दौलतनगर दि.०8:- २१ वर्षे निष्क्रीयांना आतापर्यंत या विभागाने पोत्याने
भरुन मते दिली. जनतेने पोत्याने भरुन मते देवूनही या विभागातील गांवाचा विकास मते
घेणाऱ्यांनी केला नाही.पिढयानपिढया विकासापासून वंचीत राहिलेल्या या विभागातील
गांवाना गत चार वर्षात मला किती मतदान पडले याचा विचार न करता मी या विभागात लाखो
रुपयांची विकासकामे केली आहेत.अनेक कामे पुर्ण झाली तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत
मताचे पोते येणाऱ्या निवडणूकीत आता आमच्या पदरात टाका असे आवाहन आमदार शंभूराज
देसाईंनी केले.
घेरादातेगड ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाई यांचे
प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून १५ लक्ष रुपयांच्या निधीच्या कामांचे
भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी
पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,किसन
मांडवकर,लक्ष्मण मांडवकर,ग्रामपंचायत सदस्य बंडू पवार,गिता मांडवकर,उत्तम
मानसिंग,गणेश मानसिंग,विजय भोसले,निलेश मांडवकर,बबनराव माळी,रामचंद्र पवार,
धमेंद्र पवार, गणेश लाड,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना
आमदार शंभूराज देसाई म्हणाले,घेरादातेगड या गांवातील मतांची पेटी यापुर्वीच्या
अनेक निवडणूकीत समोर आली की, माजी आमदारांचे पदरातच सगळी मते. सगळी गांवातील मते
देवुन या गावाला पोहोच असणाऱ्या रस्त्यावर इतक्या वर्षात डांबर का पडले
नाही.ज्यांना या गांवाने पोत्याने भरभरून यापुर्वी मते दिली त्यांनी गांवाला
राज्याचे सार्वजनीक बांधकाम खात्याचे सलग पाच वर्षे मंत्री असताना का डांबरी रस्ता
देवू शकले नाहीत. पिढयानपिढया आपण सर्वजण त्यांच्या मागे फिरत राहिला आणि त्यांनी
तुम्हाला फिरवतच ठेवले.केवळ मतापुरता आपला वापर करायचा हाच त्यांचा उद्योग या
विभागात पहायला मिळतोय. अनेक वर्षे या गांवाचा रस्ता झाला नाही म्हणून काही
ग्रामस्थ मला भेटायला आले.गावचे ग्रामदैवताकरीता सभामंडप आणि गावपोहोच रस्ता एवढी
आमची दोन कांमे प्रलंबीत आहेत ती पुर्ण करा अशी त्यांनी मागणी केली. पहिल्या
भेटीतच ग्रामदैवताकरीता सभामंडप देण्याचे मान्य करुन त्याकरीता निधी दिला.आज या
सभामंडपाचे उदघाटन आणि रस्त्याचे भूमिपुजन अशा संयुक्त कार्यक्रमाकरीता गांवात आलो
आहे. हा रस्ता जिल्हा नियोजन समितीमधून १५ लाख रुपयांचा असला तरी या गावचा गावपोहोच
रस्ता ३ किलोमीटरचा आहे. १५ लाख रुपयांच्या निधीमध्ये गावाकडून रस्ता सुरु करावा.
३ किलोमीटरच्या सदरचे रस्त्याकरीता सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळावा अशी
मागणी मी शासनाकडे यापुर्वीच केली होती त्यानुसार चारच दिवसापुर्वी या
रस्त्याबरोबर मतदारसंघातील बाकीच्या काही मोठया रस्त्यांच्या संदर्भात मंत्रालयात
बैठक झाली या बैठकीत या मोठया रस्त्यांच्या कामांना निधी देण्याची कार्यवाही सुरु
झाली आहे. मी केवळ आश्वासन देत नाहीतर दिलेला शब्द पाळतो याचा प्रत्यय या दोन्ही
कामांवरुन आपणांस आला आहे. या विभागातील गावागावात आपल्या गांवातील कामांप्रमाणेच
मोठया प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. विरोधकांना ही कामे दिसत असून ते दिसत
नसल्याचे ढोंग करुन जनतेची डोकी भडकविण्याचे काम करीत आहेत. आताच काही महिलांनी
गावाकरीता पिण्याच्या पाण्याच्या योजनेची सोय करा अशी मागणी माझेकडे केली. सन
२०१९-२० चा राष्ट्रीय पेयजल योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम शासन पातळीवर सुरु
आहे. प्राधान्याने या गांवाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा समावेश हा
राष्ट्रीय पेयजल योजनेचा आराखडयात मी करण्यासाठी आग्रही राहीन याची काळजी आपण करु
नये असे सांगून ते म्हणाले गावाची एकी विकासकामांच्या माध्यमातुन दिसून येत असून
काही विघ्नसंतोषी मंडळी गावात येवून आम्ही असे करतो, आम्ही तसे करतो असे सांगून
आपली दिशाभूल करतील अशाच्या नादी न लागता जो विकास देवू शकतोय त्यांच्याच पाठीशी
ठाम रहा व येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत गावाची ही एकी अशीच कायम ठेवा. कारण
आतापर्यंत ज्यांना आपल्याला काही देता आले नाही त्यांच्या हातात आता तर
देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे ते तुम्हाला काही देवू शकणार नाहीत हे मलाही
चांगलेच माहिती आहे आणि तुम्हालाही त्यामुळे अशांना चार हात लांबच ठेवून उर्वरीत राहिलेला
गांवाचा विकास पुर्ण करुन घ्यावा असेही त्यांनी शेवठी बोलताना सांगितले. यावेळी बबनराव
माळी,गणेश लाड यांनी मनोगत व्यक्त केले. घेरादातेगड येथील नागरिक व महिला तसेच
मुंबई मंडळातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व
प्रास्ताविक निलेश मांडवकर यांनी केले व आभार किसन मांडवकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment