत असल्याने गत सात ते आठ वर्षापासून माझे वाढदिवसाला भेट देवून
सदिच्छा देणा-या व्यक्तींनी हारतूरे न आणता गरीब कुटुंबातील मुलामुलींना
शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता वहया तसेच शालेय साहित्यच भेट दयावे अशी मी हाक
दिली या माझे हाकेलाही मतदारसंघातील जनतेने
चांगला प्रतिसाद दिला हाच पायंडा मी लग्नसमारंभ तसेच सत्कार समारंभाच्या
निमित्ताने राबविला त्यासही जनतेने मोठया संख्येने प्रतिसाद दिला.प्रतिवर्षी मला
भेट मिळणा-या वहया तसेच शालेय साहित्य हे मी मतदारसंघातील गरीब कुटुंबातील
मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार म्हणून देत असतो. गत सात ते आठ वर्षापासून
प्रतिवर्षी माझा वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने मला भेट मिळणा-या
सुमारे दीड लाखाहून अधिक वहयाचा सदुपयोग पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागातील गरीब
कुटुंबातील विदयार्थींनीना देवून मदतीचा हातभार लावला आहे.त्यामुळे यंदाच्या
वर्षीही माझे वाढदिवसानिमित्त भेट देताना मला वहया तसेच शालेय साहित्य दयावे असे
आवाहन स्वत: आमदार शंभूराज देसाईंनीच केले
आहे.
No comments:
Post a Comment