Tuesday, 30 January 2024

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत यशराज देसाई यांचा शाही विवाह सोहळा संपन्न शाही विवाह सोहळा जिल्ह्यासाठी ठरला अविस्मरणीय..!

 


दौलतनगर दि.30: सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई  यांचा ऐतिहासिक शाही विवाह सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री ना नारायण राणे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.अजित पवार तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील मंत्री,खासदार आमदार यांच्यासह राज्यातील, जिल्ह्यातील तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील लाखो जनसमुदायांच्या उपस्थित संपन्न झाला.दरम्यान हा शाही विवाह सोहळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला.पाटण मतदारसंघात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू,श्रीमती विजयादेवी व स्व. शिवाजीराव देसाई यांचे नातू व सौ. स्मिता देवी आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चि. यशराज  यांचा शुभविवाह,श्रीमंत सरकार शिवाजीराव निंबाळकर यांची नात व श्री इंद्रजीत सरकार निंबाळकर यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीवी सौ. का. डॉ. वैष्णवीराजे यांचे बरोबर रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी मध्ये पाटण तालुक्यातील  मरळी, दौलत नगर, ता. पाटण येथे गोरज मुहूर्तावर संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

              या विवाहाच्या निमित्ताने मरळीच्या देसाई घराण्यात प्रदीर्घ कालावधीनंतर पहिलाच सनई चौघडा वाजला.या ऐतिहासिक विवाहाला उपस्थित राहून वधू वराना शुभाशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे,  उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार,ना. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.दादा भुसे, जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड, रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे,क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,खासदार श्रीनिवास पाटील,खासदार श्रीकांत शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार संजयकाका पाटील,खासदार धैर्यशिल माने, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे, आमदार जयवंतराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील,आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सतेज पाटील,आमदार बच्चु कडू,आमदार भरतशेठ गोगावले,आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले,आमदार दिपक चव्हाण,आमदार मकरंद पाटील,आमदार शशिकांत शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार अरुण लाड,आमदार विक्रम काळे,आमदार समाधान अवताडे,आमदार गिता जैन, आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप,आमदार संजय केळकर,आमदार श्रीनिवास वनगा,आमदार शांताराम मोरे,आमदार दिलीप मोहिते,आमदार किसन कथोरे,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,आमदार भिमराव तापकीर,आमदार सुधिरभाऊ गाडगीळ,आमदार जयंत आजगावकर,आमदार संजयमामा शिंदे,आमदार निरंजन डावखरे, आमदार राजू पाटील,आमदार जयकुमार गोरे,आमदार आशुतोष काळे,आमदार मेघनाताई बोर्डीकर,आमदार संजय गायकवाड, आमदार बालाजी कल्याणकर,आमदार अशोक बापू पवार,आमदार मानसिंगराव नाईक,आमदार काशीनाथ मेंगाळ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री विजय बापू शिवतारे, माजी मंत्री अर्जुन खेातकर,माजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले, माजी खासदार संजीव नाईक,माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील,माजी आमदार सदाशिवराव सपकाळ,माजी आमदार चंद्रदिप नरके, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार दिपक साळूंखे, माजी आमदार बबनदादा भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे,श्रीमती सुनेत्राताई पवार, विश्वास नांगरे पाटील.जिल्हाधिकरी जितेंद्र डुडी,पोलीस अधिक्षक समिर शेख,ज्ञानेश्वर खिलारी,समिर वानखेडे, भारती विद्यापिठ कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,डी.वाय.पाटील विद्यापिठ कुलपती संजय डी.पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील,चेअरमन समरजित घाडगे,चेअरमन रणजितसिंह देशमुख,सातारा जिल्हा मध्यर्वर्ती बँकेचे चेअरमन नितीन पाटील,सारंगबाबा पाटील,डॉ.अतुलबाबा भोसले,विनायक भोसले,भाजपा जिल्हाध्यक्ष धैयशिल कदम,मनोज घोरपडे,शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे,डॉ.इंद्रजित मोहिते,मनोहर शिंदे,अनिल देसाई,नितीन भरगुडे पाटील,अमित कदम,सुरेंद्र गुदगे,भरत जाधव,सुनिल माने,मच्छिंद्र सकटे,शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव,ऐश्वर्याताई प्रतिक पाटील,अनुराधा प्रभाकर देशमुख,शारदाताई जाधव,प्राणा फौंडेशनच्या अध्यक्षा प्राचीताई पाटील,हिंदूराव पाटील,मानसिंगराव जगदाळे,संजय मांडवे,कुस्ती संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार,दिपक पवार,संजय देसाई,अशोकराव गायकवाड,आय.जी.जालिंदर सुपेकर,सुनिल फुलारी,अशेाक मोराळे,अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैंसकर,समिर वानखेडे,अभिनेत्री क्रांती रेडेकर,आंचल दलाल, उपायुक्त सुनिल चव्हाण, युवा उद्योजक बाजीराव चव्हाण,शशिकांत जाधव,विक्रमबाबा पाटणकर,लक्ष्मण देसाई,बाळासाहेब राजे महाडीक,सुभाष पवार,दिलीप मोटे,प्रतापराव जानुगडे,आनंदराव जाधव,वसंतराव जगदाळे,प्रदिप माने,राजेश पाटील,दिलीप मोहिते,फारुक पटवेकर,सुजित आंबेकर,प्रमोद सकटे,सतिश चव्हाण, हरीष पाटणे, राजू भोसले,विनोद सातव यांनी प्रत्यक्ष भेटून वधू-वरांना शुभाशिर्वाद दिले.या शाही विवाह सोहळयाला उपस्थित मान्यवरांचे ना.शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,चि.जयराज देसाई, चि.आदित्यराज देसाई यांनी स्वागत केले.दरम्यान या शाही विवाह सोहळयाकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री तसेच विविध राजकीय पक्षांचे खासदार,आमदार,माजी खासदार,माजी आमदार हे मोठया संख्येने उपस्थित होते.रविवारी दिवसभर या मान्यवरांची विवाहस्थळी मांदियाळी होती.

चौकट: मंत्री शंभूराज देसाई यांचे नेटके आणि उत्कृष्ट नियोजन.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचा शाही विवाह सोहळा म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टीने हे नेटक्या आणि उत्कृष्ट नियोजनाचे एक आदर्श उदाहरण ठरले कारण मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन बारकाईने सर्व गोष्टींचे नियोजन केले होते.सुमारे एक ते दीड लाख जनसमुदायांचे कसलीही तक्रार न येता झालेले स्नेहभोजन त्यांचे स्वागत,,बैठकव्यवस्था, व्हीआयपी व्यवस्था ,शिवाय पार्किंग या सर्व बाबी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अत्यंत नेटके नियोजन झाल्याची चर्चा उपसिथत मान्यवरांसह संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती.

चौकट :सुमारे ५० एकर जागेत भव्य सोहळा.

     यशराज यांचा विवाह  म्हणजे देसाई कुटुंबातील दीर्घ कालावधीनंतर होणारे पहिलेच मंगल कार्य आहे त्यामुळे या सोहळ्यासाठी देसाई कुटुंबाने गेल्या पंधरा दिवसांपासून जय्यत तयारी सुरू केली असून पूर्णपणे ओपन पद्धतीने संपन्न होणाऱ्या या सोहळ्यासाठी दौलतनगर परिसरात सुमारे पन्नास एकर जागेत भव्य शाही मंडप उभारून चारी बाजुंना पार्किंग व्यवस्था, आकर्षक आणि सुसज्ज प्रशस्त बैठक व्यवस्था,पिण्याचे पाणी,टॉयलेट,तसेच भव्य अशी भोजन व्यवस्था आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.अशा प्रकारचे आकर्षक आधुनिक शाही लग्न मंडप विद्युत रोषणाई आणि भव्य दिव्य सोहळा  प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी याची देही याची डोळा मिळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि मतदारसंघात या ऐतिहासिक विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे.

