दौलतनगर दि.26 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री
कार्यालय) :-आपले सातारा
जिल्हयामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे.पुणे, मुंबई शहरासारखी आपल्या सातारा जिल्हयाची परिस्थिती
नाही परंतू याचा प्रसार ग्रामीण भागात होवू नये हा संसर्ग नियंत्रणात आणणेकरीता ग्रामीण
भागात ज्या काही उपाययोजना करणे आवश्यक आहेत त्या सर्व उपाययोजना कराव्यात.
तपासण्या वाढवाव्यात विशेषत: तालुक्यातील मोठमोठया
बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांच्याही तपासण्या सक्तीने करुन घ्याव्यात अशा सूचना गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या.
मागील काही
दिवसांपासून जिल्हयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने व जिल्हयात
मागील 24 तासात 300 हून अधिक कोरोना रुग्ण सापडल्याने
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली शासकीय
विश्रामगृह,पाटण या ठिकाणी पाटण तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व
अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे
अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग
तांबे,तहसिलदार योगेश टोमपे,उपविभागीय पोलीस
अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवारआदींची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात
आढावा घेतला.आजमितीला पाटण तालुक्यात 32 कोरोना बाधित रुग्ण आहेत.प्रत्येक एक एक रुग्ण जंबो कोवीड
सेटंर सातारा व कृष्णा रुग्णालय,कराड येथे उपचार घेत आहेत व उर्वरीत
30 कोरोना बाधित हे गृहविलगीकरण होवून आवश्यक ते उपचार घेत आहेत.गत 07 दिवसात तालुक्यात एकूण 950 तपासण्या करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रत्येक दिवशी सरासरी 125 ते 150 तपासण्या केल्या जात आहेत. एकूण 950 तपासण्यापैकी 21 रुग्ण
बाधित सापडले आहेत.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासण्या
करणे तसेच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची कार्यवाही व तालुक्यातील मोठमोठया बाजारपेठांमधील
व्यापाऱ्यांच्याही तपासण्या करण्याचे काम सुरु असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी
बैठकीत सांगितले.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये याकरीता तालुका प्रशासनातील अधिकारी
व कर्मचारी यांनी गावां गावामध्ये शासकीय यंत्रणेमार्फत जनजागृती करावी.आरोग्य सेवक,ग्रामसेवक,तलाठी,
मंडलाधिकारी,पोलीस पाटील यांच्यामार्फत गावांगावात
जावून दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात याव्यात. अश्याही सुचना
त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
चौकट:- विहे गाव
नियंत्रणात:- ना.शंभूराज देसाई
विहे गांवामध्ये कोकणामध्ये लग्नाकरीता गेलेल्यांमध्ये पहिले
चार रुग्ण सापडले त्यानंतर तपासण्या केल्यानंतर एकूण 10 रुग्ण
सापडले. सर्वात जास्त संख्या ही विहे गांवामध्ये झाल्याने भितीचे
वातावरण निर्माण झाले होते.विहे गांवामध्ये 72 नागरिकांच्या चाचण्या घेतल्या परंतू बाधितांची साखळी तुटली त्यामुळे विहे गाव
नियंत्रणात आले आहे तरीही ग्रामस्थांनी काळजी घ्यावी असे आवाहन ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.
No comments:
Post a Comment