Monday, 17 April 2023

दि.१९ रोजी पाटण तालुक्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रा निघणार. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार गौरव यात्रेचा शुभारंभ.

                                                     


दौलतनगर दि.17:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवन चरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पाटण तालुक्यात काढण्यात येणार आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरव यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथे होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकाव्दारे दिली आहे.

सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२3 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०२3 पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना बुधवार दि.१9 एप्रिल रोजी सकाळी ०8.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या विविध संस्थांचे वतीने तसेच जिल्हा व तालुकास्तरीय सर्व शासकीय विभागांकडून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधित तसेच पाटण तालुक्यामध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य शासनाच्या विविध योजनांमधून साकारलेल्या विविध विकास कामांचे,राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले  चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या चित्ररथांचे व गौरव यात्रेचा प्रारंभ हा कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात येणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरव यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथे होणार आहे. दरम्यान  चित्ररथ व गौरव यात्रा चोपदारवाडी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, पापर्डे, मारुलहवेली फाटा,गारवडे बहुले फाटा, सोनाईचीवाडी, नावडी वसाहत,निसरे,निसरे विहिर,निसरे फाटा, आबदारवाडी,गिरेवाडी, मल्हारपेठ, नारळवाडी,येराडवाडी,नवसरी, नाडे नवारस्ता, आडूळ गावठाण, आडूळपेठ, सुभाषनगर, लुगडेवाडी सोनगाव,येरफळे,म्हावशी स्टॉप ते पाटण पर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार असून चाफोली रोड, पाटण येथील प्रांगणामध्ये या चित्ररथ व गौरव यात्रेची सांगता होणार आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवनचरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरवयात्रेचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व या चित्ररथ गौरवयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.

चौकट:लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ गौरव यात्रेमध्ये 32 चित्ररथांचा सहभाग, चित्ररथांचे चार दिवस प्रदर्शन.

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित चित्ररथ गौरव यात्रेमध्ये यंदाच्या वर्षी जिल्हा व तालुकास्तरीय विविध शासकीय विभागांच्या 32 चित्ररथांचा सहभाग राहणार आहे.तसेच दौलतनगर येथे हे चित्ररथ प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.या दरम्यान राज्य शासनाकडून सध्या सुरु असलेल्या शासकीय विभागांच्या योजनांची जत्रा या योजनेअंतर्गत शासकीय विभागांचे अधिकारी हे त्या त्या विभागाशी संबंधित योजनांची माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.


Monday, 10 April 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ. चेअरमन मा.यशराज देसाई यांचे शुभहस्ते वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण.



दौलतनगर दि.10: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगामात कारखान्याच्या सर्वच विभागांनी चांगली कामगिरी बजावली असून गळीत हंगामात गाळपाचा टप्पा पुर्ण करण्यासाठी कारखान्याशी निगडीत प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे कारखान्याने चांगले गाळप केले आहे. येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली असून आज या वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण करत असल्याची माहिती चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी यावेळी  दिली.

             चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊस तोडणी वाहतूक करारपत्र ऊस वाहतूक कंत्राटदार यांचेकडे सुपुर्द केली. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी  कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,माजी चेअरमन अशोकराव पाटील, कार्यकारी संचालक सुहास देसाई,चिफ अकौंटंट विनायक देसाई, शेती अधिकारी वैभव नलवडे यांचेसह अधिकारी व कर्मचारी तसेच तोडणी वाहतूक संस्थेचे चेअरमन राजाराम जाधव,तोडणी वाहतूक कंत्राटदार श्री.प्रकाश जाधव,पंडीत राठोड,संजय पवार,सुभाष गव्हाणे,जय पाटील हे उपस्थित होते.

                यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई पुढे म्हणाले की, कारखान्याच्या सन 2023-24 या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप पुर्ण करण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम  कारखाना व्यवस्थापनाने सुरु केली आहे. आपले कारखान्याचे नुकतेच पहिल्या टप्प्यातील विस्तारवाढीचे काम पुर्णत्वास गेले आहे. त्यामुळे संस्थेसहित सभासद शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. यापुढील काळात ही अनेक तांत्रिक आणि आधुनिक बदल करून त्याचा जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या गळीत हंगामामध्ये आपल्याला होईल. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब,स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्यामध्ये काटकसरीचे धोरण राबवित ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून सभासदांच्या प्रगतीसाठी कारखाना व्यवस्थापनाकडून नेहमीच प्रामाणिक प्रयत्न सुरु असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हंटले आहे की,येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याकरीता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपल्या राहिलेल्या ऊसाची नोंद करण्याकरीता कारखान्याचे संबंधित शेती गट ऑफीसशी संपर्क साधावा व आपण पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करावे आवाहनही त्यांनी शेवटी पत्रकांत केले आहे. 

