Friday, 8 February 2019

निष्क्रीयांना आतापर्यंत पोत्याने भरुन मते दिली, मताचे पोते आता आमच्या पदरात टाका. - आमदार शंभूराज देसाई.




­­
          दौलतनगर दि.०8:- २१ वर्षे निष्क्रीयांना आतापर्यंत या विभागाने पोत्याने भरुन मते दिली. जनतेने पोत्याने भरुन मते देवूनही या विभागातील गांवाचा विकास मते घेणाऱ्यांनी केला नाही.पिढयानपिढया विकासापासून वंचीत राहिलेल्या या विभागातील गांवाना गत चार वर्षात मला किती मतदान पडले याचा विचार न करता मी या विभागात लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत.अनेक कामे पुर्ण झाली तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत मताचे पोते येणाऱ्या निवडणूकीत आता आमच्या पदरात टाका असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
                             घेरादातेगड ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून १५ लक्ष रुपयांच्या निधीच्या कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,किसन मांडवकर,लक्ष्मण मांडवकर,ग्रामपंचायत सदस्य बंडू पवार,गिता मांडवकर,उत्तम मानसिंग,गणेश मानसिंग,विजय भोसले,निलेश मांडवकर,बबनराव माळी,रामचंद्र पवार, धमेंद्र पवार, गणेश लाड,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
                          याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,घेरादातेगड या गांवातील मतांची पेटी यापुर्वीच्या अनेक निवडणूकीत समोर आली की, माजी आमदारांचे पदरातच सगळी मते. सगळी गांवातील मते देवुन या गावाला पोहोच असणाऱ्या रस्त्यावर इतक्या वर्षात डांबर का पडले नाही.ज्यांना या गांवाने पोत्याने भरभरून यापुर्वी मते दिली त्यांनी गांवाला राज्याचे सार्वजनीक बांधकाम खात्याचे सलग पाच वर्षे मंत्री असताना का डांबरी रस्ता देवू शकले नाहीत. पिढयानपिढया आपण सर्वजण त्यांच्या मागे फिरत राहिला आणि त्यांनी तुम्हाला फिरवतच ठेवले.केवळ मतापुरता आपला वापर करायचा हाच त्यांचा उद्योग या विभागात पहायला मिळतोय. अनेक वर्षे या गांवाचा रस्ता झाला नाही म्हणून काही ग्रामस्थ मला भेटायला आले.गावचे ग्रामदैवताकरीता सभामंडप आणि गावपोहोच रस्ता एवढी आमची दोन कांमे प्रलंबीत आहेत ती पुर्ण करा अशी त्यांनी मागणी केली. पहिल्या भेटीतच ग्रामदैवताकरीता सभामंडप देण्याचे मान्य करुन त्याकरीता निधी दिला.आज या सभामंडपाचे उदघाटन आणि रस्त्याचे भूमिपुजन अशा संयुक्त कार्यक्रमाकरीता गांवात आलो आहे. हा रस्ता जिल्हा नियोजन समितीमधून १५ लाख रुपयांचा असला तरी या गावचा गावपोहोच रस्ता ३ किलोमीटरचा आहे. १५ लाख रुपयांच्या निधीमध्ये गावाकडून रस्ता सुरु करावा. ३ किलोमीटरच्या सदरचे रस्त्याकरीता सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी मी शासनाकडे यापुर्वीच केली होती त्यानुसार चारच दिवसापुर्वी या रस्त्याबरोबर मतदारसंघातील बाकीच्या काही मोठया रस्त्यांच्या संदर्भात मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत या मोठया रस्त्यांच्या कामांना निधी देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. मी केवळ आश्वासन देत नाहीतर दिलेला शब्द पाळतो याचा प्रत्यय या दोन्ही कामांवरुन आपणांस आला आहे. या विभागातील गावागावात आपल्या गांवातील कामांप्रमाणेच मोठया प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. विरोधकांना ही कामे दिसत असून ते दिसत नसल्याचे ढोंग करुन जनतेची डोकी भडकविण्याचे काम करीत आहेत. आताच काही महिलांनी गावाकरीता पिण्याच्या पाण्याच्या योजनेची सोय करा अशी मागणी माझेकडे केली. सन २०१९-२० चा राष्ट्रीय पेयजल योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम शासन पातळीवर सुरु आहे. प्राधान्याने या गांवाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा समावेश हा राष्ट्रीय पेयजल योजनेचा आराखडयात मी करण्यासाठी आग्रही राहीन याची काळजी आपण करु नये असे सांगून ते म्हणाले गावाची एकी विकासकामांच्या माध्यमातुन दिसून येत असून काही विघ्नसंतोषी मंडळी गावात येवून आम्ही असे करतो, आम्ही तसे करतो असे सांगून आपली दिशाभूल करतील अशाच्या नादी न लागता जो विकास देवू शकतोय त्यांच्याच पाठीशी ठाम रहा व येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत गावाची ही एकी अशीच कायम ठेवा. कारण आतापर्यंत ज्यांना आपल्याला काही देता आले नाही त्यांच्या हातात आता तर देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे ते तुम्हाला काही देवू शकणार नाहीत हे मलाही चांगलेच माहिती आहे आणि तुम्हालाही त्यामुळे अशांना चार हात लांबच ठेवून उर्वरीत राहिलेला गांवाचा विकास पुर्ण करुन घ्यावा असेही त्यांनी शेवठी बोलताना सांगितले. यावेळी बबनराव माळी,गणेश लाड यांनी मनोगत व्यक्त केले. घेरादातेगड येथील नागरिक व महिला तसेच मुंबई मंडळातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक निलेश मांडवकर यांनी केले व आभार किसन मांडवकर यांनी मानले.

Wednesday, 6 February 2019

कोयना पर्यटनातील कामांना सुरुवात पहिल्या टप्प्यात कोयनानगर विश्रामगृहाचे बांधकामास २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीस मान्यता. कामांची निविदाही प्रसिध्द- आमदार शंभूराज देसाई




दौलतनगर दि.०६:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता कोयना पर्यटनाचा १८ कोटी २८ लाख रुपयांचा आराखडा शासनाकडे मान्यतेकरीता सादर केला असून कोयना पर्यटनाच्या कामांस शासनाने प्रत्यक्षात सुरुवात करुन कोयना पर्यटनातील कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस पहिल्या टप्प्यात शासनाने मंजुरी दिली आहे. कोयना पर्यटनातील कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ मंजुर करावा अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये कोयना दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्याकडे केली होती त्यानुसार आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी शासनाने कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस मंजुर केला आहे या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदाही प्रसिध्द झाली असून कोयना पर्यटनातील कामांना कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणे या कामांपासून सुरुवात झाल्याचा आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे.
                    आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता जलसंपदा विभागाचे कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांचेमार्फत या विभागातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता अंदाजपत्रक तयार करुन घेतले होते सदरचे अंदाजपत्रक हे सविस्तर प्रस्तावासह जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत राज्य शासनास सादर केले आहे. प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता संबधित विभागांना शासनाने निधी उपलब्ध करुन दयावा अशी माझी सुरवातीपासूनच शासनाकडे आग्रही मागणी होती राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये कोयना दौऱ्यावर आले होते तेव्हा या कोयना पर्यटन आराखडयाच्या संदर्भात मी जलसंपदा मंत्री यांचे लक्ष वेधले होते तेव्हा त्यांनी तात्काळ कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन देखील दिले होते त्यानुसार जलसंपदा विभागाचे कोयना सिंचन विभाग,कोयनानगर यांचेमार्फत कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता एकूण आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदाही प्रसिध्द झाली असून यावर्षी या कामांस १ कोटी १० लाख रुपयांची तरतूदही शासनाचे जलसंपदा विभागाने विभागास केली आहे. कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणे ही कोयना पर्यटनातील महत्वाची बाब असून पर्यटकांना वास्तव्याकरीता योग्य जागा नसल्याने आतापर्यंत पर्यटकांचा ओढा कोयनानगरकडे कमी होत चालला होता कोयना विश्रामगृहाचे बांधकामामुळे पर्यटकांना हक्काचे वास्तव्य करण्यास मिळणार असल्याने येथील पर्यटनाला चालना मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदा आजच प्रसिध्द झाल्याने कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून लवकरच या विश्रामगृहाचे रुपडे पालटणार असल्याचा आनंद होत आहे. कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आवश्यक असणारा निधी मंजुर करुन उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी या मतदारसंघाचा आमदार या नात्याने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो असेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणेकरीता शासनाकडे सर्व ताकत लावू. पाणी मुद्यावर मणदुरे व केरा विभागातील जनतेने एक व्हा. आमदार शंभूराज देसाईंचे आवाहन




दौलतनगर दि.०६:- गत चार वर्षातच पाटण विधानसभा मतदारसंघातील मोठया व मध्यम धरण प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली असून तारळी आणि मोरणा गुरेघर या धरण प्रकल्पांच्या प्रमाणे मणदुरे व केरा या विभागातील शेतकऱ्यांना निवकणे,चिटेघर व बिबी मध्यम धरण प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी देण्यास मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून कटीबध्द आहे. माझी आमदारकीची सर्व ताकत या विषयासंदर्भात शासनाकडे मी लावणार असून पाणी मुद्यावर मणदुरे आणि केरा विभागातील जनतेने एक होण्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी करुन हा भाग तसा लवकर तयार होत नाही परंतू तुम्हाला पाणी मिळवून दयायला पोत्याने भरुन मते देणाऱ्या दादांच्या हातात आता काही राहिले नाही असा चिमटाही आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार विक्रमसिंह पाटणकरांचे नाव न घेतला.
     साखरी ता.पाटण येथे मणदुरे आणि केरा विभागातील निवकणे,चिटेघर व बिबी मध्यम धरण प्रकल्पांची कामे पुर्णत्वाकडे नेवून या प्रकल्पातून ठिकठिकाणी कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधून या विभागातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळवून देणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी परीषद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,माजी सदस्य सुरेश जाधव,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,माजी संचालक ॲड.तानाजीराव घाडगे,मधूकर भिसे,बापूराव सावंत,विलास कुऱ्हाडे,बबनराव माळी,लक्ष्मण सकपाळ,कृष्णत देसाई,शंकरराव पाटील,बशीर खोंदू,नगरसेवक गणीभाई चाफेरकर, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,राजेंद्र पाटणकर,शंभूराज युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत साळुंखे व संजय जाधव या मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच या विभागातील शेतकरी व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
                 याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,तालुक्याच्या माजी आमदारांनी सन 1997 ला मेंढोशी येथे या विषयासंदर्भात पाणी परिषद घेतली होती.तेव्हा राज्यात आणि केंद्रातही त्यांचीच सत्ता होती किती शेतकऱ्यांना त्यांनी या प्रकल्पातून पाणी मिळवून दिले तुम्ही मात्र त्यांना पोत्याने भरभरुन मते देत आहात या माळरानावरची शेती हिरवीगार झाली असती परंतू माजी आमदारांना ती करता आली नाही.याचा विचार या विभागातील शेतकऱ्यांनी आणि जनतेने करणे गरजेचे आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पाणी अडविण्याचे धोरण सन १९९7 ला युतीच्या शासनाने घेतले त्यामुळेच आपल्या तालुक्यातील धरणांची कामे सुरु झाली.1999 ला युतीचे सरकार सत्तेवरुन गेले आणि सर्व धरणांची कामे ठप्प झाली. त्याला आपला पाटण तालुकाही अपवाद नाही. आघाडीच्या शासनाने जलसंपदा विभागाचा १५ वर्षात पैसा खर्च केला परंतू मागील आघाडी सरकारचे मुख्यमंत्री हे पृथ्वीराज बाबा असताना त्यांनीच जाहीरपणे एवढा पैसा खर्च करुनही सिंचनाचा एक टक्काही वाढला नसल्याचे जाहीर केले होते. आघाडीच्या शासनाने जलसंपदा विभागाचा पैसा खर्च केला परंतू पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही मग हा पैसा कुठे खर्च झाला.गत चार वर्षात राज्यातील धरण प्रकल्पांच्या कामांना खऱ्या अर्थाने गती आली ती युतीच्या शासनामुळे. मी मंत्री नाही साधा आमदार आहे तरीही तारळी धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील शेतकऱ्यांना पाच उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी 553 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला 50 मीटरच्या वरील क्षेत्राला यामुळे पाणी मिळणार असल्याने एकूण 3000 एकर जादाचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आपल्या तालुक्याच्या माजी आमदारांनी याच तारळी धरण प्रकल्पातील पाणी बंदिस्त पाईपलाईनने त्यांच्या साहेबांच्या मतदारसंघाला देण्याचा घाट घातला होता.माझे सातत्याच्या प्रयत्नामुळे या प्रकल्पातील पाच उपसा जलसिंचन योजनांची निविदाही प्रसिध्द झाली लवकरच कार्यारंभ आदेशही मिळेल.तसेच मोरणा गुरेघर प्रकल्पातील चुकीच्या कॅनॉलमुळे येथीलही बहूतांशी क्षेत्र वंचीत रहात होते तेथेही उपसा जलसिंचन योजना राबवून टेंभू योजनेचे धोरण राबवून पाणी देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे या धोरणानूसार 81 रु. शासनाने आणि केवळ 19 रु शेतकऱ्यांना  भरावे लागणार आहेत.तारळे मोरणेत जे होवू शकते ते मणदुरे व केरा विभागात का होवू शकत नाही याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही याकरीता सर्वांनी उठाव करण्याची गरज आहे.काही प्रकल्पातील शेतकऱ्यांना जमिनींच्या बदल्यात रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे त्यावर लवकरच बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल कुणीतरी भाषणात सांगितले या विभागातील पाणी अडवा मग मतांचा लोंढा पहा.पाणी परिषदेची कार्यकारीणी करुया पक्षीय गटतट,मतभेद बाजूला ठेवून एकत्र या आजची पाणी परिषद ही सुरुवात आहे ‍पिढयान पिढया आपण असे का राहिलो याचा विचार करुन या विभागातील शेतकऱ्यांनी पाणी मुद्यावर एक व्हा अजुनही उशीर झालेला नाही असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
 चौकट:- दादा, दमदाटी करायला येथे वेळ आहे कुणाला?
माजी आमदारसाहेब, गत चार वर्षात एवढी कामे मंजुर करुन आणली आहेत तुम्हाला मंत्री असताना ती आणता आली नव्हती,भूमिपुजने करायला वेळ मिळेना ते दमदाटी करायला येथे वेळ आहे कुणाला? मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आत्ताच्या मुख्यमंत्री यांनी आणली आहे,दादा तुम्ही कधी गेला होता बिबीची योजना मंजुर करायला.पाटण तालुका टँकरमुक्त करण्याकडे आम्ही निघालो आहोत आणि दादा अजुन टँकरमध्येच अडकून राहिले आहेत.या विभागातील जनतेला दादा तुम्ही टँकरने पाणी देणार म्हणता परंतू टँकर मंजुर करायलाही आमदारांचीच सही लागते.दादा,सुरुलकरांना आणि बिबीकरांना नळाचे पाणी पिवू दे की,का कायम टँकरनेच पाणी मिळावे अशी तुमची अपेक्षा आहे असा टोलाही त्यांनी शेवठी बोलताना लागविला.

