Monday 28 June 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून 200 रुपयांचा दुसरा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या बँकखाती वर्ग करणार. चेअरमन अशोकराव पाटील यांची माहिती.


 दौलतनगर दि.28 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2020-21 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीचीच्या पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन 2130 रुपयांप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच वर्ग केली असून एफआरपीचा प्रतिटन 200 रुपयेप्रमाणे होणारा दुसरा हप्ता उद्या मंगळवार दि. 29 जून 2021 रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 चे गळीत हंगामात 02 लाख 33 हजार 326 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.91% सरासरी साखर उताऱ्यांने 02 लाख 78 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सन 2020-21 च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपीच्याप्रमाणे पहिला हप्ता प्रतिटन रुपये 2130 नुसार होणारे बिल ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे बँक खाती यापुर्वीच अदा केले आहे.

दरम्यान देशासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारी रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे हे शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधाचे पालन करुन मर्यादितच सुरु आहेत.त्यामुळे सन 2020-21 च्या गळीत हंगामाध्ये उत्पादित झालेल्या साखर विक्रीवर याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे या गळीत हंगामात उत्पादित साखरेचा उठाव न झाल्याने तसेच साखरेचे सतत कमी-जादा होणारे दर यामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम होत आहे. कोविड 19 चे महामारीच्या काळातही सर्व संकटांचा सामना करत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजनामध्ये मोठी काटकसर करण्याचे धोरण राबविले असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन आलेल्या परिस्थितीचा योग्य नियोजनातून एफआरपीचा दुसरा हप्ता माहे जून महिन्यामध्ये देण्याचे नियोजन केले होते. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई व कारखाना संचालक मंडळाने सन 2020-21 च्या गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतिटन 200 रुपये इतकी रक्कम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने उद्या मंगळवार दि. 29 जून 2021 रोजी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे सांगत सन 2020-21 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा, अशी माहिती कारखान्याचे  चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.


                   



                   


Saturday 26 June 2021

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधाची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना.

 

दौलतनगर दि.27(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यातील मागील काही दिवसात बऱ्यापैकी कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आणि कमीही झालेली दिसत आहे. बाधितांची संख्या पहाता कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या वाढविण्याचे काम प्रगतीपथावर ठेवणे गरजेचे आहे. तसेच कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नसताना तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्याची पुर्वतयारी  करणे गरजेचे असून मागील आठवडयापासून निर्बंध कमी केल्याने ठिक-ठिकाणी गर्दी होताना दिसत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबाजवणी करावी,अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

           पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांच्यावर करण्यात येणारे उपचार व वाढत्या कोरोना संख्येला रोखण्याकरीता आज दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार  योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,डॉ.श्रीनिवास बर्गे,पाटणचे पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार आदींची उपस्थिती  होती.

                  बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीस तालुक्यात किती कोरोना रुग्ण बाधित आहेत याची सविस्तर माहिती घेतली व कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना करत राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी कोविड 19 चा संसर्ग वाढत असलेल्या जिल्हयांची आढावा बैठक घेत कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नसताना ब्रेक द चेन अंतर्गत गेल्या दोन आठवडयापासून वेगवेगळया पातळीवर निर्बंध शिथिल करत आणले आहेत.त्यामुळे बाजारपेठांच्या ठिकाणी,विविध दुकानांमध्ये खरेदी करण्याकरीता मोठया प्रमाणांत गर्दी होताना दिसत असल्याने कोरोना संसर्ग पुन्हा मोठया प्रमाणांत वाढण्याची  भिती असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मी कालच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हयातील कोरोना संदर्भातील मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांनी आढावा बैठकीत जे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत याची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना केल्या.त्याचबरोबर कोरोना संसर्ग रोखण्याबरोबर तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्याची पुर्वतयारी  करणे गरजेचे असून जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर तालुका प्रशासनाने शासनाच्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत प्रत्येक गांवातील ग्रामस्तरीय समिती सक्रींय करण्याचे काम करावे.कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका प्रशासनाने हाती घेण्याच्या सुचना मागील बैठकीत केल्या होत्या त्यानुसार ही मोहिम सुरु आहे या मोहिमेत तालुका प्रशासनाने दिलेल्या उदिष्ठाप्रमाणे कार्य केल्यास नक्कीच कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल. पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी याठिकाणी उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेटंरमध्ये तालुक्यातील कोरोना बाधितांवर चांगले उपचार मिळत आहेत.या कोवीड केअर सेंटरमध्ये औषधोपचाराकरीता काही आवश्यकता लागली तर याकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अत्यावश्यक सेवासह काही बाबींना लॉकडाऊनमधून सुट दिली असली तरी विनाकारण फिरणाऱ्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी,लग्न समारंभ,हॉटेलमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत आहे का यावरही लक्ष ठेवत गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणेने सतर्क रहावे व अजूनही कोरोना बाधितांची संख्या वाढू नये याकरीता आपण सर्वांनी सतर्क रहावे,असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बैठकीत केले.    



­­­


Tuesday 22 June 2021

मल्हारपेठ पोलीस ठाणे व पोलीस निवासस्थानाचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे हस्ते व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत दि.24 रोजी ई-भूमिपुजन समारंभ गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंची माहिती.

 


           दौलतनगर दि.22 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-मल्हारपेठ,ता. पाटण येथील पोलीस ठाणे व पोलीस निवासस्थानाचा ई-भूमिपूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे शुभहस्ते व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत व गृहमंत्री ना. दिलीपराव वळसे-पाटील, सहकारमंत्री तथा पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील,गृहराज्यमंत्री (शहरे) ना.सतेज पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दि.24 जून, 2021 रोजी दुपारी 12.30 वा.संपन्न होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                मल्हारपेठ,ता.पाटण हे गाव पाटण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणारे मुख्य बाजारपेठेचे गाव असून सन 1995 युती शासनाच्या काळात तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मल्हारपेठ दूरक्षेत्राचे स्वतंत्र पोलीस ठाण्यामध्ये रुपांतर करणेकरीता विद्यमान आमदार व सध्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी युती शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. पाटण तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व मल्हारपेठ येथील मोठी बाजारपेठ,वाढते गुन्हे तसेच कराड ते चिपळूण या राज्यमार्गाचे एन.एच.199 ई असे महामार्गाचे नव्याने वर्गीकरण झाल्याने वाढत्या रस्ते अपघातांचा विचार करता तसेच कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता स्वतंत्र पोलीस ठाणेची निर्मिती व्हावी,अशी ना.शंभूराज देसाई यांची सातत्याची मागणी होती. मल्हारपेठ ता.पाटण पोलीस ठाण्याच्या व पोलीस कर्मचारी निवासस्थानाच्या या कामांस गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे राज्याचे गृहराज्यमंत्री झालेनंतर मुर्त स्वरुप प्राप्त झाले.राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कुशल नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिनांक 07 ऑक्टोंबर, 2020 रोजी या कामांस प्रत्यक्ष मंजूरी घेत महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक-पिओएस-0918/प्र.क्र.44/पोल-3 यांचेमार्फत मंजुरीचा आदेश पारित करुन घेतला. या दोन्ही कामांसाठी एकूण रु.19.24 कोटी इतक्या रक्कमेच्या खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सातारा जिल्हयातील पाटण व उंब्रज पोलीस ठाणेचे विभाजन करुन पाटण पोलीस ठाणेमधील मल्हापेठ व बेलवडे दूरक्षेत्र आणि उंब्रज पोलीस ठाणेमधील चाफळ दूरक्षेत्र एकत्रीकरण करुन मल्हारपेठ पोलीस ठाणेची निर्मिती करण्यात आली आहे. मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत अनुक्रमे मल्हारपेठ दूरक्षेत्र 30 गावे, चाफळ दूरक्षेत्र 23 गावे,बेलवडे दूरक्षेत्र 17 गावे अशी एकूण 70 गावे या पोलीस ठाणेतंर्गत समाविष्ठ करण्यात आली आहेत.मल्हारपेठ पोलीस ठाणे इमारत व प्रकार 2 व 3 ची निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पोलीस ठाणे इमारत 918.65 चौ.मी. तर 56 निवासस्थाने 4412.45 चौ.मी. आकार 3 निवासस्थानामध्ये 4 निवासस्थाने 366.18 चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मल्हारपेठ पोलीस ठाणेसाठी  01 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 01 पोलीस उपनिरीक्षक, 03 सहाय्यक फौजदार, 04 पोलीस हवालदार, 07 पोलीस नाईक, 14 पोलीस शिपाई असे एकूण 30 पोलीसांचे संख्याबळ देण्यात आले आहे.

