दौलतनगर दि.2९:- पाटण तालुक्यातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणीच्या 06 तलाठी
कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्याकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)
अंतर्गत शासकीय इमारत बांधणे या योजनेअंतर्गत 01 कोटी 68 लक्ष 46 हजार रुपयांचा
निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत
दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत
पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुक्यामध्ये ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण काम करणा-या महसूल विभागाचा तलाठी सजा असलेल्या
गावांमध्ये स्वंतत्र अशी तलाठी कार्यालय नसल्याने बहुतांशी तलाठी कार्यालयांचे
दैनंदिन कामकाज हे त्या त्या संबंधित मंडल कार्यालयमध्ये सुरु होते. त्यामुळे
महसूल विभागाचा स्वतंत्र तलाठी सजा असूनही तलाठी कार्यालयाची इमारत नसल्याने सर्व
सामान्य जनतेला आपल्या कामांकरीता नाहक त्रास होत होता. ग्रामस्थांची होणारी
गैरसोय लक्षात घेऊन स्वतंत्र तलाठी सजा असलेल्या परंतु तलाठी कार्यालयाची इमारत
नसलेल्या ठिकाणी नविन तलाठी कार्यालय इमारतींचे कामांना मजूरी देण्यात येऊन नविन तलाठी
कार्यालय इमारतींचे कामांना निधी मंजूर होणेसाठी मी राज्याचे महसूलमंत्री व महसूल
राज्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर महसूल विभागाकडून
तातडीने संबंधित तलाठी कार्यालय इमारतींचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह
मंजूरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यानुसार सन 2018-19 या आर्थिक वर्षातील
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शासकीय इमारत बांधणे या योजनेतून दि.29/01/2019
चे पत्रान्वये पाटण मतदारसंघातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणीच्या 06 तलाठी
कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करण्याकरीता 01 कोटी 68 लक्ष 46 हजार रुपये एवढया
निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये तारळे तलाठी कार्यालय इमारत 28.52
लक्ष, ऊरुल तलाठी कार्यालय इमारत 28.46 लक्ष, मल्हारपेठ तलाठी कार्यालय इमारत
28.39 लक्ष, नाडे तलाठी कार्यालय इमारत 28.33 लक्ष, आडूळ पेठ तलाठी कार्यालय इमारत
28.31 लक्ष, बहुले तलाठी कार्यालय इमारत 26.45 लक्ष या नविन तलाठी कार्यालय इमारतींचे
कामांचा समावेश असून लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने हि
कामे हाती घेण्यात येणार असलेची माहिती आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकांत दिली
आहे.
No comments:
Post a Comment