Thursday, 18 November 2021

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा दि.20 रोजी 78वा जयंती सोहळा. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची राहणार प्रमुख उपस्थिती.

 

दौलतनगर दि.१8(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचेवतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 78 वा जयंती सोहळा शनिवार दि. 20 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 10.00 वा दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणार असून हा  जयंती सोहळा महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते मा.यशराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी दिली आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमाला कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद व शेतकरी, हितचिंत, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही पत्रकांत करण्यात आले आहे.



गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 55 वा वाढदिवस उत्साहात साजरा. वाढदिवसादिवशी कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्ते, हितचिंतक यांची मांदियाळी.

 





दौलतनगर दि.१8(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 55 वाढदिवस कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर ता. पाटण येथे सामाजीक विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर सकाळपासून रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते,पदाधिकारी व हितचिंतक यांची मांदियाळी जमली  होती.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 55 वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी व मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण सौ. स्मितादेवी देसाई, सौ. अस्मितादेवी देसाई यांनी केले.यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे त्यांनी आशिर्वाद घेतले. त्यावेळी त्यांचे बंधू रविराज देसाई, चिरंजीव यशराज देसाई, कन्या कु. ईश्वरी देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

          त्यानंतर नामदार शंभूराज देसाई यांनी कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेशाचे अभिषेक करुन तसेच मरळी गावची ग्रामदैवत श्री निनाई देवीचे दर्शन घेतले.यावेळी मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचेवतीने नामदार शंभूराज देसाई यांचा सत्कार व अभिष्टचिंतन करणेत आले. त्यानंतर त्यांनी कै. सौ. वत्सलादेवी देसाई,स्व. शिवाजीराव देसाई समाधी व पुर्णाकृती पुतळा,लोकनेते बाळासाहेब देसाई पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2021-22 या गळीत हंगामामधील उत्पादित साखर पोत्यांचे पोती पूजन करुन शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरेसाहेब यांचे 09 वे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे हस्ते तालुक्यातील गोर-गरीब महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात येऊन शिवदौलत सहकारी बँकेच्या दौलतनगर येथील शाखेच्या 18 व्या वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. दरम्यान महाराष्ट्र दौलत, लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक परिसरामध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सातारा जिल्हयातील पहिल्या 100 फुटी ध्वजस्तंभ व राष्ट्रध्वज याचा लोकार्पण सोहळा राज्याचे नगरविकास मंत्री  ना.एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते पार पडला. त्यानंतर वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीराचाही उद्घाटन सोहळा ना.एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते यावेळी  पार पडला. कोविड 19 या महामारीचे कालावधीमध्ये चांगले काम केलेल्या कोविड योध्दा व महारक्तदान शिबीरामध्ये रक्तदान केलेल्या रक्तदाते यांना ना.एकनाथजी शिंदे यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच दुपारी 04.00 वाजता त्यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील तमाम जनतेच्यावतीने तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी  उद्योग व शिक्षणसमुहाच्यावतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात येऊन कार्यकर्ता संवाद मेळव्याला त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्ता संवाद मेळाव्या पुर्वी पाटण विधानसभा मतदारसंघातील शंभूराज युवा संघटना व ग्रामस्थ मरळी,पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ,मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी,शिवदौलत सहकारी बँक,कोयना परिसर कामगार संघटना,नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालय यांचेवतीने  वहीतुला करण्यात आली. 

