दौलतनगर दि.०१:- 2014 च्या विधानसभा निवडणूकीत मी मते मागायला आल्यानंतर
मतदारांना दिलेल्या आश्वासनांची या तालुक्याचा आमदार म्हणून मी पुर्तता केली आहे व
करीत आहे.आज खळे व काढणे या विभागातील संपुर्ण वाडयांची रस्त्याची असणारी कामे
पुर्णत्वाकडे गेली आहेत.काजारवाडीचा रस्ता शिल्लक राहिला होता त्याकरीता २० लक्ष
रुपयांचा निधी मंजुर करुन दिल्यानंतर या विभागातील एकही वाडी रस्त्यावाचून वंचीत
राहत नाही याचा आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
काजारवाडी (खळे) ता.पाटण येथे आमदार शंभूराज
देसाई यांचे प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून १० लक्ष रुपयांच्या निधीच्या
कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत
होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई
कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे,पंचायत
समितीचे गटनेते पंजाबराव देसाई, पंचायत समिती सदस्या सौ.सिमा मोरे,शिवदौलत बँकेचे
संचालक नेताजीराव मोरे,मधूकर पाटील,महादेव पानवळ खळे सरपंच संदीप टोळे, नामदेव पाटील,
सरपंच सौ.अश्विनी डुबल, उपसरंपच सौ. सारीका काजारी, नंदकुमार काजारी, विनायक डुबल
आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,खळे ते शिद्रुकवाडी आणि
शिद्रुकवाडी ते काढणे या रस्त्याची २०१४ पुर्वी काय अवस्था होती. २०१४ च्या
विधानसभा निवडणूकीत मी या विभागातील जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार युतीच्या राज्य
शासनाने नव्याने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून सुमारे ४ कोटी
रुपयांचा निधी मंजुर करीत खळे ते शिद्रुकवाडी आणि शिद्रुकवाडी ते काढणे या दोन्ही
रस्त्याचे काम पुर्ण करुन घेतले. काजारवाडीचा रस्ता शिल्लक राहिला होता त्याकरीता
जिल्हा नियोजन समितीमधून १० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आज त्याचे
भूमिपुजन होत आहे.तर कोयना भूकंप पुर्नवसन निधी समितीमधूनही या कामाकरीता १० लक्ष
रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.स्थानिक पातळीवर याचे भूमिपुजन करुन याही
रस्त्याच्या कामांस सुरुवात करावी. एकूण २० लक्ष रुपयांचा निधीतून हे संपुर्ण काम
पुर्ण होणार आहे. तर शिद्रुकवाडी ते डुबलवाडी या रस्त्याच्या कामांकरीताही कोयना
भूकंप पुर्नवसन निधी समितीमधून १५ लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे. हे दोन्ही
रस्ते झालेनंतर खळे व काढणे या विभागातील संपुर्ण वाडयांची रस्त्यांची कामे
पुर्णत्वाकडे जात आहेत.विकासापासून अनेक वर्षे वंचीत राहिलेल्या मतदारसंघातील
छोटया छोटया वाडयावस्त्यांनाही शासनाच्या विविध योजनेमधून निधी देवून या वाडयांचा
विकास करण्याचे काम आपण केले आहे. आपल्या गावाचा,वाडयावस्त्यांचा विकास करणाऱ्या
नेतृत्वाच्या पाठीशी मतदारसंघातील जनता यामुळेच तर ठाम आहे याचा आनंद आहे. असे
सांगत त्यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारसंघातील जनतेने त्यांच्या
गावामध्ये या चार वर्षात झालेल्या विविध विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या 2019
चा आमदार निवडावा. विरोधकांना मते मागायला आल्यानंतर गेल्या चार वर्षात जनतेला
त्यांनी काय दिले याचा जाब विचारावा असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.
यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. खळे,काजारवाडी, शिद्रुकवाडी व
डुबलवाडी येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व
प्रास्ताविक माजी सरपंच महादेव जाधव यांनी केले.
No comments:
Post a Comment