Monday, 4 February 2019

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ३ मोठया रस्त्यांच्या कामांना ११ कोटी १० लक्ष रुपयांच्या निधीची शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.






दौलतनगर दि.०४ :- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० करीता सुचविण्यात आलेल्या पाटण तालुक्यातील तीन मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पारित केला आहे.पाटण तालुक्यातील विविध भागातील तीन महत्वाच्या रस्त्यांच्या कामांकरीता ११ कोटी १० लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असून ०९.७०० किलोमीटर रस्त्याची लांबी या निधीतून पुर्ण होणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१९-२० मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे विनंती करुन या कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते.सदरच्या कामांना ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे सुचनेवरुन राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या तीन रस्त्यांच्या कामांकरीता ११ कोटी १० लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीमधून ०९.७०० किलोमीटर रस्त्याची लांबी पुर्ण होणार आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांमध्ये पाटण तालुक्यातील घोट ते बोर्गेवाडी रस्ता करणे ३.५०० किमी ३ कोटी २७ लाख ५७ हजार, भालेकरवाडी (बनपूरी) हनुमानवार्ड रस्ता करणे ३.००० किमी ३ कोटी ०१ लाख  ४६ हजार, बोर्गेवाडी वर्पेवाडी सळवे रस्ता करणे ३.२०० किमी ०४ कोटी २६ लाख २१ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर या तिन्ही कामांची पाच वर्षाकरीता नियमीत देखभाल दुरुस्ती करणेकरीता अनुक्रमे १७ लाख ६१ हजार, १४ लाख ९९ हजार, २२ लाख ६५ हजार रुपयांची तरतूदही शासनाने केली असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने      दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पारित केला आहे. या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Saturday, 2 February 2019

खळे - काढणे विभागातील संपुर्ण वाडयांची रस्त्यांची कामे पुर्णत्वाकडे- आमदार शंभूराज देसाई.


