Tuesday 9 March 2021

अर्थ व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई सव्वा बारा तास विधानपरिषदेमध्ये सक्रीय. सकाळी 10 ते रात्री 10.15 पर्यंत सांभाळले विधानपरिषदेचे कामकाज.

 



      मुंबई दि.10:- राज्याचे गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता,पणन अशा पाच खात्यांची जबाबदारी दिली आहे. गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या कामांचा आवाका यामुळे खुप वाढला आहे.सध्या मुंबई येथे राज्याचे सन 2021-22 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दि.08 मार्च रोजी विधानपरिषद सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर दि.09 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10.15 वा.पर्यंत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेकरीता तसेच मविस नियम 260 अन्वये कायदा व सुव्यवस्थावरील चर्चा असल्याने सलग सव्वा 12 तास विधानपरिषद सभागृहात सक्रीय राहून सभागृहाचे शासनाच्या वतीने कामकाज सांभाळले. वेळेचे बंधन न पाळता कामांमध्ये स्वत:ला वाहून घेणारा राज्यमंत्री म्हणून विधानपरिषदेतील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी ना.शंभूराज देसाईंचे विशेष कौतुक केले आहे.

         दि.08 मार्च रोजी महाराष्ट्र विधीमंडळात राज्याचा सन 2021-22 चा अर्थसंकल्प सादर झालेनंतर दि.09 व 10 मार्च रोजी या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा ठेवण्यात आली आहे. त्यातच अधिवेशनाचे शेवठचे दोन दिवस बाकी राहिल्याने विधानपरिषद सभागृहात मविस नियम 260 अन्वये सकाळच्या सत्रामध्ये गृह विभागाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था वरील चर्चा विरोधी पक्षाच्या वतीने आयोजीत करण्यात आली होती.कायदा व सुव्यवस्थावरील तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेमध्ये विधानपरिषदेच्या सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवर सदस्यांनी सहभाग घेवून आपले म्हणणे मांडले. या सर्व मान्यवर सदस्यांनी कोणकोणते मुद्दे या चर्चेमध्ये मांडले याची सर्व नोंद राज्याचे गृह व अर्थराज्यमंत्री म्हणून स्वत: ना.शंभूराज देसाईंनी सकाळी 10 ते रात्री 10.15 वा पर्यंत सलग सव्वा 12 तास सभागृहात बसून घेतली.

           अनेकदा गृह व अर्थ विभागाचे कॅबिनेट मंत्री हे विधानसभा सभागृहात असल्याने विधानपरिषदेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी ही गृह व अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईवर येते. गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे अभ्यासू आणि हजरजबाबी राज्यमंत्री असल्याने ते नेहमीच विधानसभा असो वा विधानपरिषद सभागृहामधील कामकाज ते तितक्याच अभ्यासूवृतीने लिलया पेलतात.गृह व अर्थ विभागाचे कॅबिनेट मंत्री यांच्या अनुपस्थितीत विधानपरिषद सभागृहातील कामकाज विरोधी पक्षाच्या बाजूने कसलाही दंगा होवू न देता शासनाच्या वतीने आपली भूमिका मांडून ना.शंभूराज देसाई योग्यरित्या सांभाळून नेतात व त्यांना दिलेल्या खात्यांच्या बाजूने अतिशय चांगल्या खिंड लढविण्याचे काम करुन सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या कौतुकास पात्र ठरतात हे अवघ्या महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे. त्यांच्या या कामकाजावर गृह व अर्थ विभागाचे कॅबिनेट मंत्री यांनी अनेकदा त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

             काल दि.09 रोजी कायदा व सुव्यवस्थावरील तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेवेळी ना.शंभूराज देसाईंनी सकाळी 10 ते रात्री 10.15 वा पर्यंत सलग सव्वा 12 तास सभागृहात बसून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांचे म्हणणे अतिशय शांतपणे एैकून घेतले त्यांचे मागणीतील मुद्दे सभागृहात उपस्थित राहून नोंद करुन घेतले यावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी वेळेचे बंधन पाळता कामात स्वत:ला वाहून घेणारा राज्यमंत्री महाविकास आघाडीला ना.शंभूराज देसाईंच्या रुपाने मिळाला आहे अशाप्रकारे त्यांच्या या कार्याचे तोंडभरुन कौतुक करीत हे कौतुक अनेक सदस्यांनी ना.शंभूराज देसाईंना बोलून दाखविले.

 

 

 

2 comments:

  1. आमचे लाडके
    राज्याचे गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई साहेब,


    राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, 'पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा' कमावण्याचा उद्योग, अनेक नेत्यांची पोकळ आश्वासने अशी सर्वसामान्य लोकांच्या मनातील राजकारण्याविषयीची भावना झाली आहे परंतु मला ठामपणे सांगायला आवडेल ते म्हणजे या सर्वाना अपवाद व कोणत्याही वाद विवादात न पडता सर्वांशी मिळून मिसळून सर्वांशी आदराचे असे संबंध निर्माण करणारे देशातील आदर्श नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण ज्यांनी जगण्यातून दाखवून दिले असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय आमदार शंभूराज देसाई साहेब. सध्याचा काळच असा आहे की, राजकारणात सगळीकडे दलदल माजली आहे, जनतेचा नेत्यांवर काडीचा भरोसा वाटत नाही. पांढऱ्या खादीतल्या कोणालाही हात लावा. भ्रष्टाचाराचं काळं हाताला लागल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या राज्यात असा एक नेता आहे, ज्याच्यावर राखलेल्या तळ्याचं पाणी चाखल्याचे आरोप करायला कुणी धजावत नाही. या बिनडागी नेत्याचं नाव मा.शंभूराज देसाईसाहेब राज्याच्या विधानसभेत कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचित घटकांचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी राजकारणातले कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. ते बोलायला उभे राहिले की विधानसभा स्तब्ध होते. मुख्यमंत्र्यांपासून ते पहिल्यांदाच सभागृहात आलेल्या तरुण आमदारापर्यंत प्रत्येकजण त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो.

    आमदारपद स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नाही तर जनता जनार्दनासाठी आहे हे त्यांनी जाणलं. आपलं तन, मन, धन, सेवा, वेळ, शील, हृदय असं सगळं जनता जनार्दनाला अर्पण केलं. जनतेनंही त्यांना आपलं मानलं. एवढं काम केलं पण साहेब त्याविषयी फारसं बोलत नाहीत.साहेबांचे काम हे फक्त पाटण मध्येच नाही. दुष्काळ, पाणी, शेती, वीज, महागाई, रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना, शेतीमालाचे भाव अशा प्रश्नांवर त्यांनी राज्याला दिशा देणारं काम केलं आहे. विधानसभेचे नियम, विधानसभेने केलेले कायदे, संसदीय कामकाज पद्धतीवर साहेबांचे प्रभुत्व आहे. नवे आमदार त्यांच्याकडून म्हणूनच सतत सल्ला घेत असतात.साहेबांनी सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात केली की रात्री उशिरापर्यंत त्यांचे ते काम सुरू असतं. डोंगराएवढं काम करूनही `मी हे काम केलं.’ असं म्हणत नाहीत. सतत आम्ही केलं असं म्हणतात. आजच्या काळात एखाद्या गावात काम करण्याच्या अगोदरच त्या कामाचे नारळ फोडले जातात. त्याची फलकबाजी गावभर केली जाते.. त्यामुळेच साहेब या आजच्या आमदारापेक्षा वेगळे वाटतात ते यावरुनच... आणि यामुळेच जनता त्यांना सतत साथ देते आहे.
    माणसामध्ये मिसळून त्यांची तळमळीने विचारपूस करणारे असे आमचे सन्माननीय आमदारसाहेब एका बाजूला आहेत म्हणूनच महाराष्ट्रातील तुमच्या माझ्या सारख्याच्या मनात साहेबांची स्वच्छ प्रतिमा मनात घर केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्यावर तळं राखलं पण पाणी चाखल्याचे आरोप कुणी करायला धजणार नाही. सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलाय. अशा काळात साहेबासारखा बिनडागाचा नेता आपलं काम नेकीनं पुढे नेतो. त्यांच्या असामान्य कर्तुत्वास मनापासून सलाम... खरंतर त्यांच्याविषयी किती जरी लिहिले, बोलले तरी मला मनातून ते कमीच वाटत आहे.

    विलास साळुंखे
    जंगलवाडी, तारळे.

    ReplyDelete