 


Monday, 29 January 2024

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत यशराज देसाई यांचा शाही विवाह सोहळा संपन्न शाही विवाह सोहळा जिल्ह्यासाठी ठरला अविस्मरणीय..!

 


दौलतनगर दि
.15: सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई  यांचा ऐतिहासिक शाही विवाह सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.अजित पवार तसेच केंद्रीय मंत्री ना नारायण राणे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील मंत्री,खासदार आमदार यांच्यासह राज्यातील, जिल्ह्यातील तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील लाखो जनसमुदायांच्या उपस्थित संपन्न झाला.दरम्यान हा शाही विवाह सोहळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला.पाटण मतदारसंघात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू,श्रीमती विजयादेवी व स्व. शिवाजीराव देसाई यांचे नातू व सौ. स्मिता देवी आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चि. यशराज  यांचा शुभविवाह,श्रीमंत सरकार शिवाजीराव निंबाळकर यांची नात व श्री इंद्रजीत सरकार निंबाळकर यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीवी सौ. का. डॉ. वैष्णवीराजे यांचे बरोबर रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी मध्ये पाटण तालुक्यातील  मरळी, दौलत नगर, ता. पाटण येथे गोरज मुहूर्तावर संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

              या विवाहाच्या निमित्ताने मरळीच्या देसाई घराण्यात प्रदीर्घ कालावतीनंतर पहिलाच सनई चौघडा वाजला.या ऐतिहासिक विवाहाला उपस्थित राहून वधू वराना शुभाशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार,ना. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस,केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील,ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे,रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे,उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील,जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड,सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार संजयकाका पाटील,खासदार धैर्यशिल माने, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम,आमदार दिपक चव्हाण,आमदार मकरंद पाटील,आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले,माजी आमदार मदन भोसले,आमदार अरुण लाड,आमदार विक्रम काळे,आमदार समाधान अवताडे,आमदार गिता जैन,माजी मंत्री आमदार जयवंतराव पाटील,माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील,आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप,आमदार संजय केळकर,आमदार श्रीनिवास वनगा,आमदार शांताराम मोरे,आमदार दिलीप मोहिते,आमदार किसन कचोरे,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,आमार भिमराव तापकीर,आमदार सुधिरभाऊ गाडगीळ,आमदार जयंत आजगावकर,आमदार संजयमामा शिंदे,आमदार निरंजन डावखरे,माजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले,माजी आमदार दिपक साळूंखे, माजी आमदार बबनदादा भोसले,माजी मंत्री अर्जुन खेातकर,माजी मंत्री शिवाजीराव नाईक,आमदार राजू पाटील,आमदार जयकुमार गोरे,आमदार आशुतोष काळे,आमदार मेघनाताई बोर्डीकर,आमदार संजय गायकवाड,माजी मंत्री आमदार सतेज पाटील,आमदार बच्चु कडू,आमदार भरतशेठ गोगावले,आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले,आमदार संजीव नाईक,आमदार बालाजी कल्याणकर,आमदार अशोक बापू पवार,आमदार मानसिंगराव नाईक,आमदार काशीनाथ मेंगाळ,माजी आमदार प्रभाकर घार्गे,श्रीमती सुनेत्राताई पवार,माजी मंत्री विजय बापू शिवतारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी आमदार ए.पी.पाटील,विश्वास नांगरे पाटील.जिल्हाधिकरी जितेंद्र डुडी,पोलीस अधिक्षक समिर शेख,ज्ञानेश्वर खिलारी,समिर वानखेडे,माजी आमदार आनंदराव पाटील,माजी आमदार सदाशिवराव सपकाळ,माजी आमदार चंद्रदिप नरके,भारती विद्यापिठ कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,डी.वाय.पाटील विद्यापिठ कुलपती संजय डी.पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील,समरजित घाडगे,रणजितसिंह देशमुख,चेअरमन नितीन पाटील,सारंगबाबा पाटील,डॉ.अतुलबाबा भोसले,विनायक भोसले,भाजपा जिल्हाध्यक्ष धैयशिल कदम,मनोज घोरपडे,शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे,इंद्रजित मोहिते,मनोहर शिंदे,अनिल देसाई,नितीन भरगुडे पाटील,अमित कदम,सुरेंद्र गुदगे,भरत जाधव,सुनिल माने,मच्छिंद्र सकटे,चंद्रकांत जाधव,ऐश्वर्याताई पाटील,अनुराधा प्रभाकर देशमुख,शारदाताई जाधव,प्राणा फौंडेशनच्या अध्यक्षा प्राचीताई पाटील,हिंदूराव पाटील,मानसिंगराव जगदाळे,संजय मांडवे,साहेबराव पवार,दिपक पवार,संजय देसाई,अशोकराव गायकवाड,आय.जी.जालिंदर सुपेकर,सुनिल फुलारी,अशेाक मोराळे,अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैंसकर,समिर वानखेडे,क्रांती रेडेकर,आंचल दलाल,सुनिल चव्हाण उपायुक्त,बाजीराव चव्हाण युवा उद्योजक,विक्रमबाबा पाटणकर,लक्ष्मण देसाई,बाळासाहेब राजे महाडीक,सुभाष पवार,दिलीप मोटे,प्रताप जानुगडे,आनंदराव जाधव,वसंतराव जगदाळे,प्रदिप माने,राजेश पाटील,दिलीप मोहिते,फारुक पटवेकर,सुजित आंबेकर,प्रमोद सकटे,सतिश चव्हाण,हरीषपाटणे,राजू भोसले,विनोद सातव यांनी प्रत्यक्ष भेटून वधू-वरांना शुभाशिर्वाद दिले.दरम्यान या शाही विवाह सोहळयाकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री तसेच विविध राजकीय पक्षांचे खासदार,आमदार,माजी खासदार,माजी आमदार हे मोठया संख्येने उपस्थित होते.रविवारी दिवसभर या मान्यवरांची विवाहस्थळी मांदियाळी होती.

