Friday, 13 December 2019

डोंगरपठारावरील गांवाच्या विकासाकरीता अधिकाऱ्यांना बरोबर घेवून डोंगरी परीषद घेणार. आमदार शंभूराज देसाईंची घोषणा.


   


              दौलतनगर दि.१४ :- केवळ निवडणूकीच्या तोंडावर पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरपठारावरील गांवाची वाडयावस्त्यांमधील जनतेची आठवण न करता गत दोन वर्षापुर्वी पाटणच्या डोंगरपठारावर या पठारावरील सर्व गांवाच्या आणि वाडयावस्त्यांच्या प्रलंबीत विकासकामांसंदर्भात डोंगरी परीषद घेवून या पठारावरील अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारी विकासकामे निवडणूकीपुर्वीच मार्गी लावली होती आता काही प्रमाणातच पठारावरील विकासकामे प्रलंबीत असून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावणेकरीता तसेच या पठारावरील जनतेच्या शासकीय यंत्रणेकडे प्रलंबीत असणाऱ्या काही अडीअडचणी सोडविण्याकरीता शासकीय सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेवूनच येत्या काही दिवसात डोंगरपठारावरच डोंगरी परीषद घेणार असल्याची घोषणा आमदार शंभूराज देसाईंनी केली आहे.
              चिटेघर ता.पाटण येथे पाटण विभागातील सर्व गांवाचा तसेच डोंगरपठारावरील गांवाचाही आभार मेळावा आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता त्याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे घोषणा केली. यावेळी बबनराव माळी,बाळासाहेब शेजवळ,सुरेशराव जाधव,गणीभाई चाफेरकर,शंकर कुंभार यांच्यासह पाटण विभागातील सर्व गांवातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
            याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण विधानसभा मतदारसंघातील पाटणच्या वरील सर्व डोंगरपठार हा विकासकामांपासून अनेक वर्षापासून वंचीत होता.२०१४ ला पाटण मतदारसंघाचा आमदार झालेनंतर या पठारावरील अनेक गांवे व वाडयावस्त्या त्यांच्या प्रलंबीत विकासकामांकरीता माझी भेट घेत होते त्यानुसार त्यांना विकासकामे देण्याचे धोरण राबविण्यात आले परंतू या गांवाचे आणि वाडयावस्त्यांचे अनेक प्रश्न विकासात्मक कामे मोठया संख्येने प्रंलबीत असल्याचे पाहून पाटणच्या डोंगरपठारावरील गांवाच्या व वाडया वस्त्यांच्या विविध प्रंलंबीत प्रश्नाकरीता मी स्वत: काटीटेक याठिकाणी डोंगरी परीषदचे आयोजन केले व या पठारावरील जनतेच्या समस्या,त्यांचे प्रश्न,प्रलंबीत विकासकामे जाणून घेतली व एकच वर्षाच्या आत याच डोंगरपठारावरील प्रत्येक गांवामध्ये व वाडयावस्त्यांमध्ये विकासाचे एकतरी काम पोहचविण्याचा प्रयत्न केला. या कामांच्या भूमिपुजन तसेच उदघाटनप्रसंगी गांवागावात आणि वाडीवस्तीवर मागील वर्षी गेल्यांनंतर मागच्या पेक्षा आता दुप्पट विकासकामे या विभागाला देण्याचा शब्द मी प्रत्येक गांवामध्ये दिला होता त्यानुसार मागील वर्षी डोंगरपठारावरील प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये मी मागील पेक्षा दुप्पट कामे मंजुर करुन दिली आजमितीला मागील वर्षातील अनेक कामे सुरु आहेत,अनेक प्रगतीपथावर आहेत. असे सांगून ते म्हणाले मी गत दोन वर्षात या पठारावरील गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये दिलेल्या विकासकामांच्या बदल्यात या विभागातील मतदारांनी मला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भरघोस असे मतदान करुन चांगले मताधिक्य दिले आहे. यापुर्वींच्या निवडणूकांमध्ये आमच्यावर विरोधकांचा दुप्पटीने असणारा मताधिक्याचा आकडा या विभागातील जनतेने कमी करुन तो निम्म्यावर आणून ठेवला आहे विरोधकांचा मताधिक्क्याचा आकडा निम्म्यावर आल्याने सहाजिकच माझे मतांमध्ये चांगली वाढ झाली आहे ती केवळ आणि केवळ विकासकामांच्या जोरावर. डोंगरपठारावरील जनतेला विकासकामांचा दिलेला शब्द मी पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न मतदारसंघाचा आमदार म्हणून केला असून अजुनही कामे डोंगरपठारावरील गांवे व वाडयावस्त्यांमध्ये शिल्लक आहेत ही लवकरात लवकर मार्गी लागून डोंगर पठारावरील जनतेचे जीवनमान सुखी करणेकरीता मी येत्या काही दिवसात पाटण तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेवूनच डोंगरपठारावरच डोंगरी परीषद घेणार आहे या डोंगरी परीषदेमध्ये डोंगरपठारावरील जनतेने त्यांच्याकडील प्रलंबीत विकासकामे तसेच शासकीय यंत्रणेकडे त्यांच्या काही प्रलंबीत अडीअडचणी असतील तर त्या त्यांनी या डोंगरी परीषदेमध्ये घेवून याव्यात असे आवाहनही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी करुन हा उपक्रम पाटण तालुक्यात नव्हे तर सातारा जिल्हयात प्रथमत:च राबविला जात आहे याचे मला कौतुक आहे कारण आपण शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेवून जनता दरबार तालुक्याच्या ठिकाणी भरवितो परंतू या उपक्रमामुळे आपण डोंगरपठारावरील जनतेच्या अडीअडचणी जागेवर जावून सोडविणार असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले. उपस्थितांचे स्वागत बबनराव माळी यांनी केले व आभार सुरेश जाधव यांनी मानले.

डोंगरपठारावरील जनतेने विकासाला पाठींबा दिल्यानेच आपला विजय. यापुढेही डोंगरपठारावरील कामांना न्याय देणार - आमदार शंभूराज देसाई.





          दौलतनगर दि.१3 :- २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील मतदारांनी गत पाच वर्षात आपण केलेल्या विविध विकासकामांना पाठींबा दिल्यानेच विकास करणाराच आमदार पुन्हा या मतदारसंघाला पाहिजे या भूमिकेतून मतदान करुन भविष्यातील विकासकामांचा दृष्टीकोन ठेवल्यानेच आपला पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजय झाला.यापुढेही पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील कामांना व मतदारांना आपण या मतदारसंघाचा आमदार म्हणून न्याय देणार असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी ढेबेवाडी ता.पाटण येथे मतदारांच्या आभार मेळाव्यात दिली.

          पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंचे विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार मेळावे सुरु असून आज कुंभारगांव, काळगांव व ढेबेवाडी या विभागातील मतदारांचे आभार मानताना त्यांनी ढेबेवाडी येथील भाग्यश्री मंगल कार्यालयातील आभार मेळाव्यात वरीलप्रमाणे ग्वाही दिली. याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांचेसमवेत लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण,शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर नलवडे,माजी पंचायत समिती सदस्य रघूनाथ माटेकर,सदस्या सौ.सिमा मोरे, शामराव कदम,बबनराव पाटील,मधूकर पाटील,नेताजी मोरे,दिलीपराव जानुगडे,शिवाजीराव शेवाळे,दत्तात्रय सुर्वे,विकास गिरीगोसावी,नारायण कारंडे,मनोज मोहिते,तुकाराम जाधव,रणजित पाटील,अंकुश महाडिक,एकनाथ जाधव, बबनराव भिसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