          दौलतनगर दि.०१:- 2014 च्या विधानसभा निवडणूकीत मी मते मागायला आल्यानंतर मतदारांना दिलेल्या आश्वासनांची या तालुक्याचा आमदार म्हणून मी पुर्तता केली आहे व करीत आहे.आज खळे व काढणे या विभागातील संपुर्ण वाडयांची रस्त्याची असणारी कामे पुर्णत्वाकडे गेली आहेत.काजारवाडीचा रस्ता शिल्लक राहिला होता त्याकरीता २० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिल्यानंतर या विभागातील एकही वाडी रस्त्यावाचून वंचीत राहत नाही याचा आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
                             काजारवाडी (खळे) ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून १० लक्ष रुपयांच्या निधीच्या कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे,पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई, पंचायत समिती सदस्या सौ.सिमा मोरे,शिवदौलत बँकेचे संचालक नेताजीराव मोरे,मधूकर पाटील,महादेव पानवळ खळे सरपंच संदीप टोळे, नामदेव पाटील, सरपंच सौ.अश्विनी डुबल, उपसरंपच सौ. सारीका काजारी, नंदकुमार काजारी, विनायक डुबल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
                          याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,खळे ते शिद्रुकवाडी आणि शिद्रुकवाडी ते काढणे या रस्त्याची २०१४ पुर्वी काय अवस्था होती. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत मी या विभागातील जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार युतीच्या राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी मंजुर करीत खळे ते शिद्रुकवाडी आणि शिद्रुकवाडी ते काढणे या दोन्ही रस्त्याचे काम पुर्ण करुन घेतले. काजारवाडीचा रस्ता शिल्लक राहिला होता त्याकरीता जिल्हा नियोजन समितीमधून १० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आज त्याचे भूमिपुजन होत आहे.तर कोयना भूकंप पुर्नवसन निधी समितीमधूनही या कामाकरीता १० लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.स्थानिक पातळीवर याचे भूमिपुजन करुन याही रस्त्याच्या कामांस सुरुवात करावी. एकूण २० लक्ष रुपयांचा निधीतून हे संपुर्ण काम पुर्ण होणार आहे. तर शिद्रुकवाडी ते डुबलवाडी या रस्त्याच्या कामांकरीताही कोयना भूकंप पुर्नवसन निधी समितीमधून १५ लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे. हे दोन्ही रस्ते झालेनंतर खळे व काढणे या विभागातील संपुर्ण वाडयांची रस्त्यांची कामे पुर्णत्वाकडे जात आहेत.विकासापासून अनेक वर्षे वंचीत राहिलेल्या मतदारसंघातील छोटया छोटया वाडयावस्त्यांनाही शासनाच्या विविध योजनेमधून निधी देवून या वाडयांचा विकास करण्याचे काम आपण केले आहे. आपल्या गावाचा,वाडयावस्त्यांचा विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी मतदारसंघातील जनता यामुळेच तर ठाम आहे याचा आनंद आहे. असे सांगत त्यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारसंघातील जनतेने त्यांच्या गावामध्ये या चार वर्षात झालेल्या विविध विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या 2019 चा आमदार निवडावा. विरोधकांना मते मागायला आल्यानंतर गेल्या चार वर्षात जनतेला त्यांनी काय दिले याचा जाब विचारावा असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले. यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. खळे,काजारवाडी, शिद्रुकवाडी व डुबलवाडी येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच महादेव जाधव यांनी केले.

Thursday, 31 January 2019

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडून पाटण मतदारसंघातील 39 गावांना ०३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.




