Saturday, 23 January 2021

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीनिमित्त गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी केले विनम्र अभिवादन. जयंतीनिमित्त गोरगरीब महिलांना व पुरुषांना केले जीवनावश्यक साहित्यांचे वाटप.

 




दौलतनगर दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे 95 व्या जयंती दिनानिमित्ताने दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती दिनानिमित्ताने पाटण मतदार संघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊस तोडणी मजूरांचे कुटुंबियांना ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह तसेच पाटण विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाच्यावतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे 95 व्या जयंती दिन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. प्रांरभी ना.शंभूराज देसाईंनी  शिवसेनाप्रमुख यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर  जयंतीनिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊस तोडणी मजूरांचे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास पाटण मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी हे मोठया संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी अभिवादन करताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जिव्हाळयाचे ऋृणानुबंध होते. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले होते हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार अनेक वर्षे तळपती ठेवली.तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला.

सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगचित्रातून टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती.मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला.शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आली आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख व हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखू लागला.आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत परंतू त्यांनी दिलेले आदर्श विचारांतून शिवसेना पक्षाची वाटचाल सुरु आहे.

शिवसेना पक्षाची धुरा त्यांनी उध्दवजी ठाकरे यांच्या हातात दिली. आज मा. उध्दवजी ठाकरे हे राज्याचे लाडके आणि कर्तबगार मुख्यमंत्री आहेत त्यांनी माझेवर राज्याच्या पाच महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देवून मला राज्याचा राज्यमंत्री केले आहे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी जी जी जबाबदारी माझेवर दिली आपल्या सर्वांच्या सहकार्याने ती पार पाडण्याचे काम मी करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचे जयंती दिनानिमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक व आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने मी विनम्र अभिवादन करतो.

 

Monday, 18 January 2021

कोयनानगरला प्रस्तावित पोलीस विशेष प्रशिक्षण उपकेंद्राच्या जागेची. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली अधिकाऱ्यासमवेत प्रत्यक्ष पहाणी.


दौलतनगर दि.18 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या परिसरात  कोयनानगर येथे निसर्गरम्य ठिकाणी पोलीस भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणेकरीता राज्याचे महाराष्ट्र पोलीस विशेष प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्यासाठी पाटण मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेतला आहे.त्यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे मान्यतेने कोयनानगरला महाराष्ट्र पोलीस विशेष प्रशिक्षण उपकेंद्र उभारणे प्रस्तावित असून या प्रस्तावित प्रशिक्षण उपकेंद्रास आवश्यक असणाऱ्या जागेची गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रत्यक्ष कोयनानगर येथे येवून संबधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली.

             मागील महिन्यात दि.10 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे हे कोयनानगरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी निसर्गाने नटलेल्या या परिसरात पोलीस भरती  होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पोलीस भरतीनंतरचे प्रशिक्षण देणेकरीता राज्य पोलीस दलाचे विशेष प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्यास मान्यता दयावी अशी मागणी मुख्यमंत्री यांचेकडे केली होती. तसेच त्यानंतर मुंबई येथे मुख्यमंत्री यांची भेट घेवून त्यांना लेखी पत्र देतही याची मागणी केली असता मुख्यमंत्री यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना गृह विभागाला दिल्या आहेत.तात्काळ या प्रस्तावित  विशेष प्रशिक्षण उपकेंद्राचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांचेकडे मान्यतेकरीता सादर करावयाचा असून याचे सादरीकरण स्वत: गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री यांचेकडे करणार आहेत.