Saturday, 8 April 2023

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त २० एप्रिलपासून दौलतनगरला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. दि.१९ रोजी पाटण तालुक्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्याची चित्ररथ व गौरवयात्रा निघणार.


दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळा वरील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये चौदाव्या वर्षी भव्य अशा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन गुरुवार दि.२० एप्रिल ते रविवार दि. २३ एप्रिल,२०२3 पर्यंत करण्यात आले आहे. तत्पुर्वी बुधवार दि.१9 एप्रिल,२०२3 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवनचरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पाटण तालुक्यात काढण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकाव्दारे दिली आहे.

सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२3 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०२3 पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना बुधवार दि.१9 एप्रिल रोजी सकाळी ०8.०० वा.लोकनेते बाळासाहेब देसाई संहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या विविध संस्थांचे तसेच जिल्हा व तालुकास्तरीय शासकीय विभागांच्यावतीने लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधित चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले असून या चित्ररथाचे व गौरव यात्रेचा प्रारंभ हा कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात येणार असून हा चित्ररथ व गौरवयात्रा चोपदारवाडी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, पापर्डे, मारुलहवेली फाटा, सोनाईचीवाडी, नावडी, निसरे फाटा, मल्हारपेठ,  नवारस्ता, आडूळपेठ, आडूळ गावठाण,येरफळे,पाटणपर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार असून पाटण येथे या चित्ररथ व गौरव यात्रेची सांगता होणार आहे.गुरुवार दि.२० एप्रिल रोजी पारायण सोहळयाचा शुभारंभ व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन ह.भ.प. जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते व राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रजल्वन करुन करण्यात येणार आहे.या पारायण सोहळयात गुरुवार दि. २० एप्रिल २०२3 रोजी ह.भ.प.  केदार महाराज,अपसिंगे यांचे प्रवचन, ह.भ.प. अशोक महाराज जाधव पुणे यांचे किर्तन,शुक्रवार दि. २१ एप्रिल, २०२3 रोजी ह.भ.प. पुज्य स्वामी आत्मदेवानंद सरस्वती आचार्य,चिन्मय आश्रम कोल्हापूर यांचे प्रवचन तर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम,ज्ञानेश्वरी व गाथा कंठस्थ अध्यापक वारकरी शिक्षण संस्था,आळंदी यांचे किर्तन आणि शनिवार दि.२२ एप्रिल, २०२3 रोजी ह.भ.प विलास पाटील हुपरी हातकणंगले यांचे प्रवचन तर ह.भ.प. अमोल महाराज घुगे,नागपूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त रविवार दि. २३ एप्रिल २०२3 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा.नामदार श्री. शंभूराज देसाई व सौ.स्मितादेवी देसाई, लोकनेते बाळासहोब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. विजय महाराज रामिष्टेवाडी यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख व राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचे हे चौदावे वर्ष असून या पारायण सोहळयाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील किर्तनकार,प्रवचनकारांना तालुकास्तरीय व्यासपीठ निर्माण झाले आहे.या पारायण सोहळयामध्ये सहभागी होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी वाचकांनी आपल्या नावाची नोंद ही कारखान्याचे मुख्य कार्यालय,शेती ऑफीस विभागीय कार्यालय,गट ऑफीस तसेच शिवदौलत सह.बँक शाखा मल्हारेपठ, ढेबेवाडी, तारळे, दौलतनगर, पाटण व मलकापूर या शाखांचे ठिकाणी करावी.तसेच  तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा व चित्ररथ व गौरवयात्रेचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे. 

Tuesday, 4 April 2023

शेतकऱ्यांच्या हितासाठी पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढणार -ना.शंभूराज देसाई. दौलतनगर ता.पाटण येथे पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न.

