दौलतनगर दि.05 :-कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते पाटणच्या पुढील भागात
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे.सदरचे
काम खुप संथ गतीने सुरु असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील पाडळी,सुपने पासून पाटणच्या पुढील हेळवाक पर्यंतच्या कामांस एल.ॲन्ड टी कंपनीने आणि काम करुन घेणा-या राष्ट्रीय
महामार्गाच्या अधिका-यांनी गती दया व जे काम सध्या सुरु आहे ते काम तीन महिन्यात कसे पुर्ण करता येईल या उदीष्टाने काम करा, अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय
महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिका-यांना बैठकीत दिल्या आहेत..
आमदार शंभूराज देसाई यांनी कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे
कामासंदर्भात तातडीने बैठक घेणेकरीता सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्रीमती
श्वेता सिंघल यांचेकडे पत्राव्दारे मागणी केली होती.आमदार शंभूराज
देसाई यांच्या मागणीवरुन श्रीमती श्वेता सिंघल हया प्रशिक्षणासाठी गेल्या
असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांचे दालनात हेळवाक ते कराड
अशा ४८.४२ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे कामाला गती देणेसंदर्भात
आमदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत तातडीने उच्चस्तरीय
बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. सागांवकर, उपअभियंता रमेश पन्हाळकर,एल अँड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर घोष,विठ्ठल
सावंत,
एस.एस.पोरे यांच्यासह एल.ॲन्ड
टी कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड
ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आमदार
शंभूराज देसाई म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या
राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजुर करण्यात आले असून गत दोन वर्षापुर्वी या
राष्ट्रीय महामार्गाच्या कामास एल अँन्ड टी कंपनीने सुरुवात केली असून सदर कंपनीने
या रस्त्याची पुर्णत: खुदाई केली असून रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे.रस्त्याची
खुदाई करण्यात आल्याने मोठया प्रमाणात मतदारसंघातील नागरिकांना तसेच वाहनधारकांना
दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या
दृष्टीने वारंवार राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता तसेच
संबधित एल अँन्ड टी कंपनीचे जनरल मॅनेजर व प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या संयुक्त
बैठकाही घेण्यात आल्या आहेत. तरीही या कामास गती देण्यात आली नसून पाटण
मतदारसंघाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.डिसेंबर,२०१९ पर्यंत या रस्त्याचे काम
पुर्ण करण्याची मुदत संबधित कंपनीला देण्यात आली होती तरीही या रस्त्याचे ४०
टक्केही काम पुर्ण झाले नसल्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून
देत पुढे म्हंटले आहे की,दरम्यान या रस्त्याचे कामात मोठया प्रमाणात दिरंगाई
झाल्याने सध्या नागरिेकांना व वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत
असल्याने या रस्त्याचे ज्या ठिकाणी खुदाईचे काम केलेले आहे ते काम गतीने करुन तीन
महिन्यात पुर्ण करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कराड ते
चिपळूण रस्त्याचे काम हे दि. 15 डिसेंबर पुर्वी गतीने सुरु झाल्याने निदर्शनास न
आल्यास सदरची बाब ही नागपूर येथील हिवाळी
अधिवेशना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचे निदर्शनास आणणार
असल्याचेही त्यांनी शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.
चौकट
:- बैठकीमधूनच जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांना दूरध्वनीवरुन साधला संपर्क
कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे
कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरु असलेल्या बैठकीमधूनच आमदार शंभूराज
देसाई यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दूरध्वनीवरुनच संपर्क साधून संथ
गतीने सुरु असलेल्या कराड ते चिपळूण रस्त्याचे कामासंदर्भात त्यांच्याकडे तीव्र
नाराजी व्यक्त केल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या रस्त्याचे काम गतीने
सुरु होणेसंदर्भात हिवाळी अधिवेशनानंतर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा उच्चस्तरीय
बैठक घेणार असल्याचे सांगीतले.
No comments:
Post a Comment