दौलतनगर दि.09(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्यातील महाविकास
आघाडीचे सरकार हे शेतकऱ्याची पाठीशी ठामपणे उभे असून कोविड 19 च्या महामारीच्या
काळात केवळ शेतीशी निगडीत कामे सुरु ठेवण्यास शासनाने प्राधान्य दिले. तालुक्याचा
लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळाले पाहिजे यासाठी नेहमीच
प्रयत्नशील राहिलो. डोंगरी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वीज पुरवठा सुरळीत
होण्याकरीता डोंगरी विकास आराखडा मंजूर केला.त्यामधून आठ उपसा जलसिंचन योजनांना
सोळा तास विज पुरवठा करण्यासाठी निधीची तरतूद केली. आजपासून महावितरणच्या
मल्हारपेठ सब स्टेशनमधून यापुढे आठ उपसा जलसिंचन योजनांव्दारे शेतकऱ्यांना 16 तास वीज पुरवठा
सुरु राहणार आहे.त्यामुळे बारामाही शेतीचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली येणार
असून शेती उत्पादनात वाढ होऊन बळीराजा समृध्द होईल,असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी केले.
डोंगरी विकास आराखडयांतर्गत मंजूर
महावितरणचे मल्हारपेठ व पाटण या उपविभागातील उपसा जलसिंचन योजनांचा
8 तासावरुन 16 तासविद्युत
पुरवठा करणे या 01 कोटी 71
लक्ष रुपये खर्चाचे नवीन उच्चदाब वाहिनीचे शुभारंभ कार्यक्रम मल्हारपेठ,ता.पाटण
येथे संपन्न झाला. यावेळी
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती
सदस्य सुरेश पानस्कर,ॲङडी.पी.जाधव,बबनराव भिसे,अशोकराव डिगे,विजय जंबुरे, शशिकांत
निकम,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,सुनिल पवार,ॲङबाबूराव नांगरे,अमोल
पाटील,अधिक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता रविंद्र बुंदिले यांचे सह
उपसा जलसिंचन योजनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.तत्पुर्वी इरीगेशन फेडरेशनचे
अध्यक्ष बबनराव नलवडे,नावडी हनुमान सह.पाणी पुरवठा संस्थेचे शामराव पवार यांनी मंत्री
शंभुराज देसाई यांचे स्वागत केले. तसेच इतर आठ
जलसिंचन योजनांच्या संस्थेचे पदाधिकारी यांनी स्वागत केले.यावेळी सर्व पाणी पुरवठा
संस्थेचे पदाधिकारी,शेतकरी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की,
लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेऊन त्याची
प्रत्यक्षा अंमलबजावणीचे काम केले. पाटण तालुका हा डोंगरी व दुर्गम भागात वसलेला
असल्याने तालुक्यातील वीज वितरण विभागाची
अनेक कामे निधी अभावी प्रलंबित होती. याकामामध्ये जादा क्षमतेची रोहित्रे,
वाढीव वीज पोल तसेच गंजलेले पोल बदलणे ई. कामांचा यात समावेश होता. प्रलंबित
असलेल्या वीज वितरणच्या कामांचा डोंगरी विकास आराखडा महावितरणकडून करुन घेऊन
त्यासाठी निधी मंजूर व्हावा,अशी सातत्याने मागणी केली. तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी
या डोंगरी विकास आराखडयाला मान्यता देत सुमारे 11 कोटी 22 लक्ष रुपयांच्या निधीची
तरतूदही केली. मंजूर झालेल्या डोंगरी विकास आराखडयात समावेश असलेल्या कामांना
प्रत्यक्षात सुरुवात झाली. आज त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला मल्हारपेठ सब स्टेशन
मधुन 8 जलसिंचन योजनांची 8 तासावरुन 16 तास विज पुरवठा यंत्रणा कार्यान्वित करणेसाठी 1 कोटी 71 लक्ष रुपयांचा निधीचे काम पुर्ण
होऊन ग्रामीण भागातील उपसा जलसिंचन योजनांना पाठबळ देण्यात यश आले. मल्हारपेठ
सबस्टेशनमधून 8 जलसिंचन योजनांना यापुढे 16 तास वीज पुरवठा होणार असल्याने
शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध पिके घेता येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती
उत्पादन वाढण्यास सहाजिकच मदत होणार असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, राज्याचे
मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार
शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले काम करत असून शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण
निर्णय शासनाने घेत त्याची अंमलबजावणीही केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक
पाणी मिळाले पाहिजे यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच प्रयत्नशील
राहिलो. तालुक्यातील आठ उपसा जलसिंचन योजनांना आजपासून महावितरणच्या मल्हारपेठ सब
स्टेशनमधून यापुढे आठ उपसा जलसिंचन योजनांव्दारे शेतकऱ्यांना 16 तास वीज पुरवठा
सुरु राहणार आहे.तसेच शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन आर्थिक विकासाला गती
देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे शेवटी त्यांनी म्हंटले.प्रास्ताविक
विजय पवार यांनी केले तर मल्हारपेठ विभागाचे महावितरणचे उपअभियंता अमित आदमाने
यांनी स्वागत करुन उपसा जलसिंचन योजनांना सोळा तास विज पुरवठा होणाऱ्या कामाची
संक्षिप्त माहिती दिली.
No comments:
Post a Comment