चौकट: मंत्री शंभूराज देसाई यांचे नेटके आणि उत्कृष्ट नियोजन.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचा शाही विवाह सोहळा म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टीने हे नेटक्या आणि उत्कृष्ट नियोजनाचे एक आदर्श उदाहरण ठरले कारण मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन बारकाईने सर्व गोष्टींचे नियोजन केले होते.सुमारे एक ते दीड लाख जनसमुदायांचे कसलीही तक्रार न येता झालेले स्नेहभोजन त्यांचे स्वागत,,बैठकव्यवस्था, व्हीआयपी व्यवस्था ,शिवाय पार्किंग या सर्व बाबी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अत्यंत नेटके नियोजन झाल्याची चर्चा उपसिथत मान्यवरांसह संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती.

चौकट :सुमारे ५० एकर जागेत भव्य सोहळा.

     यशराज यांचा विवाह  म्हणजे देसाई कुटुंबातील दीर्घ कालावधीनंतर होणारे पहिलेच मंगल कार्य आहे त्यामुळे या सोहळ्यासाठी देसाई कुटुंबाने गेल्या पंधरा दिवसांपासून जय्यत तयारी सुरू केली असून पूर्णपणे ओपन पद्धतीने संपन्न होणाऱ्या या सोहळ्यासाठी दौलतनगर परिसरात सुमारे पन्नास एकर जागेत भव्य शाही मंडप उभारून चारी बाजुंना पार्किंग व्यवस्था, आकर्षक आणि सुसज्ज प्रशस्त बैठक व्यवस्था,पिण्याचे पाणी,टॉयलेट,तसेच भव्य अशी भोजन व्यवस्था आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.अशा प्रकारचे आकर्षक आधुनिक शाही लग्न मंडप विद्युत रोषणाई आणि भव्य दिव्य सोहळा  प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी याची देही याची डोळा मिळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि मतदारसंघात या ऐतिहासिक विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Wednesday, 10 January 2024

अमृत 2.0 योजने अंतर्गत पाटण नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला तातडीने मान्यता. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून पाटण नगरपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी.