                त्यामुळे कोयनानगरला प्रस्तावित असणारे हे विशेष प्रशिक्षण उपकेंद्र  लवकरात लवकर व्हावे  याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हे प्रयत्न सुरु असून हे विशेष प्रशिक्षण उपकेंद्र कोयनानगरच्या वैभवात भर टाकणार आहे. या भेटीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रथमत: कोयनानगर येथे सर्व संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये या विशेष प्रशिक्षण उपकेंद्राकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व बांबीचा त्यांनी प्राथमिक स्वरुपात आढावा घेतला. विशेष प्रशिक्षण उपकेंद्राकरीता आवश्यक जागा, प्रशिक्षणार्थींना राहण्याकरीता आवश्यक निवासस्थाने, वीज, पाणी, रस्ता याच्या सुविधा, प्रशिक्षण केंद्राकरीता प्रशिक्षण हॉल या सर्व बांबीचा त्यांनी या बैठकीत आढावा घेतला .या विभागात कोयना धरण व्यवस्थापनच्या  प्रशिक्षणार्थींना राहणेकरीता किती खोल्या उपलब्ध आहेत, तसेच विशेष प्रशिक्षण उपकेंद्राची उभारणी करण्याकरीता महसूल विभागाची किती जागा उपलब्ध आहे याचा सर्व आढावा घेत त्यांनी प्रस्तावित असणाऱ्या या विशेष प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीकरीता प्रत्यक्ष जावून जागेवर पहाणी केली. लवकरात लवकर महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विशेष प्रशिक्षण उपकेंद्राचा सविस्तर प्रस्ताव तयार करुन तो मुख्यमंत्री यांचेकडे सादरीकरणाकरीता व मान्यतेकरीता सादर करावा अशा सुचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.

                मुख्यमंत्री यांना या प्रस्तावित विशेष प्रशिक्षण उपकेंद्राचे सादरीकरण करुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची विनंती मुख्यमंत्री यांचेकडे करणार असल्याचेही यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

               यावेळी पहाणी दौऱ्यास व बैठकीस जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, कोयना धरण कार्यकारी अभियंता वैभव फाळके, उपविभागीय अभियंता आशिष जाधव,सहाय्यक वनसंरक्षक साळुंख हे अधिकारी व शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.

Monday, 11 January 2021

ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध झालेल्या सदस्यांची राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना भेटायला तोबा गर्दी. 54 गांवातील 204 बिनविरोध सदस्यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची घेतली भेट.

 

दौलतनगर दि.11 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-  पाटण विधानसभा मतदारसंघात 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत.पहिल्या टप्प्यात 36 ग्रामपंचायतीच्या निवडणूका या पुर्णत: बिनविरोध झाल्या तर 50 ग्रामपंचायती या अंशत: बिनविरोध झाल्या. 33 गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सरळ निवडणूकीची लढत होत असून पुर्णत: व अंशत: बिनविरोध झालेल्या एकूण 86 ग्रामपंचायतीमध्ये 393  सदस्यांपैकी 256 सदस्य हे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे व शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानणारे आहेत. गेले दोन दिवस गृहराज्यमंत्री हे पाटण मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना मतदारसंघातील 54 ग्रामपंचायतीमधील शिवसेना पक्षाच्या एकूण 204 सदस्यांनी ना.शंभूराज देसाईंची दौलतनगर येथे भेटण्याकरीता तोबा गर्दी केली होती. उर्वरीत 18 ग्रामपंचायतीमधील 52 बिनविरोध सदस्य हे येत्या दोन दिवसात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची भेट घेणार आहेत.

