Tuesday 15 June 2021

आपत्ती काळातील व्यवस्थापनेकरीता शासकिय यंत्रणनेने सतर्क रहा. - ना.शंभूराज देसाईंच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना.


     

 

             दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-सातारा जिल्हयात सर्वात जास्त महाबळेश्वर बरोबर पाटण मतदारसंघाला पावसाळयात प्रतिवर्षी आपत्तीचा सामना करावा लागतो.प्रशासनाला आपले मतदार संघातील आपत्ती परिस्थितीची कल्पना आहे.आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपण प्रतिवर्षी आपत्ती व्यवस्थापन व नियोजनाची बैठक घेत असतो.आपत्तीच्या काळात मतदारसंघातील तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न करता आपत्ती व्यवस्थापनेकरीता सर्व शासकीय यंत्रणेने सतर्क रहा कोरोना परिस्थितीचा सामना करीत असलो तरी आपत्ती व्यवस्थापनाच्याही तयारीला लागा अशा सुचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील प्रशासनाला दिल्या.

                      गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक या शासकीय इमारतीत पाटण मतदारसंघातील आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात प्रशासनाची बैठक पार पडली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंग,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठ्ठले, सा.बा.कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे,पाटण प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कराड गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता पोतदार,कृष्णा खोरेचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख,ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रघूनाथ पाटील,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, व्ही.डी.शिंदे,जि.बांधकाम विभागाचे आर.एस.भंडारे,ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार,सपोनि चंद्रकांत माळी, सपोनि अजय गोरड,नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांचेसह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

             याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात गतवर्षी बऱ्यापैकी अतिवृष्टी झाली मात्र सन 2019 मध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी व महापुराचे संकट आले होते. कोयना धरणातील मोठया प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पुरपरिस्थिती उद्भवू शकते या दृष्टीने आपण नेहमी नियोजन करतो.राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्ध्दवजी ठाकरे यांनी नुकतीच मंत्रालयीन स्तरावर तातडीची बैठक घेऊन सुधारित उपाय-योजना करण्याकरीता शासनस्तरावर योग्य त्या सुचना दिल्या आहेत.कोयना धरणात गतवर्षीपेक्षा आजच्या तारखेला चार टीएमसी पाणीसाठा कमी आहे. तरीही यंदाच्या वर्षी कोयना धरण व्यवस्थापनाने धरणपाणलोट क्षेत्रात येणारी पाण्याची आवक आणि धरणातून करण्यात येणारा विसर्ग याची सांगड घालणे गरजेचे आहे. कोयना नदीकाठच्या गावामध्ये पुराचे पाणी शिरते त्याठिकाणी आताच पुररेषा निश्चित करुन दयावी पाटण शहरातील पुररेषा निश्चित झाली आहे मात्र बाकीची गांवे अद्यापही शिल्लक आहेत.पुराचा धोका असणाऱ्या कुटुंबा्रना योग्य स्थळी राहण्याची व्यवस्था आताच करुन ठेवावी. तसेच पुरामध्ये ज्या गांवामध्ये जाता येत नाही अशा लोकांना अगाऊ तीन महिन्यांचे धान्य देण्याची व्यवस्था करावी.अशा सुचना संबंधित विभागाला दिल्या.

                    ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे व पावसाळयातील साथीचे आजारांवर तातडीने औषधोपचार होण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करुन ठेवा. पावसाळयात नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व विज वितरण कंपनीने सतर्क रहावे.तसेच विज वितरण कंपनीने अतिवृष्टीमध्ये विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी दुरुस्ती यंत्रणा विभागवार कार्यरत ठेवावी.बांधकाम विभागाने तालुक्यातील पुल व रस्त्यांची कामे पुर्ण झाली असल्यास ती वाहतुकीकरीता तातडीने खुली करण्याची कार्यवाही करावी.अतिवृष्टीच्या दृष्टीने गरज असलेल्या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. तसेच अतिवृष्टीच्या काळात वाहतूक ठप्प होणार नाही याबाबत आवश्यक त्या उपाय-योजना करण्याच्या दृष्टीने सतर्क रहावे.अतिवृष्टीच्या काळात तालुक्यातील सर्वच विभागातील प्रशासनाने सतर्क राहून मतदारसंघातील प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना ना.शंभूराज देसाई यांनी या बैठकीत दिल्या.

चौकट:- पाटणमध्ये ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच कार्यवाही करावी.

             पुरपरिस्थितीत पाटण शहरात नवीन एसटी स्टॅन्ड परिसरात ओढयाचे पाणी तुंबल्याने मोठया प्रमाणात पाणी रस्त्यावर येते व वाहतूकीस रस्ता बंद होतो. हा विषय अनेक वर्षे केवळ चर्चेला जात आहे. वर्षभर यासंदर्भात काहीच होत नाही आणि पावसाळा आला पाणी तुंबले की मग प्रशासनाची धावपळ सुरु होते. ही परिस्थिती खुप गंभीर आहे त्यामुळे ही परिस्थिती उद्भवू नये याकरीता जिल्हाधिकाऱ्यांनीची तातडीने कार्यवाही करावी अशा सुचनाही ना.देसाईंनी बैठकीत दिल्या.

 

 

No comments:

Post a Comment