 

दौलतनगर दि.10: पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला अमृत 2.0 कार्यक्रमांतर्गत मंजूरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री  ना. शंभूराज देसाई यांनी केल्या होत्या.त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाने पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा सुधारित अंदाजपत्रके आराखडयासह असणारा प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी प्रस्तावित केला होता. त्यानुसार अमृत 2.0 या योजनेअंतर्गत पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली होती.दरम्यान राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा ना.शंभूराज देसाई यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. गोविंद राज यांना सदर योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुचना केली होती. आज मंत्रालय स्तरावर राज्यातील नवीन प्रकल्प व मंजूर प्रकल्पाच्या निविदा प्रस्तावाबाबत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रधान सचिव(नवि2) यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पाटण नगर पंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 योजने अंतर्गत 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या रक्कमेला राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या सुचनेनुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाटण शहारांतर्गत नव्याने कार्यान्वित करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे सर्व्हेक्षण करुन रक्कम रुपये 21 कोटी 44 लाख 57 हजार रुपयांचा सुधारित आराखडा तयार करुन संबंधित विभागाकडे दाखलही करण्यात आला. दाखल प्रस्तावावर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  संबंधित विभागाचे मुख्य अभियंता यांना तांत्रिक मान्यता देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार राज्य उच्चाधिकार सुकाणू समितीने शिफारस केल्यानुसार पाटण नगरपंचायतीचे नविन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 19 कोटी 70 लक्ष रुपये तत्वत: मंजूर केले असून या  नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाची विभागीय आणि मंडळ स्तरावर तपासणीही करण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कराड विभाग आणि मंडळ कार्यालय पुणे यांनी तांत्रिक मंजूरीसाठी सादर आणि शिफारस केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने पाटण नगरपंचायतीने सादर केलेल्या पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा येाजनेच्या अंदाजपत्रकाच्या  19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेला  सुधारित तांत्रिक मान्यता मिळाली होती. दरम्यान मंत्रालय स्तरावर आज राज्यातील नवीन प्रकल्प व मंजूर प्रकल्पाच्या निविदा प्रस्तावाबाबत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रधान सचिव (नवि 2) यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पाटण नगर पंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 योजने अंतर्गत 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या रक्कमेला राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली असल्याची माहिती शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Thursday, 28 December 2023

पाटण नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 योजनेअंतर्गत मिळणार 19 कोटी 70 लाखाचा निधी. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश.




दौलतनगर दि.28: पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला अमृत 2.0 कार्यक्रमांतर्गत मंजूरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री  ना. शंभूराज देसाई यांनी केल्या होत्या.त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाने पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा सुधारित अंदाजपत्रके आराखडयासह असणारा प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी प्रस्तावित केला होता. त्यानुसार अमृत 2.0 या योजनेअंतर्गत पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली असून लवकरच पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाकरीता प्रशासकीय मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर नगर विकास विभागाकडे दाखल केला असून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या नळ योजनेच्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी मिळण्याची विनंती ना.शंभूराज देसाई करणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली असून पाटण नगरपंचायतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

