Monday, 11 October 2021

तारळे विभागाला विकास कामांमध्ये कायम झुकते माप राहिल :गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते तारळे येथे विविध उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 

दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पहिल्यापासूनच्या राजकीय वाटचालीत तारळे विभागाने कायम मोलाची साथ केली. त्यामुळे तारळे भागावर माझे नेहमीच लक्ष असते. परिस्थिती कशीही असो, कितीही अडचणी असोत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानुसार तारळे विभागाला विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देऊन प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावली आहेत. जस तारळे विभागाला या आधीही विकासात झुकते माप दिले आहे,आगामी  काळातही या विभागाला जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या विकासाच्या कामामंध्ये झुकते माप राहिल,अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

           ते तारळे ते कोंजवडे रस्ता रुंदीकरण व नूतनीकरण भूमिपूजन, नवीन तलाठी कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या उदघाटन अशा संयुक्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,बबनराव शिंदे,अभिजित पाटील,संजय देशमुख,गजानन जाधव,सोमनाथ खामकर,रणजित शिंदे,विजय पवार,दीपक यादव,नामदेवराव साळुंखे,माणिकशहा पवार,युवराज नलवडे,रामचंद्र देशमुख,विकासराव जाधव,एम. डी. जाधव,श्रीकांत सोनावले,किशोर बारटक्के,तहसीलदार रमेश पाटील,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड,किरण सुर्यवंशी,मधुकर आरेकर,तुषार चव्हाण,बाळासाहेब सूर्यवंशी,श्रीधर जाधव, ग्रामपंचायत सदस्य संगिता जाधव,पूजा सरगडे,दीपाली पवार,पूनम जरग,शंकर साळुंखे आदींसह विविध गावचे सरपंच उपसरपंच, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                  ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले, कोरोनामुळे दीड वर्षानंतर प्रथमच कार्यक्रम होत आहे.कोरोनामुळे महसूलात घट झाल्याने सरकारच्या तिजोरीवर ताण आला आहे.गेल्या एक वर्षात महसूलमाध्ये एक लाख कोटींची तूट आली आहे. असे असले तरी काही मर्यादेत आपण विकास कामांची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. गत पंचवार्षिकमध्ये आमदार असताना पाटण तालुक्याचा सर्वांगीन विकास डोळयासमोर ठेवत राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांची विकास कामे करण्यात आपण यशस्वी झालो.आता तर राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळत असून राज्यमंत्री असल्यामुळे निश्चितच तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे जरी खरे असले तरी गत दोन वर्षामध्ये कोविड 19 चा संसर्गाने लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा फटका हा उद्योग धंदे तसेच वाहतूक,दळणवळण ठप्प झाले. परिणामी या सर्वांचा परिणाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाला. त्यातच माहे जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी व भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्तीचे डोंगरही सरकार समोर उभे राहिले. या संकटामध्ये राज्य शासनाने कोव्हीडला प्राधान्य देत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करुन संकटकाळात आधार देण्याचे काम केले. सहाजिकच या सर्वांचा परिणाम हा विकास कामांवर झाला,विकास कामांवर मर्यादा आल्या.काही दिवसांपासून आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. उद्योगधंदे, व्यापार व कारखाने सुरू झाले आहेत. राज्य शासनाकडे जस-जसा महसूल वाढून आर्थिक परिस्थिती रुळावर येईल त्या प्रमाणांत  विकास कामेही मार्गी लावता येणार असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले कोरोना काळात आमच्या पोलिस विभागाने अत्यंत चांगली कामगिरी केली. याची पोचपावती जनतेकडून मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाचे कौतुक, शिवाय आरोग्य, महसूल, आशा, ग्रामविकास, अंगणवाडी सेविका, आशा अनेक घटकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. यामुळेच कोरोनाचे संकट परतवून लावण्यात यश आले. अशा शब्दांत कोरोना योध्दांचा गौरव करुन पहिल्यापासून राजकीय कारकिर्दीमध्यये तारळे विभागाने मोठी साथ दिली असून जनहिताच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विकास कामांमध्ये यापुढे तारळे विभागाला निश्चित झुकते माप दिले जाईल,असे त्यांनी शेवटी सांगीतले. प्रास्तविक बबनराव शिंदे, आभार गजानन जाधव यांनी केले.

