दौलतनगर दि.२३:- महाराष्ट्राचे पोलादी
पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३७
पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर ता.पाटण येथील कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती
पुतळयास पुष्पवृष्टी व पुष्पचक्र अर्पण करुन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या व राज्यशासनाचेवतीने विनम्र अभिवादन
केले.प्रतिवर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत
श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर साध्या
पध्दतीने धार्मिक विधी याठिकाणी करण्यात आले.
कोरोनाच्या
पार्श्वभूमिवर यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे पोलादी पुरुष
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची ३७ वी पुण्यतिथी व पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी होणारे श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हे अत्यंत
साध्या पध्दतीने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण
समुहाच्यावतीने दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी कारखाना कार्यस्थळावर करण्यात
आले.पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व
शिक्षण समुहाचे प्रमुख राज्याचे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी कारखाना कार्यस्थळा वरील लोकनेते
बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास
पुष्पवृष्टी व पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. प्रारंभी ना.शंभूराज
देसाई यांचे हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पादुकांचे पुजन करण्यात आले तसेच
त्यांच्या हस्ते याठिकाणी ध्वजारोहण करुन पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,ह.भ.प जयवंतराव शेलार
महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटणचे प्रांताधिकारी
श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास
अधिकारी मीना साळुंखे, सपोनि तृप्ती सोनवणे या सर्व शासकीय अधिकाऱ्यांनीही दौलतनगर
येथे उपस्थित राहून स्वतंत्रपणे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे ३७ व्या
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
प्रतिवर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्त श्री.ग्रंथराज
ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते यंदाच्या वर्षी या पारायण
सोहळयाचे अकरावे वर्ष होते पुढील वर्षी पारायण सोहळयाची तपपुर्ती असून कोरोनाच्या
संकटामुळे या पारायणामध्ये खंड पडू नये याकरीता दौलतनगर येथील श्री.गणेश मंदीरात
साध्या पध्दतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन
दिवसीय पारायणाचे धार्मिक सोपस्कर यानिमित्ताने
पार पाडण्यात आले.
चौकट:- पालकमंत्री
ना.बाळासाहेब पाटील यांचेवतीनेही करण्यात आले विनम्र अभिवादन.
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे ३७ व्या
पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्हयातील तमाम जनतेच्या वतीने व जिल्हयाचा पालकमंत्री
या नात्याने विनम्र अभिवादन करावे अशी विनंती सातारा जिल्हयाचे पालकमंत्री
ना.बाळासाहेब पाटील यांनी ना.शंभूराज देसाईंना केली त्यानुसार पालकमंत्री
यांचेवतीनेही लोकनेतेसाहेब यांचे पुण्यतिथी निमित्त पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र
अभिवादन करण्यात आले.
अभिवादन।लोक नेता।। श्रीराम nanal कडून
ReplyDelete