             या समारंभास अप्पर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक पोलीस गृहनिर्माण महामंडळ विवेक फणसळकर, हे अधिकारी वर्ग ऑनलाईन उपस्थित राहणार असून समारंभाच्या ठिकाणी विशेष पोलीस महानिरिक्षक मनोज लोहिया,जिल्हाधिकारी शेखर सिंह हे उपस्थित राहणार आहेत.या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी केले आहे.          

Thursday 17 June 2021

कालच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. प्रत्यक्ष पहाणी करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार. ­­­­­­

 


          

           दौलतनगर दि.17 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यात काल मोठया प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे तसेच ग्रामीण रस्ते,पाणी पुरवठा योजना,लहान मोठे पुल या सार्वजनीक मालमत्तेसह शेतीपिकांचे मोठया संख्येने नुकसान झाले आहे. दोन दिवस पावसाचा जोर कायम असून पाऊस कमी होताच मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीचे तालुका शासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ पंचनामे करुन घेण्यात यावेत. मी सध्या मुंबईत असलो तरी दोन दिवसात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष जागेवर जावून पहाणी करुन नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देणेकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मदत मिळवून देणार आहे.त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे काम हाती घ्या असे आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले आहेत.

          गेले दोन दिवस पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे.काल रात्री मोठया प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील विविध गावांना जोडणारे मोठे रस्ते, ग्रामीण रस्ते तसेच अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना व लहान मोठे पुल या सार्वजनीक मालमत्तेबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी साठल्याने शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे विविध बैठकांकरीता मुंबई येथे असल्याने त्यांनी जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडून झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेत पावसाचे प्रमाण कमी होताच पाटण तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुका प्रशासनाकडून हाती घेण्याच्या सुचना केल्या.

             यासंदर्भात बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,मी शासकीय विविध बैठकांकरीता मुंबई येथे असून काल रात्रीपासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.काल रात्री मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात सार्वजनीक मालमत्तेबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी साठले आहे त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या आहेत. मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून मुंबईत असलो तरी या दोन दिवसातील पावसामुळे कुठे कुठे नुकसान झाले आहे याची प्राथमिक नजरपहाणी करण्याच्या तसेच पावसाचा जोर कमी होताच प्रत्यक्ष जागेवर जावून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. मी स्वत: मुंबईवरुन येताच दोन दिवसात पाटण तालुक्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष जागेवर जावून सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेत पहाणी करणार आहे व सार्वजनीक मालमत्तेच्या पुर्नंबांधणीकरीता शासनाकडे आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर करुन पुर्नंबांधणीच्या कामांकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन आणणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळवून देणेकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मदत मिळवून देणार असल्याचेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

Tuesday 15 June 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी घेतला पाटण तालुक्यातील कोरोनाचा आढावा. बैठकीस सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती.

 

­­­­­

           दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्यात मागील दहा दिवसात बऱ्यापैकी कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आणि कमीही झालेली दिसत आहे प्रतिरोज सरासरी 30 ते 35 कोरोना बाधित सापडत असले तरी याच प्रमाणात कोरोनावर मात करुन बरे झालेल्यांची संख्या चांगली आहे.बाधितांची संख्या पहाता कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या वाढविण्याचे काम प्रगतीपथावर ठेवा.तपासण्या करण्याकरीता हॉटस्पॉट गांवामध्ये मेडीकल कॅम्प लावा अशाही सुचना केल्याने कॅम्पलाही सुरुवात झाली आहे.ही चांगली बाब आहे.कोरेाना मुक्तीच्या दिशेने प्रत्येक गांवाने नियोजन करावे याकरीता ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.

           दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक या शासकीय इमारतीत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांच्यावर करण्यात येणारे उपचार व पुढील नियोजनाकरीता जिल्हा व मतदारसंघातील प्रशासनाची बैठक पार पडली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंग,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठ्ठले,पाटण प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रघूनाथ पाटील, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार,सपोनि चंद्रकांत माळी,सपोनि अजय गोरड, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांचेसह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

          बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीस तालुक्याचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याबाबत नाराजी व्यक्त करीत तालुक्यात आज तारखेला किती कोरोना रुग्ण बाधित आहेत याची सविस्तर माहिती घेतली व कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. तालुका प्रशासनाने प्रत्येक गांवातील ग्रामस्तरीय समिती सक्रींय करण्याचे काम करावे.कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका प्रशासनाने हाती घेण्याच्या सुचना मागील बैठकीत केल्या होत्या त्यानुसार ही मोहिम सुरु आहे या मोहिमेत तालुका प्रशासनाने दिलेल्या उदिष्ठाप्रमाणे कार्य केल्यास नक्कीच कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल.पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी याठिकाणी उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेटंरमध्ये तालुक्यातील कोरोना बाधितांवर चांगले उपचार मिळत आहेत.या तिन्ही कोवीड केअर सेंटरमध्ये औषधोपचाराकरीता काही आवश्यकता लागली तर याकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल.जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ही व्यक्तीश: यासंदर्भात लक्ष घालावे असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बैठकीत सांगितले.

                पाटण तालुक्यात कालपर्यंत एकूण 454 कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील 76 गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर 356 कोरोना बाधित रुग्ण हे संस्थात्मक विलगीकरणासह पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी या तिन्ही कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.या तिन्ही कोरोना केअर सेंटरमधून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असलेबाबत ना.शंभूराज देसाईंनी समाधान व्यक्त केले.कोरोना आल्यापासून तालुक्यात एकूण 6122 कोरोना बाधित झाले होते त्यातील 5401 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.ही बाबही चांगली असल्याचे ते यावेळी म्हणाले. सकाळी 09 ते दुपारी 02 पर्यंत अत्यावश्यक सेवासह काही बाबींना लॉकडाऊनमधून सुट दिली असली तरी गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणेने सतर्क रहावे व अजूनही कोरोना बाधितांची संख्या वाढू नये याकरीता आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बैठकीत केले.

 

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सारथ्य करणारे असेही “मंत्री” जिल्हयातील प्रमुख तीन अधिकाऱ्यांना बरोबर घेत गृहराज्यमंत्र्यांनी केले गाडीचे सारथ्य.


     

             दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-सातारा जिल्हयाचे सुपुत्र,महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आपण राज्याचे गृहराज्यमंत्री आहोत असा कधीच डामडौल न करता नेहमी वेगळेपण करुन जनतेची मने जिंकुन घेताना सातारा जिल्हयातील जनतेने अनेकदा पाहिले आहे.आज असेच वेगळेपण दाखवित त्यांनी सातारा जिल्हयातील प्रशासनातील प्रमुख असणारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे सीईओ या प्रमुख तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्र स्वत:च्या गाडीत बसवित स्वत:च गाडीचे सारथ्य केले. स्वत: गृहराज्यमंत्री आपल्याला घेवून गाडीचे सारथ्य करतात हे पाहून हे तिन्ही प्रशासकीय अधिकारी थोडा वेळ चकीत झाले. पण या कृतीमुळे गृहराज्यमंत्र्यांनी जनतेची मने तर जिकंलीच त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेतील सर्वच वरीष्ठ अधिकाऱ्यांचीही मने जिकंली.

                निमित्त होते पाटण विधानसभा मतदारसंघातील आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात प्रशासनाच्या आढावा बैठकीचे या बैठकीकरीता जिल्हाधिकारी शेखर सिंग,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे जिल्हा प्रशासनातले प्रमुख तीन अधिकारी उपस्थित होते.आपत्तीची बैठक संपलेनंतर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंसमवेत या तिन्ही अधिकाऱ्यांनी दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, स्मारकातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे छायाचित्रांचे दालन त्याचबरोबर स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांची पहाणी केली. त्यानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते त्यांचे निवासस्थानी ठेवला होता.निवासस्थानाकडे जाताना मंत्री ना.देसाईंनी त्यांच्या गाडीत जिल्हाधिकारी यांना आपल्या जागेवर बसवित ते स्वत: वाहकाच्या जागेवर बसले आणि पोलीस अधिक्षक व सीईओ यांना मागे बसण्यास सांगून गाडीचे स्वत:च सारथ्य केले. यावेळी गृहराज्यमंत्री यांचा सर्व ताफा गृहराज्यमंत्र्यांच्या गाडीच्या मागे होता. गृहराज्यमंत्री स्वत: प्रशासनातील तीन अधिकाऱ्यांना घेवून गाडी चालवित आहेत हे पाहून याठिकाणी उपस्थित सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भूवया उंचावल्या आणि गाडीत बसलेले हे तिन्ही अधिकारी थोडावेळ चकीत झाले. निवासस्थानी आणून ना.शंभूराज देसाईंनी या तिन्ही अधिकाऱ्यांचा पाहूणचार करीत त्यांचा मानाचा फेटा, शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.

                   प्रशासनातील दांडगा अनुभव असणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा जिल्हा असो वा राज्य किंवा तालुकास्तरावरील वरीष्ठ अधिकारी असेा त्यांचेबरोबर नेहमी सलोख्याचेच संबध जिल्हयाने पाहिले आहेत.अनेकवेळा जिल्हास्तरीय बैठकांमधून चुकलेल्या अधिकाऱ्यांला सुनवत त्यांचेकडून जनतेच्या हिताचे काम त्यांनी करुन घेतले आहे तर वेळप्रसंगी अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून कोणत्याही गोष्टीतून कसा मार्ग काढता येईल हे ही त्यांनी दाखवून दिले आहे.जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांमध्ये हुशार आमदार,मंत्री म्हणून गृहराज्यमंत्री यांचा दरारा नेहमीच पहावयास मिळतो त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना बरोबर घेवून काम करणारा मंत्री म्हणूनही त्यांचा नावलौकीक आहे. आजच्या या कृतीमुळे प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचे सारथ्य करणारे असेही मंत्री यानिमित्ताने सातारा जिल्हयातील प्रशासनातील सर्व अधिकारी व जनतेला गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या रुपाने पहावयास मिळाले.

 

आपत्ती काळातील व्यवस्थापनेकरीता शासकिय यंत्रणनेने सतर्क रहा. - ना.शंभूराज देसाईंच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना.


     

 

             दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-सातारा जिल्हयात सर्वात जास्त महाबळेश्वर बरोबर पाटण मतदारसंघाला पावसाळयात प्रतिवर्षी आपत्तीचा सामना करावा लागतो.प्रशासनाला आपले मतदार संघातील आपत्ती परिस्थितीची कल्पना आहे.आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपण प्रतिवर्षी आपत्ती व्यवस्थापन व नियोजनाची बैठक घेत असतो.आपत्तीच्या काळात मतदारसंघातील तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न करता आपत्ती व्यवस्थापनेकरीता सर्व शासकीय यंत्रणेने सतर्क रहा कोरोना परिस्थितीचा सामना करीत असलो तरी आपत्ती व्यवस्थापनाच्याही तयारीला लागा अशा सुचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील प्रशासनाला दिल्या.

                      गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक या शासकीय इमारतीत पाटण मतदारसंघातील आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात प्रशासनाची बैठक पार पडली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंग,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठ्ठले, सा.बा.कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे,पाटण प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कराड गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता पोतदार,कृष्णा खोरेचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख,ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रघूनाथ पाटील,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, व्ही.डी.शिंदे,जि.बांधकाम विभागाचे आर.एस.भंडारे,ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार,सपोनि चंद्रकांत माळी, सपोनि अजय गोरड,नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांचेसह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

             याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात गतवर्षी बऱ्यापैकी अतिवृष्टी झाली मात्र सन 2019 मध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी व महापुराचे संकट आले होते. कोयना धरणातील मोठया प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पुरपरिस्थिती उद्भवू शकते या दृष्टीने आपण नेहमी नियोजन करतो.राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्ध्दवजी ठाकरे यांनी नुकतीच मंत्रालयीन स्तरावर तातडीची बैठक घेऊन सुधारित उपाय-योजना करण्याकरीता शासनस्तरावर योग्य त्या सुचना दिल्या आहेत.कोयना धरणात गतवर्षीपेक्षा आजच्या तारखेला चार टीएमसी पाणीसाठा कमी आहे. तरीही यंदाच्या वर्षी कोयना धरण व्यवस्थापनाने धरणपाणलोट क्षेत्रात येणारी पाण्याची आवक आणि धरणातून करण्यात येणारा विसर्ग याची सांगड घालणे गरजेचे आहे. कोयना नदीकाठच्या गावामध्ये पुराचे पाणी शिरते त्याठिकाणी आताच पुररेषा निश्चित करुन दयावी पाटण शहरातील पुररेषा निश्चित झाली आहे मात्र बाकीची गांवे अद्यापही शिल्लक आहेत.पुराचा धोका असणाऱ्या कुटुंबा्रना योग्य स्थळी राहण्याची व्यवस्था आताच करुन ठेवावी. तसेच पुरामध्ये ज्या गांवामध्ये जाता येत नाही अशा लोकांना अगाऊ तीन महिन्यांचे धान्य देण्याची व्यवस्था करावी.अशा सुचना संबंधित विभागाला दिल्या.

                    ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे व पावसाळयातील साथीचे आजारांवर तातडीने औषधोपचार होण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करुन ठेवा. पावसाळयात नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व विज वितरण कंपनीने सतर्क रहावे.तसेच विज वितरण कंपनीने अतिवृष्टीमध्ये विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी दुरुस्ती यंत्रणा विभागवार कार्यरत ठेवावी.बांधकाम विभागाने तालुक्यातील पुल व रस्त्यांची कामे पुर्ण झाली असल्यास ती वाहतुकीकरीता तातडीने खुली करण्याची कार्यवाही करावी.अतिवृष्टीच्या दृष्टीने गरज असलेल्या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. तसेच अतिवृष्टीच्या काळात वाहतूक ठप्प होणार नाही याबाबत आवश्यक त्या उपाय-योजना करण्याच्या दृष्टीने सतर्क रहावे.अतिवृष्टीच्या काळात तालुक्यातील सर्वच विभागातील प्रशासनाने सतर्क राहून मतदारसंघातील प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना ना.शंभूराज देसाई यांनी या बैठकीत दिल्या.

चौकट:- पाटणमध्ये ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच कार्यवाही करावी.

             पुरपरिस्थितीत पाटण शहरात नवीन एसटी स्टॅन्ड परिसरात ओढयाचे पाणी तुंबल्याने मोठया प्रमाणात पाणी रस्त्यावर येते व वाहतूकीस रस्ता बंद होतो. हा विषय अनेक वर्षे केवळ चर्चेला जात आहे. वर्षभर यासंदर्भात काहीच होत नाही आणि पावसाळा आला पाणी तुंबले की मग प्रशासनाची धावपळ सुरु होते. ही परिस्थिती खुप गंभीर आहे त्यामुळे ही परिस्थिती उद्भवू नये याकरीता जिल्हाधिकाऱ्यांनीची तातडीने कार्यवाही करावी अशा सुचनाही ना.देसाईंनी बैठकीत दिल्या.

 

 

Monday 14 June 2021

कोरोना बाधितांच्या संपर्कातील तपासण्या वाढवा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.

­­­­­­

 

           दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या पाहता कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या वाढवा याकरीता पोलीस विभागाची मदत घ्या. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील तपासण्या करण्यास कोणी नकार देत असेल तर कारवाई करा. कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या तपासण्या करण्याची मोहिमच तालुका प्रशासनाने हाती घ्या  अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

               पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांच्यावर करण्यात येणारे उपचार व वाढत्या कोरोना संख्येला रोखण्याकरीता आज दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार  योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,डॉ.श्रीनिवास बर्गे,डॉ.बहुलेकर,पाटणचे पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी,मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार,कोयनानगर कोवीड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिंदे आदींची उपस्थिती  होती.

                बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,तालुक्याचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. त्यामानाने तपासण्या फार कमी आहेत.आज तालुक्यात एकूण 472 कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील 95 गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर 251 कोरेाना बाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे तर पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी या तिन्ही कोरोना केअर सेंटरमध्ये 84 कोरेाना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.तर 22 कोरोना रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. तालुक्यात जी गांवे हॉटस्पॅाट आहेत.त्या गांवामध्ये कॅम्प लावून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या कराव्यात.तपासण्या वाढल्या पाहिजेत याकरीता कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका प्रशासनाने हाती घ्या.तालुका प्रशासनाने प्रत्येक गांवातील ग्रामस्तरीय समिती सक्रींय करा. कोरोना आल्यापासून तालुक्यात एकूण 6025 कोरोना बाधित झाले होते त्यातील 5286 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण खुप चांगले आहे. गर्दी टाळणे याकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणा काम करीत आहे.अजूनही कोरोना बाधितांची संख्या वाढू नये याकरीता आपण खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.असे सांगून ते म्हणाले,पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी याठिकाणी उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेटंरमध्ये तालुक्यातील कोरोना बाधितांना चांगले उपचार देण्याचे काम आपण करीत आहोत त्यामुळे पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांना बाहेरील खाजगी रुग्णालयात जाण्याची जास्त वेळ येत नाही. या तिन्ही कोवीड केअर सेंटरमध्ये औषधोपचाराकरीता काही आवश्यकता लागली तर याकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल निधीची कसलीही चिंता न करता तालुक्यातील कोरोना बाधितांना चांगले उपचार दया असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बैठकीत सांगितले.

चौकट:- तपासणी मोहिमेमध्ये कुणी अडथळा आणला तर सरळ गुन्हे दाखल करा.

            कोरोना बाधित व्यक्ती सापडल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्यामध्ये कुणी अडथळा आणत असेल किंवा प्रशासनाचे एैकत नसेल तर पोलीस विभागाची मदत घेवून सरळ अडथळा आणणाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशाही सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना दिल्या.

 

Tuesday 1 June 2021

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवारांनी केले गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे कौतुक. जिल्हयातील सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट केलेबद्दल फोनवरुन केले कौतुक.

 

          दौलतनगर दि.01 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-दि.28मे,रोजी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली सातारा येथे जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्मभूमीवर झालेल्या बैठकीत पोलीस विभागाने करावयाच्या कडक अंमलबजावणी बाबत केलेल्या सुचनानुसार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तात्काळ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक,अप्पर पोलीस अधिक्षक,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे समवेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची दुसरे दिवशी सविस्तर आढावा बैठक घेवून उपमुख्यमंत्री यांच्या सुचनांचे तंतोतत पालन करण्याचे सक्त आदेश दिले.आदेश देवून न थांबता गृहराज्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करुन दाखविली हे  ना.अजितदादा पवार यांना समजलेनंतर त्यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना फोन करुन त्यांच्या तत्परेचे कौतुक केले.

               सातारा येथे जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्मभूमीवर उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हास्तरीय प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बैठक झाली या बैठकीत सातारा जिल्हयातील पोलीस विभागाने कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी पोलीस विभागाला दिलेनंतर सातारा जिल्हयातील राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तात्काळ जिल्हयातील सर्व वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली व या बैठकीत दि.28 च्या बैठकीत उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी पोलीस विभागाला ज्या ज्या सुचना केल्या आहेत त्या सुचनांची अंमलबजावणी आजपासूनच जिल्हयात दिसली पाहिजे.पोलीस विभागाने कोणतीही हयगय न करता वाढत्या कोविड रुग्ण संख्येला रोखण्याकरीता आपले विभागामार्फत कडक अंमलबजावणी करावी असे सक्त आदेश दिले व जिल्हयातील पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहील या दृष्टीने ठोस पावले उचलली. पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील शहरांना /गावांना अचानक भेटी देवून पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कारवाईची प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करावी. मी स्वत: कधीही जिल्ह्यातील कोणत्याही शहरास अथवा गावांस अचानक भेट देवून पोलीस बंदोबस्ताची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बैठकीत सांगितले असल्याने जिल्हयातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

                सातारा जिल्हयातील पोलीस विभागाची तातडीने दुसऱ्या दिवशी सविस्तर आढावा बैठक घेवून ठोस कडक अंमलबजावणी करुन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पोलीस विभागाकडून रिर्झल्ट दाखविल्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना समजलेनंतर त्यांनी तात्काळ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना फोन करुन ना.देसाईंच्या तत्परतेचे कौतुक केले.