                 पाटण नगरपंचायती  अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांची पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत होती. ऐन पावसाळयामध्ये पाटण शहारामध्ये टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ पाटण वासियांवर आली होती. दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे पाटण येथील स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होत होते.त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण नगरपंचायती अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होण्याकरीताचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाटण शहारांतर्गत नव्याने कार्यान्वित करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे सर्व्हेक्षण करुन रक्कम रुपये 21 कोटी 44 लाख 57 हजार रुपयांचा सुधारित आराखडा तयार करुन संबंधित विभागाकडे दाखलही करण्यात आला. दाखल प्रस्तावावर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  संबंधित विभागाचे मुख्य अभियंता यांना तांत्रिक मान्यता देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार राज्य उच्चाधिकार सुकाणू समितीने शिफारस केल्यानुसार पाटण नगरपंचायतीचे नविन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 19 कोटी 70 लक्ष रुपये तत्वत: मंजूर केले असून या  नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाची विभागीय आणि मंडळ स्तरावर तपासणीही करण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कराड विभाग आणि मंडळ कार्यालय पुणे यांनी तांत्रिक मंजूरीसाठी सादर आणि शिफारस केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने पाटण नगरपंचायतीने सादर केलेल्या पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा येाजनेच्या अंदाजपत्रकाच्या  19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेला  सुधारित तांत्रिक मान्यता दिली असल्याचे सांगत पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाकडील पाटण नगरपंचायतीचे नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेकरीता नगरविकास विभागाकडे दाखल प्रस्तावाबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे तातडीने मान्यता मिळण्यासाठी विनंती केलेली असून पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला लवकरच शासनस्तरावर मान्यता मिळणार असल्याने पाटण नगरपंचायत हद्दीतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Thursday, 14 December 2023

एडीबी अर्थसहाय्य योजनेतून मल्हारपेठ मसूर मायणी राज्यमार्गासाठी 480 कोटींचा निधी मंजूर. मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश.



दौलतनगर दि.14: पाटण विधानसभा मतदारसंघातून सुरु होणारा मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून मुंबई पुणे बेंगलोर आशियाई महामार्ग व विजापूर कराड चिपळूण गुहाघर राष्ट्रीय महामार्ग या दोन महामार्गांना जोडणाऱ्या या  राज्यमार्गावर दैनंदिन वाहतूक मोठया प्रमाणांत सुरु असते. या राज्य मार्गावरील पंढरपूर ते मायणी या रस्त्याचे काम पुर्ण झाले असून मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर मधील लांबीतील रस्ता खराब झाल्याने दळण वळणाची मोठी गैरसोय होत होती. मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर या राज्य मार्गाचे मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आग्रही विनंती  करत या रस्त्याचे कामाला निधी मंजूर होण्यासाठी गेली दिड वर्ष सातत्याने पाठपुरावा करत होते.त्यानुसार मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून 480 कोटी  रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

                   सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातून सुरु होणारा मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक 143 आहे. सदर रस्ता मुंबई पुणे बेंगलोर आशियाई महामार्ग व विजापूर कराड चिपळूण गुहाघर राष्ट्रीय महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा तसेच सातारा,सांगली व सोलापूर या तिन्ही जिल्हयातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर साखर कारखाने व इतर महत्त्वाचे उद्योगधंदे तसेच मोठया लोकसंख्येची मुख्य बाजारपेठा असलेली गावे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणांत वाहतूक वर्दळ असते. दरम्यान या रस्त्याचे मार्गावरील मायणी ते पंढरपूर या सोलापूर जिल्हयातील लांबीचे काम नुकतेच पूर्ण झालेले असून सातारा जिल्हयातील मल्हारपेठ ते मायणी ही 60 किलोमिटर लांबी खराब झालेली असल्याने या मार्गावरुन ये-जा करताना वाहनधारकांसह प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर या राज्य मार्गाचे मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी गत दिड वर्षापासून आग्रहाची विनंती केलेली होती. त्यानुसार मल्हारपेठ पंढरपूर या मार्गावरील  मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर खराब लांबीचे सविस्तर सर्वेक्षण (DPR) तयार करण्यात येऊन मल्हारपेठ ते मायणी या रस्त्याचे लांबीचे 480 कोटी किंमतीचे अंदाजपत्रक मंजूरी साठी सादर करण्यात आल्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे ना.शंभूराज देसाई यांनी गत दिड वर्षापासून पाठपुरावा करत होते. त्यानुसार मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून 480 कोटी  रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून  मल्हारपेठ ते मायणी या खराब लांबीचे नुतनीकरण झाल्यानंतर मल्हारपेठ ते पंढरपूर ही सलग लांबी वाहतुकीसाठी सोईची होणार आहे.दरम्यान एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून मंजूर मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे मंजूर 480 कोटी  रुपयांचे कामाची निविदा प्रक्रिया तातडीने करण्यात येऊन मंजूर असलेले काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.