            सातारा जिल्हयात सर्वात जास्त गा्रमपंचायतीच्या निवडणूका पाटण विधानसभा मतदारसंघात होत असून यातील पाटण तालुक्यात 107 व मतदारसंघातील सुपने-तांबवे पंचायत समिती गणामध्ये 12 अशा एकूण 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. पाटण मतदारसंघाचे आमदार आणि  राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे राज्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करीत आहेत त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकांकडे संपुर्ण सातारा जिल्हयाचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे व शिवसेना पक्षाचे पारडे जड असून पाटण मतदारसंघात अर्ज माघार घेणेदिवशीच 36 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत यामध्ये 21 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पक्षाचे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे वर्चस्व आहे.अंशत: बिनविरोध झालेल्या 50 ग्रामपंचायतीमध्ये 12 ठिकाणी शिवसेना पक्षाचे व ना.शंभूराज देसाईंचे बहूमत असून 38 ग्रामपंचायतीमध्ये सरळ लढत होत आहे. तर अनेक ग्रामपंचायतीमध्ये समसमातंर सदस्य हे बिनविरोध झाले आहेत.बिनविरोध झालेल्या 36 ग्रामपंचायती मधील 21 ग्रामपंचायतीच्या एकूण 130 व अशंत: बिनविरोध झालेल्या 74 अशा एकूण 204 बिनविरोध सदस्यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची येवून प्रत्यक्ष भेट घेतली.उर्वरीत 18 ग्रामपंचायती मधील 52 बिनविरोध सदस्यांनी शिवसेना पक्षाचे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे नेतृत्व मान्य करीत येत्या दोन दिवसात ना.शंभूराज देसाई पाटणच्या दौऱ्यावर येणार आहेत तेव्हा प्रत्यक्ष येवून भेट घेणार असल्याचे या ग्रामपंचायतींनी कळविले आहे.

          सद्यस्थितीला पाटण मतदारसंघात होणाऱ्या 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायतीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे व शिवसेना पक्षाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.भेटीला आलेल्या 204 बिनविरोध सदस्यांचा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी श्रीफळ देवून दौलतनगर येथे सत्कार केला. निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये बारकाईने लक्ष घालून जास्तीत जास्त सदस्य हे शिवसेना पक्षाचे करण्याचे आवाहन ना.शंभूराज देसाईंनी यावेळी उपस्थित सदस्य तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासमोर केले व भविष्यात या ग्रामपंचायतीमध्ये कशाप्रकारे चांगले काम करायचे याचे प्रशिक्षण निवडणूका झालेनंतर ग्रामपंचायत सदस्यांना तज्ञांकडून आयोजीत करणार असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी मी राज्याचा मंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख ना.उध्दवजी ठाकरे यांनी राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझेवर मोठी जबाबदारी दिली आहे. जनतेच्या आर्शिवादानेच हे सर्व शक्य झाले असून राज्याचा मंत्री असलो तरी  “ घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी ” या म्हणीप्रमाणे माझे लक्ष पाटण मतदारसंघातील जनतेवर आहे येथील विकासकामांवर आहे. सन 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कार्यकालात आमदार असताना मतदारसंघातील प्रत्येक गांवामध्ये आवश्यक ती समाजपयोगी विकासकामे आपण मार्गी लावली आहेत. भविष्यात या गांवातील उर्वरीत राहिलेल्या विकासकामांचा ग्रामस्थांच्या आणि सदस्यांच्या मागणीनुसार आराखडा तयार करुन ही विकासकांमे मार्गी लावण्याकरीता प्रयत्नशील असल्याचे सांगत ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध झालेल्या सदस्यांचे गृहराज्यमंत्री यांनी अभिनंदन करीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी होण्याकरीता  त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Saturday, 2 January 2021

 


            पाटण मतदारसंघात मध्यम नदयावर होणार कोल्हापुर पध्दतीचे बंधारे.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांची घेतली भेट.

आवश्यक निधी देण्याचे मृद व जलसंधारण मंत्री यांचेकडून मान्य.

दौलतनगर दि.02 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-  सन 2020-21 च्या आर्थ‍िक वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघातील तारळी, वांग, महिंद व मोरणा या मध्यम नद्यावर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधणेच्या कामांचा समावेश करणेकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांची मुंबई येथे भेट घेतली. ना.शंकरराव गडाख यांचेकडे ना. शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील 11 कोल्हापुर पध्दतीचे बंधारे व एका साठवण तलावाचे काम असे एकूण 12 कामे प्रस्तावित केली आहेत.या कामांना सन 2020-21 आर्थ‍िक वर्षातच आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी मान्य केले लवकरच हा निधी त्यांचे विभागामार्फत उपलब्ध  करुन देण्याचे आश्वासन ना.शंभूराज देसाईंनी दिले आहे.

               पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण,डोंगरी भागातील तारळी, वांग,महिंदच्या वांग व मोरणा या मध्यम नदयावर कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधण्याची कामे अनेक वर्षापासून प्रलंबित असून सदरचे बंधारे बांधल्यास या विभागातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याकरीता चांगला उपयोग होणार आहे. सदरच्या कोल्हापुर पध्दतीचे बंधाऱ्यांच्या कामांचा सन 2020-21 या आर्थ‍िक वर्षात समावेश करुन या कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी मतदारसंघाचे आमदार राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांची मुंबई येथे भेट घेतली. व पाटण मतदारसंघातील 12 कांमे त्यांचेकडे प्रस्तावित केली यामध्ये ढेबेवाडी विभागातील वांग नदीवर शितपवाडी, बनपुरी, काळगांव विभागातील काळगांव,मोरेवाडी (कुठरे), धामणी, चाफळ विभागातील उत्तरमांड नदीवर माजगांव, मोरणा विभागातील मोरणा नदीवर बेलवडे खुर्द, वाडीकोतावडे, तारळे विभागातील तारळी नदीवर बांबवडे, नुने येथे कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधणे व कुंभारगांव विभागातील चव्हाणवाडी कुंभारगांव ता.पाटण येथे साठवण तलाव बांधणे व वांग नदीवरील मालदन येथील कोल्हापुर पध्दतीच्या अस्तित्वात असणाऱ्या बंधाऱ्याची सुधारणा करणे या कामांचा समावेश केला आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात या बंधाऱ्यांच्या कामांना मृद व जलसंधारण विभागामार्फत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देण्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी मान्य केले यातील बहूतांशी बंधाऱ्यांची अंदाजपत्रके ही मृद व जलसंधारण विभागामार्फत तयार करण्यात आली आहेत. सदरचा निधी उपलब्ध करुन देण्याचे मान्य केल्याने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Monday, 14 December 2020

मल्हारपेठ पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची 19.23 कोटींची निविदा प्रसिध्द गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी करुन दाखविले.

 



दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-पाटण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मल्हारपेठ ता.पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीला राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दि.07 ऑक्टोंबर, 2020 रोजी मंजुरी मिळवत याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची प्रक्रिया सुरु केली केवळ दोन महिन्यातच ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकाराने नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची 19.23 कोटींची निविदाही महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,मुंबई यांनी दि.08 डिसेंबर,2020 रोजी प्रसिध्द केली असून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी बोलले ते करुन दाखविले आहे.

          पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे  अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. ना.शंभूराज देसाईंनी गृहराज्यमंत्री झाल्या झाल्या अनेक वर्षाच्या या मागणीला मुहुर्तस्वरुप देत त्यांनी व्यक्तीश: पुढाकार घेत महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाकडून मान्यता घेतली यासंदर्भात राज्य शासनाचे गृहविभागाने मंजूरी दिल्याचा शासन निर्णयही दि. 07 ऑक्टोंबर, 2020 रोजी पारित केला. नवीन पोलीस स्टेशनची मान्यता मिळालेनंतर ना.शंभूराज देसाईंनी यास गती देत याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची प्रक्रिया सुरु केली आणि केवळ दोन महिन्यातच पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारत बांधकामांची निविदाही महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,मुंबई यांचेवतीने प्रसिध्द करण्यात आली आहे.

