Tuesday 15 June 2021

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सारथ्य करणारे असेही “मंत्री” जिल्हयातील प्रमुख तीन अधिकाऱ्यांना बरोबर घेत गृहराज्यमंत्र्यांनी केले गाडीचे सारथ्य.


     

             दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-सातारा जिल्हयाचे सुपुत्र,महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आपण राज्याचे गृहराज्यमंत्री आहोत असा कधीच डामडौल न करता नेहमी वेगळेपण करुन जनतेची मने जिंकुन घेताना सातारा जिल्हयातील जनतेने अनेकदा पाहिले आहे.आज असेच वेगळेपण दाखवित त्यांनी सातारा जिल्हयातील प्रशासनातील प्रमुख असणारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे सीईओ या प्रमुख तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्र स्वत:च्या गाडीत बसवित स्वत:च गाडीचे सारथ्य केले. स्वत: गृहराज्यमंत्री आपल्याला घेवून गाडीचे सारथ्य करतात हे पाहून हे तिन्ही प्रशासकीय अधिकारी थोडा वेळ चकीत झाले. पण या कृतीमुळे गृहराज्यमंत्र्यांनी जनतेची मने तर जिकंलीच त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेतील सर्वच वरीष्ठ अधिकाऱ्यांचीही मने जिकंली.

                निमित्त होते पाटण विधानसभा मतदारसंघातील आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात प्रशासनाच्या आढावा बैठकीचे या बैठकीकरीता जिल्हाधिकारी शेखर सिंग,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे जिल्हा प्रशासनातले प्रमुख तीन अधिकारी उपस्थित होते.आपत्तीची बैठक संपलेनंतर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंसमवेत या तिन्ही अधिकाऱ्यांनी दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, स्मारकातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे छायाचित्रांचे दालन त्याचबरोबर स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांची पहाणी केली. त्यानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते त्यांचे निवासस्थानी ठेवला होता.निवासस्थानाकडे जाताना मंत्री ना.देसाईंनी त्यांच्या गाडीत जिल्हाधिकारी यांना आपल्या जागेवर बसवित ते स्वत: वाहकाच्या जागेवर बसले आणि पोलीस अधिक्षक व सीईओ यांना मागे बसण्यास सांगून गाडीचे स्वत:च सारथ्य केले. यावेळी गृहराज्यमंत्री यांचा सर्व ताफा गृहराज्यमंत्र्यांच्या गाडीच्या मागे होता. गृहराज्यमंत्री स्वत: प्रशासनातील तीन अधिकाऱ्यांना घेवून गाडी चालवित आहेत हे पाहून याठिकाणी उपस्थित सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भूवया उंचावल्या आणि गाडीत बसलेले हे तिन्ही अधिकारी थोडावेळ चकीत झाले. निवासस्थानी आणून ना.शंभूराज देसाईंनी या तिन्ही अधिकाऱ्यांचा पाहूणचार करीत त्यांचा मानाचा फेटा, शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.

                   प्रशासनातील दांडगा अनुभव असणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा जिल्हा असो वा राज्य किंवा तालुकास्तरावरील वरीष्ठ अधिकारी असेा त्यांचेबरोबर नेहमी सलोख्याचेच संबध जिल्हयाने पाहिले आहेत.अनेकवेळा जिल्हास्तरीय बैठकांमधून चुकलेल्या अधिकाऱ्यांला सुनवत त्यांचेकडून जनतेच्या हिताचे काम त्यांनी करुन घेतले आहे तर वेळप्रसंगी अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून कोणत्याही गोष्टीतून कसा मार्ग काढता येईल हे ही त्यांनी दाखवून दिले आहे.जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांमध्ये हुशार आमदार,मंत्री म्हणून गृहराज्यमंत्री यांचा दरारा नेहमीच पहावयास मिळतो त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना बरोबर घेवून काम करणारा मंत्री म्हणूनही त्यांचा नावलौकीक आहे. आजच्या या कृतीमुळे प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचे सारथ्य करणारे असेही मंत्री यानिमित्ताने सातारा जिल्हयातील प्रशासनातील सर्व अधिकारी व जनतेला गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या रुपाने पहावयास मिळाले.

 

No comments:

Post a Comment