          याप्रंसगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठया विश्वासाने तिसऱ्यांदा मतदारसंघाचा आमदार होण्याची मला संधी दिली आहे.त्याबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदारांचे मी जाहीरपणे आभार मानतो.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पाटण मतदार संघातील सर्वच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले.मागील २०१४ च्या विधानसभा निवडणूकीपेक्षा यावेळच्या निवडणूकीत या दोन्ही विभागांनी मला चांगले मताधिक्य दिले आहे. या विभागातील कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, प्राना फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्राची पाटील, माझे मित्र या विभागाचे सदस्य तसेच स्नेही यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मला निवडणूकीत सहकार्य केले त्यांचा मी आभारी आहे.विकासाचा दृष्टीकोन डोळयासमोर ठेवूनच आपण पाच वर्षे मतदारसंघात काम केले,या विभागातील न सुटणारे अनेक प्रश्न आपण मार्गी लावले काही प्रश्न शिल्लक आहेत ते सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे.या दोन्ही विभागात कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधली असून ही मोट कायम ठेवण्याचे काम कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करायचे आहे.निवडणूकीपुरते मतदारांच्या दारात जाणाऱ्यांना मतदार मते देत नाहीत त्यांना विकास करणारा आणि जनतेच्या सुखदुखा:त धावून येणारा लोकप्रतिनिधी हवा असतो.असाच लोकप्रतिनिधी निवडण्याचे काम पाटण मतदारसंघातील जनतेने केले आहे.पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करताना गत पाच वर्षात सर्व घटकांना न्याय देण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला. वेळेअभावी मतदारांचे आभार मानणेस मला विलंब झाला त्याबद्दल मी या विभागातील मतदारांची दिलगिरी व्यक्त करतो असे सांगून ते म्हणाले, गत पाच वर्षात विकासकामात आपण कुठेही कमी पडलो नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही आतातर आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे आपल्या मतदारसंघाला मागील पाच वर्षाप्रमाणेच निधी मंजुर करुन आणण्यास कोणतीही अडचण येणार नाही.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात आपण विकासाची प्रलंबीत राहिलेली कामे मार्गी लावू या विभागाला गत पाच वर्षात जसे विकासकामांत झुकते माप दिले त्याचप्रमाणे येणाऱ्या पाच वर्षातही विकासकांमामध्ये झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले. काळगांव, कुंभारगांव व ढेबेवाडी विभागातील मतदारांनी आमदार शंभूराज देसाईंचे जंगी स्वागत करुन त्यांचा ठिकठिकाणी आमदार म्हणून पुनश्च: निवड झालेबद्दल सत्कारही केला.

चौकट: महायुतीचा विसर पडू दिला नाही. आ.शंभूराज देसाई

           महायुतीच्या माध्यमातून २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आपण मतदारांना मते मागितली आता राजकीय परिस्थिती बदलली असली तरी माझे वाढदिवसादिवशी आयोजीत आभार मेळाव्यामध्ये मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोटो बॅनरवर लावले होते तेव्हा काहींनी आता महायुती आहे कुठे असा सवाल केला होता परंतू ज्या माध्यमातून आपण निवडून आलो त्यांचा विसर मी पडू दिला नाही तसाच ज्या मतदारांनी मला तिसऱ्यांदा निवडून दिले आहे त्यांचा विसर मी कधी पडू देणार नाही असेही आमदार शंभूराज देसाई यावेळी बोलताना म्हणाले.

Wednesday, 11 December 2019

पुन्हा एकदा मोठया मताधिक्याने विजयी झालो हा जनतेचा माझे नेतृत्वावर विश्वास असल्यामुळेच. मतदारसंघातील जनतेकरीता २४ बाय ७ कार्यरत आहे व यापुढेही राहणार. आमदार शंभूराज देसाईंची आभार दौऱ्यात ग्वाही.