 

दौलतनगर 04.:- कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतक्यांची एक मध्यवर्ती संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती मालाची  खरेदी विक्री होत असते. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासणे हा मुख्य हेतू पाहिजे परंतु पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी येथून राजकीय फायदा होण्यासाठी यंत्रणेचा वापर केला जात आहे.गेली अनेक वर्षे सत्ता असूनही  संस्थेची कोणतीही प्रगती नाही ना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला बाजार पेठ उपलब्ध करुन देता आली  नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्याची ससेहोलपट होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी  पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

            पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित मतदार,पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),चि.जयराज देसाई, माजी चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,भरत साळूंखे,बबनराव शिंदे,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

            यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात आज मेळावा घेण्याची वेळ का आली याचा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील इतर बाजार समितीच्या कारभार बघितला तर पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजनेची अंमलबजावणी  करण्यात अपयश आले आहे.मराठवाडयातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शासना मार्फत असणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली बघायला मिळते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी  निवाऱ्याच्या सुविधेसह त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीची चांगली व्यवस्था पहायला मिळते.परंतु पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला साधी बाजारपेठ उपलब्ध करुन देता आली नाही.या शेतकऱ्याच्या संस्थेतून केवळ राजकीय फायदाच घेण्यासाठी यंत्रणेचा वापर केला आहे.बाजार समितीच्‍या निवडणुकीमध्ये आपण केवळ विरोधासाठी विरोध म्हणून नाही तर शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेण्यासाठी तसेच राज्यातील शिवसेना भाजपा युतीच्या सरकारच्या माध्यमातून शासनाच्या असणाऱ्या  विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सोसायटीसह ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार करत सर्वांचा सन्मान केला आहे. आता निवडूण आलेल्या सर्व पदाधिकारी यांची जबाबदारी वाढली  आहे. कारण हि निवडणूक दिसते तेवढी सोपी नाही. सध्या सर्व गावांना आपण भरघोस निधी देण्याचा प्रयत्न केला असून गावा गावातील कार्यकर्त्यांनी मागेल ते काम देण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच यापुढेही विकास कामांना निधी कमी पडणार नाही.त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन जबाबदारी  घेऊन या बाजार समिती निवडणूकीत जिंकायचीच या हेतूने निवडणूकीच्या रिंगणात आता उतरुया असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.कार्य्रमाचे स्वागत व प्रास्तावित विजय पवार यांनी केले तर आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले. मेळाव्यास सोसायटी,ग्रामपंचायत व व्यापारी मतदारसंघातील मतदार बहुसंख्येने उपस्थिती होते.

Friday, 31 March 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभुत सुविधांचे पुनर्बांधणीसाठी झाली भरीव तरतुद.

 