Saturday, 9 October 2021

शेतीसाठी 16 तास वीज पुरवठा झाल्याने शेतकरी समृध्द होईल. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई. मल्हारपेठला उच्च दाब वाहिनीचा शुभारंभ.



दौलतनगर दि.09(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्याची पाठीशी ठामपणे उभे असून कोविड 19 च्या महामारीच्या काळात केवळ शेतीशी निगडीत कामे सुरु ठेवण्यास शासनाने प्राधान्य दिले. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळाले पाहिजे यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो. डोंगरी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वीज पुरवठा सुरळीत होण्याकरीता डोंगरी विकास आराखडा मंजूर केला.त्यामधून आठ उपसा जलसिंचन योजनांना सोळा तास विज पुरवठा करण्यासाठी निधीची तरतूद केली. आजपासून महावितरणच्या मल्हारपेठ सब स्टेशनमधून यापुढे आठ उपसा जलसिंचन योजनांव्दारे शेतकऱ्यांना 16 तास वीज पुरवठा सुरु राहणार आहे.त्यामुळे बारामाही शेतीचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली येणार असून शेती उत्पादनात वाढ होऊन बळीराजा समृध्द होईल,असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

              डोंगरी विकास आराखडयांतर्गत मंजूर महावितरणचे मल्हारपेठ व पाटण या उपविभागातील उपसा जलसिंचन योजनांचा 8 तासावरुन 16 तासविद्युत पुरवठा करणे या 01 कोटी 71 लक्ष रुपये खर्चाचे नवीन उच्चदाब वाहिनीचे शुभारंभ कार्यक्रम मल्हारपेठ,ता.पाटण येथे संपन्न झाला. यावेळी  मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,ॲङडी.पी.जाधव,बबनराव भिसे,अशोकराव डिगे,विजय जंबुरे, शशिकांत निकम,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,सुनिल पवार,ॲङबाबूराव नांगरे,अमोल पाटील,अधिक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता रविंद्र बुंदिले यांचे सह उपसा जलसिंचन योजनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.तत्पुर्वी इरीगेशन फेडरेशनचे अध्यक्ष बबनराव नलवडे,नावडी हनुमान सह.पाणी पुरवठा संस्थेचे शामराव पवार    यांनी मंत्री शंभुराज देसाई यांचे स्वागत केले. तसेच इतर आठ जलसिंचन योजनांच्या संस्थेचे पदाधिकारी यांनी स्वागत केले.यावेळी सर्व पाणी पुरवठा संस्थेचे पदाधिकारी,शेतकरी उपस्थित होते.   

