दौलतनगर दि.११ :- २०१९ च्या
विधानसभा निवडणूकीत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठया विश्वासाने मला
पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी दिली आहे.या निवडणूकीत
मतदारांनी मला मोठया मताधिक्यांनी विजयी केले ते जनतेचा माझेवर,माझे कामांवर
विश्वास असल्यामुळेच शक्य झाले आहे.पाटण मतदारसंघातील जनतेकरीता मी आमदार म्हणून
२४ बाय ७ मागेही कार्यरत होतो यापुढेही कार्यरत राहणार.पाटण मतदारसंघातील
मतदारांनी माझेवर जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास सार्थ ठरविण्याचेच काम माझेकडून
होईल अशी ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील मतदारांचे आभार
मानण्याच्या मेळाव्यांच्या कार्यक्रमात दिली.
विधानसभा
निवडणूक होवून सव्वा महिन्याचा कालावधी झाला असून राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय
घडामोडीमुळे इच्छा असूनही पाटणच्या आमदारकीची हॅक्ट्रीक करणारे आमदार शंभूराज
देसाईंना विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडून देणाऱ्या पाटण मतदारसंघातील
मतदारांचे आभार मानणे शक्य झाले नसल्याने त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील
मतदारांचे आभार मेळावे आयोजीत केले असून आज रासाठी, येराड,पेठशिवापुर व चिटेघर या
विभागातील मतदारांचे आभार मानताना त्यांनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली. याप्रसंगी
आमदार शंभूराज देसाई यांचेसमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, अशोकराव
पाटील,हरीष भोमकर, सदानंद साळुंखे,बबनराव माळी,माजी जि.प.सदस्य बशीर खोंदू,माजी पंचायत
समिती सदस्य नथूराम कुंभार,सुरेश जाधव,पाटणचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर यांच्यासह
प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रंसगी बोलताना आमदार शंभूराज देसाई
म्हणाले,पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठया विश्वासाने तिसऱ्यांदा मतदारसंघाचा
आमदार होण्याची मला संधी दिली आहे.त्याबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम
मतदारांचे मी जाहीरपणे आभार मानतो.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पाटण मतदार संघातील
लहानातला लहान कार्यकर्ताही मला जास्तीची मते मिळवून देणेकरीता कार्यरत होता.कार्यकर्त्यांनी
आणि पदाधिकारी यांनी निवडणूकीत अहोरात्र जीवाचे रान करुन विजयश्री खेचून आणली याचा
आनंद आहे. कार्यकर्त्यांचे पाठबळ आपली ताकत असून कार्यकर्त्यांच्या ताकतीवरच
आपल्याला तिसऱ्यांदा आमदार होता आले याची मला पुर्णपणे जाणिव आहे. माझी इच्छा
असूनही राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर राजकीय घडामोडी गत सव्वा महिना सुरु
असल्याने पक्षाचा आदेश मानून मुंबई येथे अनेक दिवस वास्तव करावा लागल्याने
मतदारांचे आभार मानता आले नाहीत त्याबद्दल मी प्रथमत: सर्वांची दिलगिरी व्यक्त
करतो.मतदारसंघाचा आमदार या नात्याने गत पाच वर्षात आपण पाटण विधानसभा मतदारसंघात
प्रलंबीत राहिलेला विकास गतीने पुढे नेण्याचा युती शासनाच्या माध्यमातून प्रयत्न
केला.कधीही न होणारी अनेक विकासकामे व मतदारसंघातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने
आवश्यक असणारे धोरणात्मक निर्णय आपण या पाच वर्षात राज्य शासनाकडून करुन घेतले.
मागेल त्या गांवाला काम देण्याचे काम या पाच वर्षात केले.जनतेच्या मुलभूत सुविधा
पुर्ण करणे हे लोकप्रतिनिधींचे कामच असते त्याच कर्तृव्यभावनेतून मी गत पाच वर्षात
काम केले असून यापुढेही मी त्याच गतीने पाटण मतदारसंघाचा विकास करणेकरीता
प्रयत्नशील राहणार आहे. या निवडणूकीत मागील निवडणूकीपेक्षा जादा मताधिक्य मिळेल
अशी अपेक्षा होती परंतू ते शक्य झाले नाही. त्याची कारणमिमांसा आम्ही करुच परंतू
याचा दोष मी पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना देणार नाही आपण कुठे कमी पडलो याचा
विचार माझेबरोबर सर्वांनीच करणे गरजेचे आहे. असे सांगून ते म्हणाले, सध्या राज्यात
महाविकास आघाडीचे नेतृत्व आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख ना.उध्दवजी ठाकरेसाहेब हे
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून करीत आहेत.आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघात मागील पाच
वर्षात काही अंशी कामे प्रलंबीत राहिली आहेत ती कामे या पाच वर्षात महाविकास
आघाडीचे प्रमुख ना.उध्दवजी ठाकरे यांच्या माध्यतातून पुर्ण करण्यासाठी मी
पुर्वीप्रमाणेच प्रयत्नशील राहणार आहे. आज मी रासाठी, येराड,पेठशिवापुर व चिटेघर
याठिकाणी कोयना, मोरणा तसेच पाटण विभागाचा आभार दौरा केला या तिन्ही विभागांनी मला
विधानसभा निवडणूकीत चांगले मताधिक्य दिले त्याबद्दल मी या विभागातील सर्व
मतदारांचा शतश: ऋृणी असून या विभागांना येणाऱ्या पाच वर्षात विकासकांमामध्ये झुकते
माप देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी
बोलताना सांगितले. रासाठी, येराड,पेठशिवापुर व चिटेघर या चारही ठिकाणी या
विभागातील मतदारांनी आमदार शंभूराज देसाईंचे जंगी स्वागत करुन त्यांचा ठिकठिकाणी
आमदार म्हणून पुनश्च: निवड झालेबद्दल सत्कारही केला.
No comments:
Post a Comment