­­
          दौलतनगर दि.३१:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून ३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
          प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील ३९ गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मंजूर होणेकरीता दि.०३.१०.२०१८ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असणाऱ्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण ३९ विविध विकासकामांना ३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना  दि.२८ जानेवारी, २०१९ रोजीचे पत्रानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर झालेल्या विकासकामामध्ये मोरेवाडी (चिखलेवाडी) अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.00 लाख, वायचळवाडी कुंभारगाव अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, पाचुपतेवाडी मालदन अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, म्हाळूंगेवस्ती सातर अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, शेंडेवाडी कुंभारगाव अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, किल्लेमोरगिरी ते गुंजाळी रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख, गुरेघर अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.50 लाख, नहिंबे तळीये सुतारवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.50 लाख, मणेरी साळूंखे वार्ड अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 300 मीटर 6.97 लाख, सदुवर्पेवाडी सळवे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, कोदळ पुनर्वसन अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,वेताळवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, तळमावले नवीन वसाहत अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, रामिष्टेवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.00 लाख, मस्कवाडी नं.1 उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.00 लाख,पोकळेवाडी कारळे रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,बाचोली जोतिर्लिंगनगर अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, धामणी स्मशानभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण 125 मीटर  10.00 लाख, कसणी ते धनगरवाडा रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, काजारवाडी खळे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, रुवले विठ्ठल साळूंखे घर ते हिंदुराव साळूंखे यांचे घर काँक्रीटीकरण 250 मीटर 5.00 लाख, शिंद्रुकवाडी ते डुबलवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख, ऊरुल अंतर्गत सनगरवाडी व पोळाचीवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 9.98 लाख, जाधववाडी चाफळ अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.27 लाख, जाईचीवाडी बोंद्री रस्ता खडीकरण डांबरीकरण  5.00 लाख, आवर्डे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, दुटाळवाडी नुने अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, मालोशी पोहोच रस्ता डांबरीकरण 10.00 लाख, धुमुकवाडी मुरुड अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.00 लाख, ताईचीवाडी शिरळ पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 6.00 लाख, पिराजीचीवाडी हुंबरळी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, कराड चिपळूण रोड ते पांढरवाडी तेलेवाडी नाडे रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख, राजवाडा घाणव अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 4.99 लाख, म्हारकवस्ती मणदुरे गावपोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 6.00 लाख, मरड गावपोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 9.99 लाख, हुंबरळी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख, करामळे वजरोशी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 9.99 लाख, नाणेल ता. पाटण येथे सभामंडप बांधणे. 7.00 लाख, जंगलवाडी तारळे येथे सभामंडप बांधणे 7.00 लाख असे एकूण ३ कोटी ५३ लाख १०,९०० रुपयांचा निधी मंजुर झाला असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

Wednesday, 30 January 2019

पाटण तालुक्यातील सहा तलाठी कार्यालय इमारतींचे कामांना 01 कोटी 68 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.





दौलतनगर दि.2९:- पाटण तालुक्यातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणीच्या 06 तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्याकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शासकीय इमारत बांधणे या योजनेअंतर्गत 01 कोटी 68 लक्ष 46 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुक्यामध्ये ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण काम  करणा-या महसूल विभागाचा तलाठी सजा असलेल्या गावांमध्ये स्वंतत्र अशी तलाठी कार्यालय नसल्याने बहुतांशी तलाठी कार्यालयांचे दैनंदिन कामकाज हे त्या त्या संबंधित मंडल कार्यालयमध्ये सुरु होते. त्यामुळे महसूल विभागाचा स्वतंत्र तलाठी सजा असूनही तलाठी कार्यालयाची इमारत नसल्याने सर्व सामान्य जनतेला आपल्या कामांकरीता नाहक त्रास होत होता. ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्वतंत्र तलाठी सजा असलेल्या परंतु तलाठी कार्यालयाची इमारत नसलेल्या ठिकाणी नविन तलाठी कार्यालय इमारतींचे कामांना मजूरी देण्यात येऊन नविन तलाठी कार्यालय इमारतींचे कामांना निधी मंजूर होणेसाठी मी राज्याचे महसूलमंत्री व महसूल राज्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर महसूल विभागाकडून तातडीने संबंधित तलाठी कार्यालय इमारतींचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह मंजूरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यानुसार सन 2018-19 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शासकीय इमारत बांधणे या योजनेतून दि.29/01/2019 चे पत्रान्वये पाटण मतदारसंघातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणीच्या 06 तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्याकरीता 01 कोटी 68 लक्ष 46 हजार रुपये एवढया निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये तारळे तलाठी कार्यालय इमारत 28.52 लक्ष, ऊरुल तलाठी कार्यालय इमारत 28.46 लक्ष, मल्हारपेठ तलाठी कार्यालय इमारत 28.39 लक्ष, नाडे तलाठी कार्यालय इमारत 28.33 लक्ष, आडूळ पेठ तलाठी कार्यालय इमारत 28.31 लक्ष, बहुले तलाठी कार्यालय इमारत 26.45 लक्ष या नविन तलाठी कार्यालय इमारतींचे कामांचा समावेश असून लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने हि कामे हाती घेण्यात येणार असलेची माहिती आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकांत दिली आहे.