          दौलतनगर दि.११ :- २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठया विश्वासाने मला पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी दिली आहे.या निवडणूकीत मतदारांनी मला मोठया मताधिक्यांनी विजयी केले ते जनतेचा माझेवर,माझे कामांवर विश्वास असल्यामुळेच शक्य झाले आहे.पाटण मतदारसंघातील जनतेकरीता मी आमदार म्हणून २४ बाय ७ मागेही कार्यरत होतो यापुढेही कार्यरत राहणार.पाटण मतदारसंघातील मतदारांनी माझेवर जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास सार्थ ठरविण्याचेच काम माझेकडून होईल अशी ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्याच्या मेळाव्यांच्या कार्यक्रमात दिली.
        विधानसभा निवडणूक होवून सव्वा महिन्याचा कालावधी झाला असून राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे इच्छा असूनही पाटणच्या आमदारकीची हॅक्ट्रीक करणारे आमदार शंभूराज देसाईंना विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडून देणाऱ्या पाटण मतदारसंघातील मतदारांचे आभार मानणे शक्य झाले नसल्याने त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मेळावे आयोजीत केले असून आज रासाठी, येराड,पेठशिवापुर व चिटेघर या विभागातील मतदारांचे आभार मानताना त्यांनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली. याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांचेसमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील,हरीष भोमकर, सदानंद साळुंखे,बबनराव माळी,माजी जि.प.सदस्य बशीर खोंदू,माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार,सुरेश जाधव,पाटणचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
          याप्रंसगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठया विश्वासाने तिसऱ्यांदा मतदारसंघाचा आमदार होण्याची मला संधी दिली आहे.त्याबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदारांचे मी जाहीरपणे आभार मानतो.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पाटण मतदार संघातील लहानातला लहान कार्यकर्ताही मला जास्तीची मते मिळवून देणेकरीता कार्यरत होता.कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी यांनी निवडणूकीत अहोरात्र जीवाचे रान करुन विजयश्री खेचून आणली याचा आनंद आहे. कार्यकर्त्यांचे पाठबळ आपली ताकत असून कार्यकर्त्यांच्या ताकतीवरच आपल्याला तिसऱ्यांदा आमदार होता आले याची मला पुर्णपणे जाणिव आहे. माझी इच्छा असूनही राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर राजकीय घडामोडी गत सव्वा महिना सुरु असल्याने पक्षाचा आदेश मानून मुंबई येथे अनेक दिवस वास्तव करावा लागल्याने मतदारांचे आभार मानता आले नाहीत त्याबद्दल मी प्रथमत: सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.मतदारसंघाचा आमदार या नात्याने गत पाच वर्षात आपण पाटण विधानसभा मतदारसंघात प्रलंबीत राहिलेला विकास गतीने पुढे नेण्याचा युती शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केला.कधीही न होणारी अनेक विकासकामे व मतदारसंघातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असणारे धोरणात्मक निर्णय आपण या पाच वर्षात राज्य शासनाकडून करुन घेतले. मागेल त्या गांवाला काम देण्याचे काम या पाच वर्षात केले.जनतेच्या मुलभूत सुविधा पुर्ण करणे हे लोकप्रतिनिधींचे कामच असते त्याच कर्तृव्यभावनेतून मी गत पाच वर्षात काम केले असून यापुढेही मी त्याच गतीने पाटण मतदारसंघाचा विकास करणेकरीता प्रयत्नशील राहणार आहे. या निवडणूकीत मागील निवडणूकीपेक्षा जादा मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती परंतू ते शक्य झाले नाही. त्याची कारणमिमांसा आम्ही करुच परंतू याचा दोष मी पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना देणार नाही आपण कुठे कमी पडलो याचा विचार माझेबरोबर सर्वांनीच करणे गरजेचे आहे. असे सांगून ते म्हणाले, सध्या राज्यात महाविकास आघाडीचे नेतृत्व आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख ना.उध्दवजी ठाकरेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून करीत आहेत.आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात काही अंशी कामे प्रलंबीत राहिली आहेत ती कामे या पाच वर्षात महाविकास आघाडीचे प्रमुख ना.उध्दवजी ठाकरे यांच्या माध्यतातून पुर्ण करण्यासाठी मी पुर्वीप्रमाणेच प्रयत्नशील राहणार आहे. आज मी रासाठी, येराड,पेठशिवापुर व चिटेघर याठिकाणी कोयना, मोरणा तसेच पाटण विभागाचा आभार दौरा केला या तिन्ही विभागांनी मला विधानसभा निवडणूकीत चांगले मताधिक्य दिले त्याबद्दल मी या विभागातील सर्व मतदारांचा शतश: ऋृणी असून या विभागांना येणाऱ्या पाच वर्षात विकासकांमामध्ये झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले. रासाठी, येराड,पेठशिवापुर व चिटेघर या चारही ठिकाणी या विभागातील मतदारांनी आमदार शंभूराज देसाईंचे जंगी स्वागत करुन त्यांचा ठिकठिकाणी आमदार म्हणून पुनश्च: निवड झालेबद्दल सत्कारही केला.