       नामदार शंभूराज देसाई यांना शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. नामदार शंभूराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे,उपमुख्यंत्री ना.अजितदादा पवार,गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,माजी राज्यपाल डी.वाय.पाटील,पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे,ना. एकनाथजी शिंदे,कृषी मंत्री ना.दादा भुसे, पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील,गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील,खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीमंती छत्रपती उदयनराजे भोसले,माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,माजी मंत्री अर्जुन खोतकर,आमदार किरण सरनाईक,आमदार संजय रायमुलकर,आमदार सुनिल प्रभु,आमदार मकरंद पाटील,आमदार महेश शिंदे,आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे,माजी आमदार शशिकांत खेडकर, वाशिम जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेश मापारी, माजी मंत्री राम‍ शिंदे,माजी आमदार सुजित मिणचेकर, आमदार दिपक चव्हाण,माजी आमदार आनंदराव पाटील,माजी आमदार सुनिल धांडे,खंडाळयाचे माजी सभापती नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील, परिक्षित थोरात,ॲङ इंद्रजित चव्हाण,प्रकाश तवटे,जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,अप्पर पोलीस महासंचालक मिलिंद भारंबे,पोलीस महानिरिक्षक मनोज लोहिया,जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय सोनावणे, संजय उत्तुरे, परेश शेठ,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा. चेअरमन राजाराम पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक पांडूरंग नलवडे, आनंदराव चव्हाण,शशिकांत निकम,सोमनाथ खामकर,गजानन जाधव,अशोकराव डिगे,शंकर शेजवळ,राजेंद्र गुरव,विकास गिरी-गोसावी, विजयराव जंबुरे,बबनराव भिसे,प्रशांत पाटील,विश्वास पाटील,सौ.विश्रांती  जंबुरे देशमुख,सौ.दिपाली पाटील, वसंत कदम,शिवदौलत बँकेचे चेअरमनॲड.मिलिंद पाटील, चंद्रकांत पाटील,संजय देशमुख,सुनील पवार,सुधीर पाटील, अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर,वाय.के.जाधव,सौ.कुसुम मोहिते,मधुकर पाटील,नेताजी मोरे, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष इंदुताई मिसाळ,किरण सुर्यवंशी,अशोक झिमरे,महेश शिद्रुक,विजय बाबर,अनिता जाधव,विलास कुराडे,कुणाल चंदुगडे,दिपक गव्हाणे,विजय साळुंखे,माजी उपसभापती डी.आर.पाटील,माजी जि.प.सदस्य डी.वाय.पाटील,जालंदर पाटील, बशीर खेांदू,ॲङडी.पी.जाधव,प्रकाशराव जाधव,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, सुग्रा खोंदु,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,संतोष गिरी, पंजाबराव देसाई, सीमा मोरे, सुभद्रा शिरवाडकर,पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक अब्दुलगणी चाफेरकर, नगरसेविका मनिषा जंगम,नाना पवार,मनोज पाटील,मिलिंद पाटील,बबनराव माळी,अमोल पाटील,प्रकाश पवार,शैलेंद्र शेलार,सावळाराम लाड, सदानंद साळूंखे, दिलीप सपकाळ, गणेश भिसे,किसन गालवे,उत्तम मोळावडे,विजयराव मोरे,टी.डी.जाधव,शिवाजीराव शेवाळे,नथूराम कुंभार,बबनराव शिंदे,राजेंद्र चव्हाण,अमोल चव्हाण,अभिजित चव्हाण,धनाजी केंडे, विष्णू पवार,अरविंद पवार,सुर्यकांत पानस्कर,नाना साबळे,संपत कोळेकर,संजय शिर्के,हेमंत पवार,विलास गायकवाड, प्रकाश टोपले,महिपती गायकवाड,नथूराम सावंत,निवृत्ती कदम,दादा जाधव,संतोष पवार,शंकर पाटील,किसन कवर,माणिक पवार, बाळासो सुर्यवंशी, बाजीराव रांजणे,चंद्रकांत जगताप,राजेंद्र चव्हाण, विश्वास निकम,रविंद्र सपकाळ,रामभाऊ कदम,रविंद्र जाधव,नाना पवार,गोरख चव्हाण,प्रविण पाटील,शिवाजी जाधव,मनोहर कडव,राजेंद्र पाटील,प्रकाशराव नेवगे,जे.एम.पवार,मनोज मोहिते,राजाराम मोहिते,ॲङ बाबूराव नांगरे, शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे,अभिजित पाटील, कारखान्याचे माजी संचालक मधूकर भिसे, प्रकाश नेवगे,जोतिराज काळे,दिपक साळूंखे, अमोल मोहिते,राजू सणस, रघुनाथ पानस्कर,शंकर पवार,राजेंद्र माळी,लक्ष्मण संकपाळ,पांडूरंग बेबले,प्रविण पाटील,संग्राम पाटील,संजय सणस,अभिजित पवार,राजेंद्र दशवंत,किरण दशवंत,वैभव देशमुख,सचिन पवार,राहूल पाटील,सुनिल माथणे,नवनाथ पाळेकर,महेश पाटील,राजू चव्हाण,प्रशांत मोरे,मुज्जमिल खोंदू,वैभव पवार,दादा देवकर,अनिकेत देसाई, डी.एम.शेजवळ,महादेव पाटील,रामचंद्र कुंभार,भरत बादल,बाळासाहेब भाकरे,महिपती गायकवाड,नामदेवराव साळूंखे,रणजित शिंदे,विजय पवार(फौजी),सागर सपकाळ,राहूल घाडगे,दै.पुढारीचे सतीश मोरे,उपसंपादक अमोल चव्हाण,अशोक मोहने,चंद्रजित पाटील,महेश पाटील,तुषार देशमुख,राजेद्र साळुंखे,एकनाथ माळी,दै.तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दिपक प्रभावळकर,देवदास मुळे,मिलिंद पवार,संभाजी भिसे,दै.मुक्तागिरी विद्या म्हासुर्णेकर,दै.लोकमतचे निलेश साळुंखे, दैनिक सकाळचे अरुण गुरव,विजय लाड यांच्यासह विविध गावातील सरपंच,उपसरपंच,तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका कार्यकारीणीचे पदाधिकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका,जयमल्हार मातंग संघटना पाटण तालुका,कोयना परिसर साखर कामगार संघटना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच तालुक्यातील शिवसेना,युवासेना सर्व कार्यकर्ते,हितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Tuesday, 16 November 2021

*गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हयातील पहिला भव्य राष्ट्रध्वज पाटण तालुक्यात डौलाने फडकणार महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते लोकार्पण

 


 

दौलतनगर दि.१4(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सुमारे शंभर फूट उंचीचा भव्य असा राष्ट्रध्वज आता पाटण तालुक्यातील दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत,लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक परिसरात फडकणार असून या राष्ट्रध्वजाचा स्तंभ 100 फुट उंचीचा असून  राष्ट्रध्वज तब्बल ३०फूट x २० फूट एवढ्या  आकाराचा आहे. लोकप्रतिनिधीच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात उभारलेला हा पहिलाच 'भव्य राष्ट्रध्वज'आहे. त्यामुळे देशाचा अभिमान आणि स्वाभिमान असणारा तिरंगा राष्ट्रध्वज आता पाटण तालुक्यातील 'महाराष्ट्र दौलत' लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक स्थळावरही डौलाने फडकणार आहे.

            लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी अवघ्या महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आपल्या विविध मंत्रिपदाचा काळात त्यांनी राज्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. त्याच लोकनेत्यांचे नातू म्हणजे महाराष्ट्राचे गृह आणि अर्थ राज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण तालुक्यातील कारखाना स्थळावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कोट्यवधी रुपये खर्चातून भव्य असे  अत्याधुनिक 'महाराष्ट्र दौलत'शताब्दी स्मारक उभे केले आहे.या स्मारकामध्ये अत्याधुनिक सुविधांसह विविध शैक्षणिक,सामाजिक दालने उभी केली असल्याने  हा परिसर एक नवे पर्यटन स्थळ म्हणून ही उदयास येत आहे.

           तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक परिसर पाटण तालुक्याच्या वैभवात भर टाकत असतानाच  मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून आता  स्मारक परिसरात आपल्या भारत देशाची आण, बाण आणि शान असणारा  भव्य असा राष्ट्रध्वज ही फडकत राहणार आहे.सुमारे शंभर फूट उंचीचा भव्य असा राष्ट्रध्वज आता'महाराष्ट्र दौलत' लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक परिसरात फडकणार आहे.  हा  राष्ट्रध्वज तब्बल ३०*२० फूट एवढ्या  आकाराचा असून लोकप्रतिनिधीच्या संकल्पनेतून   उभारलेला हा महाराष्ट्रातील हा पहिला 'भव्य राष्ट्रध्वज' मानला जात आहे.त्यामुळे देशाचा अभिमान आणि स्वाभिमान असणारा तिरंगी राष्ट्रध्वज आता विविध शासकीय कार्यालया सारख्या पाटण तालुक्यातील  'महाराष्ट्र दौलत' लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक स्थळावरही सदैव फडकणार आहे.