                मल्हारपेठ नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीच्या बांधकामांमध्ये खालील बाबींचा समावेश असून 19.23 कोटीं रुपयांच्या निविदेमध्ये जी पल्स वन अशाप्रकारे पोलीस स्टेशनची 10 हजार चौ.फुटाची इमारत उभारण्यात येणार आहे तसेच पोलीस कर्मचारी यांच्याकरीता 28 हजार चौ.फुट 500 चौ.फुटप्रमाणे 56 निवासस्थाने तसेच पोलीस अधिकारी यांच्याकरीता 5 हजार चौ.फुटाचे 04 निवासस्थाने असे एकूण 43 हजार चौ.फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याठिकाणी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचाही या निविदेमध्ये समावेश करण्यात आला आहे.संरक्षक भिंत (वॉल कंमपाँड), बागबगीचा, लॅन्डस्केंपिंग इत्यादी बाबी करण्यात येणार आहेत. मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,मुंबई यांचे या बांधकामावर नियंत्रण राहणार आहे.

           गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नामुळे पाटण तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थानाची देखणी इमारत उभी राहणार असून या इमारतीमुळे मल्हारपेठ व विशेष करुन पाटण तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे. सदरचे नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी व आता नवीन पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान इमारत उभारण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा सातत्याचा पाठपुरावा असल्याने हे सर्व शक्य झाले आहे.याचा या विभागातील नागरिकांना अभिमान असून या प्रकल्पाबाबत या विभागातील नागरिकांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

चौकट:- राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे शुभहस्ते होणार या प्रकल्पाचे

         भूमिपुजन.

             येत्या महिन्याभरात मल्हारपेठ नवीन पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचे निवासस्थानाच्या बांधकामाची सर्व निविदा प्रक्रिया पुर्ण करुन घेण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट कमी होताच राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपुजन करण्याचा मानस गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.

Saturday, 5 December 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील गांवागांवात पोहचली गोरगरीबांना मदत.

 


दौलतनगर दि.05 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यंदाच्या वर्षी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांचा दि.17 नोव्हेंबरचा वाढदिवस साजरा केला नाही.मात्र त्यांचे वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामार्फत पाटण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.प्रामुख्याने ना.शंभूराज देसाईंचे 54 व्या वाढदिवसा निमित्त मतदारसंघातील ग्रामीण भागातील अत्यंत गरीब कुटुंबातील सदस्यांना पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर 5400 ब्लॅकेंट तर 5400 महिलांना साडया व 5400 शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनींना शालेय साहित्य,बिस्कीट व पाच राजिगऱ्यांचे लाडूचे पॅकेट तसेच कोरोनापासून बचावाकरीता 5400 मास्क अशा प्रकारच्या मदतीचे वाटप करुन पाटण मतदारसंघातील गांवागावांत ही मदत पोहचविण्याचे उल्लेखनीय कार्य करण्यात आले आहे.

        राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री व पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय जनमाणसातील आमदार ना.शंभूराज देसाईंचा दि.17 नोव्हेंबरचा वाढदिवस हा पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेकरीता उत्साहाचा,प्रेरणेचा आणि जल्लोषाचा दिवस म्हणून पाटण मतदारसंघात प्रतिवर्षी साजरा होतो.मात्र यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.ना.शंभूराज देसाईंनी हा निर्णय घेतला असला तरी आपल्या वाढदिवसाच्या आनंदात त्यांनी पाटण मतदारसंघातील अत्यंत गरीब कुटुंबातील सदस्यांना,महिलांना व लहान मुलांना सहभागी करुन घेतले.मतदारसंघातील सर्व विभागातील ग्रामीण भागातील जनतेला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत आवश्यक असणाऱ्या मदतीचे वाटप पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर करण्यात आले असून पाटण मतदारसंघातील जनतेने ना.शंभूराज देसाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरुन आशिर्वाद दिले आहेत. ना.शंभूराज देसाईंचा यंदाच्या वर्षी 54 वा वाढदिवस होता. त्यांचे 54 व्या वाढदिवसानिमित्त 5400  ब्लॅकेंट, 5400 साडया, 5400  शालेय साहित्य,बिस्कीट व पाच राजिगऱ्यांचे लाडूचे पॅकेट व 5400 मास्क वाटप करण्याचा अनोखा उपक्रम त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राबविला असून या उपक्रमाचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.

