Wednesday 6 February 2019

कोयना पर्यटनातील कामांना सुरुवात पहिल्या टप्प्यात कोयनानगर विश्रामगृहाचे बांधकामास २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीस मान्यता. कामांची निविदाही प्रसिध्द- आमदार शंभूराज देसाई




दौलतनगर दि.०६:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता कोयना पर्यटनाचा १८ कोटी २८ लाख रुपयांचा आराखडा शासनाकडे मान्यतेकरीता सादर केला असून कोयना पर्यटनाच्या कामांस शासनाने प्रत्यक्षात सुरुवात करुन कोयना पर्यटनातील कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस पहिल्या टप्प्यात शासनाने मंजुरी दिली आहे. कोयना पर्यटनातील कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ मंजुर करावा अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये कोयना दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्याकडे केली होती त्यानुसार आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी शासनाने कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस मंजुर केला आहे या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदाही प्रसिध्द झाली असून कोयना पर्यटनातील कामांना कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणे या कामांपासून सुरुवात झाल्याचा आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे.
                    आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता जलसंपदा विभागाचे कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांचेमार्फत या विभागातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता अंदाजपत्रक तयार करुन घेतले होते सदरचे अंदाजपत्रक हे सविस्तर प्रस्तावासह जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत राज्य शासनास सादर केले आहे. प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता संबधित विभागांना शासनाने निधी उपलब्ध करुन दयावा अशी माझी सुरवातीपासूनच शासनाकडे आग्रही मागणी होती राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये कोयना दौऱ्यावर आले होते तेव्हा या कोयना पर्यटन आराखडयाच्या संदर्भात मी जलसंपदा मंत्री यांचे लक्ष वेधले होते तेव्हा त्यांनी तात्काळ कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन देखील दिले होते त्यानुसार जलसंपदा विभागाचे कोयना सिंचन विभाग,कोयनानगर यांचेमार्फत कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता एकूण आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदाही प्रसिध्द झाली असून यावर्षी या कामांस १ कोटी १० लाख रुपयांची तरतूदही शासनाचे जलसंपदा विभागाने विभागास केली आहे. कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणे ही कोयना पर्यटनातील महत्वाची बाब असून पर्यटकांना वास्तव्याकरीता योग्य जागा नसल्याने आतापर्यंत पर्यटकांचा ओढा कोयनानगरकडे कमी होत चालला होता कोयना विश्रामगृहाचे बांधकामामुळे पर्यटकांना हक्काचे वास्तव्य करण्यास मिळणार असल्याने येथील पर्यटनाला चालना मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदा आजच प्रसिध्द झाल्याने कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून लवकरच या विश्रामगृहाचे रुपडे पालटणार असल्याचा आनंद होत आहे. कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आवश्यक असणारा निधी मंजुर करुन उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी या मतदारसंघाचा आमदार या नात्याने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो असेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment