दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते
बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 111 वा जयंती सोहळा कार्यक्रम बुधवार दि.10 मार्च, 2021 रोजी सकाळी 10.00 वा.दौलतनगर (मरळी), ता.पाटण या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्ंयत
साध्या पध्दतीने आणि सामाजीक अंतर ठेवून संपन्न
होणार असून सदर कार्यक्रम “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजीत करण्यात
आला आहे. दि.10 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवठचा दिवस असल्याने राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुंबई येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करणार असून कारखाना कार्यस्थळावरील कार्यक्रमास युवा
नेते यशराज देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी
प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई
साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी पाटण तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा
करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बुधवार दि.10 मार्च, 2021 रोजी स्व.लोकनेते
बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 111 वा जयंती सोहळा कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत
करण्यात आला असून हा कार्यक्रम कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत साध्या
पध्दतीने व मोजक्याच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे मुंबई येथे लोकनेते बाळासाहेब देसाई
यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत.दौलतनगर येथील
कार्यक्रमास युवा नेते यशराज देसाई व मोरणा शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाईंची प्रमुख उपस्थिती
राहणार आहे.
गृह,वित्त,नियोजन
राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मागील वर्षी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये सादर केलेल्या सन 2020-21
च्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आदरणीय स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी
स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता स्व.लोकनेतेसाहेब यांचे 110 व्या जयंती
निमित्त 15 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यानुसार या शताब्दी स्मारकाच्या
दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता त्यांनी 14 कोटी 99 लाख 98 हजार इतक्या रुपयांच्या
निधीची प्रशासकीय मान्यताही शासनाकडून घेतली आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या कामांची निविदाही
प्रसिध्द झाली असून लवकरच या दुसऱ्या टप्प्याच्या कामांस सुरुवात करण्यात येणार आहे.जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील
विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे सभासद,हितचिंतक यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर सामाजीक
अंतर ठेवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्याकरीता उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी पत्रकात करण्यात आले आहे.
विनम्र अभिवादन
ReplyDelete