दौलतनगर 29 : पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात असलेल्या अनेक गावांतील पोहोच रस्ते,अंतर्गत रस्ते यांची अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत दुरावस्था झाली होती. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या विकास कामांचे पुनर्बांधणीसाठी तातडीने भरीव निधीची गरज असल्याने राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई  यांनी  राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे शिफारस करत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात असलेल्या गावांतील पायाभूत सुविधांचे पुनर्बांधणीसाठी भरीव निधीची मागणी केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 241 गावांतील विविध विकास कामांना 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, माहे जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या डोंगरी व दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने  पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील पायाभूत सुविधांचे पुनर्बांधणीसाठी भरीव निधी मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री  ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील 241 पायाभूत सुविधांचे विकास कामांना 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या पायाभूत सुविधांचे कामांमध्ये  जळकेवाडी कुशी गावठाण अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,भोकरवाडी सावरघर अंतर्गत जोतिबा मंदिर रस्ता सुधारणा 10 लाख,बामणेवाडी भांबे जांभे पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख,गोरेवाडी मुरुड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,आंबळे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,वरची केळेवाडी  कडवे  अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, बेंदवाडी,माळवस्ती व सवारवाडी कडवे पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,काळकुटवाडी आंबळे  अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,मस्करवाडी (काळगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,धामणी सोसायटी ते चर्मकारवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,निगडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,कुठरे अंतर्गत बबनराव पाटील यांचे घराकडील रस्ता सुधारणा 25 लाख,तारळे अंतर्गत रस्ता सुधारणा 25 लाख,घाटेवाडी मालोशी  सालाईदेवी  रस्ता सुधारणा 25 लाख,वाझोली  जि.प.शाळा ते मोरेवस्ती नं.2 रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,गुढेकरवाडी खळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चव्हाणवाडी चिखलेवाडी कुंभारगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,मानेगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,शिद्रुकवाडी काढणे ते घोरपडेवस्ती खडीकरण डांबरीकरण 20 लाख,खळे मातंगवस्ती ते डुबलवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,करपेवाडी ते साईबाबा मंदिर मानेगाव रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,काढणे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,तुपेवाडी काढणे घारेवस्ती रस्ता  सुधारणा 15 लाख,रासाटी कुंभारवस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 15 लाख,बोपोली अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,किसरुळे शिवंदेश्वर बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,दवंडेवस्ती बोपोली अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,केळोली (वरची) अंतर्गत  रस्ता सुधारणा 15 लाख,चव्हाणवाडी नाणेगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,चाफळ श्रीराम मंदिर ते ग्रामपंचायत रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,नाणेगाव बुद्रुक पुनर्वसन माजगाव गावठाण अंतर्गत रस्ता सुधारणा 25 लाख,माजगाव एस.टी.स्टँड ते ग्रामपंचायत रस्ता सुधारणा 20 लाख,धायटी कांबळेवस्ती  रस्ता सुधारणा 15 लाख,उधवणे पाटील आवाड ते शिर्के आवाड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,कारळे नवाळवाडी ते पाटीलआवाड रस्ता 400 मी.सुधारणा 20 लाख,पाणेरी मूस्लिमवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,पेठशिवापूर मागची वस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,वरंडेवाडी (आंबेघर तर्फ मरळी) रस्ता सुधारणा  20 लाख,आटोली भाकरमळी ते वाघजाई मंदिर रस्ता सुधारणा 40 लाख,वाडीकोतावडे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,कदमवाडी नाटोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,नाटोशी येथे निकमवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,कोकीसरे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,कळकेवाडी कुसरुंड अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,तळीये जानाई मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,नावडी रस्ता क्र.1 गोसावी वाडा ते जामदारवाडा पाण्याची टाकी रस्ता सुधारणा 20 लाख,सोनाईचीवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,नवसरी वरची जि.