१९६७ च्या भूकंपात मृत्यू पावलेल्या भूकंपग्रस्तांना आमदार शंभूराज देसाईंनी केले विनम्र अभिवादन कारखाना कार्यस्थळ व रासाठी येथे वाहिली भावपुर्ण श्रध्दाजंली.



          दौलतनगर दि.११ :- पाटण तालुक्यात १९६७ साली दि.११ डिसेंबरला झालेल्या महाप्रलयकारी भूकंपाला आज ५२ वर्षाचा कालावधी लोटला असून या महाप्रलयकारी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना आज पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करीत दौलतनगर येथील कारखाना कार्यस्थळ व रासाठी याठिकाणी विनम्र अभिवादन केले.
          भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, दि.११ डिसेंबर, १९६७ ला पाटण तालुक्यात कोयनानगरला झालेल्या महाप्रलयकारी भूकंपामध्ये येथील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.आज या दुर्दैवी घटनेला ५२ वर्षांचा कालावधी लोटला असून या भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या भूकंपग्रस्तांना मी पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन करतो.महाप्रलयकारी भूकंपात नूकसान झालेली तसेच विस्कटलेली घडी पुर्ववत बसविण्याकरीता आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब हे राज्याचे मंत्री असताना दोन महिने पाटण तालुक्यात तळ ठोकून होते. कोयनेची विस्कटलेली घडी पुर्ववत होईपर्यंत त्यांनी पाटण तालुका सोडला नव्हता.या भूकंपात नुकसान झालेल्या भूकंपग्रस्तांना त्यांनी राज्याचे मंत्री म्हणून खुप मोठी मदत केली होती ती मदत आजही पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या स्मरणात आहे. लोकनेतेसाहेब यांनीच पाटण तालुक्यातील या बाधित भूकंपग्रस्तांसाठी भूकंपाचे दाखले सुरु केले. त्यांच्या पश्चात १९९५ ला हे भूकंपाचे दाखले  देणे शासनाने बंद केल्यानंतर या दाखल्यासाठी मी स्वत: राज्य शासनाकडे पाठपुरावा केला व वेळप्रसंगी कायदयाचा आधार घेवून १९९५ ला बंद झालेले भूकंपाचे दाखले सुरु करुन घेण्यात मला यश मिळाले. तालुक्याचा आमदार या नात्याने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांच्या कामांनाही कधीही मिळाला नाही एवढा निधी गत पाच वर्षात युतीच्या राज्य शासनाकडून मंजुर करुन आणण्यात मला यश आले. कोयनेचे वैभव पुन्हा मिळवून देणेकरीता आमदार म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर करुन आणत आहे. कोयना पर्यटनाच्या दृष्टीने तसेच कोयनानगरच्या आसपासचा १० किमीचा परिसर पर्यटनाच्या माध्यमातून विकसीत करणेकरीता मी मागील पाच वर्षात ७.५० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. कोयना पुनर्वसन गावठाणांतील मुलभूत सुविधांची तसेच कोयना पर्यटनाची कामे मोठया प्रमाणात कोयना विभागात सुरु आहेत. कोयनेला  गतवैभव मिळणेकरीता माझे कसोशीने प्रयत्न सुरु असून कोयना प्रकल्पग्रस्तांची काही उर्वरीत कामे राहिली आहेत ती कामे आताच्या महाविकासआघाडीचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या माध्यमातून सोडविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. असे सांगून त्यांनी आमदार या नात्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने पुनश्च: एकदा दि.११ डिसेंबरच्या महाप्रलयकारी भूकंपात मृत्यू पावलेल्या भूकंपग्रस्तांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन करतो असे ते म्हणाले यावेळी कारखाना कार्यस्थळावर आमदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखालील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखाना अधिकारी तसेच रासाठी याठिकाणी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
        

Saturday, 7 December 2019

आमदार शंभूराज देसाई मानणार मतदारांचे आभार. दि.११ ते दि १३ डिसेंबरपर्यंत आमदार शंभूराज देसाईंचा पाटण मतदारसंघात आभार दौरा.



