Thursday 11 November 2021

गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून नाबार्ड 27 योजनेअंतर्गत देवघर व माईंगडेवाडी (जिंती) येथील पुलांचे कामांसाठी 05 कोटींचा निधी मंजूर .

 

दौलतनगर दि. (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून नाबार्ड 27 योजनेअंतर्गत ग्रामा 87 चिटेघर ते देवघर रस्त्यावर देवघर,ता.पाटण येथे केरा नदीवर पुलाचे बांधकाम व पोहोच रस्ता सुधारणा करण्यासाठी 02 कोटी 50 लक्ष तर माईंगडेवाडी ते हौदाचीवाडी ते सातर ग्रामा 302 वर माईंगडेवाडी (जिंती) येथे मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी 02 कोटी 50 लक्ष असा 05 कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील चाफोली रस्ता ते मौजे देवघर रस्त्यावर केरा नदी असून या नदीवर सध्या पुल नसल्याने या विभागातील ग्रामस्थांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत होती. विशेषत: पावसाळयात केरा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने दळण-वळणाअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान चाफोली रस्ता ते मौजे देवघर रस्त्यावर केरा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम झाल्यास या विभागातील ग्रामस्थांचा दळण-वळणाचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यास मदत होणार असल्याने या विभागातील ग्रामस्थांची सातत्याची असणारी मागणी लक्षात घेऊन चाफोली रस्ता ते मौजे देवघर रस्त्यावर केरा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणे गरजेचे होते.तसेच ढेबेवाडी विभागातील माईंगडेवाडी ते हौदाचीवाडी ते सातर या ग्रामीण मार्गावर माईंगडेवाडी(जिंती) या ठिकाणी पुल नसल्याने या मार्गावरील वाहतूक पावसाळयामध्ये पूर्णपणे बंद होत होती. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या या विभागातील विविध गावांतील ग्रामस्थांची दळणवळणाची मोठी गैरसोय होत असल्याने गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील ग्रामा 87 चिटेघर ते देवघर रस्त्यावर देवघर,ता.पाटण येथे केरा नदीवर पुलाचे बांधकाम व पोहोच रस्ता सुधारणा करणे व माईंगडेवाडी ते हौदाचीवाडी ते सातर ग्रामा 302 वर माईंगडेवाडी (जिंती) येथे मोठया पुलाचे बांधकाम करणे ही दोन कामे सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये शासनाचे नाबार्ड 27 योजनेअंतर्गत मंजूर होणेसाठी प्रस्तावित करण्यात आली होती.त्यानुसार ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये नाबार्ड 27 योजनेअंतर्गत ग्रामा 87 चिटेघर ते देवघर रस्त्यावर देवघर,ता.पाटण येथे केरा नदीवर पुलाचे बांधकाम व पोहोच रस्ता सुधारणा करण्यासाठी 02 कोटी 50 लक्ष तर माईंगडेवाडी ते हौदाचीवाडी ते सातर ग्रामा 302 वर माईंगडेवाडी (जिंती) येथे मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी 02 कोटी 50 लक्ष असा एकूण 05 कोटींचा निधी मंजूर झाला असून देवघर व माईंगडेवाडी (जिंती) येथील मंजूर पुलाच्या तातडीने निविदा प्रक्रिया करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत.या मंजूर पूलांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तातडीने हि कामे हाती घेण्यात येणार असून या पूलांच्या कामांमुळे विशेषत: पावसाळयात बंद होणारी वाहतूक यापुढे कायम सुरु राहण्यास मदत होणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

 

No comments:

Post a Comment