प.शाळाकडील अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,नाडे काटेवाडी  नवारस्ता  रस्ता सुधारणा 20 लाख,पिंपळगाव करवरवाडी अंतर्गत रस्ता डोंगरोबा मंदिर ते साईबाबा मंदिर पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता सुधारणा 15 लाख,पिंपळगाव कवरवाडी येथे चंद्रकांत कवर यांचे घरापासून स्मशानभूमी डोंगरोबा मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,नेरळे जानाई मंदिर ते नदिपर्यंतचा रस्ता सुधारणा 25 लाख,शिंदेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,गव्हाणवाडी निनाईवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चोपदारवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,आसवलेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,मरड माकणे शाळेपर्यंत रस्ता सुधारणा 20 लाख,बर्गेवाडी धनगरवाडा खिवशी अंतर्गत 300 मीटर रस्ता सुधारणा 15 लाख,धुईलवाडी गावडेवाडी मारुती सपकाळ यांचे घर ते नानुमळी घर यांचे घरापर्यंतचा रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,टोळेवाडी बाळू निकम यांचे घर ते भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,दिवशी खुर्द वाघघळ ते बसवा धारेश्वर दिवशी मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,पिंपळोशी फाटा ते बौध्दवस्ती कवडेवाडी रस्ता 400 मी. खडीकरण डांबरीकरण 20 लाख,गुढे अंतर्गत रस्ता सुधारणा 30 लाख,उत्तर तांबवे अंतर्गत रस्ता सुधारणा 30 लाख,भोळेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,केसे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,तांबवे मातंगवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,आबईचीवाडी बेघरवस्ती ते पाण्याची टाकी रस्ता सुधारणा 20 लाख,पाडळी केसे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,जांभेकरवाडी(मरळोशी) धनगरवाडा पोहोच रस्ता सुधारणा 30 लाख,जन्नेवाडी घोट श्री जानाई मंदिर ते स्मशानभूमी व रस्ता सुधारणा 20 लाख,पाडेकरवाडी मालोशी मुख्य रस्ता ते वाघजाई देवी मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,भुडकेवाडी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,नुने स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा 15 लाख,बागलेवाडी सावरघर मुख्य रस्ता ते मळीवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,आवर्डे ते धनगरवाडी रस्ता सुधारणा 15 लाख,भुडकेवाडी खालची रस्ता सुधारणा 15 लाख,जगदाळवाडी कडवे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,महाडीकवाडी नुने पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,काळगाव मुस्लीमवस्ती दफनभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,खळे ते कवडेवाडी रस्ता सुधारणा 20 लाख,बोपोली अंबाखेळती मंदिर रस्ता 01 किमी सुधारणा 20 लाख,शेळकेवस्ती ते बाजे मारुल तर्फ पाटण खडीकरण डांबरीकरण 20 लाख,नाव ते मळे कोळणे रस्ता सुधारणा 40 लाख,खराडवाडी  भोसलाई मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,ऊरुल ते माजगाव रस्ता ग्रा.मा. 135  पोहोच मार्गासह सुधारणा 75 लाख,सडानिनाई पोहोच रस्ता ग्रामा 43 सुधारणा 25 लाख,सडावाघापूर माऊली मंदिर रस्ता सुधारणा 40 लाख,चेणगेवाडी सळवे रस्ता सुधारणा 20 लाख,मान्याचीवाडी सळवे रस्ता सुधारणा 20 लाख,वर्पेवाडी सळवे ते उधवणे रस्ता सुधारणा 25 लाख,वर्पेवाडी (सळवे) ते जन्नाईमंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,रुवले स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,उधवणे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,भातडेवाडी जिंती पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख,धनावडेवाडी निगडे पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,मंद्रुळकोळे कदमआवाड पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,मराठवाडी स्मशानभूमी पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख,नहिंबे-चिरंबे स्मशानभूमी रस्ता सुधारणा20 लाख,पानस्करवाडी मल्हारपेठ पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,यमाईचीवाडी मुळगाव पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,बोंद्रेवाडी दिवशी बु रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,गारवडे मागासवर्गीयवस्ती ते भिंगारदेवे वस्ती पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख,पापर्डे बुद्रुक स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,सातारा फाटा ते वन दारे रस्ता सुधारणा 15 लाख,मरड ते जानाई मंदिर रस्ता सुधारणा 30 लाख,बोंद्री वनवासवाडी ते मधलीशाळा रस्ता सुधारणा 30 लाख,लेंढोरी भराडीदेवी मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,हेळवाक शंकरराव महाजन यांचे घर ते कोंडीबा शेलार यांचे घरापर्यंतचा रस्ता सुधारणा 25 लाख,शेंडेवाडी पवारवस्ती ते स्मशानभूमी रस्ता 1 कि.