Friday 26 March 2021

अडचणीतल्या साखर उद्योगाला केंद्र सरकारचे धोरणच जबाबदार...! मंत्री शंभूराज देसाईंचा केंद्र सरकारवर घणाघात. देसाई कारखान्याची ५० वी वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभा खेळीमेळीत संपन्न.

 

                              


दौलतनगर दि.26(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी प्रमाणे  योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते मात्र त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी  साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेला ही योग्य भाव मिळाला पाहिजे याबाबत केंद्रसरकार का निर्णय घेत नाही. त्यामुळे केंद्रसरकारचे धोरण देशातील सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढायचे धोरण आहे का ? असा सवाल राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांनी केला.

                  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौलतलोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दूरदृष्यप्रणालीव्दारे ऑनलाईन पार पडली. यावेळी त्यांच्यासमवेत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई, जयराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

                    यावेळी बोलताना मंत्री देसाई म्हणाले,सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत यशस्वीपणे टिकण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील इतर मोठ्या कारखान्याच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असताना ही इतर कारखान्याबरोबर एफआरपी प्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसदर दिला आहे याचा आपणाला अभिमान आहे.कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफआरपी चे हप्ते करीत नाही मात्र केंद्र सरकारचे साखर धोरणच राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी जबाबदार आहे.परिणामी राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे.इथेनॉलच्या बाबतीत ही केंद्र सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने याचा गंभीर परिणाम सहकारी साखर कारखानदारी वर झाला असून कारखान्याने उत्पादित केलेल्या एकूण इथेनॉल पैकी केवळ २५ टक्के एवढेच इथेनॉल केंद्र सरकार विकत घेत आहे उरलेले ७५ टक्के इथेनॉल कारखान्यात पडून असल्याचे विदारक चित्र ही सध्या कारखान्याच्या पुढे आहे.परिणामी कारखानदारी अधिकच आर्थिक अडचणीत येताना दिसत आहे.

             राज्यातील आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असून राज्यातील सहकारी साखर कारखानदारी यशवीपणे टिकविण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करीत असून या उद्योगाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर ही सरकारचे लक्ष असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दूरदृष्टी तुन निर्माण झालेल्या आणि स्व.शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारावर चालणाऱ्या या कारखान्याला राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही देवुन मंत्री देसाई म्हणाले, देशात आणि राज्यात सध्या कोविडजन्य परिस्थिती येऊन कोरोनाची दुसऱ्यां लाटेचा राज्यात प्रवेश झाला आहे देशातील एकूण १० हॉट स्पॉट जिल्ह्यापैकी तब्बल ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील असल्याने राज्यातील नागरिकांनी कोरोनाचा नियमांचे पालन काटेकोरपणे गरजेचे आहे.मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरु आहे. 1250 मे. टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफआरपी.देतो हे एकमेव उदाहरण आहे. 1250 मे. टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले, लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करुन एफ.आर.पी.देण्याचा प्रयत्न केला.सभासदांनी व ऊस उत्पादकांनी आपलेपणांन कारखान्याकडे पाहणं गरजेचे आहे.असेही यावेळी बोलताना म्हणाले.

             यावेळी युवानेते यशराज देसाई यांनी आपल्या सुमारे दोन वर्षांच्या कार्यकाळात देसाई  कारखान्यात अनेक अत्यावश्यक असे तांत्रिक  बदल केले असून त्यामुळे संस्थेसहित सभासद शेतकऱ्यांचा वेळ व मेहनत वाचून  मोठा फायदा झाला आहे  यापुढील काळात ही अनेक तांत्रिक आणि आधुनिक बदल करून देसाई कारखाना राज्यातील एक आदर्श कारखाना करणार असल्याचे सांगितले.कारखान्याची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणांत पार पडली.

चौकट :- मंत्री शंभूराज देसाई व यशराज देसाई यांच्या अभिनंदनाचा ठराव 

               पाटणचे आमदार लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाई यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृह,अर्थ,उत्पादन शुल्क,पणन,आणि कौशल्य विकास या महत्वपूर्ण खात्याचे राज्यमंत्री व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड  झालेबद्दल तसेच गेल्या दीड वर्षापासून देसाई कारखान्याची यशस्वीपणे धुरा सांभाळत असलेले युवा नेते यशराज देसाई यांचे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याच्या सभासंदानी-शेतकऱ्यांनी मंत्री देसाईंच्या अभिनंदनाचा ठराव एकमुखाने मंजुर केला.

या सभेत तालुक्यातील विविध भागांतून शेतकरी सभासद ऑनलाईन उपस्थित होते.

चौकट; शरद पवारांकडून ही चिंता व्यक्त.

             साखर उद्योग अडचणीमधून काढण्यासाठी साखर उद्योगाशी निगडीत असणारे देशाचे माजी कृषी मंत्री शरद  पवार यांच्यापुढे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि मी स्वतः साखर उद्योगाच्या व्यथा मांडल्या त्यावेळी सध्या केंद्र सरकारचा साखर उद्योगाबाबतचा  दृष्टिकोन पोषक दिसत नाही या पुढे काळजीपूर्वक पाऊले टाकावी लागणार अशी चिंता व्यक्त करून आम्ही देशाचे कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला भरभरून दिले अशी माहिती खा पवार यांनी आम्हा शिष्ट मंडळा पुढे व्यक्त केल्याची माहिती मंत्री देसाई यांनी सांगितली. 

 

 

Thursday 25 March 2021

मल्हारपेठच्या ग्रामीण रुग्णालयाकरीता शासकीय जागेची संयुक्त पहाणी करावी : ना.शंभूराज देसाई

 

 

दौलतनगर दि.26 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- मल्हारपेठला ग्रामीण रुग्णालय मंजुर करुन बरेच वर्षे झाली याठिकाणी आवश्यक असणारी शासकीय जागा उपलब्ध नसल्याने मल्हारपेठ ग्रामीण रुग्णालय होवू शकले नाही. जागेअभावी मंजुर ग्रामीण रुग्णालय परत जाणे चुकीचे आहे याकरीता मल्हारपेठच्या आसपासच्या गांवामध्ये कुठे शासकीय जागा आहे का? याची अधिकाऱ्यांनी संयुक्त पहाणी करावी अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिल्या आहेत.

           मल्हारपेठ ता.पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामांसंदर्भात शासकीय जागा उपलब्ध करुन देणेसंदर्भात ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह पाटण येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.यावेळी बैठकीस जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोणपे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, सार्वजनीक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील यांची उपस्थिती होती.

                   याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,सन 2004 ते 2009 आमदार असताना तत्कालीन सार्वजनीक आरोग्य मंत्री स्व.विमलताई मुंदडा यांचेकडून मल्हारपेठ ता.पाटण येथे ग्रामीण रुग्णालय मंजुर करुन घेतले होते. हे ग्रामीण रुग्णालय शासना कडून मंजुर करुन घेवून अनेक वर्षांचा कालावधी उलटून गेला शासकीय जागा याठिकाणी उपलब्ध होवू शकली नाही म्हणून हा प्रस्ताव रेंगाळत गेला.आरोग्य विभागाच्या आराखडयात मल्हारपेठ ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी आहे त्यातच पाटणचे ग्रामीण रुग्णालय आता उपजिल्हा रुग्णालय म्हणून उभे रहात आहे.त्यामुळे मल्हारपेठ ग्रामीण रुग्णालयाकरीता आवश्यक असणारी शासकीय जागा ही मल्हारपेठ गावाच्या आसपासच्या गांवामध्ये कुठे उपलब्ध आहे का? याची महसूल,आरोग्य,ग्रामविकास,जलसंपदा व सार्वजनीक बांधकाम उपविभागाने संयुक्तरित्या पहाणी करावी अशा सुचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.ग्रामीण रुग्णालय हे 30 बेडचे असल्याने याविभागातील नागरिकांची आरोग्याची सोय होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे लवकरात लवकर जागेचा शोध घेवून याचा प्रस्ताव मंजुरीकरीता शासनाकडे सादर करावा.यासंदर्भात शासनस्तरावर आरोग्य मंत्री यांचेकडे बैठक घेवून उचीत निर्णय घेता येईल असे त्यांनी सांगितले.

                  दरम्यान  नाडे नवारस्ता  ता.पाटण येथे तीन ते साडेतीन एकर शासकीय जागा उपलब्ध असून या जागेची संयुक्त पहाणी करण्यात यावी असेही ना.देसाईंनी सांगत एवढया मोठया प्रमाणात जागा उपलब्ध असल्यास याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचाही प्रस्ताव विभागाने तयार करावा अशाही सुचना ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बैठकीत दिल्या.

चौकट:-  पाटण तालुक्यात मोड्यूलर दोन ऑपरेशन थिएटर उभे करण्याचा प्रस्ताव दयावा.

