दौलतनगर दि.26 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री
कार्यालय) :- मल्हारपेठला
ग्रामीण रुग्णालय मंजुर करुन बरेच वर्षे झाली याठिकाणी आवश्यक असणारी शासकीय जागा उपलब्ध
नसल्याने मल्हारपेठ ग्रामीण रुग्णालय होवू शकले नाही. जागेअभावी मंजुर ग्रामीण रुग्णालय परत जाणे चुकीचे आहे याकरीता मल्हारपेठच्या
आसपासच्या गांवामध्ये कुठे शासकीय जागा आहे का? याची अधिकाऱ्यांनी
संयुक्त पहाणी करावी अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी
दिल्या आहेत.
मल्हारपेठ
ता.पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामांसंदर्भात शासकीय जागा उपलब्ध
करुन देणेसंदर्भात ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली शासकीय
विश्रामगृह पाटण येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे
सुचना केल्या.यावेळी बैठकीस जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोणपे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,
सार्वजनीक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना
ना.शंभूराज देसाई म्हणाले,सन
2004 ते 2009 आमदार असताना तत्कालीन सार्वजनीक
आरोग्य मंत्री स्व.विमलताई मुंदडा यांचेकडून मल्हारपेठ ता.पाटण येथे ग्रामीण रुग्णालय मंजुर करुन घेतले होते. हे
ग्रामीण रुग्णालय शासना कडून मंजुर करुन घेवून अनेक वर्षांचा कालावधी उलटून गेला शासकीय
जागा याठिकाणी उपलब्ध होवू शकली नाही म्हणून हा प्रस्ताव रेंगाळत गेला.आरोग्य विभागाच्या आराखडयात मल्हारपेठ ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी आहे त्यातच
पाटणचे ग्रामीण रुग्णालय आता उपजिल्हा रुग्णालय म्हणून उभे रहात आहे.त्यामुळे मल्हारपेठ ग्रामीण रुग्णालयाकरीता आवश्यक असणारी शासकीय जागा ही मल्हारपेठ
गावाच्या आसपासच्या गांवामध्ये कुठे उपलब्ध आहे का? याची महसूल,आरोग्य,ग्रामविकास,जलसंपदा व सार्वजनीक
बांधकाम उपविभागाने संयुक्तरित्या पहाणी करावी अशा सुचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना
दिल्या.ग्रामीण रुग्णालय हे 30 बेडचे असल्याने
याविभागातील नागरिकांची आरोग्याची सोय होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे लवकरात लवकर जागेचा शोध घेवून याचा प्रस्ताव मंजुरीकरीता शासनाकडे
सादर करावा.यासंदर्भात शासनस्तरावर आरोग्य मंत्री यांचेकडे बैठक
घेवून उचीत निर्णय घेता येईल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान नाडे नवारस्ता ता.पाटण येथे
तीन ते साडेतीन एकर शासकीय जागा उपलब्ध असून या जागेची संयुक्त पहाणी करण्यात यावी
असेही ना.देसाईंनी सांगत एवढया मोठया प्रमाणात जागा उपलब्ध असल्यास
याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचाही
प्रस्ताव विभागाने तयार करावा अशाही सुचना ना.शंभूराज देसाईंनी
यावेळी बैठकीत दिल्या.
चौकट:- पाटण तालुक्यात मोड्यूलर दोन ऑपरेशन थिएटर उभे करण्याचा प्रस्ताव दयावा.
पाटण तालुका ग्रामीण भाग आहे मोठमोठया शस्त्रक्रियेकरीता तालुक्यातील
नागरिकांना कराड अथवा सातारा येथे जावे लागते त्यामुळे पाटण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये
किंवा आरोग्य केंद्रामध्ये मोड्यूलर दोन ऑपरेशन थिएटर उभे राहिल्यास तालुक्यातील नागरिकांची
गैरसोय दुर होईल त्यामुळे लवकर आरोग्य विभागाने याचा प्रस्ताव सादर करावा असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.
No comments:
Post a Comment