         अशा या भव्य आणि दिव्य  ध्वजस्तंभ आणि राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा  महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते आणि गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री ना.देसाई यांच्या ५५ व्या वाढदिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक १७ रोजी दुपारी 11.30  वाजता संपन्न होणार आहे.

Sunday, 14 November 2021

पाटण येथील प्रशासकीय इमारतीची निविदा कार्यवाही सुरु,लवकरच प्रत्यक्ष कामाला होणारा सुरुवात. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या वास्तुमुळे पाटणच्या वैभवात पडणार भर.


दौलतनगर दि.१4(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण येथे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली आणण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सुमारे 14 कोटी 87 लक्ष रुपयांची भरघोस अशी तरतुद सन 2020-21 च्या राज्य शासनाचे अर्थसंकल्पामध्ये करुन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मंजूर होण्यासाठी पाटण तालुकावाशियांची बहुप्रतिक्षित असलेली मागणी मुर्त स्वरुपात आणली आहे. सदर कामांस प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी पारित केला आहे.नुकतीच पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे कामाची निविदा कार्यवाही सुरु झाली असून या कामांस कार्यारंभ आदेश प्राप्त होताच लवकरच या इमारतीचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे कामामुळे पाटणच्या वैभवात भर पडणार आहे.

                 पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुख्‍य बाजारपेठेच्या ठिकाणी  शासकीय कार्यालय हे वेग-वेगळया ठिकाणी असल्याने तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातून आपल्या दैनंदिन कामासाठी आलेल्या नागरिकांना या वेगवेगळया ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात.त्याचा नाहक त्रास हा येथील सर्वसामान्य जनतेला होत असून वेळेत कामं होत नसल्याने नागरीकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याने तालुक्याच्या ठिकाणची असणारी सर्व शासकीय कार्यालये ही एका छताखाली यावी या संकल्पनेतून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांची पाटण येथे प्रशासकीय इमारत मंजूर होण्याकरीता राज्य शासनाकडे सातत्याने मागणी  केली  होती.त्या अनुषंगाने राज्याचे वित्त राज्यमंत्री म्हणून  मार्च 2020 च्या अर्थसंकल्पामध्ये पाटण येथे नव्याने उभारावयाच्या प्रशासकीय इमारतीचे कामाला मंजूरी घेतली.तसेच सदर कामांस प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी पारित केला. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये कोविड 19 च्या संसर्गामुळे राज्य शासनाने कोविड उपाय योजनांवर जास्त भर दिल्याने त्याचा परिणाम विकास कामांवर काही निर्बंध आले.सध्या कोविड 19 चा संसर्ग कमी झाला असल्याने राज्याची आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर येत असून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्राधान्याने पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे कामासाठी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये आवश्यक तेवढया निधीची तरतूद केली. सध्या या प्रशासकीय इमारतीचे कामाची निविदा कार्यवाही सुरु झाली असून या कामांस कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार आहे.नव्याने साकारणाऱ्या या प्रशासकीय इमारतीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून तालुकास्तरीय सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली  येणार आहेत.यामध्ये उपविभागीय कार्यालय,तहसिल कार्यालय,लोक अदालत कार्यालय,सेतू कार्यालय,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय,दुय्यम निबंधक कार्यालय,वनक्षेत्रपाल कार्यालय,तालुका कृषी कार्यालय व ट्रेझरी ऑफीस हि सर्व कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने एकाच ठिकाणी सर्व प्रकारची लोकोपयोगी कामे कमी कालावधीमध्ये होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वेग-वेगळया ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार नसून पैसा व वेळ याची बचत होऊन या प्रशासकीय इमारतीमुळे शासकीय काम-काजही सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.नव्याने साकारणाऱ्या प्रशासकीय इमारत ही सर्वसोयींनुक्त अशी असून शासकीय कामकाज जलदगतीने होण्याच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या इमारतीमधील शासकीय कार्यालयांना पुरविण्यात येणार असल्याने पाटण या तालुक्याच्या ठिकाणी ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून एक भव्य असे विकासाचे दालन या प्रशासकीय इमारतीचे माध्यमातून उभे राहणार असून याचा निश्चितच तालुक्यातील आमजनतेला येणाऱ्या कालावधीत जास्तीत जास्त फायदा होणार आहे.या प्रशासकीय इमारतीचा कार्यारंभ आदेश प्राप्त होताच लवकरच या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम होऊन प्रत्यक्ष इमारत बांधकामास सुरुवात होणार असल्याने पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून तालुकास्तरीय सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली येऊन अत्याधुनिक व सर्वसोयींनुक्त अशा या नवीन प्रशासकीय इमारतीचे वास्तुमुळे पाटणच्या वैभवात भर पडणार आहे.

Saturday, 13 November 2021

गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या 55 वा वाढदिवस साध्यापध्दतीने होणार साजरा. दि.17 नोव्हेंबरला महारक्तदान शिबिरात युवकांनी रक्तदान करावे व वाढदिवसाला पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता वहया व शालेय साहित्य आणण्याचे आवाहन.

 


दौलतनगर दि.१4(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 55 वा वाढदिवस बुधवार दि.17 नोव्हेंबर,2021 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे साध्यापध्दतीने साजरा होणार असल्याची  माहिती नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचेकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली असून वाढदिवसानिमित्त नामदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणाऱ्या हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना वाढदिवसाची भेट देण्याकरीता वहया तसेच शालेय वस्तू आणाव्यात असे आवाहनही  वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

                                  पत्रकांत म्हंटले आहे की,गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 55वा वाढदिवस बुधवार दि.17 नोव्हेंबर,2021 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे साध्या पध्दतीने साजरा होत असून या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर येथे करण्यात आला आहे .सकाळी 09.00 वा.त्यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 11.30 पर्यंत ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी  येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई ( ताईसाहेब ) यांच्या पुतळा, स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची समाधी व पुर्णाकृती  पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन असे धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.त्यानंतर हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन व पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे.शिवदैालत बँकेच्या विस्तारीत कक्षाचे 18 व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर स.11.30 पासून दुपारी 04.30 वाजेपर्यंत नामदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते,हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत.दुपारी 04.30 वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने ‘कार्यकर्ता संवाद मेळावा’ आयोजीत केला आहे. या मेळाव्यास संबोधित करण्याकरीता नामदार शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. दरम्यान गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नियोजन समितीने केले आहे. दरम्यान नामदार शंभूराज देसाई हे या दिवशी दिवसभर शुभेच्छा स्विकारण्यासाठी दौलतनगर ता.पाटण येथे उपस्थित राहणार आहेत,याची हितचिंतकांनी नोंद घ्यावी तसेच शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे,पुष्पगुच्छ व पुष्पहार न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पेन,वहया इ.शालेय साहित्य आणावे असे आवाहनही नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्या वतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.


Thursday, 11 November 2021

सामाजिक बांधिलकी जपत महारक्तदान शिबीरामध्ये युवकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे युवकांना आवाहन. दौलतनगर,ता.पाटण येथे दि. १7 नोव्हेंबर रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन.

  

दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सध्या विविध हॉस्पीटलमध्ये अनेक आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत आहे.परंतु सध्या रक्तपेढीमध्ये कमी प्रमाणांत रक्तसाठा उपलब्ध असल्याने रक्त आवश्यक असलेल्या रुग्णांची  मोठी गैरसोय होत आहे.पुरेशा रक्ताअभावी  रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून दि.१7 नोव्हेंबर,2021 रोजी दौलतनगर,ता.पाटण येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन उत्स्फुर्तपणे रक्तदान करावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले आहे.

            ना.शंभूराज देसाई यांनी पुढे म्हंटले आहे की,महाराष्ट्रासह आपला देश कोविड सारख्या महाभयंकर महामारीला समर्थपणे सामोरे जात असताना कोविड संसर्गामुळे जास्त प्रादुर्भाव झालेले अनेक रुग्ण आज वेग-वेगळया  दवाखान्यांमध्ये औषधोपचार घेत आहेत.तसेच दैनंदिन होणारे रस्ते अपघामध्ये जखमी झालेले रुग्ण असो की वेग-वेगळया आजारांवर औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना सध्या मोठया प्रमाणांवर रक्ताची गरज भासत आहे.परंतु रक्तपेढयांमध्ये रक्ताचा उपलब्ध साठा बघितला तर तो खुपच कमी प्रमाणांत असून रक्ताच्या तुटवडयामुळे अनेक रुग्णांचे रक्ताअभावी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडूनही रक्तदान करण्यासाठी वेळो-वेळी आवाहन केले जात असून या रक्तदान शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काही प्रमाणांत रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यास मदत झाली आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्याचाच एक भाग म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून विविध दवाखान्यांमध्ये औषधोपचार घेत असलेल्या रुग्णांना रक्त पुरवठा करण्यास मदत होण्याचे करीता सामाजिक बांधिलकीच्या हेतूने दि.१7नोव्हेंबर,2021 रोजी दौलतनगर, ता.पाटण येथे श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनिअर व सिनिअर कॉलेज दौलतनगर येथे तालुकास्तरीय महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या महारक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शेवटी केले आहे.

गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून नाबार्ड 27 योजनेअंतर्गत देवघर व माईंगडेवाडी (जिंती) येथील पुलांचे कामांसाठी 05 कोटींचा निधी मंजूर .

 

दौलतनगर दि.११ (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून नाबार्ड 27 योजनेअंतर्गत ग्रामा 87 चिटेघर ते देवघर रस्त्यावर देवघर,ता.पाटण येथे केरा नदीवर पुलाचे बांधकाम व पोहोच रस्ता सुधारणा करण्यासाठी 02 कोटी 50 लक्ष तर माईंगडेवाडी ते हौदाचीवाडी ते सातर ग्रामा 302 वर माईंगडेवाडी (जिंती) येथे मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी 02 कोटी 50 लक्ष असा 05 कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील चाफोली रस्ता ते मौजे देवघर रस्त्यावर केरा नदी असून या नदीवर सध्या पुल नसल्याने या विभागातील ग्रामस्थांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत होती. विशेषत: पावसाळयात केरा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने दळण-वळणाअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान चाफोली रस्ता ते मौजे देवघर रस्त्यावर केरा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम झाल्यास या विभागातील ग्रामस्थांचा दळण-वळणाचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यास मदत होणार असल्याने या विभागातील ग्रामस्थांची सातत्याची असणारी मागणी लक्षात घेऊन चाफोली रस्ता ते मौजे देवघर रस्त्यावर केरा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणे गरजेचे होते.तसेच ढेबेवाडी विभागातील माईंगडेवाडी ते हौदाचीवाडी ते सातर या ग्रामीण मार्गावर माईंगडेवाडी(जिंती) या ठिकाणी पुल नसल्याने या मार्गावरील वाहतूक पावसाळयामध्ये पूर्णपणे बंद होत होती. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या या विभागातील विविध गावांतील ग्रामस्थांची दळणवळणाची मोठी गैरसोय होत असल्याने गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील ग्रामा 87 चिटेघर ते देवघर रस्त्यावर देवघर,ता.पाटण येथे केरा नदीवर पुलाचे बांधकाम व पोहोच रस्ता सुधारणा करणे व माईंगडेवाडी ते हौदाचीवाडी ते सातर ग्रामा 302 वर माईंगडेवाडी (जिंती) येथे मोठया पुलाचे बांधकाम करणे ही दोन कामे सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये शासनाचे नाबार्ड 27 योजनेअंतर्गत मंजूर होणेसाठी प्रस्तावित करण्यात आली होती.त्यानुसार ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये नाबार्ड 27 योजनेअंतर्गत ग्रामा 87 चिटेघर ते देवघर रस्त्यावर देवघर,ता.पाटण येथे केरा नदीवर पुलाचे बांधकाम व पोहोच रस्ता सुधारणा करण्यासाठी 02 कोटी 50 लक्ष तर माईंगडेवाडी ते हौदाचीवाडी ते सातर ग्रामा 302 वर माईंगडेवाडी (जिंती) येथे मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी 02 कोटी 50 लक्ष असा एकूण 05 कोटींचा निधी मंजूर झाला असून देवघर व माईंगडेवाडी (जिंती) येथील मंजूर पुलाच्या तातडीने निविदा प्रक्रिया करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत.या मंजूर पूलांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तातडीने हि कामे हाती घेण्यात येणार असून या पूलांच्या कामांमुळे विशेषत: पावसाळयात बंद होणारी वाहतूक यापुढे कायम सुरु राहण्यास मदत होणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.