             पाटण तालुका ग्रामीण भाग आहे मोठमोठया शस्त्रक्रियेकरीता तालुक्यातील नागरिकांना कराड अथवा सातारा येथे जावे लागते त्यामुळे पाटण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये किंवा आरोग्य केंद्रामध्ये मोड्यूलर दोन ऑपरेशन थिएटर उभे राहिल्यास तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दुर होईल त्यामुळे लवकर आरोग्य विभागाने याचा प्रस्ताव सादर करावा असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

             

कोरोना बाधितांची संख्या वाढतेय, काळजी घ्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना.

 


 

           दौलतनगर दि.26 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-आपले सातारा जिल्हयामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे.पुणे, मुंबई शहरासारखी आपल्या सातारा जिल्हयाची परिस्थिती नाही परंतू याचा प्रसार ग्रामीण भागात होवू नये हा संसर्ग नियंत्रणात आणणेकरीता ग्रामीण भागात ज्या काही उपाययोजना करणे आवश्यक आहेत त्या सर्व उपाययोजना कराव्यात. तपासण्या वाढवाव्यात विशेषत: तालुक्यातील मोठमोठया बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांच्याही तपासण्या सक्तीने करुन घ्याव्यात अशा सूचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या.

            मागील काही दिवसांपासून जिल्हयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने व जिल्हयात मागील 24 तासात 300 हून अधिक कोरोना रुग्ण सापडल्याने गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह,पाटण या ठिकाणी पाटण तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवारआदींची उपस्थिती  होती.

                   या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात आढावा घेतला.आजमितीला पाटण तालुक्यात 32 कोरोना बाधित रुग्ण आहेत.प्रत्येक एक एक रुग्ण जंबो कोवीड सेटंर सातारा व कृष्णा रुग्णालय,कराड येथे उपचार घेत आहेत व उर्वरीत 30 कोरोना बाधित हे गृहविलगीकरण होवून आवश्यक ते उपचार घेत आहेत.गत 07 दिवसात तालुक्यात एकूण 950 तपासण्या करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रत्येक दिवशी सरासरी 125 ते 150 तपासण्या केल्या जात आहेत. एकूण 950 तपासण्यापैकी 21 रुग्ण बाधित सापडले आहेत.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासण्या करणे तसेच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची कार्यवाही व तालुक्यातील मोठमोठया बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांच्याही तपासण्या करण्याचे काम सुरु असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत  सांगितले. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये याकरीता तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी गावां गावामध्ये शासकीय यंत्रणेमार्फत जनजागृती करावी.आरोग्य सेवक,ग्रामसेवक,तलाठी, मंडलाधिकारी,पोलीस पाटील यांच्यामार्फत गावांगावात जावून दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात याव्यात. अश्याही सुचना त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या.

चौकट:- विहे गाव नियंत्रणात:- ना.शंभूराज देसाई

             विहे गांवामध्ये कोकणामध्ये लग्नाकरीता गेलेल्यांमध्ये पहिले चार रुग्ण सापडले त्यानंतर तपासण्या केल्यानंतर एकूण 10 रुग्ण सापडले. सर्वात जास्त संख्या ही विहे गांवामध्ये झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते.विहे गांवामध्ये 72 नागरिकांच्या चाचण्या घेतल्या परंतू बाधितांची साखळी तुटली त्यामुळे विहे गाव नियंत्रणात आले आहे तरीही ग्रामस्थांनी काळजी घ्यावी असे आवाहन ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.

 

 

Wednesday 24 March 2021

एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत पाणी टंचाईचे प्रस्ताव तात्काळ मंजुरीकरीता पाठवा : ना.शंभूराज देसाई पाणी टंचाई आढावा बैठकीत दिल्या सुचना.

 

दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- माहे एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत ज्या ज्या गांवात तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे अशा गांवाचे संयुक्तरित्या सर्व्हेक्षण करुन पाणी टंचाई जाणवणाऱ्या गांवात या तीन महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई जाणवणार नाही याकरीता करावयाच्या उपाययोजनांचा प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी यांचेकडे मान्यतेकरीता पाठवा.पाणीटंचाई काळात अधिकाऱ्यांकडून कोणतीही दिरंगांई खपवून घेतली जाणार नाही. आणि जिथे खरोखरच आवश्यकता आहे अश्याच गांवाचे स्वर्हेक्षण करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिल्या.

            गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण शासकीय विश्रामगृह येथे माहे एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम गांवे वाडयावस्त्यांमध्ये जाणवणाऱ्या पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक आयोजीत केली होती.यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या. यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोणपे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,पाणी पुरवठा शाखा अभियंता एस.आर.कदम यांची उपस्थिती होती.

             यावेळी आढावा बैठकीत सुचना देताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,माहे एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत ज्या गांवामध्ये, वाडीवस्तीमध्ये नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार आहे त्या त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत त्या उपाययोजना तातडीने करण्याकरीता पाणी पुरवठा उपविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आतापासून स्वर्हेक्षण करण्याचे काम सुरु करावे. वेळेत सर्व्हेक्षण होत नाही, पाणी टंचाईचे प्रस्ताव वेळेवर सादर केले जात नाहीत त्यामुळे शासकीय यंत्रणेचा फटाका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.पाण्याचे हंडेच्या हंडे नागरिकांना, महिलांना भरुन आणावे लागतात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना नाही त्यामुळे यात विलंब करु नका,प्रातांधिकारी, तहसिलदार वा गटविकास अधिकारी असो आपण आपल्या यंत्रणेला यामध्ये मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांना सक्त सुचना दया दोन दिवसाच्या आत एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत ज्या ज्या गांवामध्ये पाण्याची टंचाई जाणवणार आहे आणि त्याठिकाणी काय केले तर पाणी टंचाईची झळ त्या गांवातील नागरिकांना, महिलांना बसणार नाही याची उपाययोजना काय करणे आवश्यक आहे यासंदर्भात ग्रामपंचायतीकडून लागणारी सर्व कागदपत्रे गोळा करुन ती संबधित प्रस्तावाला जोडून या तीन महिन्याचा रितसर पाणी टंचाई आराखडा मान्यतेकरीता जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करा मी स्वत: जिल्हाधिकारी यांना सुचना करुन लवकरात लवकर यास मान्यता घेतो अशा सुचना करीत प्राधान्याने ज्या नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, ज्याठिकाणी विंधन विहीरींची आवश्यकता आहे तसेच विहीरींची दुरुस्ती, खोलीकरण, गाळ काढणे व आडवी बोअर मारणे गरजेचे आहे त्याचबरोबर ज्या वाडयावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावयाचा आहे ते प्रस्ताव तात्काळ संबधित ग्रामपंचायतीकडून मागवून घेवून सादर करा अशाही सुचना ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत दिल्या.

 

 

 

 

 

मारुल तर्फ पाटण गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणणेसाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा: ना.शंभूराज देसाई मारुल तर्फ पाटण गांवाच्या पाणी योजनेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तातडीने आमदार फंडातून दिले 15 लक्ष रुपये.

  


दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- मारुल तर्फ पाटण ता.पाटण गांवामध्ये गॅस्ट्रोची लागण होवून सुमारे 85 ग्रामस्थांना याचा त्रास झाला असून ही बाब अतिशय गंभीर आहे. ही साथ आटोक्यात आणणेकरीता तातडीने सर्वोत्तरी प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत सुरु करावेत अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रातांधिकारी व आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गावांतील पाईपलाईन अत्यंत जुनी असल्याने दुषीत पाण्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ना.शंभूराज देसाईंनी तातडीने त्यांचे आमदार फंडातून 15 लक्ष रुपयांचा निधी देत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला बोलवून या गावच्या योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचा व मंजुरी घेवून तात्काळ या योजनेच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

             मारुल तर्फ पाटण या गांवातील नळ पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन अत्यंत जुनी असल्याने या पाईपलाईनमधून दुषीत पाणीपुरवठा गावांतील ग्रामस्थांना झाल्यामुळे गांवामध्ये गॅस्ट्रोची लागण होवून सुमारे 85 ग्रामस्थांना उलटया व जुलाब याचा त्रास झाला आहे. जुन्या पाईपलाईनमधून दुषीत पाणी पुरवठा झाल्यानेच गावकऱ्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला हे समजताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तातडीने महसूल,ग्रामविकास व आरोग्य विभागाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची पाटण शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली व वरीलप्रमाणे सुचना देत या गांवाच्या योजनेच्या व पाईपलाईन दुरुस्तीच्या कामांस तात्काळ निधी देणेकरीता त्याचदिवशी त्यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना लेखी पत्र देत त्यांचे आमदार फंडातून 15 लक्ष रुपयांचा निधी देण्याचे आदेश दिले.

             एवढया मोठया प्रमाणात अतिसाराची लागण गांवामध्ये होणे हे अतिशय गंभीर आहे. उलटया व जुलाब झालेल्या सुमारे 85 ग्रामस्थांना त्यांचे घरामध्ये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय पाटण येथे उपचार देणे सुरु केले आहेत. ही साथ लवकरात लवकर कशी आटोक्यात येईल याकरीता  महसूल विभागाच्या प्रातांधिकारी, ग्रामविकास विभागाच्या गटविकास अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवाव्यात.अशा सुचना करुन गटविकास अधिकारी यांना तातडीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांला बोलवा माझे आमदार फंडातून आजच मी या पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरीता आवश्यक असणारा 15 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांना देतो या योजनेचा प्रस्ताव दोन दिवसात जिल्हाधिकारी यांचेकडे मान्यतेकरीता पाठवा आणि या योजनेचे काम लवकरात लवकर सुरु करुन या गांवातील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी कसे लवकर देता येईल हे पहा असे सांगत गांवातील जीर्ण झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेतील दुषीत पाण्यामुळे ही अतिसाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या पाण्याचा वापर न करण्याच्या सुचना मंडलाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत गांवामध्ये दयाव्यात. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच ग्रामीण रुग्णालय पाटण येथील आरोग्य विभागाचे एक पथक या गांवामध्ये ही अतिसाराची साथ आटोक्यात येईपर्यंत तैनात ठेवावे अशाही सुचना यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना केल्या.

 

Saturday 13 March 2021

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना.


 

           दौलतनगर दि.13 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-राज्यामध्ये परत एकदा मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे.पुणे, मुंबई शहरासारखी आपल्या सातारा जिल्हयाची पारिस्थिती नाही परंतू याचा प्रसार ग्रामीण भागात होवू नये हा संसर्ग नियंत्रणात आणणेकरीता ग्रामीण भागात ज्या काही उपाययोजना करणे आवश्यक आहेत त्या सर्व उपाययोजना कराव्यात. मुख्यत: नागरिकांना मास्क,सॅनिटायझर वापरण्याची सक्ती करावी.मास्क न वापरण्यावर कारवाई करावी. तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये याकरीता तालुका प्रशासनाने त्यांच्या अखत्यारितील सर्व यंत्रणा सतर्क ठेवाव्यात व कोरोना चाचण्यामध्ये वाढ करावी अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या.

            मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तसेच तालुक्यातील विहे गांवामध्ये एका दिवसात मोठया संख्येने कोरोना रुग्ण सापडल्याने गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी पाटण विधानसभा मतदारसंघातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.चंद्रकांत यादव,ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.दत्तात्रय डोंगरे, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,कोयनेचे सपोनि सी.एस.माळी आदींची उपस्थिती  होती.

                   या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात आढावा घेतला. आजमितीला पाटण तालुक्यात 33 कोरोना बाधित रुग्ण आहेत. विहे गांवामध्ये कोकणामध्ये लग्नाकरीता गेलेल्यांमध्ये पहिले चार रुग्ण सापडले त्यानंतर काल एकूण 10 रुग्ण सापडले.त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.विहे गांवामध्ये 72 नागरिकांच्या चाचण्या घेतल्या आहेत. या गांवात आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचे सर्व अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर राज्यमंत्री ना.देसाईंनी कोरोनाचा प्रसार परत होवू नये याकरीता प्रत्येक नागरिकांने मास्क वापरणे सक्तीचे करा.त्याचबरोबर कोरोना चाचण्याही वाढवा जेणेकरुन कोरोना  बाधितांचे प्रमाण आपले लक्षात येईल आणि त्याप्रमाणे उपाययोजना ही आपणांस करता येतील.कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये याकरीता तालुका प्रशासना तील अधिकारी व कर्मचारी यांनी गावांगावामध्ये शासकीय यंत्रणेमार्फत जनजागृती करण्याचे काम सुरु करावे. आरोग्य सेवक,ग्रामसेवक,तलाठी,मंडलाधिकारी,पोलीस पाटील यांच्यामार्फत गावांगावात जावून दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात याव्यात.

                 सध्या लग्नकार्य मोठया प्रमाणात होत आहेत परवानगी घेवून ही कार्य सुरु असली तरी तसेच मोठमोठे बाजार त्याचबरोबर मोठमोठया बाजारपेठांमध्ये गर्दी होवून अशा ठिकाणी कोठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये याचीही काळजी यंत्रणेकडून घेण्यात यावी.गर्दीवर नियंत्रण ठेवत कोरेानावर मात करण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावे.अश्याही सुचना त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या.

चौकट:- मास्क न वापरण्यावर कडक कारवाई करा.:- ना.शंभूराज देसाई

             नागरिकांमध्ये कोरोना संपला अशी मानसिकता निर्माण झाली आहे परंतू कोरोना रुग्णांच्या संख्येत आता वाढ होवू लागली आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.कोरोनामुळे लॉकडाऊनची वेळ परत येवू नये याकरीता आताच काळजी घ्यावी. बाहेर फिरणारे नागरिक मास्क हनुवटीवर बांधत आहेत पोलीस दिसले की, नाकावर आणि तोंडावर घेत आहेत मास्क न वापरणाऱ्यावर कडक कारवाई करा अशा सुचनाही यावेळी ना.शंभूराज देसाईंनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.

 

 

Tuesday 9 March 2021

अर्थ व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई सव्वा बारा तास विधानपरिषदेमध्ये सक्रीय. सकाळी 10 ते रात्री 10.15 पर्यंत सांभाळले विधानपरिषदेचे कामकाज.

 



      मुंबई दि.10:- राज्याचे गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता,पणन अशा पाच खात्यांची जबाबदारी दिली आहे. गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या कामांचा आवाका यामुळे खुप वाढला आहे.सध्या मुंबई येथे राज्याचे सन 2021-22 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दि.08 मार्च रोजी विधानपरिषद सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर दि.09 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10.15 वा.पर्यंत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेकरीता तसेच मविस नियम 260 अन्वये कायदा व सुव्यवस्थावरील चर्चा असल्याने सलग सव्वा 12 तास विधानपरिषद सभागृहात सक्रीय राहून सभागृहाचे शासनाच्या वतीने कामकाज सांभाळले. वेळेचे बंधन न पाळता कामांमध्ये स्वत:ला वाहून घेणारा राज्यमंत्री म्हणून विधानपरिषदेतील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी ना.शंभूराज देसाईंचे विशेष कौतुक केले आहे.

         दि.08 मार्च रोजी महाराष्ट्र विधीमंडळात राज्याचा सन 2021-22 चा अर्थसंकल्प सादर झालेनंतर दि.09 व 10 मार्च रोजी या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा ठेवण्यात आली आहे. त्यातच अधिवेशनाचे शेवठचे दोन दिवस बाकी राहिल्याने विधानपरिषद सभागृहात मविस नियम 260 अन्वये सकाळच्या सत्रामध्ये गृह विभागाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था वरील चर्चा विरोधी पक्षाच्या वतीने आयोजीत करण्यात आली होती.कायदा व सुव्यवस्थावरील तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेमध्ये विधानपरिषदेच्या सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवर सदस्यांनी सहभाग घेवून आपले म्हणणे मांडले. या सर्व मान्यवर सदस्यांनी कोणकोणते मुद्दे या चर्चेमध्ये मांडले याची सर्व नोंद राज्याचे गृह व अर्थराज्यमंत्री म्हणून स्वत: ना.शंभूराज देसाईंनी सकाळी 10 ते रात्री 10.15 वा पर्यंत सलग सव्वा 12 तास सभागृहात बसून घेतली.

           अनेकदा गृह व अर्थ विभागाचे कॅबिनेट मंत्री हे विधानसभा सभागृहात असल्याने विधानपरिषदेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी ही गृह व अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईवर येते. गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे अभ्यासू आणि हजरजबाबी राज्यमंत्री असल्याने ते नेहमीच विधानसभा असो वा विधानपरिषद सभागृहामधील कामकाज ते तितक्याच अभ्यासूवृतीने लिलया पेलतात.गृह व अर्थ विभागाचे कॅबिनेट मंत्री यांच्या अनुपस्थितीत विधानपरिषद सभागृहातील कामकाज विरोधी पक्षाच्या बाजूने कसलाही दंगा होवू न देता शासनाच्या वतीने आपली भूमिका मांडून ना.शंभूराज देसाई योग्यरित्या सांभाळून नेतात व त्यांना दिलेल्या खात्यांच्या बाजूने अतिशय चांगल्या खिंड लढविण्याचे काम करुन सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या कौतुकास पात्र ठरतात हे अवघ्या महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे. त्यांच्या या कामकाजावर गृह व अर्थ विभागाचे कॅबिनेट मंत्री यांनी अनेकदा त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

             काल दि.09 रोजी कायदा व सुव्यवस्थावरील तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेवेळी ना.शंभूराज देसाईंनी सकाळी 10 ते रात्री 10.15 वा पर्यंत सलग सव्वा 12 तास सभागृहात बसून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांचे म्हणणे अतिशय शांतपणे एैकून घेतले त्यांचे मागणीतील मुद्दे सभागृहात उपस्थित राहून नोंद करुन घेतले यावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी वेळेचे बंधन पाळता कामात स्वत:ला वाहून घेणारा राज्यमंत्री महाविकास आघाडीला ना.शंभूराज देसाईंच्या रुपाने मिळाला आहे अशाप्रकारे त्यांच्या या कार्याचे तोंडभरुन कौतुक करीत हे कौतुक अनेक सदस्यांनी ना.शंभूराज देसाईंना बोलून दाखविले.