                ते पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी  म्हणून  नेहमीच शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्षा अंमलबजावणीचे काम केले. पाटण तालुका हा डोंगरी व दुर्गम भागात वसलेला असल्याने तालुक्यातील वीज वितरण विभागाची  अनेक कामे निधी अभावी प्रलंबित होती. याकामामध्ये जादा क्षमतेची रोहित्रे, वाढीव वीज पोल तसेच गंजलेले पोल बदलणे ई. कामांचा यात समावेश होता. प्रलंबित असलेल्या वीज वितरणच्या कामांचा डोंगरी विकास आराखडा महावितरणकडून करुन घेऊन त्यासाठी निधी मंजूर व्हावा,अशी सातत्याने मागणी केली. तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी या डोंगरी विकास आराखडयाला मान्यता देत सुमारे 11 कोटी 22 लक्ष रुपयांच्या निधीची तरतूदही केली. मंजूर झालेल्या डोंगरी विकास आराखडयात समावेश असलेल्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली. आज त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला मल्हारपेठ सब स्टेशन मधुन 8 जलसिंचन योजनांची 8 तासावरुन 16 तास विज पुरवठा यंत्रणा कार्यान्वित  करणेसाठी 1 कोटी 71 लक्ष रुपयांचा निधीचे काम पुर्ण होऊन ग्रामीण भागातील उपसा जलसिंचन योजनांना पाठबळ देण्यात यश आले. मल्हारपेठ सबस्टेशनमधून 8 जलसिंचन योजनांना यापुढे 16 तास वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध पिके घेता येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढण्यास सहाजिकच मदत होणार असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले काम करत असून शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेत त्याची अंमलबजावणीही केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळाले पाहिजे यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहिलो. तालुक्यातील आठ उपसा जलसिंचन योजनांना आजपासून महावितरणच्या मल्हारपेठ सब स्टेशनमधून यापुढे आठ उपसा जलसिंचन योजनांव्दारे शेतकऱ्यांना 16 तास वीज पुरवठा सुरु राहणार आहे.तसेच शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन आर्थिक विकासाला गती देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे शेवटी त्यांनी म्हंटले.प्रास्ताविक विजय पवार यांनी केले तर मल्हारपेठ विभागाचे महावितरणचे उपअभियंता अमित आदमाने यांनी स्वागत करुन उपसा जलसिंचन योजनांना सोळा तास विज पुरवठा होणाऱ्या कामाची संक्षिप्त माहिती दिली.

 

 


बाधितग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी शासन कटीबध्द-ना.शंभूराज देसाई ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबियांना तात्पुरत्या निवारागृहाचे करण्यात आले वाटप.

 


दौलतनगर दि.09(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावात भुस्खलन होऊन घरे बाधित झाली होती. या गावातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून कोयनानगर येथील माध्यमिक व प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरुपात रहात होते.या आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी कोयनानगर येथील शासकीय वसाहतीमधील १५० मोडकळीस आलेल्या खोल्यांची तातडीने दुरुस्ती करुन पहिल्या टप्प्यात 70 आपत्तीग्रस्त कुटुंबियांना या तात्पुरत्या निवारागृहाचे वाटप आज होत असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांतील कुटुंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. लकरच या बाधितग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविणार असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी सांगीतले आहे.

            अतिवृष्टीमुळे दरड कोसळून घरांचे पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना तात्पुरत्या निवारागृहाचे वितरण गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते झाले.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर,शैलेंद्र शेलार,विजय बाकाडे,उपविभागीय अधिकारी सुनिल गाढे,तहसिलदार रमेश पाटील, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार,सा.बा.उपअभियंता अजित पाटील व बाधित कुटुंबिय यांची  उपस्थिती होती.

           यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावांत भूस्खलन होवुन आपत्तीचा डोंगर काळ बनुन गावांवर कोसळला होता. यामध्ये मिरगाव, ढोकावळे व हुंबरळी येथील घरे जमीनदोस्त झाली होती. यामुळे या तीन गावांचे अस्तित्व धोक्यात आले होते. या तीन गावांतील सर्व ग्रामस्थांना कोयनानगर,चाफेर,मिरगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत तर हुंबरळी येथील लोकांना पर्यटन महामंडळ व खाजगी मालकाच्या रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बाधितग्रस्तांची तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन देण्यास महाविकास आघाडीच्या सरकारने प्राधान्य दिले. त्यानुसार कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीतील मोडकळीस आलेल्या खोल्या दुरूस्त करून त्या खोल्यांमध्ये आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन या दुरुस्तीचे कामासाठी तातडीने मान्यता घेऊन मोडकळीस आलेल्या खोल्या तातडीने नव्या स्वरूपात उभारण्याचे काम युध्द पातळीवर सुरु करुन बाधितग्रस्तांचा तात्पुरत्या निवाऱ्याचा विषय निकाली काढण्यास आपल्याला यश आल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की. कोयनानगर येथील कोयना वसाहतीमधील या खोल्यांमध्ये मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या आपत्तीग्रस्त गावातील बाधितांचे तात्पुरते निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.दरम्यान मिरगाव,हुंबरळी  व ढोकावळे या गावांना कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता जागा पसंती करण्यासंदर्भात अधिकार दिले आहेत. महसूल विभागाकडून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येत असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना कायमस्वरुपी घरे उभारुन देण्यासाठी शासन सकारात्मक असून बाधितग्रस्तांचे  कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी महाविकास आघाडीचे शासन कटीबध्द असल्याचे त्यांनी शेवटी म्हंटले आहे.

Thursday, 7 October 2021

शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच धार्मिक स्थळांना भेट द्यावी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे जनतेला आवाहन*


सातारा दि. 7 राज्य शासनाने आजपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली केली आहेत. नागरिकांनी धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेट देत असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच भेट द्यावी, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.श्री. देसाई यांनी दत्त मंदिर, पंचमुखी गणेश मंदिर व साईबाबा मंदिरात भेट देवून तेथील व्यवस्थेची पहाणी केली. यावेळी ते बोलत होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभमीवर शासनाने राज्यातील धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. आज घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे उघण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेटी देत असताना नागरिकांनी  मास्कचा वापर, सामाजिक अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता ठेवावी व शासनाने दिलेल्या नियमांचे   काटेकोरपणे पालन करावे असेही आवाहनही श्री. देसाई यांनी केले 

Wednesday, 6 October 2021

मा.यशराज देसाई(दादा) यांचा दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाव्दारे साधेपणाने होणार साजरा.

 

               

दौलतनगर दि.07(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा.यशराज देसाई (दादा) यांचा दि. १0 ऑक्टोंबर,२०२1 रोजीचा वाढदिवस कोरोनाच्या संकटामुळे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साधेपणाने साजरा होणार आहे. दरम्यान वाढदिनी मा.यशराज देसाई (दादा) हे दुपारी 12.30 वा. पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथे धार्मिक विधीकरीता उपस्थित राहणार असून त्यानंतर ते कुटुंबियांसमवेत परगावी जाणार असल्याची माहिती शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे व शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा अध्यक्ष विजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस  गतवर्षी  गतवर्षी मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यंदाच्याही वर्षी कोरोनाचे संसर्गाचे पार्श्वभूमीवर मा.यशराज देसाई (दादा) यांचे दि. १0 ऑक्टोंबर,२०२1 रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये माहे जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेघर, मिरगावं, ढोकवळे, हुंबरळी या गावांतील झालेल्या कुटुंबियांना जिवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील तारळे, चाफळ,मल्हारपेठ,मारुलहवेली,नाटोशी,ढेबेवाडी,कुंभारगाव,काळगाव,कोयना व पाटण विभागामध्ये खाऊ वाटप तसेच गरीब व गरजू कुटुंबातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना वहया वाटप शिवसेना,युवासेना व युवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सामाजिक अंतर ठेऊन त्या त्या विभागामध्ये करण्यात येणार असून रविवार दि. १0 ऑक्टोंबर रोजी दौलतनगर ता.पाटण येथे धार्मिक विधीचे कार्यक्रम झाल्यानंतर ते दुपारी 12.30 वा. नंतर कुटुंबियांसमवेत परगांवी जाणार असल्याने मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंत यांनी प्रत्यक्ष न भेटता सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्यात,असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

Wednesday, 29 September 2021

प्रामाणिकपणे जनता व पक्षाची केलेल्या सेवेमुळेच राज्यमंत्री म्हणून पाच महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई नावडी,वेताळवाडी येथील विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

 


दौलतनगर दि.29(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-सन 2014 ते 2019 या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघ हा विकास कामांच्याबाबतीत आघाडीवर होता, जादाचा निधी जादाची विकास कामे आणण्याचे काम या पाच वर्षाच्या काळात केले.सन 2019 ची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पश्चात त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मंत्रीपद मिळाले.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेमुळे मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रामाणिकपणे जनतेची,पक्षाची सेवा करण्याचे काम केले.त्यामुळे मंत्रीमंडळातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळाली असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले.

