Sunday 14 November 2021

पाटण येथील प्रशासकीय इमारतीची निविदा कार्यवाही सुरु,लवकरच प्रत्यक्ष कामाला होणारा सुरुवात. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या वास्तुमुळे पाटणच्या वैभवात पडणार भर.


दौलतनगर दि.4(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण येथे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली आणण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सुमारे 14 कोटी 87 लक्ष रुपयांची भरघोस अशी तरतुद सन 2020-21 च्या राज्य शासनाचे अर्थसंकल्पामध्ये करुन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मंजूर होण्यासाठी पाटण तालुकावाशियांची बहुप्रतिक्षित असलेली मागणी मुर्त स्वरुपात आणली आहे. सदर कामांस प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी पारित केला आहे.नुकतीच पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे कामाची निविदा कार्यवाही सुरु झाली असून या कामांस कार्यारंभ आदेश प्राप्त होताच लवकरच या इमारतीचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे कामामुळे पाटणच्या वैभवात भर पडणार आहे.

                 पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुख्‍य बाजारपेठेच्या ठिकाणी  शासकीय कार्यालय हे वेग-वेगळया ठिकाणी असल्याने तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातून आपल्या दैनंदिन कामासाठी आलेल्या नागरिकांना या वेगवेगळया ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात.त्याचा नाहक त्रास हा येथील सर्वसामान्य जनतेला होत असून वेळेत कामं होत नसल्याने नागरीकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याने तालुक्याच्या ठिकाणची असणारी सर्व शासकीय कार्यालये ही एका छताखाली यावी या संकल्पनेतून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांची पाटण येथे प्रशासकीय इमारत मंजूर होण्याकरीता राज्य शासनाकडे सातत्याने मागणी  केली  होती.त्या अनुषंगाने राज्याचे वित्त राज्यमंत्री म्हणून  मार्च 2020 च्या अर्थसंकल्पामध्ये पाटण येथे नव्याने उभारावयाच्या प्रशासकीय इमारतीचे कामाला मंजूरी घेतली.तसेच सदर कामांस प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी पारित केला. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये कोविड 19 च्या संसर्गामुळे राज्य शासनाने कोविड उपाय योजनांवर जास्त भर दिल्याने त्याचा परिणाम विकास कामांवर काही निर्बंध आले.सध्या कोविड 19 चा संसर्ग कमी झाला असल्याने राज्याची आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर येत असून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्राधान्याने पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे कामासाठी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये आवश्यक तेवढया निधीची तरतूद केली. सध्या या प्रशासकीय इमारतीचे कामाची निविदा कार्यवाही सुरु झाली असून या कामांस कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार आहे.नव्याने साकारणाऱ्या या प्रशासकीय इमारतीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून तालुकास्तरीय सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली  येणार आहेत.यामध्ये उपविभागीय कार्यालय,तहसिल कार्यालय,लोक अदालत कार्यालय,सेतू कार्यालय,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय,दुय्यम निबंधक कार्यालय,वनक्षेत्रपाल कार्यालय,तालुका कृषी कार्यालय व ट्रेझरी ऑफीस हि सर्व कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने एकाच ठिकाणी सर्व प्रकारची लोकोपयोगी कामे कमी कालावधीमध्ये होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वेग-वेगळया ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार नसून पैसा व वेळ याची बचत होऊन या प्रशासकीय इमारतीमुळे शासकीय काम-काजही सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.नव्याने साकारणाऱ्या प्रशासकीय इमारत ही सर्वसोयींनुक्त अशी असून शासकीय कामकाज जलदगतीने होण्याच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या इमारतीमधील शासकीय कार्यालयांना पुरविण्यात येणार असल्याने पाटण या तालुक्याच्या ठिकाणी ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून एक भव्य असे विकासाचे दालन या प्रशासकीय इमारतीचे माध्यमातून उभे राहणार असून याचा निश्चितच तालुक्यातील आमजनतेला येणाऱ्या कालावधीत जास्तीत जास्त फायदा होणार आहे.या प्रशासकीय इमारतीचा कार्यारंभ आदेश प्राप्त होताच लवकरच या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम होऊन प्रत्यक्ष इमारत बांधकामास सुरुवात होणार असल्याने पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून तालुकास्तरीय सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली येऊन अत्याधुनिक व सर्वसोयींनुक्त अशा या नवीन प्रशासकीय इमारतीचे वास्तुमुळे पाटणच्या वैभवात भर पडणार आहे.

7 comments:

  1. Very nice
    Fakt aani fakt
    AKC Raj
    SHAMBHURAJ

    ReplyDelete
  2. 🚩🏹💐🙏🏻 साहेब आपले शतशः आभार.पाटण तालुक्यातील जनता आपली सदैव ऋणी राहील यात शंका नाही.🙏🏻💐🏹🚩
    🚩🏹 शुभेच्छुक:- श्री.शंकरराव कुंभार.शिवसेना पाटण शहर प्रमुख.४ थे दुर्ग संमेलन दातेगड, पाटण. सच्चा मावळा पुरस्कृत.व सर्व शिवसेना पदाधिकारी,आजी-माजी शिवसैनिक.🏹🚩

    ReplyDelete
  3. साहेब आपले शतशः आभार.पाटण तालुक्यातील जनता आपली सदैव ऋणी राहील तालुक्याच्या विकासाला खरोखरच आपण या राज्यात वेगळं स्थान निर्माण कराल तुमच्या सारख्या कुटुंब प्रमुखाची गरज आहे साहेब पुढील वाटचालीस
    शुभेच्छा..!
    शुभेच्छुक:विजय शामराव यादव


    ReplyDelete
  4. Very nice नामदार साहेब

    ReplyDelete