 

 

 

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 111 वी जयंती साधेपणाने साजरी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरुची शासकीय निवासस्थानी केले विनम्र अभिवादन.

 

          

 

          दौलतनगर दि.10:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे करारी माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 111 वी जयंती आज अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवठचा दिवस असल्याने राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मुंबई येथे त्यांचे सुरुची या शासकीय निवासस्थानी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

               दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र व महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन युवा नेते यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाईंनी विनम्र अभिवादन केले.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्ंयत साध्या पध्दतीने आणि सामाजीक अंतर ठेवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 111 वी जयंती अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे सभासद,हितचिंतक जयंती कार्यक्रमास उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंती निमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर सुमधूर भजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

 

 

पाटण मतदारसंघाकरीता राज्याच्या अर्थसंकल्पातून 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर. अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिला मतदारसंघाला न्याय. कोयनानगरला पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजुर करुन मतदारसंघाच्या वैभवात टाकली भर. नवीन प्रशासकीय इमारत, न्यायालयाच्या अतिरिक्त कामांसाठी निधी उपलब्ध.

 

दौलतनगर दि.08:- राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे अर्थराज्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पहात असले तरी  घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी या म्हणीप्रमाणे त्यांनी आपल्या पाटण या डोंगरी आणि दुर्गम मतदारसंघाच्या पदरात आपल्या पदाचा वापर झाला पाहिजे याकरीता नेहमीच प्रयत्न केले आहेत. नुकत्याच झालेल्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातून त्यांनी पाटण मतदारसंघाकरीता 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. पाटण मतदारसंघात त्यांनी दर्जोन्नती मिळवून दिलेल्या ग्रामीण भागांना जोडणाऱ्या महत्वाच्या मोठया रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 94 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी तर पाटणला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता 11 कोटी 87 लक्ष व पाटण न्यायालयाच्या अतिरिक्त बांधकामासाठी 1 कोटी 50 लक्ष निधी मंजुर करुन घेतला आहे.तसेच त्यांनी विधानपरिषद सभागृहात काल सन 2021-22 चा अर्थसंकल्प मांडताना पाटण मतदारसंघातील कोयनानगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यास शासनाची मान्यता घेत याची घोषणा करुन पाटण मतदारसंघाच्या वैभवात भर टाकली आहे.

 सन 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात मंजुर झालेल्या कामांचा व मंजुर निधींचा तपशील जिंती ते निगडे रस्ता प्रजिमा 121 भाग 0/00 ते 5/00 किमी 05 कोटी 60 लक्ष, त्रिपुडी ते कवरवाडी रस्ता प्रजिमा 123 भाग 0/00 ते 5/00 किमी 04 कोटी, बेलवडे ते सुळेवाडी रस्ता प्रजिमा 124 भाग किमी 0/00 ते 4/00 02 कोटी 50 लक्ष, बनपूरी ते नाईकबा रस्ता प्रजिमा 125 भाग 0/00 ते 5/00 किमी 03 कोटी, डाकेवाडी ते वाझोली फाटा रस्ता प्रजिमा 121 भाग 18/00 ते 23/00 किमी 04 कोटी, भोसगाव ते आंब्रुळकरवाडी रस्ता प्रजिमा 122 भाग 0/00 ते 2/500 किमी 02 कोटी, रिसवड ते ढोकावळे रस्ता प्रजिमा 123 भाग 21/500 ते 26/00 किमी 03 कोटी 40 लक्ष, सुळेवाडी ते शिंदेवाडी रस्ता प्रजिमा 124 भाग 4/00 ते 8/400  किमी 04 कोटी 40 लक्ष, शिंदेवाडी ते कुसरुंड रस्ता प्रजिमा 124 भाग 8/400 ते 12/600 किमी 04 कोटी 20 लक्ष, काटेवाडी ते मुरुड रस्ता प्रजिमा 128 0/00 ते 7/00 किमी 03 कोटी 50 लक्ष, कोंजवडे ते कडवे खुर्द रस्ता प्रजिमा 129  0/00 ते 5/00 किमी 01 कोटी 50 लक्ष, गमेवाडी ते पाडळोशी रस्ता  प्रजिमा 130 0/00 ते 8/00 किमी 03 कोटी, सडावाघापूर ते खंडूआईचे ‍ मंदिर रस्ता प्रजिमा 37 26/300 ते 38/00 किमी 01 कोटी 50 लक्ष,  चाफळ फाटा ते गमेवाडी रस्ता प्रजिमा 53 किमी 0/00 ते 6/500  02 कोटी 70 लक्ष, निसरे फाटा ते निसरे गाव व मारुलहवेली ते कोरिवळे रस्ता प्रजिमा 54 किमी 0/00 ते 1/00 व 7/500 ते 8/500  01 कोटी 50 लक्ष, चव्हाणवाडी ते घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 23/500 ते 33/500 05 कोटी, गलमेवाडी ते तालुकाहद्द रस्ता प्रजिमा 56 किमी 7/00 ते 9/00 01 कोटी 50 लक्ष, नवजा हेळवाक गोवारे मोरगिरी गारवडे साजूर विंग वाठार रस्ता रामा 148 किमी 58/800 ते 60/300 ची सुधारणा करणे03 कोटी व नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा 58 वर किमी 1/120 मध्ये कोयना नदीवर सांगवड गावाजवळ मोठया पुलाचे बांधकाम करणे 18 कोटी तसेच चरेगाव चाफळ डेरवण दाढोली चोपडी नाटोशी रस्ता प्रजिमा 53 किमी 21/100 मध्ये कोयना नदीवर त्रिपुडी गावाजवळ मोठया पुलाचे बांधकाम करणे 20 कोटी, पाटणला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता 11 कोटी 87 लक्ष व पाटण न्यायालयाच्या अतिरिक्त बांधकामासाठी 1 कोटी 50 लक्ष असे एकूण 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध महत्वाच्या कामांना राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजुर झाला आहे.

राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना राज्याच्या अर्थसंकल्पात भरघोस निधी देवून मतदारसंघाला न्याय मिळवून दिलेबद्दल पाटण मतदारसंघातील जनतेने त्यांचे आभार मानले आहेत.

चौकट:-पोलीस प्रशिक्षण केंद्र व तालुक्याच्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीमुळे मतदारसंघाच्या वैभवात भर.

अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील सौदर्यांने नटलेल्या कोयनानगर परिसरात पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे पाठपुरावा केला व हे केंद्र मंजुर करुन घेतले तसेच तालुक्याच्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून 11 कोटी 87 लाख रुपयांचा प्रत्यक्ष निधी मंजुर करुन दिल्याने पाटण मतदारसंघाच्या वैभवात भर पडली आहे.

Monday 8 March 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा दि.10 मार्च रोजी 111 वा जयंती सोहळा कार्यक्रम. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मुंबई येथे करणार अभिवादन. कारखाना कार्यस्थळावरील कार्यक्रमास युवा नेते यशराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.

     


            दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 111 वा जयंती सोहळा कार्यक्रम बुधवार दि.10 मार्च, 2021 रोजी सकाळी 10.00 वा.दौलतनगर (मरळी), ता.पाटण या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्ंयत साध्या पध्दतीने आणि सामाजीक अंतर ठेवून संपन्न होणार असून सदर कार्यक्रम महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजीत करण्यात आला आहे. दि.10 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवठचा दिवस असल्याने राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुंबई येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करणार असून कारखाना कार्यस्थळावरील कार्यक्रमास युवा नेते यशराज देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी पाटण तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बुधवार दि.10 मार्च, 2021 रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 111 वा जयंती सोहळा कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला असून हा कार्यक्रम कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत साध्या पध्दतीने व मोजक्याच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे मुंबई येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत.दौलतनगर येथील कार्यक्रमास युवा नेते यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाईंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.              

                 गृह,वित्त,नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मागील वर्षी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये सादर केलेल्या सन 2020-21 च्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आदरणीय स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता स्व.लोकनेतेसाहेब यांचे 110 व्या जयंती निमित्त 15 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यानुसार या शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता त्यांनी 14 कोटी 99 लाख 98 हजार इतक्या रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यताही शासनाकडून घेतली आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या कामांची निविदाही प्रसिध्द झाली असून लवकरच या दुसऱ्या टप्प्याच्या कामांस सुरुवात करण्यात येणार आहे.जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे सभासद,हितचिंतक यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर सामाजीक अंतर ठेवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्याकरीता उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी पत्रकात करण्यात आले आहे.