दौलतनगर दि.27(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण
तालुक्यातील मागील काही दिवसात बऱ्यापैकी
कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आणि कमीही झालेली दिसत आहे. बाधितांची संख्या पहाता कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील
व्यक्तींच्या तपासण्या वाढविण्याचे काम प्रगतीपथावर ठेवणे गरजेचे आहे. तसेच कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्यापही
पूर्णपणे ओसरलेली नसताना तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्याची पुर्वतयारी करणे गरजेचे असून मागील आठवडयापासून निर्बंध कमी
केल्याने ठिक-ठिकाणी गर्दी होताना दिसत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने
निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबाजवणी करावी,अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांच्यावर करण्यात येणारे उपचार व वाढत्या कोरोना
संख्येला रोखण्याकरीता
आज दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक
झाली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग
तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,डॉ.श्रीनिवास बर्गे,पाटणचे पोलीस
निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
अजय गोरड, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,पाटण ग्रामीण
रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,मल्हारपेठ
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार आदींची उपस्थिती होती.
बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीस तालुक्यात किती
कोरोना रुग्ण बाधित आहेत याची सविस्तर माहिती घेतली व कोरोना रुग्णांची संख्या वाढू
नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना करत राज्याचे मुख्यमंत्री
ना.उध्दवजी ठाकरे यांनी कोविड 19 चा संसर्ग वाढत असलेल्या जिल्हयांची आढावा बैठक घेत
कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नसताना ब्रेक द चेन अंतर्गत
गेल्या दोन आठवडयापासून वेगवेगळया पातळीवर निर्बंध शिथिल करत आणले आहेत.त्यामुळे बाजारपेठांच्या
ठिकाणी,विविध दुकानांमध्ये खरेदी करण्याकरीता मोठया प्रमाणांत गर्दी होताना दिसत असल्याने
कोरोना संसर्ग पुन्हा मोठया प्रमाणांत वाढण्याची
भिती असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे
निर्देश त्यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मी कालच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची
बैठक घेऊन जिल्हयातील कोरोना संदर्भातील मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांनी आढावा
बैठकीत जे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत याची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या
सुचना केल्या.त्याचबरोबर कोरोना संसर्ग रोखण्याबरोबर तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला
करण्याची पुर्वतयारी करणे गरजेचे असून जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला
दिल्यानंतर तालुका प्रशासनाने शासनाच्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या
सूचना अधिकाऱ्यांना देत प्रत्येक गांवातील ग्रामस्तरीय समिती सक्रींय करण्याचे काम
करावे.कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहिम तालुका
प्रशासनाने हाती घेण्याच्या सुचना मागील बैठकीत केल्या होत्या त्यानुसार ही मोहिम सुरु
आहे या मोहिमेत तालुका प्रशासनाने दिलेल्या उदिष्ठाप्रमाणे कार्य केल्यास नक्कीच कोरोना
रुग्णांची संख्या कमी होईल. पाटण,
दौलतनगर व ढेबेवाडी याठिकाणी उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेटंरमध्ये तालुक्यातील
कोरोना बाधितांवर चांगले उपचार मिळत आहेत.या कोवीड केअर सेंटरमध्ये औषधोपचाराकरीता
काही आवश्यकता लागली तर याकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अत्यावश्यक सेवासह
काही बाबींना लॉकडाऊनमधून सुट दिली असली तरी विनाकारण फिरणाऱ्यावर पोलीस विभागाने कारवाई
करावी,लग्न समारंभ,हॉटेलमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत आहे का यावरही लक्ष
ठेवत गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणेने सतर्क रहावे व अजूनही कोरोना बाधितांची
संख्या वाढू नये याकरीता आपण सर्वांनी सतर्क रहावे,असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी शेवठी बैठकीत केले.
No comments:
Post a Comment