Tuesday, 12 December 2023

माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर.

 

 

दौलतनगर दि.12: पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे व पूलांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.अजितदादा पवार  व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती.सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

               प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे मोठे प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे या रस्त्यांवरुन  प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे तसेच बाचोली व खळे येथील पुलांचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-58 कि.मी. 14/00 ते 17/00 ची सुधारणा करणे (भाग- दिवशी घाट) 02 कोटी, बनपुरी अंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन  रस्ता प्रजिमा 125 कि.मी. 0/00 ते 13/00 (भाग कि.मी.7/00 ते 10/00 - जौंजाळवाडी ते  अंबवडेफाटा) ची रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, चरेगांव चाफळ दाढोली महाबळवाडी येरफळे त्रिपुडी चोपडी बेलवडे आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी. 40/00 ते 42/00  ची सुधारणा 03 कोटी, मानेगांव ते कुंभारगाव गलमेवाडी रस्ता प्रजिमा 56 कि.मी. 3/00 ते  6/700 (कुंभारगांव ते  गलमेवाडी) ची सुधारणा 02 कोटी, भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 22/500 (भाग कि.मी.12/00 ते 17/00-(कारळे ते तामिणे ) ची  रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, बनपूरी आंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन रस्ता प्रजिमा 131 कि.मी.6/500 ते 11/500 ची सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.12/00 ते 15/300 मध्ये घाट लांबीतील सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.5/600 ते 12/00 भाग चाफळ ते दाढोली रस्त्याची सुधारणा 2.50 कोटी, कोंजवडे भुडकेवाडी वरची केळेवाडी प्रजिमा 129 कि.मी.5/00 ते 10/00 मध्ये सुधारणा 02 कोटी, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी प्रजिमा 134 कि.मी.04/00 ते 7/00 मध्ये रुंदीरकरणासह सुधारणा 2.50 कोटी, मल्हारपेठ मंद्रुळहवेली पानस्करवाडी जमदाडवाडी नवसरवाडी प्रजिमा 133 कि.मी.0/00 ते 2/00 भाग मल्हारपेठ ते जमदाडवाडी रस्त्याची सुधारणा 2 कोटी, रामा 04 ते वराडे भोळेवाडी ते रामा 136 ते साकुर्डी तांबवे सुपने जुनी पाडळी गावठाण ते वारुंजी ते रामा 136 रस्ता प्रजिमा 79 व किमी 16/500 ते 19/00 भाग सुपने पूल ते जुनी पाडळी ची सुधारणा 2 कोटी, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता रामा 143 कि.मी.02/600 ते 6/00, 9/00 ते 1/800 भाग ऊरुल फाटा ते भोळेवाडी फाटा व कळंत्रेवाडी फाटा ते उंब्रज ची सुधारणा   02 कोटी, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता रामा 398 कि.मी.4/00 ते 5/00 व 18/00 ते 24/00 भाग बिबी ते देवघर फाटा व जळवखिंड ते मरळोशी ची सुधारणा 02 कोटी, प्रजिमा-55 ते  बाचोली पोहोच  रस्ता  ग्रामा. 289 वर बाचोली येथे वांग नदीवर मोठा पुल 05 कोटी,खळे पोहोच रस्ता ग्रा.मा.  323 वर    कि.मी. 0/800   येथे खळे गावाजवळ  वांग नदीवर  मोठा पुल 05 कोटी या कामांना सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Monday, 4 December 2023

गोकूळ तर्फ हेळवाक येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नांना यश.