          दौलतनगर दि.०७ :- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल आमदारकीची हॅक्ट्रीक करणारे आमदार शंभूराज देसाई हे दि.११ डिसेंबर पासून दि.१३ डिसेंबरपर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदारांचे आभार मानणार असून नागपुरच्या विधानसभेच्या अधिवेशनापुर्वी ते पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारसंघातील आठ जिल्हा परीषद मतदारसंघनिहाय आभार दौरा करणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
           प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हंटले आहे की,विधानसभा निवडणूक होवून सव्वा महिन्याचा कालावधी झाला असून राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे इच्छा असूनही पाटणच्या आमदारकीची हॅक्ट्रीक करणारे आमदार शंभूराज देसाईंना विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडून देणाऱ्या पाटण मतदारसंघातील मतदारांचे आभार मानणे शक्य झाले नसल्याने दि.१६ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या नागपुर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापुर्वी आमदार शंभूराज देसाई हे पाटण मतदारसंघातील मतदारांचे आभार मानणार असून दि.११ डिसेंबर पासून दि.१३ डिसेंबरपर्यंत रोज ते पाटण मतदारसंघातील जिल्हा परीषद मतदारसंघ निहाय मतदारांचे आभार मानणार आहेत. बुधवार दि.११ डिसेंबर, २०१९ रोजी सकाळी ११.०० वा कोयना विभागाचा रासाठी, दुपारी १२.०० वा. शिरळ विभागाचा येराड, दुपारी ०१.०० वा मोरणा विभागाचा पेठशिवापुर व दुपारी ०२.०० वा पाटण विभागाचा चिटेघर येथे, तसेच गुरुवार दि.१२ डिसेंबर, २०१९ रोजी सकाळी ११.०० वा कुंभारगांव व काळगाव विभागाचा तळमावले येथे, दुपारी १२.०० वा. ढेबेवाडी विभागाचा ढेबेवाडी येथे, दुपारी ०१.०० वा मारुलहवेली जिल्हा परीषद गटाचा मारुलहवेली येथे, दुपारी ०२.०० वा मल्हारपेठ जिल्हा परीषद गटाचा मल्हारपेठ येथे व दुपारी ०३.०० वा संपुर्ण चाफळ विभागाचा चाफळ येथे तर शुक्रवार दि.१३ डिसेंबर, २०१९ रोजी सकाळी ११.०० तारळे जिल्हा परीषद गटाचा तारळे  येथे व दुपारी १२.३० वा सुपने मंडलचा साकुर्डी येथे आभार दौरा आयोजीत करण्यात आला असून या आभार दौऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

Thursday, 5 December 2019

हेळवाक ते कराड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती दया. आमदार शंभूराज देसाईंच्या अधिका-यांना बैठकीत सुचना.



 दौलतनगर दि.05 :-कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते पाटणच्या पुढील भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे.सदरचे काम खुप संथ गतीने सुरु असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील पाडळी,सुपने पासून पाटणच्या पुढील हेळवाक पर्यंतच्या कामांस एल.ॲन्ड टी कंपनीने आणि काम करुन घेणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांनी गती दया व जे काम सध्या सुरु आहे ते काम तीन महिन्यात कसे पुर्ण करता येईल या उदीष्टाने काम करा, अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिका-यांना बैठकीत दिल्या आहेत..
          आमदार शंभूराज देसाई यांनी कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात तातडीने बैठक घेणेकरीता सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांचेकडे पत्राव्दारे मागणी केली होती.आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीवरुन श्रीमती श्वेता सिंघल हया प्रशिक्षणासाठी गेल्या असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांचे दालनात हेळवाक ते कराड अशा ४८.४२ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे कामाला गती देणेसंदर्भात आमदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. सागांवकर, उपअभियंता रमेश पन्हाळकर,एल अँड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर घोष,विठ्ठल सावंत, एस.एस.पोरे यांच्यासह एल.ॲन्ड टी कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
        कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आमदार शंभूराज देसाई म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजुर करण्यात आले असून गत दोन वर्षापुर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास एल अँन्ड टी कंपनीने सुरुवात केली असून सदर कंपनीने या रस्त्याची पुर्णत: खुदाई केली असून रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे.रस्त्याची खुदाई करण्यात आल्याने मोठया प्रमाणात मतदारसंघातील नागरिकांना तसेच वाहनधारकांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या दृष्टीने वारंवार राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता तसेच संबधित एल अँन्ड टी कंपनीचे जनरल मॅनेजर व प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या संयुक्त बैठकाही घेण्यात आल्या आहेत. तरीही या कामास गती देण्यात आली नसून पाटण मतदारसंघाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.डिसेंबर,२०१९ पर्यंत या रस्त्याचे काम पुर्ण करण्याची मुदत संबधित कंपनीला देण्यात आली होती तरीही या रस्त्याचे ४० टक्केही काम पुर्ण झाले नसल्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पुढे म्हंटले आहे की,दरम्यान या रस्त्याचे कामात मोठया प्रमाणात दिरंगाई झाल्याने सध्या नागरिेकांना व वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या रस्त्याचे ज्या ठिकाणी खुदाईचे काम केलेले आहे ते काम गतीने करुन तीन महिन्यात पुर्ण करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कराड ते चिपळूण रस्त्याचे काम हे दि. 15 डिसेंबर पुर्वी गतीने सुरु झाल्याने निदर्शनास न आल्यास सदरची बाब ही नागपूर  येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचे निदर्शनास आणणार असल्याचेही त्यांनी शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.
चौकट :- बैठकीमधूनच जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांना दूरध्वनीवरुन साधला संपर्क
        कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरु असलेल्या बैठकीमधूनच आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दूरध्वनीवरुनच संपर्क साधून संथ गतीने सुरु असलेल्या कराड ते चिपळूण रस्त्याचे कामासंदर्भात त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या रस्त्याचे काम गतीने सुरु होणेसंदर्भात हिवाळी अधिवेशनानंतर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याचे सांगीतले.

Wednesday, 27 November 2019

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचाही गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांनी प्रयत्न करुयात. युवा नेते यशराज देसाईंचे ४६ व्या गळीत हंगाम शुभारंभात सभासद, कारखाना व्यवस्थापनास आवाहन.




दौलतनगर दि.२७ :- सातारा जिल्हयामध्ये २५००,५००० मे.टन,७५०० मे.टन दररोज ऊसाचे गळीत करणारे मोठ मोठे साखर कारखाने आपल्या आजू बाजूला आहेत या सर्व मोठया तसेच उपपदार्थ प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांच्या तुलनेमध्ये एखादा महिना पुढे मागे सोडला तर आपल्याकडे कोणताही उपपदार्थ प्रकल्प उभारण्यास वाव नसतानादेखील कारखान्याचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे अभ्यासू नेते आमदार शंभूराज देसाईसाहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने कारखान्याच्या सभासदांना व ऊस उत्पादकांना शासनाने ठरवून दिलेली एफ.आर.पी.ची पुर्ण रक्कम दरवर्षी दिली आहे. सभासदांनी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आपल्या देसाई कारखान्यास देवून सहकार्य करावे. आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे निटनेटक्या नियोजनामुळे हे सर्व शक्य होत असून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचाही गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता आपण सर्वांनी प्रयत्न करुयात असे जाहीर आवाहन पाटण तालुक्याचे युवा नेते यशराज देसाईंनी कारखान्यांच्या सभासदांना व कारखाना व्यवस्थापनास केले.
                           दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांच्या हस्ते व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,आदित्यराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, शिवदौलत बँकेचे अध्यक्ष मिलींद पाटील,कारखान्याचे तसेच शिवदौलत सहकारी बँकेचे सर्व आजी माजी संचालक,आजी माजी जिल्हा परीषद,पंचायत समिती सदस्य,यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कारखान्याचे सभासद,शेतकरी बांधव, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
                               याप्रसंगी बोलताना युवा नेते यशराज देसाई म्हणाले,आपल्या मतदारसंघाची भौगोलिक अडचण असताना व प्रतिकुल परिस्थितीमध्येही स्पर्धेच्या युगात देसाई कारखाना भक्कमपणे टिकून आहे. आज आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदारसाहेब हे मुंबई याठिकाणी आमदारपदाची शपथ घेणेकरीता गेले असल्यामुळे या समारंभास ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे या वर्षीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याचा बहूमान मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. आज कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत आहे.मागच्या गळीत हंगामात दोन लाख मे. टन ऊसाचे आपण गाळप केले आहे.आमदार शंभूराज देसाईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीची संपूर्ण एफ.आर.पी.ची रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर जमा केली आहे.महाराष्ट्रात आज 150 सहकारी साखर कारखाने तर 70 खाजगी कारखाने आहेत सहकार टिकला पाहिजे,सहकार वाढला पाहिजे या भूमिकेतून आमदारसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याचे काम सुरु आहे. आर्थिक मंदिच्या बाबतीत टि.व्ही.वरती व पेपरमध्ये आपण वाचतो. आर्थिक मंदी आली की खाजगी कंपनीमध्ये काम करत असलेलं व्यवस्थापन नोकर कपातीचे धोरण राबवितात सहकारी संस्थेमध्ये असा निर्णय घेतला जात नाही जी संस्था सभासदांच्या मालकीची आहे सभासदांचा त्यावर पहिला हक्क आहे याकरीता सहकार टिकला पाहिजे  असे माझे मत आहे. यापुर्वी कारखान्यात ऊस आला,त्याचे गळीत करुन साखर उत्पादन केले, उत्पादित साखर बाजारपेठेत विक्री केली व आलेल्या पैशातून कारखाना व्यवस्थापनाचा खर्च केला व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले हे सुत्र होते.पण आता एफ. आर.पी.चा नियम लागू झाल्यामुळे सरकारने निश्चित केलेली एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण सक्तीचं झालेल आहे. नाहीतर पुढील गळीत हंगामात गाळप परवाना दिला जात नाही.आपले कारखान्यामध्ये आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे निटनेटके नियोजन तसेच कारखाना व्यवस्थापनाकडून खर्च कमी करण्याचे नियोजन कारखाना संचालक मंडळाचे सहकार्याने केलेले आहे त्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकले आहे. सभासदांच्या मालकीची हि कारखानदारी सभासदांच्याच मालकीची राहिली पाहिजे आणि जादा दर हा सभासदांना वेळेत देता आला पाहिजे या करीता आपल्याला भविष्यात धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत या गळीत हंगामासाठी इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाचे काम पुर्ण झाले आहे तर कारखाना परिसरामध्ये ऊस तोड मजूर यंत्रणाही दाखल झाली आहे. आमदारसाहेबांनी नियोजन करुन दिल्याप्रमाणे वेळेवर सभासदांचा व ऊस उत्पादकांचा ऊस आणून तो गाळप केला तर आपल्या नियोजनानुसार गळीताचे उद्दीष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुयात असेही ते म्हणाले.यावेळी रविराज देसाई, डॉ. दिलीपराव चव्हाण यांची भाषणे झाली.उपस्थितांचे स्वागत चेअरमन अशोकराव पाटील यांनी केले आभार संचालक पांडूरंग नलवडे यांनी मानले.
चौकट:- सहकारी साखर कारखान्यांनीही कॉमन मिनीमम प्रोग्राम ठरविण्याची गरज:- यशराज देसाई.
            उद्या सत्तेवर येणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने जसा महाराष्ट्रातील जनतेच्या हिताकरीता विकास आघाडीचा कॉमन मिनीमम प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे त्याप्रमाणे सहकारी साखर कारखान्यांनीही कारखान्याच्या सभासदांच्या तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरीता पुढील पाच वर्षाचा कॉमन मिनीमम प्रोग्रॅम तयार करण्याची गरज असून आपल्या कारखान्याने आमदारसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली या धोरणाची सुरुवात करावी असेही आवाहन यशराज देसाईंनी यावेळी बोलताना केले.