मी.सुधारणा 25 लाख,डोंगळेवाडी माणगाव मोरगिरी मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीकडे जाणारा 1 कि.मी.रस्ता खडीकरण, डांबरीकरण 25 लाख,गोवारे गवळीनगर रस्ता सुधारणा 25 लाख,काटकरवाडी मंद्रुळकोळे रस्ता सुधारणा व आर.सी.सी.गटर 25 लाख,पाटण टोळेवाडी घेरादातेगड विठ्ठलवाडी सावंतवाडी नाणेल रस्ता सुधारणा करणे. (भाग विठ्ठलवाडी सावंतवाडी नाणेल) 48 लाख,काठी गावठाण ते जाधववस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,देशमुखवाडी गोकूळ तर्फ हेळवाक पोहोच रस्ता सुधारणा 30 लाख,हुंबरळी महादेववाडी रस्ता सुधारणा 15 लाख,मिरगाव कामरगाव रस्ता सुधारणा 20 लाख,बांबवडे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,बनपेठवाडी येराड कोयना नदी  घाट रस्ता सुधारणा 25 लाख,निवडे स्मशानभूमी रस्ता सुधारणा35 लाख,खालची खबालवाडी ते वरची खबालवाडी रस्ता सुधारणा 45 लाख,चेणगेवस्ती गारवडे ते पाऊदका रस्ता सुधारणा 35 लाख,मारुलहवेली बाजारपेठ ते कोरिवळे रस्ता सुधारणा 20 लाख,मंगेवाडी मरळी अंतर्गत व स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा 30 लाख,आबदारवाडी जुगाईनगर ते जि.प.शाळा रस्ता नळकांडी पुलासह रस्ता सुधारणा 20 लाख,मळ्याचीवाडी काळगांव पोहच रस्ता उर्वरीत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,काळगाव बौध्दवस्ती,पाटीलवस्ती येथे ओढयालगत संरक्षक भिंत 20 लाख,निवी चोरगेवस्ती रस्ता खडीकरण 50 लाख,काजारवाडी शिंद्रुकवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,माटेकरवाडी ते चिखलेवाडी जंगली महाराज मठ रस्ता सुधारणा 40 लाख,कामरगाव बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,मारुल तर्फ पाटण सावंतवाडी ते मारुल बाजे चौगुलेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,आंबवडे खुर्द काळेश्वर मंदिर ते रुवले फाटा रस्ता सुधारणा 25 लाख,बनपूरी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,म्हाळुंगेवस्ती सातर अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,साबळेवाडी ते शेजवळवाडी रस्ता सुधारणा 15 लाख,माईंगडेवाडी जिंती ते दिसले आवाड रस्ता सुधारणा 20 लाख,पाणेरी मुख्य रस्ता ते गावठाण रस्ता सुधारणा 20 लाख,हौदाचीवाडी जिंती रस्ता सुधारणा 15 लाख,कडवे खुर्द संरक्षक भिंत 10 लाख,केळेवाडी खालची कडवे खुर्द येथे मंदिर ते शाळा संरक्षक भिंत बांधकाम 15 लाख,गायमुखवाडी बांबवडे अंतर्गत रस्ता  सुधारणा 7 लाख,जुगाईवाडी घोट रस्ता सुधारणा 20 लाख,दुटाळवाडी नुने अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,बेंदवाडी कडवे बु ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 10 लाख,भैरेवाडी ढोरोशी येथे संरक्षक भिंत 10 लाख,मरळोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,राहुडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,जंगलवाडी तारळे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 25 लाख,कुशी पुनर्वसन आवर्डे रस्ता सुधारणा 20 लाख,भोकरवाडी सावरघर गावडेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,आडदेव खुर्द बेंदे पासून आंब्रुळे माणगाव रस्ता सुधारणा 20 लाख,काढोली धावडवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,झाकडे बौध्दवस्ती ते विठ्ठलाई मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,कोरिवळे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,सोनवडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,वरची मेंढोशी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,आंबवणे शेळकेवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,काठी  आवसरी जोडरस्ता ते सिताराम विष्णू कदम यांचे घरापर्यंतचा रस्ता सुधारणा 20 लाख,रामेल शेळकेवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,कुंभारगाव येथे संरक्षक भिंत 30 लाख,येराड फळबाबी ओढयाशेजारी संरक्षक भिंत 20 लाख,वनकुसावडे ते पळासरी साकव पूलाला संरक्षक भिंतीसह सुधारणा 20 लाख,जरेआवाड वाटोळे किसन राजाराम पवार यांचे घर ते पाणवठा रस्ता सुधारणा 20 लाख,मसुगडेवाडी पाडळोशी येथे सभामंडपाशेजारी संरक्षक भिंतीसह परिसर सुधारणा 15 लाख,आबदारवाडी ग्रामपंचायत जागेला संरक्षक भिंत 20 लाख,दिवशी खुर्द मळयाचावाडा पांगुळवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 30 लाख,वस्ती साकुर्डी स्मशान भूमी रस्त्यावर संरक्षक भिंत 15 लाख,केसे जुने गावठाण मागासवर्गीय वस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,पाडळी नविन गावठाण  जोडरस्ता सुधारणा 25 लाख,मस्करवाडी नं.2 येथे ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,माथणेवाडी नाडे रस्त्यावरील साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,बोंद्री मधलीशाळा ते भराडी रस्त्यावरील ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,काढोली सावंतवस्ती पोहच रस्ता साकवसह सुधारणा 40 लाख,विठ्ठलवाडी ते गुणुगलेवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी स्लॅब ड्रेन 40 लाख,आटोली भाकरमळी ते वाघजाई मंदिर रस्त्यावर स्लॅब ड्रेन 25 लाख,शिवाजीनगर ऊरुल येथे ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,गलमेवाडी येथे ओढयावर साकव 35 लाख,डेळेवाडी मथुरादास मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,आबईचीवाडी येथील ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,भोसगाव मुख्य रस्त्यावर साकव सह सुधारणा 40 लाख,डिगेवाडी ते काळेवाडी साकव सह रस्ता सुधारणा 40 लाख,साजूर येथे भगवान चव्हाण यांचे घराकडे जाणारा रस्त्यावर साकव 35 लाख,रुवले मोरेवाडी ते सुतारवाडी नेहरु टेकडी ते नवीवाडी फाटा रस्ता सुधारणा 25 लाख,जमदाडवाडी जिल्हा परिषद शाळेसमोर गट नं.207 श्री.सुभाष जयसिंग जमदाडे यांचे घर ते विष्णू मोरे यांचे घर रस्ता सुधारणा 15 लाख,मारुल तर्फ पाटण अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,दिवशी खुर्द मळयाचावाडा रस्ता सुधारणा 20 लाख,मान्याचीवाडी मालदन येथे स्मशानभूमीकरीता संरक्षक भिंत 30 लाख,माथणेवाडी भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,मान्याचीवाडी सळवे रस्ता खडीकरण डांबरीकरण 35 लाख,चाफळ भांबेवाडी ते देसाईवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,पांढरवाडी तारळे विहिरीला संरक्षक भिंत 25 लाख,कदमवाडी नाटोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,रासाटी साईनगर रस्ता सुधारणा 15 लाख,म्हावशी जांभळेवस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 15 लाख,मरळी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,घोट मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,निगडे ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,गोवारे ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,काढोली ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,ऊरुल ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,जानुगडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,मालदन ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,माजगाव ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,येराड ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,गमेवाडी,ता.कराड ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,साखरी सभामंडप दुरुस्ती व बांधकाम 15 लाख,कोळेकरवाडी श्री भराडीदेवी मंदिर रस्ता सुधारणा 15 लाख,सडाबोडकी रस्ता खडीकरण,डांबरीकरण 25 लाख,सडानिनाई सडावाघापूर सभामंडप दुरुस्ती व बांधकाम 12 लाख,सडाकळकी सडावाघापूर अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,घोट स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,पानस्करवाडी मल्हारपेठ स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,दिंडूकलेवाडी मल्हारपेठ अंतर्गत रस्ता सुधारणा 5 लाख,आंब्रुळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,डावरी पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख,मानेगाव इंजादेवी रस्ता सुधारणा 10 लाख,खालचे आडदेव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, नारळवाडी ते वेताळबा मंद्रुळहवेली रस्ता सुधारणा 20 लाख,शिरळ हणमंत नाना सुर्यवंशी यांचे घर ते माळवस्ती रस्ता सुधारणा 14 लाख,हारुगडेवाडी नाडोली स्मशानभूमी पोहोच रस्ता सुधारणा 10 लाख,वेताळवाडी स्मशानभूमी पाणवठा रस्ता सुधारणा 25 लाख,सोनवडे तालिम इमारत दुरुस्तीसह बांधकाम 15 लाख,भोसगाव आंब्रुळकरवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,नाणेगाव बु. सुर्याचीवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,जाळगेवाडी स्मशानभूमी रस्ता साकवसह सुधारणा 30 लाख,डेरवण कोळेकरवाडी ते वनवासवाडी रस्ता सुधारणा 15 लाख,वाघजाईवाडी मधलीवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,सडादुसाळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,वेखंडवाडी साकवसह रस्ता सुधारणा 30 लाख,पाडळोशी वार्ड नं.1 नवेघर आर.सी.सी.पाय-या गटर सह रस्ता सुधारणा 10 लाख, काळगाव नाभिकवस्ती रस्ता सुधारणा 12 लाख,धामणी मुस्लिमवस्ती रस्ता सुधारणा 12 लाख,आवसरी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,घाणबी बौध्दवस्ती ते ग्रामपंचायत कार्यालय रस्ता सुधारणा 15 लाख,वाटोळे मैदान ते गाव रस्त्यावर साकव पूल 30 लाख,धडामवाडी केरळ खिवशी राजवाडा म्हारंवड ते भारसाखळे रस्ता सुधारणा 20 लाख,कुसरुंड मराठी शाळा ते पवारवाडा रस्ता सुधारणा 15 लाख,रामिष्टेवाडी पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,गाढखोप अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,बेलदरे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख या तब्बल 241 पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 05 कोटींचा निधी मंजूर. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन स्थळांचा होणार विकास.

