दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- माहे एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत ज्या ज्या गांवात तीव्र पाणी
टंचाई जाणवणार आहे अशा गांवाचे संयुक्तरित्या सर्व्हेक्षण करुन पाणी टंचाई जाणवणाऱ्या
गांवात या तीन महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई जाणवणार नाही याकरीता करावयाच्या उपाययोजनांचा
प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी यांचेकडे मान्यतेकरीता पाठवा.पाणीटंचाई काळात अधिकाऱ्यांकडून
कोणतीही दिरंगांई खपवून घेतली जाणार नाही. आणि जिथे खरोखरच आवश्यकता आहे अश्याच गांवाचे
स्वर्हेक्षण करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिल्या.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण शासकीय विश्रामगृह
येथे माहे एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम गांवे वाडयावस्त्यांमध्ये
जाणवणाऱ्या पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक आयोजीत केली होती.यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे
सुचना केल्या. यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोणपे,गटविकास
अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,पाणी पुरवठा शाखा अभियंता एस.आर.कदम यांची उपस्थिती होती.
यावेळी आढावा बैठकीत सुचना देताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,माहे
एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत ज्या गांवामध्ये, वाडीवस्तीमध्ये नागरिकांना पाणी टंचाई
जाणवणार आहे त्या त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत त्या उपाययोजना तातडीने
करण्याकरीता पाणी पुरवठा उपविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आतापासून स्वर्हेक्षण
करण्याचे काम सुरु करावे. वेळेत सर्व्हेक्षण होत नाही, पाणी टंचाईचे प्रस्ताव वेळेवर
सादर केले जात नाहीत त्यामुळे शासकीय यंत्रणेचा फटाका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.पाण्याचे
हंडेच्या हंडे नागरिकांना, महिलांना भरुन आणावे लागतात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना
नाही त्यामुळे यात विलंब करु नका,प्रातांधिकारी, तहसिलदार वा गटविकास अधिकारी असो आपण
आपल्या यंत्रणेला यामध्ये मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांना
सक्त सुचना दया दोन दिवसाच्या आत एप्रिल ते जुन महिन्यापर्यंत ज्या ज्या गांवामध्ये
पाण्याची टंचाई जाणवणार आहे आणि त्याठिकाणी काय केले तर पाणी टंचाईची झळ त्या गांवातील
नागरिकांना, महिलांना बसणार नाही याची उपाययोजना काय करणे आवश्यक आहे यासंदर्भात ग्रामपंचायतीकडून
लागणारी सर्व कागदपत्रे गोळा करुन ती संबधित प्रस्तावाला जोडून या तीन महिन्याचा रितसर
पाणी टंचाई आराखडा मान्यतेकरीता जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करा मी स्वत: जिल्हाधिकारी
यांना सुचना करुन लवकरात लवकर यास मान्यता घेतो अशा सुचना करीत प्राधान्याने ज्या नळ
पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, ज्याठिकाणी विंधन विहीरींची आवश्यकता
आहे तसेच विहीरींची दुरुस्ती, खोलीकरण, गाळ काढणे व आडवी बोअर मारणे गरजेचे आहे त्याचबरोबर
ज्या वाडयावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावयाचा आहे ते प्रस्ताव तात्काळ संबधित ग्रामपंचायतीकडून
मागवून घेवून सादर करा अशाही सुचना ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत दिल्या.
No comments:
Post a Comment