               ते नावडी नविन वसाहत येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर वेताळवाडी ते नावडी रस्ता डांबरीकरण भुमीपुजन,अंगणवाडी इमारत व बौध्दवस्तीमधील अभ्यासिका इमारतीचे उद्घाटन, या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.यावेळी रविराज देसाई,जि.प.सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,अॅड. बाबुराव नांगरे,अॅड.डि.पी.जाधव,विजय जंबुरे,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष सरपंच विजय शिंदे,कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम पाटील, संचालक  बबनराव भिसे  शशिकांत निकम,धनाजी केंडे,मानसिंगराव नलवडे,सरपंच विष्णू पवार,सोनाईचीवाडीचे संतोष कदम ठोमसेचे बजरंग माने यांचेसह नावडी, वेताळवाडी, मल्हारपेठ, आबदारवाडी, गिरेवाडी, ठोमसे, सोनाईचीवाडी,विहे परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.तत्पुर्वी ग्रामपंचायत वतीने सरपंच सुभाष नलवडे,शरद पाटील,सतीश पवार यांनी भव्य पुष्प हार घालून स्वागत केले. हनुमान सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे वतीने चेअरमन व संचालक सुदाम पवार,अशोक लोंढे,फेडरेशनचे अध्यक्ष बबनराव नलवडे , सोसायटीचे संचालक मंडळ,गणेश  मंडळाने ,युवक मंडळाचे बाजीराव पवार यांनी सत्कार केला.

              यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी गृहमंत्री  पदाच्या कालावधतीत केलेल्या कार्यामुळे पाटण तालुक्याची ओळख महाराष्ट्रात  झाली .एक करारी गृहमंत्री म्हणून आजही त्यांना ओळखले जाते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय हे त्यांच्या कार्याची आजही ओळख आपल्याला देतात.त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने  महाविकास आघाडी सरकारमध्ये लोकनेत्यांचे  राजकीय  वारसदार म्हणून व शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांनी त्याच गृहमंत्री पदासह अन्य महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिल्याने  तालुक्याच्या विकासाठी चांगली संधी मिळाल्याचे सांगत मंत्री शंभुराज देसाई विकास कामावर बोलताना म्हणाले महाविकास आघाडी सरकारमध्ये  वित्त व नियोजन राज्यमंत्री म्हणून विधान परिषदेत शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधून अर्थसंकल्प मांडला.त्यावेळी डोंगरी भागाचा विकासाचा अर्थसंकल्प म्हणून कौतुक झालं.परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करते समयी  अडचणी आल्या.कोरोना महामारीने सर्व उद्योग धंदे बंद पडले. अनेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नोकरीवर गदा आली.कोविड मुळे संपूर्ण राज्यात घालण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्य शासनाला सुमारे एक लाख कोटी रुपयांचा महसूलात तूट आली.सहाजिकच मग विकास कामे करताना राज्याचा महसूल खूप कमी जमा झाल्याने विकास कामे करताना काही निर्बंध आले.पण या अडचणीच्या काळात फक्त राज्यातील कृषी क्षेत्र टिकून होते.राज्‍य शासनाने लॉकडाऊनच्या काळात शेती व शेतीपूरक कामांवर कोणतीही बंधन न लादता शेती उत्पादनाशी निगडीत सर्व प्रक्रिया सुरु ठेवल्याने कोविड सारख्या महामारीमध्ये कृषी उत्पन्नात वाढ झाली आहे. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर येत असून काही महिन्यांच्या कालावधीत मतदारसंघातील प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव निधीची तरतूद करणार असल्याने या पुढील काळात कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात प्राधान्यक्रमाने विकास कामांची मागणी करा.या विकास कामांना कसलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यानी शेवटी दिली.

ना.शंभूराज देसाई यांचेमुळे बाधितग्रस्तांची होणार निवासाची सोय. अतिवृष्टीमुळे बाधित भूस्खलनग्रस्तांचे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी कोयनानगर येथे 150 खोल्या तयार.


दौलतनगर दि.29(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावात भुस्खलन होऊन घरे बाधित झाली होती. या गावातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून दाटीवाटीने कोयनानगर येथील माध्यमिक व प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरुपात रहात होते.या आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी कोयनानगर येथील शासकीय वसाहतीमधील १५० मोडकळीस आलेल्या खोल्यांची दोन महिन्यात तातडीने दुरुस्ती करुन पहिल्या टप्प्यात 90 आपत्तीग्रस्त कुटुंबियांचे या खोल्यात येत्या दोन दिवसांत तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचेमुळे बाधितग्रस्तांची निवाऱ्याची सोय होणार आहे.

                   अतिवृष्टीमुळे कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावांत भूस्खलन होवुन आपत्तीचा डोंगर काळ बनुन गावांवर कोसळला होता. यामध्ये मिरगाव मधील ११, ढोकावळे येथील 5 तर हुंबरळी येथील 1 अशी १७ घरे जमीनदोस्त झाली होती. यामुळे या तीन गावांचे अस्तित्व धोक्यात आले होते. या तीन गावांतील सर्व ग्रामस्थांना कोयनानगर,चाफेर,मिरगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत तर हुंबरळी येथील लोकांना पर्यटन महामंडळ व खाजगी मालकाच्या रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केल्यानंतर दुरध्वनीवरुन याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना दिली.अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बाधितग्रस्तांची तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन देण्यास महाविकास आघाडीच्या सरकारचे प्राधान्य राहणार असल्याचे सांगीतले होते.तसेच या कालावधीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयनानगर येथील वसाहतीतील निवासी इमारतींची पाहणी करुन दुरुस्ती करण्याच्या सुचना केल्या होत्या.त्यानुसार कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीतील १५० मोडकळीस आलेल्या खोल्या दुरूस्त करून त्या खोल्यांमध्ये आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन या दुरुस्तीचे कामासाठी तातडीने मान्यता घेऊन मोडकळीस आलेल्या खोल्या तातडीने नव्या स्वरूपात उभारण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. दोन महिन्यांच्या कालावधीत सगळ्यांना हेवा वाटेल अशा सर्व सोयींनीयुक्त टुमदार १५० खोल्या कोयनानगर येथे तयार झाल्या आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर आपत्तीग्रस्त व सध्या कोयनानगर व चाफेर-मिरगांव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत राहणाऱ्या मिरगाव, ढोकावळे या गावातील आपत्तीग्रस्तांना येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे.ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून आपत्तीग्रस्त लोकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याचा विषय निकाली निघाला आहे. कोयनानगर येथील कोयना वसाहतीमधील १५० खोल्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. दोन महिन्यात १५० खोल्या उभ्या राहिल्या आहेत. या खोल्यांमध्ये मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या आपत्तीग्रस्त गावातील बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.मिरगाव येथील बाधित आपत्तीग्रस्त, कोयनानगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल या तर ढोकावळे येथील आपत्तीग्रस्त न्यु इंग्लिश स्कुल चाफेर, मिरगाव या विद्यालयात दोन महिन्यापासून वास्तव्यास आहेत. येत्या चार ऑक्टोबरपासुन दीड वर्षापासुन बंद असलेली सर्व विद्यालये सुरु होत आहेत. विद्यालय सुरु करण्यासाठी या विद्यालयात असणारे आपत्तीग्रस्त अन्यत्र स्थलांतरीत करणे गरजेचे आहे.तात्पुरते निवासस्थान पूर्ण झाल्याने आपत्तीग्रस्तांचे या निवासस्थानी तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा मोकळ्या करून देण्यात येण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या तीन गावाच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. आपत्तीग्रस्त असणाऱ्या या तीन गावातील पहिल्या टप्प्यात 90 बाधित कुटुंबियांना प्रथम प्राधान्याने या खोल्या दिल्या जाणार असून अतिवृष्टीमुळ बाधित झालेल्या कुटुंबियांची निवाऱ्याची सोय ना. शंभूराज देसाई यांनी केल्याबद्दल बाधितग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.