वाशिम दि.12:- राज्याचे
गृहराज्यमंत्री आणि वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाशिम
जिल्हयासाठी किती सतर्क व अलर्ट आहेत याचा प्रत्यय रात्री पावणे अकराला आला.काल
रात्री 10.45 वा वाशिम जिल्हयातील रिसोड तालुक्यातील चिखली गावातील श्री.रमेश
गिऱ्हे या गृहस्थाचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंना दुरध्वनी गेला त्या गृहस्थाने
त्यांना सांगितले माझी 13 वर्षाची मुलगी गौरी खुप आजारी आहे तिला दवाखान्यात
तातडीने नेणे गरजेचे आहे आमचे गावात दवाखान्याची तसेच कोरोनामुळे सध्या जाम
असल्याने वाहनाची कसलीही सोय नाही. गेले दोन तास मी वाहन मिळते का? म्हणून प्रयत्न
करतोय पण मला कसेलेही वाहन मिळून नाही राहिले तुम्हीच काहीतरी करा अशी कैफियत या
गृहस्थांने पालकमंत्र्यांना सांगितली.पालकमंत्र्यांनी तात्काळ वाशिमचे
जिल्हाधिकारी, रिसोडचे तहसिलदार यांना दुरध्वनी केला रिसोड तालुक्यातील चिखली
गावातील श्री.रमेश गिऱ्हे या गृहस्थाचा मला फोन आला होता त्याची मुलगी गौरी खुप
आजारी आहे त्या गृहस्थाला गावात कसलेही वाहन मिळत नाही तात्काळ ॲम्बूलन्स पाठवून
त्यांच्या मुलीला जिल्हा रुग्णालयात आणून उपचार सुरु करायला सांगा. हा त्यांचा
नंबर आहे. पालकमंत्री यांच्या फोनमुळे हालचाली गतीमान झाल्या आणि अर्ध्या तासात
ॲम्बूलन्स चिखली या दुर्गम गावात पोहचली आणि गौरी गिऱ्हे ही 13 वर्षाची
उपचाराकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पालकमंत्र्याचा हा सतर्कपणा पाहून
गिऱ्हे यांचा व त्यांच्या कुटुंबाचा ऊर भरुन आला.जनतेला सर्वोतोपरी मदत करण्याचा
पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंचा हाच सतर्कपणा सध्या वाशिम जिल्हयातील जनता अनुभवत
असून आमच्या जिल्हयाचे पालकमंत्री अलर्ट आणि सर्वसामान्य जनतेची कणव असणारे मंत्री
असल्याची प्रतिक्रिया वाशिम जिल्हयातील जनतेमधून ना.देसाईंविषयी उमटू लागल्या
आहेत.
मुळचे
सातारा जिल्हयातील गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांची वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्रीपदी निवड झालेनंतर प्रथमत:च पालकमंत्री
म्हणून त्यांचा या जिल्हयाशी संबध आला. पालकमंत्री झाल्या झाल्या त्यांनी वाशिम
जिल्हयाचा तीन दिवसांचा दौराही केला या दौऱ्यामध्ये त्यांनी आपल्या कौशल्येतून
राजकीय, शासकीय बैठका घेवून वाशिम जिल्हयातील विविध प्रश्न समजावून घेवून त्यावर
धोरणात्मक निर्णय घेत वाशिम जिल्हयातील विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला.जिल्हयाच्या
त्यांच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये त्यांनी पालकमंत्री सतर्क आहेत म्हणून वाशिम
जिल्हयातील जनतेची मनेही जिंकली.जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून जिल्हयाच्या सर्वांगीण
विकासाची जनतेला येणाऱ्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी आता माझी आहे ती मी लिलया
पेलेन अशी ग्वाही देणारे ना.शंभूराज देसाई हे खरोखरच या संकटाच्या काळात वाशिम
जिल्हयातील जनतेच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या प्रादुभावामुळे राज्यामध्ये असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात वाशिम
जिल्हयातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध अडचणीत जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून
ना.शंभूराज देसाई हे जनतेच्या मदतीला धावून येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात
पालकमंत्री ना.देसाई यांनी वाशिम जिल्हयातील जनतेला येणाऱ्या अडचणी ते तातडीने
कशाप्रकारे सोडवित आहेत याचे अनेक किस्से सध्या वाशिम जिल्हयातील जनतेकडून
सांगितले जात आहेत. कोरोनाचे संकट आलेनंतर वाशिम जिल्हयातील जनतेच्या आरोग्याच्या
दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 01 कोटी रुपयांचा निधी कोरोनापासून
जनतेचा बचाव करण्याकरीता उपयोगात आणण्याच्या सुचना त्यांनी जिल्हयाचे जिल्हाधिकारी
यांना दिल्या.01 कोटी रुपयांचा निधी जनतेच्या आरोग्याकरीता देण्याचा त्यांनी
निर्णय घेताच त्यांच्या निर्णयाचे या जिल्हयामध्ये मोठे कौतुक करण्यात आले.गेली तीन,चार
आठवडे ते कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पाटण विधानसभा मतदारसंघात, सातारा जिल्हयात
कार्यरत असले तरी त्यातूनही वेळ काढून वाशिम जिल्हयातील कोरोनासंदर्भातील
सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी दिवसातून दोनदा वाशिमचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस
अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून लॉकडाऊनच्या काळात जिल्हयामध्ये आरोग्य सुविधा,
औषधांची उपलब्धता तसेच स्वस्त धान्याचे वाटप कुठेपर्यंत आले आहे? बाहेर गांवाहून
किती लोक आले आहेत त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्या का? कायदा व सुव्यवस्था
सुरळीत आहे का? कोरोनासंदर्भात अधिकच्या कोणकोणत्या उपाययोजना करायच्या याविषयी
सातत्याने ते आदेश देताना दिसत आहेत.
कोरोनाच्या
पार्श्वभूमिवर शासनाने संबधित जिल्हयाच्या पालकमंत्र्याच्या दुरध्वनीची यादीच सोशल
मिडीयावर प्रसारित केली आहे. त्यामुळे वाशिम जिल्हयातील जनतेला कसलीही अडचण आली की
येथील जनता थेट पालकमंत्री ना.शंभूराज देसाई बोलत आहात काय? मला रेशनिंगचे धान्य
नाही मिळाले, हा दुकानदार जादा दराने धान्य विकत आहे, मला अशी अशी अडचण येवून
राहिली माझी अडचण दुर करा अशा अनेक समस्या येथील लोक पालकमंत्र्यांना दुरध्वनीवरुन
सांगत आहेत.ना.शंभूराज देसाईही वाशिम जिल्हयातील कुणाचाही रात्रीअपरात्री दुरध्वनी
गेला की तात्काळ त्यांची समस्या जाणून घेवून त्यावर तोडगा काढत आहेत आणि विशेष
म्हणजे त्यांचे काम झाले म्हणून आलेल्या दुरध्वनीवर स्वत: तेच संबधित व्यक्तीला
तुमची थोडया वेळात अडचण दुर होईल मी संबधित अधिकारी यास सांगितले आहे असे सांगत
आहेत याचे विशेष कौतुक वाशिम जिल्हयातील जनता करीत असून आम्हाला अलर्ट आणि सतर्क
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या रुपाने मिळाले आहेत हे वाशिम जिल्हयातील
जनताच अभिमानाने सांगू लागली आहे.
No comments:
Post a Comment