Tuesday, 27 December 2022

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शनिवार दि.31 रोजी पाटण विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन.

 

 

दौलतनगर दि.27: पाटण विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिदे , राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत पाटण विधानसभा मतदर संघातील जनतेने बाळासाहेबांच्या शिवसेनेनेला ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान करुन घवघवीत यश संपादन करुन दिले. या निवडणूकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा बाळासाहेबांची शिवसेना पाटण व शिवशाही सरपंच संघ पाटण यांचेवतीने जाहिर सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथे आयोजित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 90 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम 11 डिसेंवर 2022 रोजी पार पडला असून या ग्रामपंचातींचा निकाल मंगळवार दि. 20 डिसेंबर 2022 रोजी जाहिर करण्यात आला. निवडणूक लागलेल्या 90 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध झालेल्या एकूण 16 ग्रामपंचायतीपैकी 13 ग्रामपंचायतीं पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे नेतृव माणणाऱ्या असून उर्वरित 74 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीमध्ये 51 ग्रामपंचायतींमध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेनेलचा भगवा फडकवला असून हा  मोठा विजय संपादित केला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेनेलचे बिनविरोध व निवडूण आलेल्या 64 ग्रामपंचायतीचे सरपंच व नवनिर्वाचित सदस्य तसेच उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये निवडूण आलेल्या सदस्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पाटण व शिवशाही सरपंच संघ पाटण यांचेवतीने जाहिर सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथे आयोजित केला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे जाहिर सत्कार समारंभास नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

Saturday, 24 December 2022

माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी 11 कोटींचा निधी मंजूर. पाटण येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकामासाठी पुरवणी अर्थसंकल्पात 05 कोटी रुपयांची तरतूद

 

 

दौलतनगर दि.22: पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती.सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पाटण येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता 05 कोटी रुपयांची तरतूदही  राज्याचे पुरवणी अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

               प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे मोठे प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे या रस्त्यांवरुन  प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रामा 148 कि.मी.0/00 ते 9/00 भाग डिचोली ते कामरगाव ची सुधारणा करणे 04 कोटी 50 लाख,प्रजिमा 53 ते चोपडी बेलवडे खु. सुळेवाडी सोनवडे हुंबरवाडी नाटोशी धावडे रस्ता प्रजिमा 124 कि.मी. 0/00 ते 19/00 भाग कि.मी.2/00 ते 2/900, 3/00 ते 4/00 मधील रस्त्याची भूसंपादनासह सुधारणा करणे 04 कोटी 50 लाख, प्रजिमा 61 साकुर्डी बेलदरे तळबीड शहापूर रस्ता भाग बेलदरे ते तळबीड रस्ता किमी 1/500 ते 5/00 ची सुधारणा करणे ता.कराड 02 कोटी या कामांना सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी एकूण 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.तसेच पाटण येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता 05 कोटी रुपयांची तरतूदही  राज्याचे पुरवणी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या असून निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकां देण्यात आली आहे.

केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) मधून नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यासाठी 25 कोटींचा निधी मंजूर. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीनजी गडकरी यांचेकडील पाठपुराव्याला यश.

 

 

दौलतनगर दि.24: पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन सन 2022-23 चे आर्थिक वर्षात केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) मधून 25  कोटी रुपायांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती  महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

           पत्रकात पुढे म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी रस्ता म्हणून नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता या रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळणेसाठी ना. शंभूराज देसाईंनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता 148 क्रमांकाचा राज्य मार्गाचा दर्जा देण्यात आला. सध्या हेळवाक मोरगिरी ते गारवडे या रस्त्यावर मोठया प्रमाणांत वाहनांची ये-जा सुरु असते.माहे जुलै 2021 महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या राज्य मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली होती या मार्गावरुन प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या राज्य मार्गावरील हेळवाक ते मोरगिरी ते गारवडे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) योजनेतून भरीव निधी मंजूर करावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे केली  होती. या मागणीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या राज्य मार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे कोळे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता कि.मी.32/500 ते 62/500 ची सुधारणा करण्यासाठी भारत सरकारचे केंद्रीय मार्ग निधी(सी.आर.एफ.) मधून 25 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी  यांनी मंजूर केला असून कुसवडे ते तालुका हद्दीपर्यंतच्या 30 कि.मी.लांबीमध्ये संपूर्ण रस्ता साडेसात मीटरने  डांबरीकरणासह पूर्ण करण्यात येणार असून या कामामध्ये आवश्यक तेथे 10 छोटे पूल व 04 मोठे पूल बांधले जाणार आहेत.तसेच या राज्य मार्गावरील लेंढोरी,काढोली,किल्ले मोरगिरी, मान्याचीवाडी, शिंदेवाडी व सुळेवाडी या गावांचे हद्दीतील रस्त्याच्या दुतर्फा आर.सी.सी.गटराचे बांधकाम  केले जाणार आहे.त्याचबरोबर छेद रस्त्यांची कामेही करण्यात येणार असल्याने या राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचेकडे या राज्य मार्गाचे मजबुती करण्यासाठी  केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.)मधून निधी मंजूर होणेकरीता सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे सांगत लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात येऊन तातडीने राज्य मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे,अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या असून या रस्त्याच्या कामांस आवश्यक असणारा निधी तातडीने मंजुर करुन दिलेबद्दल ना. शंभूराज देसाई यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे विशेष आभार मानले असल्याचेही त्यांनी शेवटी  पत्रकात म्हंटले आहे. 

 

Monday, 12 December 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून सन 2022-23 चे गळीत हंगामासाठी 2800 रु. ऊस दर चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

 


 दौलतनगर दि.12:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2022-23 चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे चालू केला असून गळीतास येणाऱ्या ऊसाला 2800 रु.प्र.मे.टन ऊस दर जाहिर करण्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना ऊसबिलापोटी पहिला हप्ता प्र. मे.टन 2500 रुपयांप्रमाणे रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन पहिल्या टप्प्यातील विस्तारवाढ चालू गळीत हंगामापुर्वी केली असून, दुस-या टप्प्याचे काम ही चालू गळीत हंगाम समाप्त झाल्यानंतर करणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन सन 2022-23 गळीत हंगाममध्ये कारखान्यास गळीतास आलेल्या ऊसाला 2800 रु.प्र.मे.टन दर जाहिर करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत कारखान्यास गळीतास आलेल्या ऊसापोटी 2500 रु.प्र.मे.टन प्रमाणे पहिल्या हपत्याची होणारी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे सांगत पुढे म्हणाले की, सध्या सर्वत्र ऊस गळीत हंगाम सुरु असून आपले कारखान्याचे पहिल्या टप्प्यातील गाळप क्षमता वाढविण्याचे काम पुर्णत्वाकडे गेल्यानंतर गळीत हंगाम सुरु केला आहे. आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये आज पर्यंत 44 हजार 110 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 44 हजार 750 क्विंटल साखर उत्पादन केले आहे.जिल्हयासह राज्यात सर्वच कारखान्यांकडे  ऊस तोडणी मजूरांची कमतरता असून देखील  राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने सन 2022-23 च्या गळीत हंगामा यशस्वीपणे चालवला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास गळीतास घालून सन 2022-23 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Friday, 9 December 2022

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पाटणवासीयांनी दिलेले हे यश जनसेवेसाठी ऊर्जा देणारे. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई दौलतनगर,ता.पाटण येथे बिनविरोध ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

 

दौलतनगर दि.09:- पाटण विधानसभा मतदारसंघातील ९० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीपैकी १६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय तेथील ग्रामस्थांनी घेतला. त्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा फडकला आहे. तसेच इतर ५ ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मिळून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तब्बल १६१ सदस्य आणि १८ सरपंच बिनविरोध निवडून आले. सुजाण नागरिक नेहमीच विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देतात. पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांकडे पाहून पाटणवासीयांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला बळ देण्याचे ठरवले आहे याचा आनंद आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पाटणवासीयांनी दिलेले हे यश जनसेवेसाठी ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

              दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील  ९० ग्रामपंचायतींपैकी  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानत बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंच व नवनिर्वाचित सदस्य यांचे सत्कार समारंभप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी  या सत्कार समारंभास आमदार श्री. शहाजीबापू पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते मा. यशराज(दादा) देसाई, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख मा. जयवंतराव शेलार,बबनराव शिंदे,विजय पवार,प्रदिप पाटील,राजाराम पाटील,भरत साळूंखे,विजय पवार,विजय शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, वैद्यकीय सहायता मदत निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

               यावेळी बोलताना ना.देसाई पुढे म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये मोठया संख्येने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडूण आले.बिनविरोध झालेल्या 16 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतीमध्ये आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाची सत्ता आली.ग्रामस्थांनी विकास कामांकडे बघूनच ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये आपला निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्वाखालील सरकारमध्ये सातारा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना सातारा जिल्हयासह आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी नेहमीच झुकते माप दिले आहे. सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांत रस्ते, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत याबाबत नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक संपन्न झाली. या बैठकीत डोंगरी तालुक्यांतील नागरी सुविधांचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील विकासकामांसाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी १०० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे सांगते ते पुढे म्हणाले की कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर  व मंत्रालयीन कामकाजामुळे मतदारसंघामध्ये वेळ देण्यासाठी मर्यादा पडत आहेत. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना गावच्या विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द हा माझ्यावतीने दिला गेला आहे. गावांच्या विकासासाठीचे प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल, असा विश्वास ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

चौकट:- सर्वांगिण विकासासाठी ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाची मतदारसंघाला गरज-आमदार शहाजीबापू पाटील

            मी स्वत: खुप नशिबवान आहे कारण मला ना.शंभूराज देसाई यांचे बरोबर काम करण्याची संधी मिळाली. पाटण तालुक्याला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांचा वारसा असून पाटण तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर नेण्याचे काम लोकनेते यांनी केले.त्यांचा वारसा आज ना.शंभूराज देसाई हे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व पालकमंत्री म्हणून समर्थपणे पार पाडत असल्याचा अभिमान वाटतो. तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाची मतदार संघाला गरज असून त्यांच्या पाठीशी  तुम्ही ठामपणे उभे राहून पाठबळ देण्याचे आवाहन यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपस्थितांना केले.