Thursday 17 June 2021

कालच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. प्रत्यक्ष पहाणी करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार. ­­­­­­

 


          

           दौलतनगर दि.17 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यात काल मोठया प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे तसेच ग्रामीण रस्ते,पाणी पुरवठा योजना,लहान मोठे पुल या सार्वजनीक मालमत्तेसह शेतीपिकांचे मोठया संख्येने नुकसान झाले आहे. दोन दिवस पावसाचा जोर कायम असून पाऊस कमी होताच मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीचे तालुका शासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ पंचनामे करुन घेण्यात यावेत. मी सध्या मुंबईत असलो तरी दोन दिवसात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष जागेवर जावून पहाणी करुन नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देणेकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मदत मिळवून देणार आहे.त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे काम हाती घ्या असे आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले आहेत.

          गेले दोन दिवस पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे.काल रात्री मोठया प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील विविध गावांना जोडणारे मोठे रस्ते, ग्रामीण रस्ते तसेच अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना व लहान मोठे पुल या सार्वजनीक मालमत्तेबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी साठल्याने शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे विविध बैठकांकरीता मुंबई येथे असल्याने त्यांनी जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडून झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेत पावसाचे प्रमाण कमी होताच पाटण तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुका प्रशासनाकडून हाती घेण्याच्या सुचना केल्या.

             यासंदर्भात बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,मी शासकीय विविध बैठकांकरीता मुंबई येथे असून काल रात्रीपासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.काल रात्री मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात सार्वजनीक मालमत्तेबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी साठले आहे त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या आहेत. मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून मुंबईत असलो तरी या दोन दिवसातील पावसामुळे कुठे कुठे नुकसान झाले आहे याची प्राथमिक नजरपहाणी करण्याच्या तसेच पावसाचा जोर कमी होताच प्रत्यक्ष जागेवर जावून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. मी स्वत: मुंबईवरुन येताच दोन दिवसात पाटण तालुक्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष जागेवर जावून सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेत पहाणी करणार आहे व सार्वजनीक मालमत्तेच्या पुर्नंबांधणीकरीता शासनाकडे आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर करुन पुर्नंबांधणीच्या कामांकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन आणणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळवून देणेकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मदत मिळवून देणार असल्याचेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment