Monday 11 October 2021

तारळे विभागाला विकास कामांमध्ये कायम झुकते माप राहिल :गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते तारळे येथे विविध उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 

दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पहिल्यापासूनच्या राजकीय वाटचालीत तारळे विभागाने कायम मोलाची साथ केली. त्यामुळे तारळे भागावर माझे नेहमीच लक्ष असते. परिस्थिती कशीही असो, कितीही अडचणी असोत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानुसार तारळे विभागाला विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देऊन प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावली आहेत. जस तारळे विभागाला या आधीही विकासात झुकते माप दिले आहे,आगामी  काळातही या विभागाला जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या विकासाच्या कामामंध्ये झुकते माप राहिल,अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

           ते तारळे ते कोंजवडे रस्ता रुंदीकरण व नूतनीकरण भूमिपूजन, नवीन तलाठी कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या उदघाटन अशा संयुक्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,बबनराव शिंदे,अभिजित पाटील,संजय देशमुख,गजानन जाधव,सोमनाथ खामकर,रणजित शिंदे,विजय पवार,दीपक यादव,नामदेवराव साळुंखे,माणिकशहा पवार,युवराज नलवडे,रामचंद्र देशमुख,विकासराव जाधव,एम. डी. जाधव,श्रीकांत सोनावले,किशोर बारटक्के,तहसीलदार रमेश पाटील,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड,किरण सुर्यवंशी,मधुकर आरेकर,तुषार चव्हाण,बाळासाहेब सूर्यवंशी,श्रीधर जाधव, ग्रामपंचायत सदस्य संगिता जाधव,पूजा सरगडे,दीपाली पवार,पूनम जरग,शंकर साळुंखे आदींसह विविध गावचे सरपंच उपसरपंच, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                  ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले, कोरोनामुळे दीड वर्षानंतर प्रथमच कार्यक्रम होत आहे.कोरोनामुळे महसूलात घट झाल्याने सरकारच्या तिजोरीवर ताण आला आहे.गेल्या एक वर्षात महसूलमाध्ये एक लाख कोटींची तूट आली आहे. असे असले तरी काही मर्यादेत आपण विकास कामांची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. गत पंचवार्षिकमध्ये आमदार असताना पाटण तालुक्याचा सर्वांगीन विकास डोळयासमोर ठेवत राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांची विकास कामे करण्यात आपण यशस्वी झालो.आता तर राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळत असून राज्यमंत्री असल्यामुळे निश्चितच तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे जरी खरे असले तरी गत दोन वर्षामध्ये कोविड 19 चा संसर्गाने लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा फटका हा उद्योग धंदे तसेच वाहतूक,दळणवळण ठप्प झाले. परिणामी या सर्वांचा परिणाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाला. त्यातच माहे जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी व भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्तीचे डोंगरही सरकार समोर उभे राहिले. या संकटामध्ये राज्य शासनाने कोव्हीडला प्राधान्य देत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करुन संकटकाळात आधार देण्याचे काम केले. सहाजिकच या सर्वांचा परिणाम हा विकास कामांवर झाला,विकास कामांवर मर्यादा आल्या.काही दिवसांपासून आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. उद्योगधंदे, व्यापार व कारखाने सुरू झाले आहेत. राज्य शासनाकडे जस-जसा महसूल वाढून आर्थिक परिस्थिती रुळावर येईल त्या प्रमाणांत  विकास कामेही मार्गी लावता येणार असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले कोरोना काळात आमच्या पोलिस विभागाने अत्यंत चांगली कामगिरी केली. याची पोचपावती जनतेकडून मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाचे कौतुक, शिवाय आरोग्य, महसूल, आशा, ग्रामविकास, अंगणवाडी सेविका, आशा अनेक घटकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. यामुळेच कोरोनाचे संकट परतवून लावण्यात यश आले. अशा शब्दांत कोरोना योध्दांचा गौरव करुन पहिल्यापासून राजकीय कारकिर्दीमध्यये तारळे विभागाने मोठी साथ दिली असून जनहिताच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विकास कामांमध्ये यापुढे तारळे विभागाला निश्चित झुकते माप दिले जाईल,असे त्यांनी शेवटी सांगीतले. प्रास्तविक बबनराव शिंदे, आभार गजानन जाधव यांनी केले.

No comments:

Post a Comment