दौलतनगर दि.10:- महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष,राज्याचे करारी माजी गृहमंत्री व पाटण
तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची 111 वी जयंती आज अत्यंत साध्या पध्दतीने साजरी
करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवठचा दिवस असल्याने राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मुंबई येथे त्यांचे सुरुची या शासकीय निवासस्थानी
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र
अभिवादन केले.
दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखाना
कार्यस्थळावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र व “महाराष्ट्र
दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन युवा
नेते यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाईंनी विनम्र अभिवादन
केले.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्ंयत साध्या पध्दतीने
आणि सामाजीक अंतर ठेवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 111 वी जयंती अत्यंत साध्या
पध्दतीने साजरी करण्यात आली. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे सभासद,हितचिंतक जयंती कार्यक्रमास उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई
यांचे जयंती निमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर सुमधूर भजनाचा कार्यक्रम
आयोजीत करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment