दौलतनगर दि.29(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे
कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावात भुस्खलन होऊन घरे बाधित झाली
होती. या गावातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून दाटीवाटीने कोयनानगर येथील
माध्यमिक व प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरुपात रहात होते.या आपत्तीग्रस्तांचे
तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी कोयनानगर येथील शासकीय वसाहतीमधील १५० मोडकळीस
आलेल्या खोल्यांची दोन महिन्यात तातडीने दुरुस्ती करुन पहिल्या टप्प्यात 90
आपत्तीग्रस्त कुटुंबियांचे या खोल्यात येत्या दोन दिवसांत तात्पुरते पुनर्वसन केले
जाणार आहे.गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचेमुळे बाधितग्रस्तांची निवाऱ्याची सोय
होणार आहे.
अतिवृष्टीमुळे कोयना
विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावांत भूस्खलन होवुन आपत्तीचा डोंगर काळ
बनुन गावांवर कोसळला होता. यामध्ये मिरगाव मधील ११, ढोकावळे येथील 5 तर हुंबरळी येथील 1 अशी १७ घरे जमीनदोस्त झाली होती. यामुळे या तीन गावांचे अस्तित्व धोक्यात
आले होते. या तीन गावांतील सर्व ग्रामस्थांना कोयनानगर,चाफेर,मिरगाव येथील
प्राथमिक व माध्यमिक शाळेत तर हुंबरळी येथील लोकांना पर्यटन महामंडळ व खाजगी
मालकाच्या रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केल्यानंतर दुरध्वनीवरुन
याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री
ना.अजितदादा पवार यांना दिली.अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बाधितग्रस्तांची
तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन देण्यास महाविकास आघाडीच्या सरकारचे प्राधान्य
राहणार असल्याचे सांगीतले होते.तसेच या कालावधीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम
मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयनानगर येथील वसाहतीतील निवासी इमारतींची पाहणी करुन
दुरुस्ती करण्याच्या सुचना केल्या होत्या.त्यानुसार कोयना प्रकल्पाच्या शासकीय
वसाहतीतील १५० मोडकळीस आलेल्या खोल्या दुरूस्त करून त्या खोल्यांमध्ये
आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी
राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन या दुरुस्तीचे कामासाठी तातडीने मान्यता घेऊन
मोडकळीस आलेल्या खोल्या तातडीने नव्या स्वरूपात उभारण्याचे काम युध्द पातळीवर सुरु
होते. दोन महिन्यांच्या कालावधीत सगळ्यांना हेवा वाटेल अशा सर्व सोयींनीयुक्त
टुमदार १५० खोल्या कोयनानगर येथे तयार झाल्या आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर
आपत्तीग्रस्त व सध्या कोयनानगर व चाफेर-मिरगांव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत
राहणाऱ्या मिरगाव, ढोकावळे या गावातील आपत्तीग्रस्तांना येथे स्थलांतरीत करण्यात
येणार आहे.ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून आपत्तीग्रस्त लोकांच्या
तात्पुरत्या निवाऱ्याचा विषय निकाली निघाला आहे. कोयनानगर येथील कोयना वसाहतीमधील १५०
खोल्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. दोन महिन्यात १५० खोल्या उभ्या राहिल्या
आहेत. या खोल्यांमध्ये मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या आपत्तीग्रस्त गावातील बाधितांचे
तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.मिरगाव येथील बाधित आपत्तीग्रस्त, कोयनानगर
येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल या तर ढोकावळे येथील आपत्तीग्रस्त न्यु इंग्लिश
स्कुल चाफेर, मिरगाव या विद्यालयात दोन महिन्यापासून वास्तव्यास आहेत. येत्या चार
ऑक्टोबरपासुन दीड वर्षापासुन बंद असलेली सर्व विद्यालये सुरु होत आहेत. विद्यालय
सुरु करण्यासाठी या विद्यालयात असणारे आपत्तीग्रस्त अन्यत्र स्थलांतरीत करणे
गरजेचे आहे.तात्पुरते निवासस्थान पूर्ण झाल्याने आपत्तीग्रस्तांचे या निवासस्थानी
तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे. शाळा सुरु
होण्यापूर्वी शाळा मोकळ्या करून देण्यात येण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या तीन
गावाच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे.
आपत्तीग्रस्त असणाऱ्या या तीन गावातील पहिल्या टप्प्यात 90 बाधित कुटुंबियांना प्रथम प्राधान्याने या खोल्या दिल्या जाणार असून
अतिवृष्टीमुळ बाधित झालेल्या कुटुंबियांची निवाऱ्याची सोय ना. शंभूराज देसाई यांनी
केल्याबद्दल बाधितग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment