दौलतनगर दि.१3 :- २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत
पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील मतदारांनी गत पाच वर्षात आपण केलेल्या
विविध विकासकामांना पाठींबा दिल्यानेच विकास करणाराच आमदार पुन्हा या मतदारसंघाला
पाहिजे या भूमिकेतून मतदान करुन भविष्यातील विकासकामांचा दृष्टीकोन ठेवल्यानेच
आपला पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजय झाला.यापुढेही पाटण मतदारसंघातील
डोंगरपठारावरील कामांना व मतदारांना आपण या मतदारसंघाचा आमदार म्हणून न्याय देणार
असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी ढेबेवाडी ता.पाटण
येथे मतदारांच्या आभार मेळाव्यात दिली.
पाटण मतदारसंघाचे
आमदार शंभूराज देसाईंचे विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडून देणाऱ्या
मतदारांचे आभार मेळावे सुरु असून आज कुंभारगांव, काळगांव व
ढेबेवाडी या विभागातील मतदारांचे आभार मानताना त्यांनी ढेबेवाडी येथील भाग्यश्री
मंगल कार्यालयातील आभार मेळाव्यात वरीलप्रमाणे ग्वाही दिली. याप्रसंगी
आमदार शंभूराज देसाई यांचेसमवेत लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन
डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समिती सदस्य
पंजाबराव देसाई,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण,शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर नलवडे,माजी पंचायत
समिती सदस्य रघूनाथ माटेकर,सदस्या सौ.सिमा
मोरे, शामराव कदम,बबनराव पाटील,मधूकर पाटील,नेताजी मोरे,दिलीपराव
जानुगडे,शिवाजीराव शेवाळे,दत्तात्रय
सुर्वे,विकास गिरीगोसावी,नारायण कारंडे,मनोज मोहिते,तुकाराम जाधव,रणजित
पाटील,अंकुश महाडिक,एकनाथ जाधव,
बबनराव भिसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठया
संख्येने उपस्थित होते.
याप्रंसगी
बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी
मोठया विश्वासाने तिसऱ्यांदा मतदारसंघाचा आमदार होण्याची मला संधी दिली आहे.त्याबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदारांचे मी जाहीरपणे आभार
मानतो.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पाटण मतदार संघातील
सर्वच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले.मागील २०१४ च्या विधानसभा निवडणूकीपेक्षा यावेळच्या निवडणूकीत या दोन्ही
विभागांनी मला चांगले मताधिक्य दिले आहे. या विभागातील कै.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र
पाटील, प्राना फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्राची पाटील, माझे मित्र या विभागाचे सदस्य तसेच
स्नेही यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मला निवडणूकीत सहकार्य
केले त्यांचा मी आभारी आहे.विकासाचा दृष्टीकोन डोळयासमोर
ठेवूनच आपण पाच वर्षे मतदारसंघात काम केले,या विभागातील न
सुटणारे अनेक प्रश्न आपण मार्गी लावले काही प्रश्न शिल्लक आहेत ते सोडविण्यासाठी
मी कटीबध्द आहे.या दोन्ही विभागात कार्यकर्त्यांची चांगली
मोट बांधली असून ही मोट कायम ठेवण्याचे काम कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी
करायचे आहे.निवडणूकीपुरते मतदारांच्या दारात जाणाऱ्यांना
मतदार मते देत नाहीत त्यांना विकास करणारा आणि जनतेच्या सुखदुखा:त धावून येणारा लोकप्रतिनिधी हवा असतो.असाच
लोकप्रतिनिधी निवडण्याचे काम पाटण मतदारसंघातील जनतेने केले आहे.पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करताना गत पाच वर्षात सर्व
घटकांना न्याय देण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला. वेळेअभावी
मतदारांचे आभार मानणेस मला विलंब झाला त्याबद्दल मी या विभागातील मतदारांची
दिलगिरी व्यक्त करतो असे सांगून ते म्हणाले, गत पाच वर्षात
विकासकामात आपण कुठेही कमी पडलो नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही आतातर आपल्या
पक्षाचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे आपल्या मतदारसंघाला
मागील पाच वर्षाप्रमाणेच निधी मंजुर करुन आणण्यास कोणतीही अडचण येणार नाही.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या
सहकार्याने पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात आपण विकासाची प्रलंबीत राहिलेली कामे
मार्गी लावू या विभागाला गत पाच वर्षात जसे विकासकामांत झुकते माप दिले
त्याचप्रमाणे येणाऱ्या पाच वर्षातही विकासकांमामध्ये झुकते माप देण्याचा माझा
प्रयत्न राहणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले. काळगांव, कुंभारगांव व ढेबेवाडी विभागातील
मतदारांनी आमदार शंभूराज देसाईंचे जंगी स्वागत करुन त्यांचा ठिकठिकाणी आमदार
म्हणून पुनश्च: निवड झालेबद्दल सत्कारही केला.
चौकट: महायुतीचा विसर पडू दिला
नाही. आ.शंभूराज देसाई
महायुतीच्या माध्यमातून २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आपण मतदारांना मते
मागितली आता राजकीय परिस्थिती बदलली असली तरी माझे वाढदिवसादिवशी आयोजीत आभार
मेळाव्यामध्ये मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोटो बॅनरवर लावले होते तेव्हा
काहींनी आता महायुती आहे कुठे असा सवाल केला होता परंतू ज्या माध्यमातून आपण
निवडून आलो त्यांचा विसर मी पडू दिला नाही तसाच ज्या मतदारांनी मला तिसऱ्यांदा
निवडून दिले आहे त्यांचा विसर मी कधी पडू देणार नाही असेही आमदार शंभूराज देसाई
यावेळी बोलताना म्हणाले.
No comments:
Post a Comment