 


दौलतनगर 29 : पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील दौलतनगर येथील श्री गणेश मंदिर, बोपोली येथील अंबाखेळती मंदिर, येराड येथील येडोबा मंदिर,विहे येथील जोतिबा मंदिर,जळव येथील जोतिबा मंदिर ,सडा दाढोली येथील कुबडी तीर्थ परिसर,नाडोली येथील धुळोबा मंदिर,रासाटी येथील नवलाई मंदिर तसेच साजूर ता.कराड येथील महादेव मंदिर या तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांचा विकास पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील शिफारस केलेल्या  पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                   प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन व तिर्थक्षेत्र  स्थळांच्या ठिकाणी आवश्यक अशा मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे विनंती केलेली होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रसिध्द असलेल्या या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविल्यास या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची  गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील दौलतनगर येथील श्री गणेश मंदिर, बोपोली येथील अंबाखेळती मंदिर, येराड येथील येडोबा मंदिर,विहे येथील जोतिबा मंदिर,जळव येथील जोतिबा मंदिर ,सडा दाढोली येथील कुबडी तीर्थ परिसर,नाडोली येथील धुळोबा मंदिर,रासाटी येथील नवलाई मंदिर तसेच साजूर ता.कराड येथील महादेव मंदिर या पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीचा पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील या पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला आहे.मंजूर झालेल्या पर्यटन विकासाच्या कामांमध्ये दौलतनगर येथील क वर्ग  पर्यटन स्थळ गणेश मंदीर परिसरात वाहनतळ, पर्यटक कक्ष, मंदिर परिसर सुशोभिकरण 02 कोटी, बोपोली येथील आंबाखेळती मंदीर पोहच रस्ता सुधारणा करणे व परिसर सुशोभिकरण 50 लक्ष, येराड येथील क वर्ग पर्यटन स्थळ येडोबा मंदीर परिसरात सुशोभिकरण करणे व कोयना नदीतीरावरील घाटास दगडी पाय-या 75 लक्ष, विहे येथील क र्वग पर्यटन स्थळ जोतिबा मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख, जळव येथील क वर्ग पर्यटन स्थळ जोतिबा मंदीर परिसर सुभोभिकरण करणे व रस्ता सुधारणा 30 लाख,सडा दाढोली येथील क र्वग पर्यटन स्थळ कुवडी तिर्थ परिसर सुशोभिकरण 25 लाख, नाडोली येथील क र्वग पर्यटन स्थळ धुळोबा मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख, रासाटी येथील  नवलाई मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख, साजूर ता.कराड येथील क र्वग पर्यटन स्थळ महादेव मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख अशा एकूण 05कोटी रुपयांचा कामांचा समावेश असून पाटण विधानसभा मतदारसंघातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तर प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांना तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात लवकरच जिल्हास्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित करुन या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करुन ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात संबंधित शासकीय अधिकारी यांना सूचना करण्यात येणार असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Thursday, 23 March 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 71 गावांतील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.23:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली  निवडूण आलेले सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे सत्कार समारंभप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून गावा-गावांमध्ये विकासाची कामे राबविण्यासाठी राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही. अशी ग्वाही या प्रसंगी दिली होती. राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्याकरीता मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांसाठी 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दींस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांतील रस्त्यांची प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत नुकसान होत असते. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधीची गरज होती. दरम्यान नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडूण आलेल्या नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत संदस्य यांचा सत्कार सोहळा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये दौलतनगर ता.पाटण येथे पार पडला.या कार्यक्रमप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे हे ऑनलाईन उपस्थित राहून गावांचे विकास कामांना राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी सांगीतले होते.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 71 विविध गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रत्येक गावनिहाय 25 लाख या प्रमाणे एकूण 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय  राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला आहे.मंजूर झालेल्या कामांमध्ये पाडळोशी, वेखंडवाडी, कळंबे, झाकडे, मालदन, पाणेरी, घोटील, मोरगिरी, कडववाडी(नाणेगाव बु.), गिरेवाडी, हुंबरवाडी, गलमेवाडी, वर्पेवाडी (सळवे), कडवे खुर्द, रासाटी, नाव, ढाणकल, गोवोर, काढोली, काठी, शिरळ, कुसवडे, भारसाखळे, निवकणे, निवडे पुनर्वसन, राहुडे, जळव, घोट, मरळोशी, भुडकेवाडी, कोंजवडे, आवर्डे, तोंडोशी, कडवे बुद्रुक, नुने, डेरवण, जाळगेवाडी, माजगाव, सडावाघापूर, माथणेवाडी,  जाधववाडी चाफळ, डिगेवाडी आडूळ, बनपेठवाडी येराड, येराड, शेडगेवाडी विहे, आबदारवाडी, ऊरुल,वेताळवाडी,  नाडे, आडूळपेठ, आडूळ गावठाण, गारवडे, लेंढोरी, नाटोशी,  साबळेवाडी, मराठवाडी, बनपूरी, भोसगाव, मत्रेवाडी, आंबवडे खुर्द,  धजगावं, महिंद, ताईगडेवाडी, शेंडेवाडी, चाळकेवाडी, भिलारवाडी, मान्याचीवाडी, मालदन, सुतारवाडी मालदन तसेच सुपने मंडलातील गमेवाडी,आरेवाडी व उत्तर तांबवे या गावांचा समावेश आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील एकाच वेळी तब्बल 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांना प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे सुमारे 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री ना.संदिपानजी भुमरे यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आभार मानले असून मंजूर झालेल्या या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लागण्यासंदर्भात मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.