Monday 5 November 2018

शेतकऱ्यांच्या ऊसबिलाचा शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी देसाई कारखाना करेल. आमदार शंभूराज देसाईंचे ४५ व्या गळीत हंगाम शुभारंभात आश्वासन.





             देसाई कारखान्याच्या संदर्भात सुरवातीपासूनच विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो कारखाना बंद पडण्याची स्वप्ने पहाणाऱ्यां विरोधकांचे हे प्रयत्न आजही संपले नाहीत.परंतू कारखान्याच्या सभासदांना व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना मला जागृत आणि सावध करावयाचे आहे.क्षणिक फायदयासाठी दुसरी वाट धरण्याचा निर्णय विरोधकांच्या सांगण्यावरुन अनेक शेतकऱ्यांनी यापुर्वी घेतला तो शेतकऱ्यांच्या अडचणीचा आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे धोरण आपले कारखान्याने कधीच राबविले नाही. गतवर्षी सुमारे तीन लाख टन ऊसाचे गाळप होईल असा अंदाज बांधण्यात आला होता परंतू तालुक्यातील १ लाख्‍ टन ऊस बाहेर गेल्याने गाळप कमी झाले. अंदाजाप्रमाणे ऊसाचे गाळप झाले असते तर आम्हालाही शेतकऱ्यांना ऊसाचा चांगला दर देता आला असता तरीही कोणतेही कर्ज न काढता आपण जिल्हयातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने गतवर्षी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे ऊसाचा दर दिला यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाचा दर देणेसंदर्भात शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी आपला देसाई कारखाना करणार असल्याचे आश्वासन देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाईंनी दिले.
                दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांच्या हस्ते व आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, आदित्यराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर. पाटील, सातारा बँकेचे माजी व्हा.चेअरमन ॲड.बी.आर.पाटील,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, सुरेश पानस्कर, संतोष गिरी, माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कारखान्याचे सभासद व शेतकरी बांधवाची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
              याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात १२५० मे टनाचे किती साखर कारखाने सुरु आहेत आणि त्यांनी किती दर शेतक-यांना दिला आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. १०० किलोच्या पैलवानाबरोबर ५० किलोच्या पैलवानाची बरोबरी होऊ शकत नाही तसेच मोठया क्षमतेच्या कारखान्याच्या बरोबरीने आपल्या कारखान्याची बरेाबरी कधीच होवू शकत नाही.त्यामुळे मोठया क्षमतेच्या कारखान्याबरोबर तुलना करणे चुकीचे आहे.आपला आवाका पाहून हातपाय पसरणे योग्य.सवंग लोकप्रियतेकरीता ऊस दर देण्यासाठी मोठया कारखान्यांच्या बरोबर दराची स्पर्धा करायची याकरीता कारखान्यावर कर्ज काढायचे आणि त्याचा बोजा कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर ठेवायचा  असे कारखान्याने कधीच केले नाही.शेतकऱ्यांच्या पदरात न्यायच देण्याचा प्रयत्न कारखान्याने केला आहे. शेतकऱ्यांनीही साखर कारखानदारी समजुन घेणे गरजेचे आहे.मला कुठल्या कारखान्याचे नाव घ्यायचे नाही परंतू जो ऊस  शेतकरी बाहेरच्या कारखान्यांना घालतात त्या शेतकऱ्यांनी गेल्या ३ वर्षात एकाच कारखान्याला ऊस घातलेला दिसून येत नाही. दुर्देव एवढेच आहे की,कारखान्याच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून आपला ऊस भिजवायचा आणि तो बाहेरच्या कारखान्यांना घालायचा. ज्या कारखान्यांनी यापुर्वी एफआरपी एवढीही रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही.त्या कारखान्याला ऊस घालून शेतकऱ्यांचा काय फायदा झाला.अडचणीतील ऊस बाहेरचे कारखाने नेत नाहीत.लोकरी माव्याचे मागील वेळेस मोठे संकट शेतकऱ्यांवर आले तेव्हा आपल्याच कारखान्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देवून या संकटातून बाहेर काढले.कारखान्यावरही अडचणीचा आणि परीक्षेचा काळ आल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे आहे.अत्यंत कमी खर्चात आपण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकरीता उभारलेला हा कारखाना चालवित आहोत.खोटया आमिषांना बळी पडून शेतकऱ्यांनी आपले नुकसान करुन घेवू नये.कर्मचाऱ्यांचे वाढीव पगाराचे प्रश्न शिल्लक आहेत परंतू त्या प्रश्नांचा शेतकऱ्यांच्या ऊसदरावर कधीही परिणाम होवू दिला नाही.कर्मचाऱ्यांच्या वाढीव पगारवाढीचा निर्णयही कारखाना लवकर घेणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी क्षणिक फायदयासाठी खेाटया आमिषांना बळी पडून बाहेरच्या कारखान्यांना ऊस देवून त्यांनी त्यांचे नुकसान करुन घेवू नये. यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाचा दर देणेसंदर्भात शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण करणार असून आपले कारखान्याकडे नोदंविलेला संपुर्ण ऊस शेतकऱ्यांनी देसाई कारखान्यासच घालावा असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत चेअरमन अशोकराव पाटील यांनी केले आभार संचालक गजानन जाधव यांनी मानले.
चौकट:- ५०० रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, शासनाकडे आग्रही राहणार.- आमदार देसाई.
             साखरेचे दर मोठया प्रमाणात कोसळल्यामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. सध्या बाजारपेठेत साखरेचे भाव प्रति क्विटंल २९०० रुपये इतका आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम अदा करताना साखर कारखान्यांना सुमारे ५०० रुपये प्रति मे टन इतकी तुट येत आहे ही तुट भरुन काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संयुक्तीकपणे ५०० रुपयांचे अनुदान कारखान्यांना नाहीतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे याकरीता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शासनाकडे आग्रही राहणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.




No comments:

Post a Comment