           त्याचबरोबर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात आलेल्या शिवसेना सदस्य नोंदणींच्या उपक्रमामध्ये पाटण मतदार संघात ना.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली चांगला सहभाग घेवून शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणीची अनोखी भेट देण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले होते त्यानुसार ना.शंभूराज देसाईंच्या वाढदिवसादिवशी सुमारे 71 हजार सदस्य नोंदणी करण्यात आली. सातारा जिल्हयाकरीता 03 लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उदिष्ट देण्यात आले होते त्यातील 71 हजार शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. उर्वरीत 29 हजार शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.

 

 

Friday, 4 December 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईच्या पुढाकाराने 90 कोरोनाबाधितांना जीवनदान. दौलतनगर कोवीड केअर सेंटरमधून सुमारे 90 जण झाले कोरोनामुक्त.

  


दौलतनगर दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- कोविड-19 संसर्गामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील रुग्णांची हेळसांड थांबविण्याकरीता मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून उभारलेल्या दौलतनगर,ता.पाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये गत दोन महिन्यात आतापर्यंत कोरोना बाधित 98 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यातील सुमारे 90 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकारामुळे या 90 कोरोना बाधितांना जीवनदान मिळाले असल्याने 90 कोरोनामुक्त झालेल्यांच्या कुटुंबियांनी पाटण मतदारसंघासाठी खऱ्या अर्थाने कोरोना योध्दा ठरलेल्या ना.शंभूराज देसाईंचे आभार व्यक्त केले आहेत.

             सातारा जिल्ह्यामध्ये दोन महिन्यापुर्वी ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कराड,सातारा याठिकाणी ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवू लागली होती.ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असताना अशा गंभीर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे नगर विकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्णांकरीता कोवीड केअर सेंटर उभे करण्याचा धोरणात्मक निर्णय गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी घेतला.

             स्वत: याकरीता त्यांनी पुढाकार घेत केवळ पाच ते सहा दिवसात या कोवीड सेंटरची उभारणी करीत रुग्णांच्या सेवेसाठी हे कोवीड सेंटर तातडीने सुरु करण्याचे काम त्यांनी केले.या कोविड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड,25  नॉनऑक्सिजन बेड अशी एकूण 75 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. आवश्यक सर्व औषधसाठा तसेच इतर साधन सामुग्रीसह या कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक 18 वैद्यकीय अधिकारी,17 कर्मचारी  उपलब्ध करण्यात आले आहेत.गत दोन महिन्यात आतापर्यंत याठिकाणी पाटण मतदारसंघातून 98 कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते.त्यातील सुमारे 90 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या या सेंटरमध्ये केवळ 07 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकारामुळे उभारलेले हे कोवीड केअर सेंटर पाटण मतदारसंघातील कोरोनाबाधितांना खऱ्या अर्थाने वरदान ठरले आहे.

             या कोविड सेंटरच्या एकूण कामकाजावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे बारकाईने लक्ष असून कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी,वाफारा घेणेसाठी वाफाऱ्याची भांडी, आवश्यक असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे.तसेच वेळच्यावेळी चहा,नाष्टा, जेवण व औषधोपचार या बाबींकडेही लक्ष दिले जात आहे.सेंटरमधील रुग्णांकरीता निवासाची चांगली सोय करत वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या सेवेमध्ये कशाचीही कमतरता भासू नये,यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी 24 तास उपलब्ध आहेत.

           दरम्यान रुग्णांची ने-आण करण्यासाठी कोविड सेंटरला आवश्यक असणारी अद्यावत रुग्णवाहिका शिवसेना पक्षाचे गटनेते व राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे सहकार्याने डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून उपलब्ध करण्यात आली आहे.कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात योध्दा म्हणून पाठीशी उभे राहिलेल्या ना.शंभूराज देसाईंचे त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल पाटण मतदारसंघातील जनतेकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.