दौलतनगर दि.१४:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब
यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी
दौलतनगर ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे
प्रांगणात लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने श्री. ग्रंथराज
ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळा आयोजीत
करण्यात येतो.यंदा या पारायण सोहळयाचे अकरावे वर्ष असून कोरोनाच्या संकटामुळे या
पारायणामध्ये खंड पडू नये याकरीता दौलतनगर येथील श्री.गणेश मंदीरात साध्या
पध्दतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन
दिवसीय पारायणाचे धार्मिक सोपस्कर पार पाडण्यात
येणार असल्याची माहिती श्री.ग्रंथराज
ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे संकल्पक
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व ह.भ.प जयवंतराव शेलार महाराज यांनी
प्रसिध्दीस दिली आहे.
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल रोजी ३७ वी पुण्यतिथी असून प्रतिवर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी कारखाना कार्यस्थळावरील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे
प्रांगणात दि. २० एप्रिल ते दि. २३ एप्रिल या
कालावधीत तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे
आयोजन करण्यात येते. गत दहा वर्षापासून हा श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
अखंडीतपणे याठिकाणी सुरु असून यंदाच्या वर्षी या पारायणाचे अकरावे वर्ष आहे.कोरोना
रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे ३७
व्या पुण्यतिथीनिमित्त श्री.गणेश मंदीरामध्ये सोमवार दि. २० एप्रिल ते गुरुवार दि.
२३ एप्रिल, २०२० या कालावधीमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे धार्मिक
सोपस्कर पार पाडण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावा असे आवाहनही
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व ह.भ.प जयवंतराव शेलार महाराज यांनी पत्रकामध्ये
केले आहे.
No comments:
Post a Comment