 

दौलतनगर दि.04 :- पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली कोल्हापूर व कोकण भागामध्ये प्रतिवर्षी येणाऱ्या आपत्तींना सामोरे जाणेसाठी तसेच आपदग्रस्तांना तातडीने  मदत देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सातत्याने मागणी केली होती. दरम्यान महसूल व वन विभागाचे दि.23.05.2023 रोजीच्या शासन ज्ञापनान्वये राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मौजे गोकूळ तर्फ हेळवाक(कोयनानगर) येथील 38.93 हेक्टर आर क्षेत्र गृह विभागास प्रदान करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली होती.तर राज्य शासनाचे गृहविभागाने दि. 04 डिसेंबर 2023 रोजी पारित केलेल्या शासन निर्णयानुसार गोकूळ तर्फ हेळवाक येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक पदनिर्मिती, साधनसामुग्री व वाहन खरेदी आणि इमारत बांधकाम इत्यादीबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यास मंजूरी दिली असून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नाने राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मौजे गोकूळ तर्फ हेळवाक(कोयनानगर) येथील 38.93 हेक्टर आर क्षेत्रावर लवकरच राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र या दोन कार्यालयांची उभारणीचे कामकाजाला सुरुवात होणार आहे.

                 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तसेच कोयना धरणाचे पाण्यासाठयाचे विसर्गामुळे प्रतिवर्षी  पूरपरिस्थिती  निर्माण होत असून दळण वळण ठप्प होऊन येथील नागरीकांचे मोठया प्रमाणांत हाल होत असतात. या फटका पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली,कोल्हापूर या जिल्हयांना प्रतिवर्षी बसून महापूर परिस्थिती निर्माण होत असते. कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हांतील समुद्र किनार पट्टीच्या भागात चक्रीवादळाने आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होत असल्याने या भागात तातडीने मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल तात्काळ उपलब्ध होण्याचे दृष्टीने पाटण विधानसभा मतदारसंघातील गोकूळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासंदर्भात ना.शंभूराज देसाई हे यापुर्वीच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असताना सातत्याने आग्रही होते. त्याच पार्श्वभूमीवर ना. शंभूराज देसाई यांनी महसूल व गृह विभागाच्या सर्व संबंधित अधिकारी यांचेसमवेत सदर राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारावयाच्या प्रस्तावीत गोकूळ तर्फ हेळवाक(कोयनानगर) येथील जागेची पाहणी करुन या ठिकाणी सदरची दोन्ही शासकीय कार्यालये उभारण्यास मंजूरी मिळण्याकरीताचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाचे संबंधित विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही ना.शंभूराज देसाई यांनी केल्या होत्या. तद्नंतर ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयीन स्तरावर संबंधित शासकीय विभागाच्या बैठकाही झाल्या होत्या. पाटण तालुका भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने आणि कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील समुद्रकिनार पट्टीच्या भागात चक्रीवादळाने आपत्तीजनक परिस्थिती उद्भवत असल्याने या भागात तातडीने मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल व सद्यस्थितीत पोलीस प्रशिक्षण केंद्रांची मोठी मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपदग्रस्तांना कमी कालावधीमध्ये तात्काळ सेवा देण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

चौकट:- ना.शंभूराज देसाई यांचे दूरदृष्टीने पश्चिम महाराष्ट्र व कोकणासाठी महत्त्वाची दोन कार्यालये होणार.

पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम भागात वसलेला अतिवृष्टीचा व भूकंपप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो.प्रतिवर्षी मतदारसंघात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत कोयना धरणातून मोठया प्रमाणांत होणाऱ्या विसर्गाने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्हयात पूर परिस्थिती निर्माण होत असते. तर  कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील समुद्रकिनार पट्टीच्या भागात चक्रीवादळाने व अतिवृष्टीमुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवत असते.या आपत्काली परिस्थितीमध्ये तात्काळ मदत होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विभागाच्या मध्यतर्वी असलेल्या गोकूळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) या ठिकाणी ना.शंभूराज देसाई यांचे दूरदृष्टीने  राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र या दोन शासकीय कार्यालये होणार आहेत.

 

चौकट:- याबाबत मा. ना. शंभूराज देसाई म्हणाले की, कोयनानगर येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळाली, याचा आनंद आहे. याबाबत सकारात्मक विचार करून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मान्यता दिल्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. लवकरच सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल, असा विश्वासही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी व्यक्त केला.