Tuesday 1 June 2021

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवारांनी केले गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे कौतुक. जिल्हयातील सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट केलेबद्दल फोनवरुन केले कौतुक.

 

          दौलतनगर दि.01 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-दि.28मे,रोजी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली सातारा येथे जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्मभूमीवर झालेल्या बैठकीत पोलीस विभागाने करावयाच्या कडक अंमलबजावणी बाबत केलेल्या सुचनानुसार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तात्काळ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक,अप्पर पोलीस अधिक्षक,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे समवेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची दुसरे दिवशी सविस्तर आढावा बैठक घेवून उपमुख्यमंत्री यांच्या सुचनांचे तंतोतत पालन करण्याचे सक्त आदेश दिले.आदेश देवून न थांबता गृहराज्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करुन दाखविली हे  ना.अजितदादा पवार यांना समजलेनंतर त्यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना फोन करुन त्यांच्या तत्परेचे कौतुक केले.

               सातारा येथे जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्मभूमीवर उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हास्तरीय प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बैठक झाली या बैठकीत सातारा जिल्हयातील पोलीस विभागाने कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी पोलीस विभागाला दिलेनंतर सातारा जिल्हयातील राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तात्काळ जिल्हयातील सर्व वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली व या बैठकीत दि.28 च्या बैठकीत उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी पोलीस विभागाला ज्या ज्या सुचना केल्या आहेत त्या सुचनांची अंमलबजावणी आजपासूनच जिल्हयात दिसली पाहिजे.पोलीस विभागाने कोणतीही हयगय न करता वाढत्या कोविड रुग्ण संख्येला रोखण्याकरीता आपले विभागामार्फत कडक अंमलबजावणी करावी असे सक्त आदेश दिले व जिल्हयातील पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहील या दृष्टीने ठोस पावले उचलली. पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील शहरांना /गावांना अचानक भेटी देवून पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कारवाईची प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करावी. मी स्वत: कधीही जिल्ह्यातील कोणत्याही शहरास अथवा गावांस अचानक भेट देवून पोलीस बंदोबस्ताची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बैठकीत सांगितले असल्याने जिल्हयातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

                सातारा जिल्हयातील पोलीस विभागाची तातडीने दुसऱ्या दिवशी सविस्तर आढावा बैठक घेवून ठोस कडक अंमलबजावणी करुन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पोलीस विभागाकडून रिर्झल्ट दाखविल्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना समजलेनंतर त्यांनी तात्काळ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना फोन करुन ना.देसाईंच्या तत्परतेचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment