Friday 13 December 2019

डोंगरपठारावरील गांवाच्या विकासाकरीता अधिकाऱ्यांना बरोबर घेवून डोंगरी परीषद घेणार. आमदार शंभूराज देसाईंची घोषणा.


   


              दौलतनगर दि.१४ :- केवळ निवडणूकीच्या तोंडावर पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरपठारावरील गांवाची वाडयावस्त्यांमधील जनतेची आठवण न करता गत दोन वर्षापुर्वी पाटणच्या डोंगरपठारावर या पठारावरील सर्व गांवाच्या आणि वाडयावस्त्यांच्या प्रलंबीत विकासकामांसंदर्भात डोंगरी परीषद घेवून या पठारावरील अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारी विकासकामे निवडणूकीपुर्वीच मार्गी लावली होती आता काही प्रमाणातच पठारावरील विकासकामे प्रलंबीत असून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावणेकरीता तसेच या पठारावरील जनतेच्या शासकीय यंत्रणेकडे प्रलंबीत असणाऱ्या काही अडीअडचणी सोडविण्याकरीता शासकीय सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेवूनच येत्या काही दिवसात डोंगरपठारावरच डोंगरी परीषद घेणार असल्याची घोषणा आमदार शंभूराज देसाईंनी केली आहे.
              चिटेघर ता.पाटण येथे पाटण विभागातील सर्व गांवाचा तसेच डोंगरपठारावरील गांवाचाही आभार मेळावा आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता त्याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे घोषणा केली. यावेळी बबनराव माळी,बाळासाहेब शेजवळ,सुरेशराव जाधव,गणीभाई चाफेरकर,शंकर कुंभार यांच्यासह पाटण विभागातील सर्व गांवातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
            याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण विधानसभा मतदारसंघातील पाटणच्या वरील सर्व डोंगरपठार हा विकासकामांपासून अनेक वर्षापासून वंचीत होता.२०१४ ला पाटण मतदारसंघाचा आमदार झालेनंतर या पठारावरील अनेक गांवे व वाडयावस्त्या त्यांच्या प्रलंबीत विकासकामांकरीता माझी भेट घेत होते त्यानुसार त्यांना विकासकामे देण्याचे धोरण राबविण्यात आले परंतू या गांवाचे आणि वाडयावस्त्यांचे अनेक प्रश्न विकासात्मक कामे मोठया संख्येने प्रंलबीत असल्याचे पाहून पाटणच्या डोंगरपठारावरील गांवाच्या व वाडया वस्त्यांच्या विविध प्रंलंबीत प्रश्नाकरीता मी स्वत: काटीटेक याठिकाणी डोंगरी परीषदचे आयोजन केले व या पठारावरील जनतेच्या समस्या,त्यांचे प्रश्न,प्रलंबीत विकासकामे जाणून घेतली व एकच वर्षाच्या आत याच डोंगरपठारावरील प्रत्येक गांवामध्ये व वाडयावस्त्यांमध्ये विकासाचे एकतरी काम पोहचविण्याचा प्रयत्न केला. या कामांच्या भूमिपुजन तसेच उदघाटनप्रसंगी गांवागावात आणि वाडीवस्तीवर मागील वर्षी गेल्यांनंतर मागच्या पेक्षा आता दुप्पट विकासकामे या विभागाला देण्याचा शब्द मी प्रत्येक गांवामध्ये दिला होता त्यानुसार मागील वर्षी डोंगरपठारावरील प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये मी मागील पेक्षा दुप्पट कामे मंजुर करुन दिली आजमितीला मागील वर्षातील अनेक कामे सुरु आहेत,अनेक प्रगतीपथावर आहेत. असे सांगून ते म्हणाले मी गत दोन वर्षात या पठारावरील गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये दिलेल्या विकासकामांच्या बदल्यात या विभागातील मतदारांनी मला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भरघोस असे मतदान करुन चांगले मताधिक्य दिले आहे. यापुर्वींच्या निवडणूकांमध्ये आमच्यावर विरोधकांचा दुप्पटीने असणारा मताधिक्याचा आकडा या विभागातील जनतेने कमी करुन तो निम्म्यावर आणून ठेवला आहे विरोधकांचा मताधिक्क्याचा आकडा निम्म्यावर आल्याने सहाजिकच माझे मतांमध्ये चांगली वाढ झाली आहे ती केवळ आणि केवळ विकासकामांच्या जोरावर. डोंगरपठारावरील जनतेला विकासकामांचा दिलेला शब्द मी पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न मतदारसंघाचा आमदार म्हणून केला असून अजुनही कामे डोंगरपठारावरील गांवे व वाडयावस्त्यांमध्ये शिल्लक आहेत ही लवकरात लवकर मार्गी लागून डोंगर पठारावरील जनतेचे जीवनमान सुखी करणेकरीता मी येत्या काही दिवसात पाटण तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेवूनच डोंगरपठारावरच डोंगरी परीषद घेणार आहे या डोंगरी परीषदेमध्ये डोंगरपठारावरील जनतेने त्यांच्याकडील प्रलंबीत विकासकामे तसेच शासकीय यंत्रणेकडे त्यांच्या काही प्रलंबीत अडीअडचणी असतील तर त्या त्यांनी या डोंगरी परीषदेमध्ये घेवून याव्यात असे आवाहनही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी करुन हा उपक्रम पाटण तालुक्यात नव्हे तर सातारा जिल्हयात प्रथमत:च राबविला जात आहे याचे मला कौतुक आहे कारण आपण शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेवून जनता दरबार तालुक्याच्या ठिकाणी भरवितो परंतू या उपक्रमामुळे आपण डोंगरपठारावरील जनतेच्या अडीअडचणी जागेवर जावून सोडविणार असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले. उपस्थितांचे स्वागत बबनराव माळी यांनी केले व आभार सुरेश जाधव यांनी मानले.

3 comments:

  1. मन:पूर्वक अभिनंदन साहेब
    Great work

    ReplyDelete
  2. अभिनंदन साहेब

    ReplyDelete