Tuesday 16 November 2021

*गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हयातील पहिला भव्य राष्ट्रध्वज पाटण तालुक्यात डौलाने फडकणार महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते लोकार्पण

 


 

दौलतनगर दि.4(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सुमारे शंभर फूट उंचीचा भव्य असा राष्ट्रध्वज आता पाटण तालुक्यातील दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत,लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक परिसरात फडकणार असून या राष्ट्रध्वजाचा स्तंभ 100 फुट उंचीचा असून  राष्ट्रध्वज तब्बल ३०फूट x २० फूट एवढ्या  आकाराचा आहे. लोकप्रतिनिधीच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात उभारलेला हा पहिलाच 'भव्य राष्ट्रध्वज'आहे. त्यामुळे देशाचा अभिमान आणि स्वाभिमान असणारा तिरंगा राष्ट्रध्वज आता पाटण तालुक्यातील 'महाराष्ट्र दौलत' लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक स्थळावरही डौलाने फडकणार आहे.

            लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी अवघ्या महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आपल्या विविध मंत्रिपदाचा काळात त्यांनी राज्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. त्याच लोकनेत्यांचे नातू म्हणजे महाराष्ट्राचे गृह आणि अर्थ राज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण तालुक्यातील कारखाना स्थळावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कोट्यवधी रुपये खर्चातून भव्य असे  अत्याधुनिक 'महाराष्ट्र दौलत'शताब्दी स्मारक उभे केले आहे.या स्मारकामध्ये अत्याधुनिक सुविधांसह विविध शैक्षणिक,सामाजिक दालने उभी केली असल्याने  हा परिसर एक नवे पर्यटन स्थळ म्हणून ही उदयास येत आहे.

           तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक परिसर पाटण तालुक्याच्या वैभवात भर टाकत असतानाच  मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून आता  स्मारक परिसरात आपल्या भारत देशाची आण, बाण आणि शान असणारा  भव्य असा राष्ट्रध्वज ही फडकत राहणार आहे.सुमारे शंभर फूट उंचीचा भव्य असा राष्ट्रध्वज आता'महाराष्ट्र दौलत' लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक परिसरात फडकणार आहे.  हा  राष्ट्रध्वज तब्बल ३०*२० फूट एवढ्या  आकाराचा असून लोकप्रतिनिधीच्या संकल्पनेतून   उभारलेला हा महाराष्ट्रातील हा पहिला 'भव्य राष्ट्रध्वज' मानला जात आहे.त्यामुळे देशाचा अभिमान आणि स्वाभिमान असणारा तिरंगी राष्ट्रध्वज आता विविध शासकीय कार्यालया सारख्या पाटण तालुक्यातील  'महाराष्ट्र दौलत' लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक स्थळावरही सदैव फडकणार आहे.

         अशा या भव्य आणि दिव्य  ध्वजस्तंभ आणि राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा  महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते आणि गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री ना.देसाई यांच्या ५५ व्या वाढदिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक १७ रोजी दुपारी 11.30  वाजता संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment