Tuesday 15 June 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी घेतला पाटण तालुक्यातील कोरोनाचा आढावा. बैठकीस सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती.

 

­­­­­

           दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्यात मागील दहा दिवसात बऱ्यापैकी कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आणि कमीही झालेली दिसत आहे प्रतिरोज सरासरी 30 ते 35 कोरोना बाधित सापडत असले तरी याच प्रमाणात कोरोनावर मात करुन बरे झालेल्यांची संख्या चांगली आहे.बाधितांची संख्या पहाता कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या वाढविण्याचे काम प्रगतीपथावर ठेवा.तपासण्या करण्याकरीता हॉटस्पॉट गांवामध्ये मेडीकल कॅम्प लावा अशाही सुचना केल्याने कॅम्पलाही सुरुवात झाली आहे.ही चांगली बाब आहे.कोरेाना मुक्तीच्या दिशेने प्रत्येक गांवाने नियोजन करावे याकरीता ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.

           दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक या शासकीय इमारतीत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांच्यावर करण्यात येणारे उपचार व पुढील नियोजनाकरीता जिल्हा व मतदारसंघातील प्रशासनाची बैठक पार पडली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंग,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठ्ठले,पाटण प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रघूनाथ पाटील, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार,सपोनि चंद्रकांत माळी,सपोनि अजय गोरड, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांचेसह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

          बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीस तालुक्याचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याबाबत नाराजी व्यक्त करीत तालुक्यात आज तारखेला किती कोरोना रुग्ण बाधित आहेत याची सविस्तर माहिती घेतली व कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. तालुका प्रशासनाने प्रत्येक गांवातील ग्रामस्तरीय समिती सक्रींय करण्याचे काम करावे.कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका प्रशासनाने हाती घेण्याच्या सुचना मागील बैठकीत केल्या होत्या त्यानुसार ही मोहिम सुरु आहे या मोहिमेत तालुका प्रशासनाने दिलेल्या उदिष्ठाप्रमाणे कार्य केल्यास नक्कीच कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल.पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी याठिकाणी उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेटंरमध्ये तालुक्यातील कोरोना बाधितांवर चांगले उपचार मिळत आहेत.या तिन्ही कोवीड केअर सेंटरमध्ये औषधोपचाराकरीता काही आवश्यकता लागली तर याकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल.जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ही व्यक्तीश: यासंदर्भात लक्ष घालावे असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बैठकीत सांगितले.

                पाटण तालुक्यात कालपर्यंत एकूण 454 कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील 76 गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर 356 कोरोना बाधित रुग्ण हे संस्थात्मक विलगीकरणासह पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी या तिन्ही कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.या तिन्ही कोरोना केअर सेंटरमधून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असलेबाबत ना.शंभूराज देसाईंनी समाधान व्यक्त केले.कोरोना आल्यापासून तालुक्यात एकूण 6122 कोरोना बाधित झाले होते त्यातील 5401 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.ही बाबही चांगली असल्याचे ते यावेळी म्हणाले. सकाळी 09 ते दुपारी 02 पर्यंत अत्यावश्यक सेवासह काही बाबींना लॉकडाऊनमधून सुट दिली असली तरी गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणेने सतर्क रहावे व अजूनही कोरोना बाधितांची संख्या वाढू नये याकरीता आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बैठकीत केले.

 

No comments:

Post a Comment